तुमचे न्यू इयर रिसोल्युशन काय आहे?

Submitted by कटप्पा on 28 December, 2018 - 19:45

माझे असे आहे की फालतू धागे काढणे बंद करेन.
तुमचे काय आहे?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह सामो, हे छान आहे.
रोज सूर्यनमस्कार करणार ठरवते, पण सातत्य नाहीये त्यामुळे सध्यातरी हेच रीसोल्युशन Happy चला लागते करायला आताच.

माझा २०२१चा संकल्प व्यवस्थित पा ळला गेला नाही
आता काय
ज्यांनी आधीचे संकल्प पूर्ण केले त्यांचे अभिनंदन
इथे लिहा बरं

कटप्पांनी धागे काढणे खरंच बंद केले..
माझे २०२१ चे रेझॉल्युशन होते नवा आणि बेटर जॉब मिळवणे जो अगदी इतका मरमर प्रयत्न करून नोव्हेंबरात मिळाला Happy
जे जेंव्हा नशिबात असते ते तेंव्हाच होते..

२०२२ चे रेझॉ. घरच्यांना भेटणे.. कोरोना मुळे २ वर्ष भेटगाठ नाही Sad

लग्न टाळणे हे माझे दोन वर्षांपासुन काटेकोर अंमलबजावणी होत असलेले रिसोल्युशन आहे. ह्या वर्षीसुद्धा यशस्वी होईल अशी आशा आहे.
Submitted by जिद्दु on 2 January, 2021 - 14:05 > still going strong

यावर्षी:
1. जिवंत राहणे
2. कुटुंब आणि जवळच्याना शक्य तितके सुरक्षित ठेवणे.
3. अजून 20 वर्षं नोकरी चालू ठेवता येईल आणि त्यात आनंद वाटेल इतकी नवी स्किल्स शिकत राहणे.
4. काहीही को मॉरबीडीटी मागे लावून न घेणे.
(इतकं जमलं तर बाकी पुढच्या वर्षी पाहण्यात येईल).

नो रिझोल्युशन....
जमेल तितके आनंदी रहाणे. (हे वर्ष आयुष्यातलं सगळ्यात दुःखद, वेदनादायी होतं. )

मायबोलीवर कथा विभागात डोकावण्याची फ्रिक्वेन्सी वाढवणार आहे. संकल्प बिंकल्प नाही. जसे जमेल तसे.
सर्वांना नवीन वर्षाच्या आणि खिसमसच्या शुभेच्छा !

अजून 20 वर्षं नोकरी चालू ठेवता येईल आणि त्यात आनंद वाटेल इतकी नवी स्किल्स शिकत राहणे.>>> कमेंडेबल आणि शुभेच्छा त्या साठी. ह्या विश मधे तुझी पहिली विश आपोआप पुर्ण होतेय Happy
मला तर ४५ मधे अरली रीटायर होणार इतकी इंडीपेंडंसी आली अशी स्वप्नं पडतात अधून मधून..असो अजून वेळ आहे.

धन्यवाद हपा.

महिन्यात किमान दोन सुट्ट्या घेणार. २०२१ मध्ये माझ्या काही सुट्ट्या न वापरल्याने lapse झाल्या. तरी शेवटचे २ आठवडे सुट्टी टाकलीय आता.
स्वतःच घालून घेतलेली बंधने झुगारून "एन्जॉय लाईफ" मोड मध्ये जगणार. बादलीत कोमट पाणी घेऊन आंघोळ करण्याऐवजी गरमागरम शॉवर ने आंघोळ करणार. वडापाव, समोसे, कांदाभजी, फ्रेंच फ्राईज हादडणार. हे सगळं बॅलन्स करायला गरज पडली तर व्यायाम पुन्हा चालू करणार. प्रत्येक लाँग विकेंड ला गाडी घेऊन कुठेतरी जवळपास जाणार. महिन्यातून किमान एकदा सहकुटुंब बाहेर जेवायला जाणार आणि नेहमीच्याच गोष्टी ऑर्डर न करता प्रयोगशील राहणार. मुलांना उपदेश कमी करणार.
आणि नंतर गोष्टी सुचत जातील तशी लिस्ट वाढत जाईल Happy

संकल्प बद्दल:
आता वाचल्यावर लक्षात आलं की हे खूप जणांना डिप्रेसिंग आणि माझ्याबद्दल काळजी वाटेल असं वाटू शकेल.(#प्रवचनपोस्ट डिस्क्लेमर)

1. जिवंत राहणे:
सध्या व्हॅकसीन्स घेऊनही ब्रेक थ्रू इन्फेक्शन्स आहेत.जग नॉर्मल ला जायचा प्रयत्न करतंय, आणि सामान्य(फार वाचन न करणाऱ्या) लोकांच्या मनात 'व्हॅकसीन म्हणजे अमरपट्टा' असं चित्र निर्माण होऊन दुकानदार, आजूबाजूला कोणीही मास्क वापरत नाहीयेत.ओमीक्रॉन बद्दल रोज विरुद्ध संशोधनं समोर येतायत.
लोकांनी असं वागूनही सर्व नियंत्रणात राहील, आणि कोव्हीड ची तीव्रता कमी होईल, सर्व व्हेरीयंट शी लढेल अशी व्हॅकसीन बनायला अजून 5 वर्षं जातील.तोवर स्वतः आणि कुटुंबाला जिवंत आणि निरोगी ठेवणे.म्हणजे बाकी सर्व गोल्स कडे वाटचाल (संकल्प न करता) करता येईल.
2. कुटुंब आणि जवळच्याना शक्य तितके सुरक्षित ठेवणे.
(सेम ऍज कारण 1)
3. अजून 20 वर्षं नोकरी चालू ठेवता येईल आणि त्यात आनंद वाटेल इतकी नवी स्किल्स शिकत राहणे.
हे गोल आधीपासूनच आहे.आजूबाजूला खूप बायका या न त्या कारणाने अतिशय यशस्वी करियर मधून ब्रेक घेताना बघतेय.माझ्या आईबाबांच्या पिढीत सरकारी नोकरीत रिटायरमेन्ट पर्यंत काम केलेल्या बऱ्याच स्त्रिया आहेत.पण आता चित्र परत बदलतंय.त्यामुळे एका वर्किंग बाई ने मध्ये कोणतेही ब्रेक न घेता नोकरी करत रिटायर होणे हेही एक नैसर्गिक प्रवाह न बनता एक संकल्प म्हणून प्लॅन करून पूर्ण करण्याचं उदिष्ट झालं आहे.
4. काहीही को मॉरबीडीटी मागे लावून न घेणे.
हे गोल सुद्धा आधीपासूनच आहे.पण सध्याच्या काळात जास्त महत्वाचं .2021 मध्ये काही न काही कारणाने अपेक्षेपेक्षा जास्त वेळा बाहेरचं खाणं झालंय.हे साध्य करण्यात 2022 मध्ये ही वारंवारता कमी करणे.वेळेत झोपणे.wfh मुळे आयुष्यातून गेलेल्या बऱ्याच गोष्टी परत चालू करणे.

हे सर्व 2022 मध्ये काहीही खाडे न करता जमवलं तर 2025 पर्यंत मनातली बाकी गोल्स मी पूर्ण करणार आहेच.

<तोवर स्वतः आणि कुटुंबाला जिवंत आणि निरोगी ठेवणे.>

सांगितल्या गेलेल्या सर्व प्रकारच्या प्रिकॉशन्स घेऊनही कोव्हिड झालेला पाहिला आहे. आता घरातल्या घरातही मास्क लावून फिरायचं बाकी राहिलंय. सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नसतात.

<काहीही को मॉरबीडीटी मागे लावून न घेणे.> हे जीवनशैलीमुळे मागे लागणार्‍या व्याधी टा ळण्यासाठी आवश्यक बदल करणे असं लिहिता येईल.

मी १४ महिन्यांच्या गॅपनंतर परवापासून सकाळी चालायला जायला सुरुवात केली. सध्या एकच राउंड . ३५ मिनिटे होतात. पुढल्या आठवड्यापासून वाढवेन. बरोबर सहाला बाहेर पडतोय त्यामुळे सध्या तरी अजिबात गर्दी नाहीए.

विकत घेऊन पडून असलेल्या पुस्तकांपैकी दर पंधरवड्याला एक पुस्तक वाचून संपवायचा बेत आहे. लायब्र रीतून आणलेलं पुस्तकही एका आठवड्यात संपवायचा विचार आहे. आतापर्यंत समोर दिसेल त्यातली पुस्तकं निवडून उचलत असे. या वर्षी एक वाङ्मयप्रकार निवडून त्याचं वाचन करायचा बेत आहे.
रोज ४५ मिनिटे घरातला एकेक कोपरा , कप्पा निवडून साफसफाई आणि अडगळ काढणे.
एक खोकं भरून कॅसेट्स आताच भंगारवाल्याला दिल्या. त्याने त्या तो पुढे कशा तोडणार आहे त्याचं डेमोही दिलं.
पुस्तकांपैकीही एकदाच वाचण्याजोगी पुस्तकं देऊन टाकायची आहेत.

माझे संकल्प
- सध्या रोज १०००० स्टेप्स चालतो ते हळु हळु १५००० पर्यंत घेउन जायचे आहे.
- मराठी पुस्तके वाचणे बंद केली होती. ते परत चालु करायचे आहे. (कालच तीन पुस्तके आणली आहेत.)

चंपक, चांदोबा, ठकठक, मोटु पतलु घसीटा आदींचे वाचन थांबवणे आणि
मध्यरात्रीची मुंबई, इब्लिस, हैदोस असे चौफेर वाचन वाढवणे. टीव्हीवर मस्तराम सारखे शैक्षणिक कार्यक्रम पाहणे.
हे सर्व मायबोलीवर येऊन सांगणे.

१. स्वतःची काळजी घेणे -
गेले एक दोन महिने रात्री लवकर जेवण्याचा प्रयत्न करतेय . अजून नियम बनवला नाही कारण तो पाळता येईलच असं नाही .
जेव्हा अगदीच शक्य नसते तेन्व्हा उशीरा जेवते , नाहीतर ८ च्या अगोदर खाउन होतं
हा दिनक्रम चालू ठेवण्याचा विचार आहे .

केसांची पार वाट लागली आहे . नियमत निगा राखेन असे ठरवलेय

२. रोजच्यारोज जमेल असं वाटत नाही , पण महिन्यातून एकदातरी अडगळ साफ करेन .
३. वाचन परत चालू करायचे आहे . लॉकडाउनच्या काळात , वाचन कमी वेबसिरिज जास्त झाल्यात .

सध्यातरी ईतकेच .

रानभुली, नुसते डोकाऊ नकोस, लिहित रहा! >>> मनापासून आभार. प्रयत्न तर नक्कीच करीन.
( लिहीत असताना जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंतचा ताण, लागणारा वेळ नकोसा होतो. पण सुचल्यावर नाईलाज असतो. Happy ).

माझे संकल्प
==========

१. सर्वांना मदत करणे
२. घरदार विकून अडल्या नडलेल्यांना आर्थिक मदत करणे.
३. बेघरांना घर देणे
४. ज्या गावाला रस्ते नाहीत तिथे मोफत बुलेट ट्रेन सुरू करणे
५. डोंगराळ भागात मोफत विमान सेवा सुरू करणे
६. जगातील सर्व पुस्तके वाचणे आणि तितक्याच पुस्तकांची भर घालणे.
७. अशिक्षितांना घरोघरी जाऊन वाचायला शिकवणे.
८. सर्वांना रोजगार मिळवून देणे
९. मायबोलीवर जितका वेळ घालवाल त्या हिशेबाने प्रत्येका सदस्याला फूल ना फुलाची पाकळी देणे.
१०. सिक्स पॅक्स बनवणे, मॅराथॉन मधे पहिला येणे, भालाफेकीत गोल्ड मेडल मिळवणे, बॉक्सिंग चँपियन बनणे, बॅडमिंटन आणि लॉन टेनिस मधे सुवर्णपदक आणणे, या वर्षी क्रिकेटचा वर्ल्डकप भरवून तो जिंकणे.
११. राजकीय पक्ष काढणे व निवडणुका जिंकून सत्तेत येणे.
१२. सत्तेत आल्यावर मायबोलीवरच्या चर्चा वाचून जे काही ठरेल त्याची अंमलबजावणी करणे
सध्या इतकेच.

माझे संकल्प

१. कपाटाच्या गंजलेल्या बिजागऱ्या एखाद्या चांगल्या सुताराकडून बदलून घेणे
२. सुकडू सुताराचे थकलेले पैसे देणे
३. गावात सरकारी गुरांचा दवाखाना व्हावा यासाठी शासनाचा पाठपुरावा करणे
४. मायबोलीकर किमान ३ नवे लेख लिहिणे

ह.पा.
संकल्प आवडले आहेत
गुरांचा दवाखाना यात चांगला अपडेट झाल्यास शेअर करा.

माझे या वर्षाचे रिझोल्युशन्स...
1. सकाळी 5 ला उठून मंडोलिन आणि गिटार रियाझ सुरु करेन...
2. या वर्षी गूगल जॉईन करायचा प्लॅन आहे.. त्यादृष्टीने प्रेप चालू करेन...
3. मागच्या(2020)मध्ये बॉडी फॅट 15 पर्यंत नेले... या वर्षी बिलो 10 आणून ऍब्स काढायचा प्लॅन आहे..
4. स्विमिंग मधला बटरफ्लाय टाईप आत्मसात करायचा आहे...त्यानुसार प्रॅक्टिस सुरु करेन...
५. भरपूर टाईप्स ची दारू पिणार आणि फुल्ल एन्जॉय जेंव्हा पार्टी करेन तेंव्हा...

१ जानेवारी.. सकाळचे साडेसात.. आणि काल तीनचा झोपलेलो मी आजही घराबाहेर वॉल्कला पडतोय.. जिंकलो Happy

Pages