तुमचे न्यू इयर रिसोल्युशन काय आहे?

Submitted by कटप्पा on 28 December, 2018 - 19:45

माझे असे आहे की फालतू धागे काढणे बंद करेन.
तुमचे काय आहे?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

स्वभाव बदलू नये. कारण तो सहज बदलताही येत नाही.
माझा चटकन राग यायचा स्वभाव आहे. मी तो बदलायच्या भानगडीत पडत नाही. राग येऊ देतो. पण राग आल्यावर जे आपण रिॲक्ट करतो, त्यावर कंट्रोल करायचा प्रयत्न करतो.

एक संस्क्रीत सुभाषित आहे,
अन्न दिसता तोंडाला पाणी सुटणे, पैसे दिसता ते उचलायची हाव होणे आणि परस्त्री दिसता तिला प्राप्त करायचा मोह होणे, हे असे होणे पुरुषांना स्वाभाविक आहे. पण या तीनही वस्तूंना तुम्ही स्पर्श करणे टाळता की नाही यावर तुमचे चारीत्र्य ठरते.

माझा चटकन राग यायचा स्वभाव आहे. मी तो बदलायच्या भानगडीत पडत नाही. राग येऊ देतो. पण राग आल्यावर जे आपण रिॲक्ट करतो, त्यावर कंट्रोल करायचा प्रयत्न करतो. >>> ह्म्म्म्म्म . अमलात आणायचा प्रयत्न करते यावर्शी .
दर महिन्याला gratitude list/happy moments list बनवायचा विचार आहे .

स्वस्ति, दर महिन्याला कराच पण दर दिवशी रात्री झोपताना नुसतं आठवलं आज दिवसभरात काय छान घडलं तरी लक्षात येतं की काही न काही घडलंय. अगदी आज एकही ट्रॅफिक सिग्नल लागला नाही. कालची अपूर्ण आहे पण आजची टू डू लिस्ट आज पूर्ण झालीय. खूप दिवसांनी अचानक एखाद्याची भेट झाली. मस्त वाटतं मग. आणि सापडतं ही काही न काही छोटी गोष्ट.

वर्णिता , अगदी अगदी.
कालच सकाळी ऑफिसला निघताना , वरच्या मजल्यावरचा 6-7 वर्षाचा मुलगा एकटाच लिफ्टमध्ये भेटला. काल आवर्जून बोलण्याच निमित्त मिळालं. 2 minutes of cute , innocent chat made my whole day. ऑफिसातल्या 2-3 irritating गोष्टींकडे मी दुर्लक्ष केलं.

वजन कमी करण्याचा चिकाटीने प्रयत्न करणे ..
विशेषतः पोटाचा घेर
कोणाकडे काही proven टिप्स असतील तर सांगा नक्की

आणखी एक गोष्ट मला पुन्हा सुरु करायची आहे ती म्हणजे लिखाण, त्यासाठी लागणारी वैचारिक आणि प्रत्यक्ष typing ची बैठक जुळवून आणायला हवी.
Time is a new oil for me,it is getting more and more expensive day by day.
Time management चे धडे घ्यायला हवेत खरं.

शोधक छान संकल्प.
सगळ्यांना नवीन संकल्प व त्याच्या पूर्ततेच्या शुभेच्छा

Pages