तुमचे न्यू इयर रिसोल्युशन काय आहे?

Submitted by कटप्पा on 28 December, 2018 - 19:45

माझे असे आहे की फालतू धागे काढणे बंद करेन.
तुमचे काय आहे?

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इंग्रजीत walk.
मराठीत सुकलेले. उदा: वाळकं खोबरं
तुमच्या रिसोल्युशन मस्त आहेत च्रप्स. शुभेच्छा.
पण ते ऍब्स आणि अल्कोहोल डोन्ट गो टुगेदर.

मागच्या पोस्टमधे संपादन करता येत नाही. त्यामुळे मागून पुढे चालू

१३. पोस्ट चार तासांच्या आत संपादीत करणे
१४. चार हिंदी, दोन सौंदेंडियन आणि एक मराठी चित्रपट बनवणे
१५. बिग बजेट हॉलिवूड मूव्ही बनवणे. या मूवीत अ‍ॅव्हेंजरची जागा रोहित शेट्टीचे पोलीस वर्ल्ड घेते असे दाखवण्यात येईल.
१६. कंगना राणावत च्या नावे शांततेचा एक पुरस्कार चालू करणार. या पुरस्काराची रक्कम नोबेल पेक्षा वीस पटीने जास्त ठेवली जाईल.
१७. नेहमी खरे बोलणार

सरांवर पुस्तक लिहिणार
ज्याची पुढे वेब सिरीज बनेल
त्यात काम करायला महागुरू किंवा लघुगुरु यांना सुपारी देणार

हा एक वर्षाचा नाही, जीवनाचा संकल्प आहे

हा एक वर्षाचा नाही, जीवनाचा संकल्प आहे
तुमचा संकल्प हर्क्युलसपेक्षाही भारदस्त आहे. तुमचं नाव भविष्यात पीजीएमने (प्लॅटिनम गृप मेटल्स) कोरलं जाईल याची खात्री बाळगा.

मोबाईल बघणे कमी करायला हवे. पण कसे जमणार?

बाहेर फिरणे बंद त्यामुळे भाषा शिकणे ( उगाचच) सुरू केले. सगळा माल मोबाईलमध्येच आहे.

सत्तेत आल्यावर मायबोलीवरच्या चर्चा वाचून जे काही ठरेल त्याची अंमलबजावणी करणे >>> हाहाहा, हे भारी आहे.

इंग्रजीत एक म्हण आहे. टाळकं बिफोर वाळकं (Talk before Walk) >>> हाहाहा, सही .

मोबाईल बघणे कमी करायला हवे.>>>>

मी दोन नियम केले आहेत ज्याचा मला फायदा होत आहे.

१. मोबाईल साठी एक जागा ठरवली. घरात असताना तो त्याच ठिकाणी ठेवायचा. ( घरात असताना तो लँड लाईन, घराबाहेर पडताना मोबाईल)
२. बेडरुम मधे, निवांत ठिकाणी ( जिथे रिलॅक्स झोपून, बसून पाहता येईल अशा ठिकाणी) मोबाईल आणायचा नाही.

-मोबाईलचा वापर कमी करणार झोपायच्या आधी व सकाळी उठल्या उठल्या बघणे
-रात्री लवकर झोपणार (?)
- कमीत कमी ३ दा तरी वेट ट्रेनिंग करणार.
- स्वतःला प्राधान्य देणार. ते उठले की, ह्याला काय हवं, त्याचं काय करायचं, घरात हे ते आवरायचं, त्याला/हिला आठवण करा, ह्याला/त्याला खुष करा.... हि असली कामं न करता, मला काय आज "स्वतःसाठी" करायचं हे बघणार मग इतर. जिंदगी अशीच गेली मागची बरीच वर्षे.
- उठले की निवांत बसणार काही मिनिटे( फोन शिवाय)
- नको त्या लोकांना,विचारांना आणि घरातील अडगळीला कमी करणार पुर्णपणे.

: *वन्दे भारत मातरम्*

*देश के 75 वे स्वतंत्रता वर्ष में अपनी मातृभूमि के अमृत महोत्सव निमित्त "75 कोटि सूर्यनमस्कार का संकल्प" पूज्य स्वामी गोविंद देव गिरि जी ( गीता परिवार), पू.स्वामी रामदेव जी ( पतंजलि योगपीठ एवं नॅशनल योगासन स्पोर्ट्स फेडरेशन), मा. भैय्याजी ( क्रीडा भारती), पू. दाजी ( हार्टफुलनेस), आप के संरक्षण में संयुक्त तत्त्वावधान से लिया गया है*।

*भारतमाता के चरणों में भेंट अर्पण करने का यह सामूहिक प्रयास है*।

*आप सभी से निवेदन है कि जो सूर्य नमस्कार कर सकते हैं वह सभी साधक www.75suryanamaskar.com इस वेबसाइट पर जाकर अपना रजिस्ट्रेशन करें। वेबसाइट पर सारी जानकारी उपलब्ध है*।

*आप सभी 'स परिवार' सूर्य नमस्कार अवश्य करें, पंजीकरण अवश्य करें - यह नम्र निवेदन...!*

*गीता परिवार- विवेकानंद केंद्र*

1 जनवरी से 7 फरवरी 2022 तक किसी भी 21 दिन प्रतिदिन 13 सूर्य नमस्कार करके आपके प्रोफाईल पर उपलब्ध कॅलेंडर पर जिस दिन किया, उस दिन- ऐसे 21 दिन के बाॅक्स में क्लिक अवश्य करें..! तभी अंतिम दिन पश्चात ई सर्टिफिकेट उपलब्ध होगा।
हे फक्त 21 दिवसांच आहे....
नको त्या लोकांना,विचारांना आणि घरातील अडगळीला कमी करणार पुर्णपणे.>>> हाऊ? घरातील वस्तुंची अजिबातच नाही. बाकी जाणून घ्यायला आवडेल

सगळा माल मोबाईलमध्येच आहे.
>>> हाईड करून ठेवा...

- by च्रप्स.

हो. ज्या विडिओंचे mp3 करणे चालणार आहे ते करून ऐकतो. म्हणजे की मोबाईलचा वापर आहे पण स्क्रीन पाहात नाही. 😀

कार्पोरेटात म्हणे सहा महिन्यांनी रिव्ह्यू घेतात. माझे जे संकल्प होते, ते खालीलप्रमाणे
-------
माझे संकल्प
१. कपाटाच्या गंजलेल्या बिजागऱ्या एखाद्या चांगल्या सुताराकडून बदलून घेणे
२. सुकडू सुताराचे थकलेले पैसे देणे
३. गावात सरकारी गुरांचा दवाखाना व्हावा यासाठी शासनाचा पाठपुरावा करणे
४. मायबोलीकर किमान ३ नवे लेख लिहिणे
-------

यातला १ पूर्ण झाला. २ पूर्ण होण्याची शक्यता कमी. ३ करून काही उपयोग नाही. ४ पूर्ण होईल असे वाटते. गेल्या सहा महिन्यात दोन धागे काढले.
याशिवाय संघ-बांधणी उपक्रम किंवा कार्पोरेट-सामाजिक कर्तव्य म्हणून एका उपक्रमाची हाताळणी करण्यात पुढाकार घेतला.

वरील कामगिरीबद्दल मला पदोन्नती मिळून गावातल्या सुतारांचा मुकादम करणेत यावे अशी विनंती आर्डरली साहेबाच्या शिफारशीने मी करत आहे (शिफारस कागदावरील लाल रंग हा शेरा नसून आर्डरलीची कागद वाचताना (?) झालेली करामत आहे हे लक्षात घ्यावे).

आपला,
हरचंद पालव

बरोबर. Lol
माझी भाषा सुधारणे हा पुढील वर्षाचा संकल्प म्हणून घेणेत येईल.

my resolution -
फुल्ल पार्टी करणार... 2023 संपूर्ण एन्जॉय करणार.. वेगवेगळे पदार्थ खाणार...वेगवेगळ्या जागा फिरणार... भरपूर व्हरायटी ड्रिंकस ट्राय करणार...

एक गुप्त संकल्प सापडला.

सरांच्या विरोधकांचे आयडी (जमल्यास) विनाकारण उडवणार नाही हा संकल्प करण्याचा संकल्प या वर्षी करण्याचा विचार करण्याचा विचार विचाराधीन आहे.
( नावाबाबत गुप्तता राखण्यात येत आहे)

१.राग आणि चिडचिड कमीत कमी करणार.
२.काहीही बोलण्यापूर्वी pause घेणार, विचार करणार हे बोलणं गरजेचं आहे का? असेल तरच बोलणार.
( बडबडा स्वभाव काही कामाचा नाही माझा )

क्रमांक दोन कठीण आहे, बरंच बोलायचं असतं, ते control केलं की त्रास होतोय Happy
पण फायदाही आहेच त्याचा
होईल सवय.
क्रमांक एक मुख्यत्वे करून मुलांसाठी आहे. त्यांच्यावर रागावून काहीही फायदा नाही हे समजलंय. आपली प्रत्येक कृती तिकडे copy होतेय हेही समजलंय. त्यामुळे समजून उमजून बोलणं आणि राग कमी करणं खूपच आवश्यक झालंय.
जमतंय हळूहळू.
क्रमांक एक नवरा आणि आई सोडून सगळीकडे apply करण्याचा प्रयत्न सुरु आहे.
मुलांनी मला बरंच काही शिकवलंय आयुष्यात Happy

क्रमांक एक मुख्यत्वे करून मुलांसाठी आहे. त्यांच्यावर रागावून काहीही फायदा नाही हे समजलंय. आपली प्रत्येक कृती तिकडे copy होतेय हेही समजलंय. त्यामुळे समजून उमजून बोलणं आणि राग कमी करणं खूपच आवश्यक झालंय.

>>>>मला पण अंमलात आणावं लागेल हे

Pages