तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छळ मांडला आहे ह्या बाळाने त्या विकूचा.लग्नानंतर विकूचे आहेत तेवढे सगळे काळेपांढरे केस जाणार. परत एकदा बाळाला फॉर्मल इंटर्व्ह्यू न होता सरंजामे कडे नोकरी मिळाली,आणि आता आईसाहेब पण ईशासोबत काम करणार आहेत.
म्हणजे बहुतेक दोघी राजनंदिनी साडी ड्रेस शिवण्यासाठी कात्रीने फाडणार आणि गाण म्हणताना डायरेक्ट मंगळागौरीचाच खेळ खेळणार
"अग अग सूने
काय म्हणता सासुबाई
विक्रांत आणि मी दिलेला हार तू कय ग केलास काय ग केलास?
माझ्या लग्नात आईला दिला आईला दिला."

परत एकदा बाळाला फॉर्मल इंटर्व्ह्यू न होता सरंजामे कडे नोकरी मिळाली,>>> परत तिथेच ? Uhoh मग बाबांच्या म्हणण्याचे काय?

धादांत khot बोलते हो इशा बाबांना. विकू म्हणाला की 3 महिने जॉईन केलेली नोकरी सोडता येत नाही।। म्हणजे थापच .. थोडा इशाला इशारा करताच ती पण लगेच हो म्हणाली।। आता उद्यापासून ऑफिस मध्ये इलू इलू

मायरा सरांना गोळ्या देत असताना ईशा केबिनच्या दारातून बघत असते, गळाला लागलेला मासा निसटतो की काय अशी भीती पसरते ईशाच्या चेहे-यावर. फारच गळेपडू आहे ईशा.

नरमगरम सिनेमामधे जेव्हा स्वरूप संपतचे लग्न उत्पल दत्तशी ठरवले जाते तेव्हा ए के हंगल म्हणतात कैसे हा करू ये शादी के लिये? उमरमे मेरेसे साल-दो साल तो निकालते ही होंगे. मै उसका बाप हूँ कोई दुश्मन तो नही... त्याची आठवण झाली.

त्याच वयच तर सांगत नाहीयेत एक्साक्टली.. जर इशा 22 वर्षाची असेल तर तिचे बाबा निदान 45 -50 असणार .. मग सुभा पण त्याच वयाचा झाला की..
की 2-3 वर्ष लहान? जाऊ दे .. झेंडे काहीतरी परिक्षा घेणार वाटत आता इशाची.. सुभा बघावा वाटतोय तोपर्यंत बघायचं.. एक्सप्रेशन्स मस्त.. गोड आहे सुभा

विक्रांत सरंजामेचं वय ४६, सुरुवातीला ईशा त्याला त्याची माहिती लिहिण्यासाठी एक बुक देते. त्यात वयासमोर तो ४६ लिहितो. Married? च्या पुढे काही लिहिताना तो थबकतो आणि मग काहीच लिहित नाही.

ईशा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला म्हणजे अंदाजे २०.

>>"बास बास, पुढे सांगायची गरजच नाही. तुम्हाला नोकरीवर घेताना ऑन प्रमोशनच घेत आहोत. बंगलोर की लंडन पोस्टिंग ते ठरवा."
लय भारी..! Proud

>>विक्रांत सरंजामेचं वय ४६, सुरुवातीला ईशा त्याला त्याची माहिती लिहिण्यासाठी एक बुक देते. त्यात वयासमोर तो ४६ लिहितो.
बाकी, 'भाई' ला त्या बाबतीत टक्कर देऊ शकेल असा एक मराठी स्टार शेवटी सापडला. फक्त व्हाया बालगंधर्व, टीळक, कट्यार, अशी गाडी रूळावर येईपर्यंत अंगावर 'फुगे' चिकटले. असो.
>>Married? च्या पुढे काही लिहिताना तो थबकतो आणि मग काहीच लिहित नाही.
अर्थातच... नाहितर ज्यु टिल्लू ला जास्त फुटेज द्यावं लागलं असतं ना.

एक मात्रं आहे. वि.स. ला पर्याय म्हणून मुद्दामूनच कुणिही पात्रं ऊभे केलेल नाही.. त्यामूळे सटकलेला जयदीप, टिल्लू बाळ, या पेक्षा विस (वय वगळता) ऊठून दिसतो. ईबाळा चे ही तेच. मायरा, रूपाली, व ऑफिस मधिल ईतर स्त्री पात्रांपुढे ती जरा बरी वाटते. थोडक्यात ऑथर बॅक्ड रोल का म्हणतात तसे. सुभा ने संधीचा मस्त फायदा घेतला. ईबा च्या बाबतीत मात्र- जे सोर्‍यातच नाही ते चकलीत कसे येणार अशी गत आहे.
खरे तर ड्रामा, थ्रिल, विनोद, रहस्य, रोमांस, कट, कारस्थाने, ईत्यादी साठी आवश्यक तगडा दारूगोळा वेग वेगळ्या पात्रांच्या रूपाने ऊपलब्ध आहे. पण शक्यतो मुख्य स्त्री व पुरूष पात्रांभोवतीच फिरणार्‍या मराठी मालिकां मधून दुसरे काही वेगळे अपेक्षित नव्हते. खेरीज पाट्या टकणार्‍या लेखकांकडून फार अभ्यासपूर्ण पटकथा वगैरे अपेक्षा ठेवणे चूकच आहे. सुभा व त्यामूळे चॅनल चा टीआरपी भयंकर वाढला आहे. तेव्हा हे सर्व असेच चालू राहणार. ऊगाच आता मायरा व झेंडे प्रेमप्रकरण असल्या अशक्य अपेक्षा ठेवू नयेत. या मालिकेने सुभा च्या रूपात सर्व स्त्री वर्गाची सोय केली आहे पण पुरूष वर्गावर मात्र घोर अन्याय केला आहे. एव्ह्डाच आक्षेप आहे. Proud

ईबा च्या बाबतीत मात्र- जे सोर्‍यातच नाही ते चकलीत कसे येणार अशी गत आहे. >>> Lol हे परफेक्ट आहे.

वि.स. ला पर्याय म्हणून मुद्दामूनच कुणिही पात्रं ऊभे केलेल नाही. >>> म्हणजे सवता सुभा उभा केलेला नाही (किती दिवसांपासून हा कोट मारायची संधी शोधत होतो! Happy )

पण ते निरीक्षण बरोबर आहे. आपल्याला बदाम शेप्ड गॉगल्स लावून सिरीज बघावीशी वाटेल असे कोणीच नाही त्यात. आणि सुबोध भावे ला कॉम्पिटिशन नाही हे ही खरे. जयदीपही हॅण्डसम आहे पण तो चक्रम आहे. झेण्डेला लाइकेबल करायची चांगली संधी होती. "गावाकडचा" कॉमन सेन्स वापरून मायरा सकट आजूबाजूच्या लोकांना जमिनीवर ठेवणारा भारदस्त माणूस म्हणून तो जमला असता. पण ती व्यक्तिरेखाही गोंधळात आहे. अर्थात सिरीज मधल्या लेखनाची लेव्हल पाहता हे आवर्जून केले असेल अशी शक्यता कमी आहे. पण थोर थोर पिच्कर्स ना मग फॅन लोकही मुळात - योगच्या परवानगीने त्याचीच उपमा वापरून - सोर्‍यातील पिठात नसलेले गुण चकलीला चिकटवतात तसे आपणही करायला हवे या सिरीज बद्दल. म्हणजे "विक्रम सरंजामेला टक्कर देउ शकेल आणि ईशाच्या हळुवार मनापुढे तारूण्यसुलभ डायलेमा उपस्थित होईल अशी व्यक्तीच नसणे, हा लेखकाचा मास्टरस्ट्रोक आहे" वगैरे वगैरे

मायबोलीवर नेहमी वाचनमात्रच असते. पण तो नियम मोडून प्रतिसाद द्यावा इतकी उच्च कोटी की कोट फारएंड यांनी केली आहे. साष्टांग दंडवत. टोपी काढण्यात आली आहे.

ईशा गेली का त्या घरात राहायला. तो गोराघारा एक आहे ना तरूण जो म्हणतो ना की मी मुलगी असतो तर बरंं झालं असतं, तो आवडू शकला असता की ईशाला. तो शिपाई दाखवलाय तोही देखणा आहे.

सवता सुभा फार भारी!
तुपारेच लेखन सध्या मायबोलिच्या गणपतीतल्या एसटिवाय सारख चालु आहे अस वाटत , एक बेसिक स्टोरिलाइन आहे, नविन पात्र आणा, ड्रिम -सिक्वेन्स नको, कुणाला मारु नका बाकी मग चालु दे

विस जोवर स्वतःचा आब राखून होता तोवर जास्त आवडायचा. परवा तिला तो आज डब्यात काय आणलंय, बरं मी घरी सोडायला आलो तर चालेल ना असं विचारतो तेव्हा वाईट वाटलं.

सवता सुभा >>> Biggrin एकदम सिक्सर.

आणिक कोण शोभलं असतं सुभाच्या जागी? >>> शाहरुख खानशिवाय आहे कोण? (आता लोकांनी हाणायच्या आधी पळतो इथून.) Light 1

वरील कोणीच सुभाइतके देखणे नाहीत. खुद्द सुभासुद्धा आधी इतका देखणा दिसला नव्हता.

Pages