तुमचे न्यू इयर रिसोल्युशन काय आहे?

Submitted by कटप्पा on 28 December, 2018 - 19:45

माझे असे आहे की फालतू धागे काढणे बंद करेन.
तुमचे काय आहे?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो
६ महिन्यात ८२ वरून ५० किलो झाले होते माझे वजन, सो मला परत एकदा किमान ४८-५० करायचे आहे☺️

मी ३२ किलो वजन कमी केले तर सुईच्या भोकातून दोरयासारखा आरपार जाईन Happy

जोक्स द अपार्ट, वजन जे सिन्सिअरली कमी करतात त्यांचे कौतुक वाटते. कारण आजूबाजूला आणि घरातच हे न जमणारया कैक व्यक्ती पाहतोय.

मला वजनाचे टेंशन नसले तरी आता रोज सकाळी ऑफिसला जायच्या आधी नयनरम्य निसर्गाच्या सानिध्यात किमान पाऊण ते एक तास चालायचा विचार आहे.
३१ च्या पार्टीनंतर १ तारखेला पचका नको म्हणून आधीच सुरुवात करणार होतो. पण साडेसहा झाले तरी बाहेर अंधारच असतो. उगाच ते कुत्र्यांचे अमानवीय अनुभव घ्यायला नको म्हणून जात नाही. सातला उजाडते पण मग ऑफिसला लेट होईल. म्हणून सध्या थंडीचे दिवस छोटे आणि रात्र मोठी आहे तोपर्यंत विकेंड शनिवार रविवारचे चालणे सुरू केले आहे. अगदी आजही मस्त फेरफटका मारून आलो. चालताना मोबाईलमधून फोटो टिपायचे आणि फेसबूकवर टाकायचे. त्यावरचे लाईक्स हुरूप वाढवतात तसेच ईतरांनाही सकाळी उठून फिरायला प्रेरीत करतात. ही एक प्रकारची समाजसेवाच आहे.

WOW...32 किलो. याचा एक सेपरेट धागा काढला तर लोकांना मदत होईल खरच. 90% लोकांचे रिसोल्युशन वजन कमी करणे हेच असते. घ्या मनावर.

६ महिन्यात ३२ किलो वजन कमी झाले?>>>>> VB, डायटेशियनच्या सल्ल्यानुसार करतेय का ? ५ किलो महिन्याला हा रेट बराच जास्त वाटतोय.

याचा एक सेपरेट धागा काढला तर लोकांना मदत होईल खरच. .... +१.

६ महिन्यात ३२ किलो वजन कमी झाले?!!
>>
अभीनंदन! टीप्ससाठी धागा काढा एक!

बाकि, आमचे जुने राहिलेलेच संकल्प पुर्ण करणे हाच एक संकल्प आहे Happy

Vb सिम्पली ग्रेट....
तुमच्या पावलांचा फोटो टाका, इकडून चरणस्पर्श करतो

माझा संकल्पः हापिसात माबो न उघडणॅ, लय टीपी व्हतो राव, कन्ट्रोल जातो ना

Vb सिम्पली ग्रेट....
तुमच्या पावलांचा फोटो टाका, इकडून चरणस्पर्श करतो+१११११११

काय किल्ली, २०१९ चा पहिला दिवस अर्धाही नाही झाला अजुन तर लगेच फिरवाफिरवी शब्दांची? असे संकल्प सोडणारे आणि सोडून देणारे हवेत. Lol Lol Lol

लगेच फिरवाफिरवी शब्दांची>> किल्ली फिरवण्यासाठीच असते, नाहीतर कुलुपं उघडत नाहीत Proud
नावाला जागले हो

धन्यवाद लोकहो, हो ३२ किलो कमी केले अन आजारपणानंतर ५वाढले देखील. पण धागा काढणे किंवा काही टिप्स देणे नाही जमत. मी याआधी कुठल्यातरी धाग्यावर लिहिले होते की खूप जास्त जन्क फूड खाल्यामुळे माझे वजन वाढले होते, सो बाहेरचे खाणे पूर्णपणे बंद केले, सकाळ-संध्याकाळ ४०-४५ मिनिट प्रत्येकी चालायची अन जेवण खूप कमी केले होते.

उद्यापासून परत चालू करतीये सगळे, बघू कितीपत यश येतेय☺️

सो बाहेरचे खाणे पूर्णपणे बंद केले, सकाळ-संध्याकाळ ४०-४५ मिनिट प्रत्येकी चालायची अन जेवण खूप कमी केले होते.
>>>>>

हे माझ्या एका एक्स गर्लफ्रेंडने केले होते.
कसलाही वेगळा डाएट न करता जंक फूड आणि वजववाढवू पदार्थ बंद केले होते.
ऑफिस सुटल्यावर ती घरी सव्वा ते दिड तास चालत जायची. एवढाच वेळ मला ट्रेनच्या प्रवासात लागायचा. मी तिला फोनवर तास दिड तास गप्पा मारून कंपनी द्यायचो. आमचा एकमेकांना रिलायन्स टू रिलायन्स कॉल फ्री होता त्याचा फायदा उचलायचो.
सहा महिन्यात वीस ते पंचवीस किलो वजन तिनेही घटवले. ते देखील गोबरया गालांनी चेहरयाला येणारा गोडवा कुर्बान न करता Happy

32 किलो वजन कमी ?????? धक्काच बसला ऐकून. म्हणजे अशी जंगी वजनं कमी झालेल्या गोष्टी फेसबूकवर वाचतो त्या खऱ्या असतात तर.
पण जंक फुडने एवढे 30+ वाढतात? एवढं भारी भरकम वजन मेडिकल कंडिशन्स मध्ये वाढतं पण जंक फूड ??????? तसं असेल तर VB तू तुझा वजन वाढणे आणि नंतर 32 किलो कमी करणे हा अनुभव लिहीचच. इथल्या सगळ्या जंक फूड लव्हर्सना अलर्ट आणि वजन कमी करणाऱ्यांना motivation म्हणुन.

तर VB तू तुझा वजन वाढणे आणि नंतर 32 किलो कमी करणे हा अनुभव लिहीचच. इथल्या सगळ्या जंक फूड लव्हर्सना अलर्ट आणि वजन कमी करणाऱ्यांना motivation म्हणुन+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

गेली वर्षभर एक कथा लिहतोय, सातत्य नाही.. वेळ मिळाला कि वही घेऊन बसतो.. कच्चा मसुदा तयार आहे..काही पाने लिहली आहेत.. पण निदान यावर्षी पूर्ण करेन..

मला या वर्षी किमान ५ किलो तरी वजन वाढवायचे आहे अन् पन्नाशी गाठायची आहे Lol ( वजनाची ). प्लिज टीप्स द्या कुणीतरी Lol

त्याने सगळ्यांचे नाही वाढत च्रप्स, निदान तरुण वयात.
मी एकेकाळी खूप प्रयत्न केला, फुल क्रीम मिल्क सकाळ संध्याकाळ बदाम, काजू पावडर, अश्वगंधा टाकून. नाही म्हणायला अर्धा किलो फरक दिसला, पण तेव्हा घरी काटा नव्हता, आणि बाहेर वजन करताना पोटात अन्न, शरीरात पाणी तेवढेच असण्याची शक्यता अजिबात नव्हती.
तीन चार महिन्यांनी नाद सोडून दिला.

मी पण यंदा ५ किलोने वजन वाढवेन म्हणतो म्हणजे ७५किलोची फाइट / कुमिते कटेगरीमध्ये फिट बसेन यंदाच्या कराटे स्टेट टूर्नामेंटला.
-----------
च्रप्स ते वजन वाढवेन म्हटले की वाढले असे इतके सोप्पे नसते Happy तेही बाकी सर्व फिजिक एकदम फिट ठेवून !
आणि काहीजण कितीही खाल्ले तरी FCR कमी असल्याने कमी वजनाचे राहु शकतात. आपल्या सारख्या ओबेस लोकांना त्यांच्या बारिकपणाचा हेवा वाटतो तसा त्यांनाही आपला स्थूलपणा थोड़ा मिळेल का म्हणून हेवा वाटत असतो Proud

Pages