तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ते दोघे बोलत असताना मधेच (नबोलावता) ऑफिसातला वयस्कर माणूस आत येतो. मग विस त्याला एक प्रश्न विचारतो .. त्यावर ‘ऑं’ करून उत्तर देतो आणि जातो.
इबाबांना विसने कितीही टेपा लावल्या तरी त्यांना जरा सुद्धा मनात शंका येणार नाही कि हा आणि याचा शत्रु आपल्या मुलीला एव्हढे महत्व का देतोय?

ते दोघे बोलत असताना मधेच (नबोलावता) ऑफिसातला वयस्कर माणूस आत येतो. मग विस त्याला एक प्रश्न विचारतो .. त्यावर ‘ऑं’ करून उत्तर देतो आणि जातो.>>>>>> Lol

सुभा बरा आहे की.. अभिज्ञा भावेने, सुभा तिच्या आईला वाढदिवसाच्या शुभेच्छा देतानाचा व्हिडिओ टाकला होता.. सिरियलच्या सेटवरचाच आहे.. सुभा यंग , उत्साही, हॅपनिंग, फ्रेश दिसतोय.. त्याच विसं च्या कपड्यांमधे आहे.. कदाचित असा वयस्कर माणसाचा रोल करायचा म्हणुन जास्त संथ राहात असावा..
डोळे मात्र बोलतात त्याचे.. डोळ्यातुन भावना व्यक्त होतात .. अशे अभिनेते हिंदी -मराठी सगळीकडेच कमी आहेत..
इशा ला टायटल साँग आणि प्रोमो मधे मेक-अपचा मारा करुन ओके दिसवलं आहे .. अशी रोज मालिकेत फार बोअर दिसत आहे.. कपडे तर काहितरीच.. लहान दिसणे अपेक्शित आहे पण ती हाइट, अंगयष्टीने पण कमी असल्याने सुभासमोर येवढीशीच दिसतिये.. त्यामुळे त्याला शोभत नाही. त्यात अल्लड असल्याचा अभिनय करायचं डोक्यात घेतलय मग तर बाळंच .. सुभा तरी प्रेयसी म्हणुन कसं बघणार बिचारा ..
तिला नंतर मेक ओव्हर द्यायचा म्हणुन येवढं डब्बा दाखवत असतिल तर ते फार बोअरिंग आहे.. अपिलच होत नाही ती.. रडकं शेंबडं बाळ वाटत आहे..
ती वैदेही परशुरामी, घाणेकर मधली लहान ही दिसली असती तरीही सुभाला शोभली पण असती..
तसं बाबा आणि मुली सारखं दिसणं पण ओकेच आहे .. कारण असं वयात अंतर असणार्या जोड्या अशाच तर दिसतात.. माल्या आणि त्याच्या गर्ल फ्रेंड्स, कबीर बेदी आणि वाईफ, विजोड असुन प्रेम असणे हेच तर दाखवायच आहे..

हा धागा वाचुन प्रेरित झाले
मालिइकेचा एक भाग पाहिला नेटवर

माफ करा मैत्रीणींनो पण सुभा बिलकुल नाय आवडला, शिरेल तर बिग नो नो... हा धागा मस्तय पण Happy

काय बोअर लोक आहेत. मागच्या दोन एपिसोड्स मधे काहीच घडले नाही. घड्याळ काय वाजते, पंधरा मिनीटे दोन बॉडीगार्ड्स चहूदिशेला ते काय शोधत बसतात. आता काय ईशाच्या घरात टाइमबॉम्ब लावणार होता का तो जालिंदर, कधीतरी रात्री स्फोट व्हायला. त्यात मध्यरात्री घुसून पाहण्यासारखे काय होते.

मायराचे डिमोशन दणक्यात सुरू आहे. एव्हीपी वरून झेंडेची लेखनिक झाली. आता सुभाच्या सेफ हाउस ची हाऊसकीपर दिसतेय. तो ही बिनदिक्कत तिला कॉफी आण वगैरे सांगतोय. ऑफिस मधल्या महत्त्वाच्या पदावरच्या मुली बॉस ला चहा कॉफी देण्याचे काम करतात काय? कोणत्या दशकातली आहे ही सिरीज.

मायराने आणलेल्या कोणत्या कपात काय आहे हे एक कोडे म्हणून चांगले होईल. आधी ग्रीन टी आणला. मग ब्लॅक कॉफी हवी म्हणून ती घेउन आली. पण झेंडेला ती ऑफर करताना अचानक पुन्हा ती ग्रीन टी झाली.

मायरा रडतांना सायनस झाल्यासारखी रडते. म्हणजे आधी नाक थोडं फुरफुरतं, मग डोळे विस्फारतात, मग थोडे पाणी झरायला सुरुवात होते, मग सर्दी आतल्या आत कोंडली गेलीय, ती बाहेर येत का नाही, आणी नाक जाम दुखतयं या सगळ्या स्थितीतुन मायरा वैतागलेली असते. मग सगळा राग इबाळावर निघतो. मग इबाळ दु:खी होतं. मग इबाळ सुभाच्या मागे लागुन सहानुभूती मिळवतं.

यांना एका चमच्यात बरोब्बर बसतील असे नूडल्स कोणी कापून दिले? का बिपिन ला त्या कामालाही लावला होता? ईशाचे एकूण कौशल्य पाहता नूडल्स खाताना भरपूर पारंब्या असलेल्या वडाच्या झाडाची प्रतिमा आली होती डोळ्यासमोर.

झी मराठी वाहिनीवरील अल्पावधीत लोकप्रिय ठरलेली ‘तुला पाहते रे’ ही मालिका बंद करण्याची मागणी करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात निवेदन दिलं आहे. या मालिकेतून समाज प्रबोधनाचा कोणताही संदेश नाही, उलट महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचा त्यांचा ध्यास आहे, असा आरोप प्रदीप नाईक यांनी केला आहे.

‘या मालिकेत २० वर्षांची मुलगी ४० वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात पडल्याचं दाखवलं आहे. मात्र हा संदेश जिजाऊंची शिकवण असलेल्या महाराष्ट्रासाठी घातक आहे. या मालिकेतून आमच्या माता-भगिनींना वेगळा संदेश देण्याचा घाट घातला जात आहे. याबाबत आम्ही संबंधित वाहिनीकडे फोनवरुन तक्रार दिली, मात्र ई- मेल करण्यास बजावून आम्हाला धुडकावून लावले. या महाराष्ट्राला संतांची परंपरा लाभली आहे. त्यामुळे पुरोगामी महाराष्ट्राला धक्का पोहोचवला जात आहे. या मालिकेतील दिग्दर्शक, निर्माते किंवा अभिनेते आपल्या घरातील २० वर्षीय मुलीचे लग्न ४० वर्षीय युवकाशी लावून देतील का? त्यामुळे या मालिकेत बदल करावा अन्यथा बंद करावी,’ असं प्रदीप नाईक यांनी निवेदनात म्हटलं आहे.

मला आता त्या झेंडेने आपल्या गावातील तालमीतून ओळखीपाळखीचे लोक आणून सिक्युरिटी कंपनी स्थापन केली आहे असे वाटू लागले आहे. त्यांना काही झेपतच नाही.
- किरकोळ घड्याळाचा बीप ऐकून धाड धाड आत घुसलेले लोक, नंतर ईशा किंचाळून उठली तरी यांना पत्ताच नाही.
- तो तिच्या बरोबर डॉक्टर कडे (ताप असताना चालत!) निघालेला गार्ड त्याचा ब्लू टूथ फोन बरोबर पेअर न करता गंमत म्हणून कानाला लावून होता का इतके दिवस? पेअर केलेला फोन फक्त ब्लू टूथ मधूनच वाजतो ना?
- ईशाच्या प्रोटेक्शनला आलेला असताना ते रिक्षातून उतरल्यावर ईशाला मागे ठेवून रूपालीबरोबर गेला हा पंटर पुढे निघून.

पुढच्या सीन मधे कसलाच आगापीछा नसलेल्या "बिझिनेस" टर्म्स नी धमाल उडवली आहे. हा लंडनला कशाला गेला होता, तर "वर्ल्ड ट्रेड कॉन्फरन्स" ला. तेथे एक रिटेल स्कीम सुपरहिट झाली. काय तर राउण्ड फिगर न वापरता डिस्काउण्टेड प्राइस ची. काय अभिनव कल्पना! वॉलमार्ट पासून ते ग्राहक पेठेपर्यंत कोणालाच कशी समजली नाही? आणि त्यांनी टॅगलाइन इंग्रजीत भाषांतरित केली - म्हणजे तेथेही डिस्काउण्ट अगदी दोन पाउण्ड्सचेच दिले जाइल इतकी चपखल बसली ही स्कीम.

आणि त्यांनी म्हणे आपले हे प्रोजेक्ट "अ‍ॅप्रूव्ह" केले! इथे "ते" कोण? आणि "अ‍ॅप्रूव्ह" काय? कसला प्रोजेक्ट? सरंजामे कंपनी आता परदेशातील फोन कंपन्यांना त्यांची उत्पादने कशी डिस्काउण्ट मधे विकायची हे सुचवणार आहे का? नाहीतर एका कंपनीचा प्रोजेक्ट दुसरी कंपनी अ‍ॅप्रूव्ह करते म्हणजे नक्की काय करते?हे बिझिनेस ट्रॅन्झॅक्शन नवीन आहे. मात्र ईशाने न सुचवलेली अशी पहिली निरर्थक कल्पना आहे या कंपनीतील ही Happy

आणि सेलिब्रेशन करायचे तर समोर एफएम पासून मिहीर पर्यंत अनेक कर्मचारी आहेत, नवीन चम्या/चमी आहेत आणि पार्टीत ज्यूस आणि वेफर्स दिसले फक्त - तेवढ्याकरता "झेंडे आणि मायरा, करा पार्टी अरेंज" ही ऑर्डर कशाला दिली सुभाने कोणास ठाउक. हे तर त्या एफएम ने कॅफेटेरियातून सुद्धा आणले असते.

विक्रांतला म्हणे त्या टॅगलाइन वरून ईशा आठवली. बाकी ऑफिस ला "आज कोणीही काम करायचे नाही" वरून आठवली असेल Happy

टू बक्स वर्थ अ मिलिएन हे इंग्रजी ऐकून राणी हाराकिरी करेल. हा कॉन्फरन्स ला जाउन चकल्या खाउन आला आहे फक्त.

एक जुना पिक्चर आहे गृह प्रवेश त्यात संजीव कुमार चे शर्मिला टागोर बरोबर लग्न झालेले आहे. पण सारिका टायपिस्ट म्हणून ऑफिसात लागते.
संकु व शटा नेहमी कॉफी पीत असतात. सारिका टी. रोज ऑफिसात केबीन मध्ये एक चहा एक कॉफी. एक दिवस संकु पण चहा माग वतो.
तर प्युन बाहेर येउन सर्वांना सांगतो " आज सरने चाय पी ली. " ही अफेअरची सुरुवात ऑफिशिअ ली.

तरी ते ऑफिस अफेर खूपच एलिगंट होते. हे काय एक ना धड भाराभर चिंध्या. पिक्चर बघा आहे तूनळीत.

हो सुभा हल्लीच नाही पण मागे पण बऱ्याचदा सुजलेला दिसतो आहे आणि जाड पण ! भले तो म्हणतोय कि त्याने केलेय थोडे वजन कमी .. पण तरीही जाडच दिसतोय .. पण चेहऱ्यावरचे हावभाव , बोलके डोळे यामुळे तो भाव खाऊन जातो .. त्याने नुसती भुवई उडवली /मान हलवली तरी कळतं काय बोलायचंय ..
खरं तर त्या इशाच्या मैत्रिणीचे पण चांगले असतात हावभाव .. खूप चांगला अभिनय करतेय
पण इशा हे पात्रंच बहुधा मठ्ठ मंद आणि बुळं रंगवलं असावं Sad तसं असेल तर त्यांना इशा चं काम करणारी योग्य काम करतेय असं म्हणायला हवं .. Uhoh
पण तिचा आवाज अयाई गं !! खालच्या पट्टीत तिचा आवाज फुटतंच नसावा ..
बाळाने एकतर रनर घ्यावा(आपला आवाज वापरू नये)>> हे अगदीच खरं आहे
आवाजाचे जे ढोबळमानाने ३ प्रकार असतात कर्णमधूर, कर्णकटू आणि कर्णकर्कश्श पैकी इशा चा आवाज कशातच बसत नाही .. "कर्णअतिकटू " वाटतो Uhoh
आणि याउलट बिपीन ने बावळट असल्याचं काम खूपच छान केलंय
कालचा गाडीतला सीन खरंच बाबा आणि मुलगी वाटत होता .. नाही आवडला अजिबातच
ते दोघे बोलत असताना मधेच (नबोलावता) ऑफिसातला वयस्कर माणूस आत येतो. मग विस त्याला एक प्रश्न विचारतो .. त्यावर ‘ऑं’ करून उत्तर देतो आणि जातो.>> हो मला पण एक क्षण कळलं नाही हे कुठून मधेच उपटले आपोआप !! आणि १००० एवढं उत्तर देऊन गेले पण
लहान दिसणे अपेक्शित आहे पण ती हाइट, अंगयष्टीने पण कमी असल्याने सुभासमोर येवढीशीच दिसतिये.. त्यामुळे त्याला शोभत नाही>>> हो ना ! अगदीच

सुभा सुजकट ,थोराड वगैरे सगळ ठीक आहे,पण आपल्या तेंडुलकरांच्या सचिन ससरख बिचारा एकटाच जीव तोडून खेळतोय.
मायरा,झेंडे, निमकर जोडप 1,2,3 धावा काढून साथ देतात.पण बाळ ,तिचा एकही बॉल बँटला लागतच नाही,बर तरी सुभा स्ट्राईक घेण्यासाठी धावतो.पण आताशा तो पण दमायला लागलाय.
बाळाने एकतर रनर घ्यावा(आपला आवाज वापरू नये)किंवा जागा रिकामी करावी.

Submitted by UP on 26 November, 2018 - 18:43
---- +1 ☺️☺️ मस्त जमलंय

<<प्रश्न विचारतो .. त्यावर ‘ऑं’ करून उत्तर देतो आणि जातो.>> हो मला पण एक क्षण कळलं नाही हे कुठून मधेच उपटले आपोआप !! आणि १००० एवढं उत्तर देऊन गेले पण<<
इबाळाचे टेन्शन हलके होण्याकरता सुभा आम्हा बिजनेसमन्सना धमकीचे किती कॉल्स येतात हे सान्गण्यासाठी तो त्या परान्जपेन्ना बोलवतो आणि गेल्या वर्षभरात आपल्याला धमकीचे किती कॉल्स येउन गेले असे विचारतो. ते १००० असे उत्तर देतात. तेव्हा इशा तोन्डाचा आ' वासते आणि १०००? असे विचारते. Lol

इबाळाचे टेन्शन हलके होण्याकरता सुभा आम्हा बिजनेसमन्सना धमकीचे किती कॉल्स येतात हे सान्गण्यासाठी तो त्या परान्जपेन्ना बोलवतो आणि गेल्या वर्षभरात आपल्याला धमकीचे किती कॉल्स येउन गेले असे विचारतो. ते १००० असे उत्तर देतात. तेव्हा इशा तोन्डाचा आ' वासते आणि १०००? असे विचारते>>> हे मी पाहिलय Lol
मी पाहिलेल्या एकुलत्या एक एपि मधला सीन Proud

तो सुभा तिला आत बसवुन जेव्हा म्हणतो की इतका ताप असताना यायची काय गरज होती ऑफीसला?
मी डोक्याला हात मारला होता, म्हटल आता इबाळ परत लाजत लाजत चिरक्या आवाजात ती कॅसेट सुरु करते की काय!
" हो सर? पण तुम्ही कसे ओळखले मला ताप आहे ते? अस काय हो सर, सांगा ना सर, मन मोकळ करा.. मनात ठेउ नका काही. आणि चेहर्यावर ते सुप्रसिद्ध हसु... अन मग ते लाजुन खाली पहाणे.

√√√या मालिकेतून समाज प्रबोधनाचा कोणताही संदेश नाही, उलट महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचा त्यांचा ध्यास आहे, असा आरोप प्रदीप नाईक यांनी केला आहे.√√√√√√

इथे समलिंगी संबंधाना मान्यता मिळाली आणि हे बाया बाप्याना पण लग्न करू देईनात Lol

पण इशा हे पात्रंच बहुधा मठ्ठ मंद आणि बुळं रंगवलं असावं >>>>>>> हया इशाच्या पात्राचा नेमका लोचा काय आहे? कधी मठ्ठ मंद वाटते तर कधी बनेल. Uhoh आजसुद्दा कारमध्ये सुभा तिला 'पड जराशी' म्हणतो तेव्हा तिच्या चेहर्यावर ' अहाहा काय लाईफ आहे आपली.' अशी स्माईल दिसली.

सुभा छान नाचला, नाहीतर परवाचा तो झेन्डेचा डान्स. Proud

त्या मिहिरला एवढा काय आनन्द झालेला ईशा आल्याचा. 'सर, बघा कोण आलय ते आपल्या ऑफिसात' म्हणत होता. खरतर ईशावर सर्वात जास्त तोच जळत होता. 'मी मुलगी झालो असतो तर बर झाल असत' म्हणणारा हाच ना तो.

पण चेहऱ्यावरचे हावभाव , बोलके डोळे यामुळे तो भाव खाऊन जातो .. त्याने नुसती भुवई उडवली /मान हलवली तरी कळतं काय बोलायचंय >>>>>> +++++++११११११११

नवीन चम्या/चमी आहेत संकु व शटा >>>>> Rofl

सारिका टी. >>>>>>> मला आधी ते जयश्री टी सारख वाटल. नन्तर कळल ते टायपिस्ट चे शॉ. फॉ आहे.

त्यात अल्लड असल्याचा अभिनय करायचं डोक्यात घेतलय मग तर बाळंच >>>>>> नायिका अल्लड असली तरीही चालली असती पण इथे तर केजीच बाळ आहे.

कालच्या एपि मधे सुबोध म्हणतो, तू तुझ्या वडिलांशी खोटं बोलू शकत नाहीस, .......पाॅज.......तू माझ्याशीही खोटं बोलू शकत नाहीस....
नक्की काय म्हणायचं आहे काकांना?
1. मी तुला वडिलांच्या ठिकाणी आहे
2. तू वडिलांना मानतेस तशीच मलाही मानतेस
3. तू खोटंच बोलू शकत नाहीस. Happy कोणाशीच नाही. ह्याच्याशीही नाही आणि त्याच्याशीही नाही.

झिंगाट गाण्यावर नाचताना सगळेजण "दैवजात दुःखे घडता" वर नाचल्यासारखे नाचत होते. सद्ध्या त्याचं जे चाल्लंय ते पाहून सिरीअलमधील सैराट पाहिल्यासारखं वाटतंय.

झिंगाट गाण्यावर नाचताना सगळेजण "दैवजात दुःखे घडता" वर नाचल्यासारखे नाचत होते.+१११११११११११११११
मेधावि , अख्या पोस्ट ला अनुमोदन

दैवजात दु:खे ........भन्नाट
बाकी काल बाळाला कोट दिल्यावर थोपटताना " निंबोणीच्या झाडामागे"हे गाण कित्ती ग्वॉड वाटल असत.
फारएण्ड,अँँनँलिसिस एकदम कडक.
पण मालिका बंद करण्याची मागणी काय पटली नाही.अहो मग जवळजवळ सगळ्याच मालिका बंद कराव्या लागती.
मग आम्ही लिहायच काय?
अजून खरी ईश्टोरी सुपात आहे,ती बाहेर तर येऊ देत.कारण सुभा वजनाकडे जरी लक्क्ष देत नसला तरी तो इमेज सांभाळून काम करणार्यातला कलाकार वाटतो आणि बाळाशी तर तो वात्सल्याने वागत आहे.त्यामुळे इतक्यात घाई नको.

बाकी काल बाळाला कोट दिल्यावर थोपटताना " निंबोणीच्या झाडामागे"हे गाण कित्ती ग्वॉड वाटल असत.>> +१११
त्याच्या काखेतला घाम दिसत होता, थोपटण्याच्या सीन मध्ये

पण चेहऱ्यावरचे हावभाव , बोलके डोळे यामुळे तो भाव खाऊन जातो .. त्याने नुसती भुवई उडवली /मान हलवली तरी कळतं काय बोलायचंय >>>>>> +++++++११११११११ आणी स्माईल पण किलर आहे.....

अजुन एक observation ... मायरा सग ळ्या स्कर्ट वर एकच belt घालते....

Pages