तुमचे न्यू इयर रिसोल्युशन काय आहे?

Submitted by कटप्पा on 28 December, 2018 - 19:45

माझे असे आहे की फालतू धागे काढणे बंद करेन.
तुमचे काय आहे?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे ५ किलो फारच विनोदी झालेय आता Proud

पण माझ्यामते, वजन कमी करणे वा वाढवण्यापेक्षा जास्त गरजेचे आहे योग्य वजन असणे. काही बारीक सडपातळ व्यक्ती आकर्षक दिसतात तर काही आजारी/रोगट, हेच उलटे जाड व्यक्तींसाठी लागू आहे. सो आपले वजन हे उंची अन वयानुसार योग्य तर असायला हवे पण सोबत त्यामुळे आपल्या आकर्षक दिसण्यावर काही फरक पडतो का? हेही तितकेच महत्त्वाचे. अर्थात यासाठी वजनाव्यतिरिक्त अजूनही गोष्टी आहेत म्हणा☺️

माझी एक कलीग आहे अंडर वेट, तिची खूप इच्छा आहे वजन वाढवायची, काहीजण तिला तसे सांगतात देखील. पण मी तिला सांगितले की वजन वाढवायला काही वेगळे प्रयत्न करू नको, बरेचदा वयानुसार ते आपोआप वाढते. अन आपली कॉर्पोरेट लाइफस्टाइल तर नक्कीच वजन वाढवते, सो जोवर बारीक आहेस, एन्जॉय कर, शेवटी निरोगी असणे जास्त महत्वाचे नाही का☺️

कामामुळे सरत्या वर्षांत मायबोलीला हवा तेवढा वेळ देता आला नाही.. नवीन वर्षात वेळेची ही उणीव भरून काढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करायलाच हवे असे ठरवले आहे.
ह्या वर्षात मायबोलीला भरपूर वेळ देऊन वाचन, चर्चा आणि प्रतिसाद ह्यात सहभाग वाढवण्याचा निश्चय केला आहे.

१. सोशल मेडीया वर कमी टाइम पास करणार
२. जास्त पुस्तके वाचणार
३. रोज योगा करणार
४. तोन्डावर नियन्त्रण ठेवणार (खाणे , बोलणे)

हिरो असुन झिरो झालेल्या शाहरुखचे सिनेमे रिव्यु वाचल्याशिवाय बघणार नाही. आता उरला आठवणीपुरता.

आपल्या सारख्या ओबेस लोकांना त्यांच्या बारिकपणाचा हेवा वाटतो तसा त्यांनाही आपला स्थूलपणा थोड़ा मिळेल का म्हणून हेवा वाटत असतो..... +१११११११११११११११

माझे 2020 चे कोणतेही संकल्प पाळले गेलेले नाहीयेत Happy
त्यामुळे यावर्षी आला दिवस मस्त काढायचा आणि दिवसाच्या शेवटी दिवसभर काहीतरी चांगलं केल्याची तृप्तता मनात घेऊन झोपायचं इतकाच संकल्प आहे.

रोज न कंटाळता योगा करायचा आणि थोडेसे स्वार्थी बनून स्वतःसाठी जगायचे..मागच्या वर्षी राहून गेलेले आणि ह्या वर्षीच डबल जगायचे आहे.

लग्न टाळणे हे माझे दोन वर्षांपासुन काटेकोर अंमलबजावणी होत असलेले रिसोल्युशन आहे. ह्या वर्षीसुद्धा यशस्वी होईल अशी आशा आहे.

या वर्षी तिसरे अपत्य प्लान करायचे आहे.
>>> मस्त मस्त मस्त... शुभेच्छा तुम्हाला... लवकर गोड बातमी द्या...

तिसरे अपत्य > छान!
आम्हाला दोन आहेत ती सांभाळताना नाकीनऊ येतंय Happy

या वर्षी तिसरे अपत्य प्लान करायचे आहे. >>>> यावर प्रतिसाद देणे म्हणजे फारच पर्सनल गोष्टीत नाक खुपसणे होईल. पण आगाऊ स्वभावानुसार बोलतेच.
आहे त्या दोघांच्या वेळेत (आणि कदाचित प्रेमात सुद्धा) वाटेकरी आणण्याऐवजी आहे त्या दोघांसाठी पेट आणा. मुलांवर आणि एकूणच कुटुंबाच्या मनस्वास्थ्यावर खूप पॉझिटिव्ह फरक पडतो.
आणि हो, बऱ्याच कॉर्पोरेट मध्ये तिसऱ्या अपत्यासाठी paternity leave मिळत नाही, चाईल्ड education allowance आणि इतरही बेनेफिट्स मिळत नाहीत. (मग मागाहून तक्रार करायला नवीन धागा येईल म्हणून आधीच अलर्ट दिला Wink )

तिसरे अपत्य प्लॅन करतो म्हटल्यावर ज्या प्रतिक्रिया माझ्या डोक्यात आल्या नेमक्या तश्याच वर वाचल्या आणि त्या वाचून काहीतरी जुने आठवले. मी नव्या मुंबईत ज्या पार्लरमध्ये जाते तिथली मुलगी गोवन ख्रिस्ती आहे. मी जायला लागले तेव्हा अविवाहित तरुणी होती. नंतर एकदा गेले तेव्हा नुकतेच लग्न झालेले दिसले. यथावकाश पहिले मूल, मग दुसरे मूल... गेल्या वर्षी तिसर्याची तयारी दिसली. तेव्हा वर ज्या प्रतिक्रिया आल्या तशाच माझ्या डोक्यात आल्या. मुलांची शाळा, खर्च वगैरेबद्दल मी तिला बोलले. ती हसत हसत म्हणाली, त्याची काहीच काळजी नाहीये, आमचे चर्च सगळा खर्च देते. मी थक्क!!!

रूनमेश तुमची इच्छा असेल तर तिसरे काय चौथे अपत्यही आणा. तुमची दोन्ही मुले लहान आहेत, त्यांच्यात अजून एक सहज खपुन जाईल. उलट मुले आवडीने नव्याचे स्वागत करतील. बाकी खर्च वगैरे मुद्दे आहेतच पण तूमची तयारी असणारच त्याला.

मीरा, साधना धन्यवाद

तिसरे अपत्य - https://www.maayboli.com/node/74176
असा धागा मी आधी ईथे काढला होता.

विचार तर आहे. आणि हा कोरोना नसता तर हे वर्ष आधीच्या मुलांच्या वयातील अंतराच्या दृष्टीने आदर्श होते.
पण कोरोना आणि एकूणच त्यामुळे जी अनिश्चितता आहे त्यामुळे बघूया मोड मध्ये आहे आणि जमवायला आवडेलच म्हणून रिजोल्युशन आहे Happy

Pages