तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्या झिंगाट गाण्यावर, विठ्ठल रखुमाई नाचताना पाहून अजय अतूल स्वर्गात गेल्याचं कानावर आलं..
Proud
जालींदर ने ईशा ला पकडले, अगवाह, किंवा किड्नॅप वगैरे केले तर काय होईलः
चंबू बाळः हे पहा जालींदर काका, तुमचा राग विक्रांत सरांवर आहे ना? मग मला का पकडताय? शहाण्या घरातील माणसं असं करतात का? शिवाय तुम्ही तर मला वडीलांसमान आहत. आता असं बघा, माझ्या वयाची तुमची मुलगी असती आणि तीला जर कुणी असा त्रास दिला असता, तर तुम्हाला काय वाटलं असतं? माझं ऐका.. तुम्ही एकदाच काय ते वि. सरांशी स्पष्ट बोलून वाद संपवून का नाही टाकत.. ? चंचू एक्स्पेशन डायरेक्टेड अ‍ॅट जालींदर.
जालींदरः ए... हीला घरी सोडून या रे... यापेक्षा वि.स. परवडला.
जालींदर टू वि.स.: कसं काय झेलता बुवा तीला.. खरच तुम्ही देव माणूस आहात... माझी चूक झाली, क्षमस्व! Proud

मालिका संपली.

हे पहा जालींदर काका, तुमचा राग विक्रांत सरांवर आहे ना? मग मला का पकडताय? शहाण्या घरातील माणसं असं करतात का? शिवाय तुम्ही तर मला वडीलांसमान आहत. आता असं बघा, माझ्या वयाची तुमची मुलगी असती आणि तीला जर कुणी असा त्रास दिला असता, तर तुम्हाला काय वाटलं असतं? माझं ऐका.. तुम्ही एकदाच काय ते वि. सरांशी स्पष्ट बोलून वाद संपवून का नाही टाकत.. ? >>>> योग मी हे सगळे अगदी ईशा बोलते तसेच वाचले, मजा आली.

जरा विचार करा, यावर जालिंदरनेच ईशाला एखादी गोश्ट सांगीतली तर....

Submitted by सूलू_८२ on 28 November, 2018 - 18:17
काल सुबोध तिला त्या फोटोवाल्या माणसाला भेटायला नेतो तेव्हा म्हणाला, "इशा, तू घाबरू नकोस. (fullstop) मी गाडीत आहे हे विसरू नकोस"
म्हणजे काय?
1. तू न घाबरता जा. मी गाडीतच आहे. माझी काळजी करू नकोस.
2. तू जा. न घाबरता जा. मी दिसणार नाही कारण मी गाडीत आहे.( दगाफटका झालाच तर पोलिसांना बातमी देईन.)
3. तू जा, पण मी गाडीत आहे हे लक्षात असूदे, नाहीतर परत जाताना बसनं जाशील.

एक फायदा दोघांच्याही लक्षात आलाय. खुले आम कुठेही , कितीही मिठ्या मारु शकतात. बघणा-याला वाटतं की बापलेक आहेत. (साप भी मरे, लाठी भी ना टूटे.) >>>>>>>>>>>>>>>>>>>>हहहहहहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा >>>>>>>> अहो अबोल, मेधाविची पोस्ट माझ्या नावावर का खपवताय? Lol
Anyways, होत अस कधी कधी, माझ्याकडून सुद्दा अशीच चूक झालीय.

तू जा, पण मी गाडीत आहे हे लक्षात असूदे, नाहीतर परत जाताना बसनं जाशील >>>>> Rofl

अहो अबोल, मेधाविची पोस्ट माझ्या नावावर का खपवताय? Lol >>>>>> ते nantar lakshat aal copy zal hot te...... hasu avarena ani reaction dili hoti....instant...

आज ईबाळाला आदर्श प्रेमिकेचे झटके आले. झेन्डेला विसला विसरुन जाण्याचे वचन देतेय. सरळ बोलायला हव होत ना तिने, 'अरे हट! तुझ वचन- बिचन गेल खड्डयात! तुला तुझ्या सरान्च रक्षण करता येत नाही त्यात माझा काय दोष आहे!

ईशाच्या बाबान्ना आपली मुलगी तिच्या ऑफिसमधल्या कुणाच्या प्रेमात पडलीये हयाचा डाउट आलाय. तो जो कोणी 'विस' आहे हे त्यान्ना अजून ठाऊक नाही. ईशाने विसने लिहिलेली चिठ्ठी त्यान्ना अनावधानाने सापडली.

ईशा झेन्डेला वचन देण्यासाठी त्याच्या हातावर हात ठेवते, हे जर निमकरान्नी बघितल तर त्यान्च्या भलताच गैरसमज व्ह्ययचा. Proud

विस- आईसाहेन्बाचा सीन छान होता. सुभाची स्माईल, अहाहा! Blush आईसाहेबान्नी ' तुम्हाला आता वयाच काही वाटत नाही, म्हणजे तुम्ही लग्न करायला तयार आहात तर' अस विचारल्यावर विस लाजून ( इश्श, आईसाहेब तुम्ही पण ना!) जे काही पळाले ना. Lol

आईसाहेब माबो वाचतात वाटत, विसला तब्येतीकडे लक्ष द्या म्हणत होत्या.

आईसाहेब येण्याआधी विस कोपरा टेकवून नक्की काय करत होते, पुस्तक वाचत होते, की डुलक्या घेत होते?

पुढच्या भागात, झेन्डे 'इशाच्या जीवाला धोका आहे म्हणतात. झेन्डेन्ना कधीपासून ईशाची काळजी वाटायला लागली. Uhoh

वाल्याचा वाल्मिकी झाला वाली गोष्ट।.. >>>>>> ती गोष्ट तर त्या वेडया भिकार्याबाबत खरी ठरली.

हे पहा जालींदर काका, तुमचा राग विक्रांत सरांवर आहे ना? मग मला का पकडताय? शहाण्या घरातील माणसं असं करतात का? शिवाय तुम्ही तर मला वडीलांसमान आहत. आता असं बघा, माझ्या वयाची तुमची मुलगी असती आणि तीला जर कुणी असा त्रास दिला असता, तर तुम्हाला काय वाटलं असतं? माझं ऐका.. तुम्ही एकदाच काय ते वि. सरांशी स्पष्ट बोलून वाद संपवून का नाही टाकत.. ? >>>> योग मी हे सगळे अगदी ईशा बोलते तसेच वाचले, मजा आली. >>>>>> मी सुद्दा. Proud

विस- आईसाहेन्बाचा सीन छान होता. सुभाची स्माईल, अहाहा! Blush >>>>>>>>>>>> हो.... tooooo cutteee ...lagnache vedh lagalet aataa.....

आईसाहेब येण्याआधी विस कोपरा टेकवून नक्की काय करत होते, पुस्तक वाचत होते, की डुलक्या घेत होते? >>>>> पुस्तक वाचत होते .. subha is also vaachan premi aahe.... sonali k bolali hoti eka interview madhye

आईसाहेब माबो वाचतात वाटत, विसला तब्येतीकडे लक्ष द्या म्हणत होत्या. >>>>>>>>>>>>>> माझ्या मनात पण हाच विचार आला....:))

विक्रांत खरंच असा अस्वलासारखा का चालतो Happy
रिसेंटली जरा जास्त सुजल्यासारखा दिसतोय. सिरीअल चालू असताना व्यायाम आणि डायेट करणं कठीण होत असणार.

झेंडे मजा मजा करत होता आज. विक्रांतची मस्त खेचत होता :). विक्या कामातून गेलाय एकंदरीत.

बाळ इंटरव्ह्यूची जोरदार तयारी करत आहे,पण बाळाला जर विचारल की सरंजाम्यांकडे काय बरं शिकलीस बाळ,तर काय सागेल बाळ?
आज भोकाड पसरताना नीट रडत पण नवःहत बाळ.
फार रटाळवाणी होत चालली आहे.
ईआई म्हणाली की खर्च दहा हजारात गेला घराचा,अरेच्चा कसा काय?फराळाचे पैसे गेले कुठे?
आणि काय पांचटपणा ,बिनडोकपणा ,अचरटपणा चालला होता ईपालकांचा ,काय चाललय शिरियलीत?
केड्याबाबा,अजब तुझे सरकार

>>इशाचा टेडी बेअर आहे म्हणून
टेडी बोअर होऊ लागला आहे आता... काय हलेच ना पुढे कथा. जालींदर ने ईतके एपिसोड्स फुटेज खाल्ले पण काही विशेष ऊपयोग झाला नाही. नुसताच फोन फोन खेळतो.. ईतक्या मेंगळट जालींदर साठी वि.स. ला झेंड सिक्युरिटी. ईबा चे बाबा पण घाबराय्चे नाहीत जाली ला. इबा च्या आईने नुसते डोळे वटारले ती घाबरून फोन ठेवेल इतका मेंगळट जालींदर दाखवलाय!
आता फक्त एकच शिल्लक आहे. ती शीर्षक गीता मध्ये दाखवतात ती कोण? तिचा काय संबंध, ते लवकर ऊलगडले तर कथा पुढे जाणार. नाहीतर हे टोम अँड जेरी प्रकरण सुरूच राहील. बहुदा ९ डीसेंबर च्या खास एपिसोड साठी ते गुपित राखून ठेवलय.
म्हणजे ९ डीसे ला सुभा एका गुढ्घ्यावर वाकून ईलू ईलू म्हणतो का ते बघायला तमाम २० (तीच्या साठी) ते ५० (त्याच्या साठी) वयोगटातील स्त्रीया अगदी आतुरतेने वाट बघणार.. टेडी मग आपली ढेडी सावरत वाकणार.. ईबा त्या गुलाबाचे चंचूग्रहण करणार.. ईतक्यातच गुपित फोडायला ती दुसरी बाई अवतरणार.. की हाच तमाम वर्ग परत सुभा साठी हळहळणार.
मज्जा आहे बुवा सुभा ची... नशीब असावे तर असे. (इती पुरूष वर्ग)
नशीब आहे बुवा ईबा च. कसलिही विशेष पात्रता नसताना सुभा बरोबर रोमांस करायला मिळतोय. (इती स्त्री वर्ग)

ईतक्यात गुपित फोडायला ती दुसरी बाई अवतरणार, हाहाहा
पण ती दुसरी बाई म्हणजे शितु,जिवंत आहे कि नाही तेच माहित नाही,
त्याला आणखी एक महारविवार.

इशामुळे फार बोरिंग होत आहे.. जमतच नाहीये तिला .. फसलेलं लेखन .. टुकार plot एकटा खेचून नेतोय सुभा .. त्याच्याजागी कोणी दुसर असतं तर कोणी बघितली पण नसती सिरिअल..

सुभा झेंडे सीन मस्त होता, काय स्माईल देतो सुभा खतरनाक! अचानक झेंडे सुभाच्या लग्नाबद्दल आवडीने बोलत होता हे कस्काय? मत बदलले काय त्याने?
3500 कोटी रु टरणोवर असलेल्या कम्पनीचा मालक असल्या मेंगळीच्या नादी काय लागलाय काय माहित !

मला तर वाटलं काल झेंडेना टेरेस वरती वेन्सडे मधला नासिररूद्दीन शाह भेटतो कि काय ?:)

<<शहाण्या घरातील माणसं असं करतात का? शिवाय तुम्ही तर मला वडीलांसमान आहत. आता असं बघा, माझ्या वयाची तुमची मुलगी असती आणि तीला जर कुणी असा त्रास दिला असता, तर तुम्हाला काय वाटलं असतं? माझं ऐका.. तुम्ही एकदाच काय ते वि. सरांशी स्पष्ट बोलून वाद संपवून का नाही टाकत..<< आईग! मेले.. फुटले मी Rofl Rofl
हे अगदी इबाळाच्या स्टाइल मधे वाचुन बघित्ले. विशेषतः आता असं बघा.. च्या वेळी ते फेमस मान हलवणं , आणी डाव्या हाताची तर्जनी वर करुन बोलणं". ( इशा डावखुरी असावी).
Lol नशिब, जालिन्दरला इशा गोष्ट सांगुन स्वत:ची सुटका करुन घेते, असे नाही म्हणालात.

<<शहाण्या घरातील माणसं असं करतात का? शिवाय तुम्ही तर मला वडीलांसमान आहत. आता असं बघा, माझ्या वयाची तुमची मुलगी असती आणि तीला जर कुणी असा त्रास दिला असता, तर तुम्हाला काय वाटलं असतं? माझं ऐका.. तुम्ही एकदाच काय ते वि. सरांशी स्पष्ट बोलून वाद संपवून का नाही टाकत..<< आईग! मेले.. फुटले मी Rofl Rofl>>>>> मी पण अगदी तस्सच इमॅजीन करुन बघीतले. Rofl

जालींदरः ए... हीला घरी सोडून या रे... यापेक्षा वि.स. परवडला.
जालींदर टू वि.स.: कसं काय झेलता बुवा तीला.. खरच तुम्ही देव माणूस आहात... माझी चूक झाली, क्षमस्व! >>> Lol

योग तो सगळा पॅराच भन्नाट आहे Happy

येस्स...मलाही अगदी तेच आठवलेलं... Happy नासिरुद्दीन...!!>> अगदी अगदी मला हि सेम हेच आठवलं.
मला एकदा हा सर्च करायचाच आहे कि कोणत्या कंपनी मध्ये चांगल्या पदाच्या पोस्ट चा इंटरव्यू मराठीतून होतो ?दरवेळी सगळ्या मालिकांमधले इंटरव्यू मराठीतून असतात .. काल इशा जे काय बाळबोध प्रश्नांची उजळणी करत होती ते बघून Uhoh असं झालं .. पण अचानक सुभा येताना दाखवला सो पुढे बघवलं तरी ..
आणि काल लग्नाच्या हॉल/ठिकाणाविषयी झेंडे बोलत होते .. म ते परवा हातावर हात ठेऊन घेतलेलं वचन ??!! ते सोयीस्कर विसरले का सगळे लेखक दिग्दर्शक?
काय एकंदरीत चाल्लंय ते चाल्लंय .. एकाच बैलाने नांगर ओढून शेत नांगरावं तसं चाल्लंय ..सगळं सुभा एकट्याने ओढतोय असा इम्बॅलन्स दिसतो.
डाव्या हाताची तर्जनी वर करुन बोलणं". ( इशा डावखुरी असावी).>> नक्कीच मला पण वाटत .. कायम एकाच हाताच्या तर्जनी वर करत बोलते

ईशा अगदीच बाळबोध आणि साधारण दिसते....... काय तो आवाज, काय ते विस्फारलेले पण अजिबात स्पार्क नसलेले डोळे, बेकार केशरचना,....छ्या!!
सुबोध कसला गोड हसला टर्न ओव्हर सांगताना............... छा गया! अशाने इशाचं सर्व साधारणपण अधिकच ठळकपणे दिसतं ना पण!
काय याला ही मेंगळट आवडत्येय असं ..!!

सुबोधसाठी किती टोकाच्या रिअॅक्शन्स येतायत् Wink
ज्यांना आवडतोय (जास्त आहे ही संख्या) त्यांना तो म्हणजे हॅन्डसमतेची परिसीमा वाटतोय आणि आवडत नाहीये त्यांना पिठूळ, बैल, सुजका आणि काय काय. गंमतै किनी?
इशासाठी मात्र एकमत आहे सर्वांचं.

Pages