तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो सुभा पण ४३-४४ आहे बहुतेक.. या रोल साठी वयस्करच दाखवायचं आहे म्हणुन ठीक , पण चाळीशीच्या मानाने मोठा दिसतोय.. वजन वाढलयं.. अनहेल्दी वाटतोय..
पुष्पक विमान मधे येवढा जाड नव्हता वाटला.. गावाकडच्या मुलाचं कॅरॅक्टर पण छान उभं केलं होतं..

ओ उमेशला कशाला मध्ये आणताय. तो एकदम फिट आहे.
डाएट आणि व्यायाम दोन्ही उत्तमरितीने फाॅलो करतो. म्हणूनच अजूनही एकदम फिट आहे. Happy

सुभा अचानकच सुजकट दिसायला लागलाय. कामाचा अतिताण असू शकतो.
मी ही शिरेल बघणे कधीचेच सोडलेय. सुभाच काय अगदी हृतिक आला शिरेलीत तरी बी मी नाय पाहू शकत इतकी बिनडोक शिरेल.

तरी सर्वान्नी परवाऑफिसमधे झालेल्या डान्सच्या एपिचा लाभं घ्यावा प्लिजच.. सगळ्या मुर्खपणाचा शिरोमणी होता तो..

आणि असे ड्रिंक्स इतक्या ओपनली? तेही ऑफीस आर्स मधे?
काहीही.....
आणि सर्वात कहर म्हणजे तो गार्ड विक्रांत ला काहीच कळवत नाही......विक्रांत ही हातात २ रु चे नाणे घेऊन उसासे टाकत बसला आहे....

>>>सुबोध भावे कधीच स्मार्ट, कॉस्मो हिरो म्हणून सूट होत नाही,
अगदी अवंतिका वगैरे च्या दिवसापासून,
त्याचा एकंदर वावर पुण्याच्या कॉलेज मधला कॅम्पस प्लेसमेंट मधून IT कंपनी मध्ये लागलेला गुड बॉय असाच असतो भूमिका कोणतीही असो ,
आता इकडे बालगंधर्व किंवा टिळक चे दाखले देऊ नयेत ,त्यात हेवी मेकअप ने त्याचा लुक बदलला होता.<<<<

तो सुजमार अगदी पहिल्यापासुन दिसतो.
विशिष्ट शहरातील काही पेठी मुलींना तो आवडायचा पाहून वाटायचे की, अरेरे..

सुकन्या ची trajedy झाली, स्टेज वर झालेल्या अपघातानंतर स्टरॉइड्स घेतल्यामुळे तिचे वजन बेफाम वाढले

सुभानं पण बालगंधर्व आणि लोकमान्यसाठी उतरवलं होतं वजन. आत्ताही उतरवलं होतं पण जास्त उतरवलं असतं तर चेहरा खप्पड झालेला चालणार नाही म्हणून थांबवलं. जसा आहे तसाही ठीके. तो वयस्करच झाल्यावरच आवडायला लागलाय बायाबापड्यांना. कविता लाड गोडच आहे पण प्रशांत वजनदार आहे तरी तोही चांगला दिसतो अजून.
सुकन्या हल्ली हल्ली जरा बारीक वाटायला लागलिये.

सुबोध भावे सारख्या पिठुळ दिसणार्या chubby माणसाचे फॅन आहेत याचे आश्चर्य वाटले.
सु भा ,स्वजो इत्यादी लोक काही नायक वाटत नाहीत ,ते कोणत्यातरी दिवाळीपहाट कार्यक्रमाचे हंगामी सुत्रसंचालक वाटतात.

हो सुभा पण ४३-४४ आहे बहुतेक.. या रोल साठी वयस्करच दाखवायचं आहे म्हणुन ठीक , पण चाळीशीच्या मानाने मोठा दिसतोय.. वजन वाढलयं.. अनहेल्दी वाटतोय.. >>> हे मला पहील्या दोन एपिसोडस मधेच वाटलं. मी लिहीलंही होतं की त्याला जास्त दाखवलंय वयाने आणि ती तर अजिबात आवडली नाही त्यामुळे पुढे बघितलीच नाही. अपवाद एक सीन पार्टीला जातात तो बघितला. पुढचा तमाशा नाही बघितला.

उमेश कामतसाठी मात्र डोळ्यात बदाम.

सु भाच्याच वयाचा किंवा मोठा दाखवलाय समीर धर्माधिकारी भेटी लागी जीवा मधे पण काय दिसतो, काय सॉलिड प्रोजेक्ट केलंय त्याला, हा अभिनय नो डाऊट सु भा उत्तम करतो पण प्रेझेंटेबल स ध कितीतरी पटीने सु भा पेक्षा. हल्ली अभिनयपण चांगला करायला लागलाय. स ध कडे बघत रहावं असं वाटतं मात्र सु भा पेक्षा.

उमेश अजून तरुण आहे खूप.>>>> ४० शी आला तोही.

कविता लाड गोडच आहे पण प्रशांत वजनदार आहे तरी तोही चांगला दिसतो अजून.>>>>> हो तो पहिल्यापासून गुटगुटीत आहे.गोंडस आणि तरतरीत दिसतो.
सुभा सुजकट दिसतो.मात्र मृदू हास्य आणि मार्दवी चेहरा चांगला आहे इतकेच.बालगंधर्व सिनेमा पहायचा राहिला.त्यात लडिवाळ सुरेख दिसत असणार.

कलाकार हा त्यातल्या अभिनयाने कौशल्याने घर करतो मनात....कुठे तरी ..ते त्याने tyachya madhal talent पोचवल आहे लोका पर्यन्त .... त्यामुळेच सुभा ची क्रेझ वाढ ली आहे... काहि वेळेला... serial madhale character sudha lok relate karu lagatat .... so actually vikrant che character tyane kahi velela nusatya expressions madhun ubhe kele ahe.. .tya mule sudhha lok vede zalet...

मृदू हास्य >>+11111111

काही अभिनेते / अभिनेत्री जरा 45शीत आले की लगेच आईबाबा रोल करायला लागतात, पण आपले लुक्स मेंटेन नाही करत. >>>>>>>> अगदी अगदी . हयाबाबतीत अशोक शिन्देला मानल पाहिजे, वडिलान्चा रोल करुनही अजूनही फिटनेस कायम आहे त्याचा.

(आजी असतील तर कठीणच आहे) लग्नाआधी, भूतकाळातील गाडलेली भुते उकरून परत गाडणार असतील. >>>>>> Rofl

तो वेडा माणूस नेमका फोटो दाखवल्यावरच कसा काय तिच्या मागे लागला? Uhoh जालिन्दरनेच त्याला हायर केले असणार. तो वेडा बिडा नसावा.

कलाकार हा त्यातल्या अभिनयाने कौशल्याने घर करतो मनात....कुठे तरी ..ते त्याने tyachya madhal talent पोचवल आहे लोका पर्यन्त .... त्यामुळेच सुभा ची क्रेझ वाढ ली आहे... काहि वेळेला... serial madhale character sudha lok relate karu lagatat .... so actually vikrant che character tyane kahi velela nusatya expressions madhun ubhe kele ahe.. .tya mule sudhha lok vede zalet...

मृदू हास्य >>+11111111 >>>>>>>>>>>> +++++++++११११११११

सुभा सुजकट ,थोराड वगैरे सगळ ठीक आहे,पण आपल्या तेंडुलकरांच्या सचिन ससरख बिचारा एकटाच जीव तोडून खेळतोय.
मायरा,झेंडे, निमकर जोडप 1,2,3 धावा काढून साथ देतात.पण बाळ ,तिचा एकही बॉल बँटला लागतच नाही,बर तरी सुभा स्ट्राईक घेण्यासाठी धावतो.पण आताशा तो पण दमायला लागलाय.
बाळाने एकतर रनर घ्यावा(आपला आवाज वापरू नये)किंवा जागा रिकामी करावी.

आज तर फार गोड दिसला. आजारी असल्याने गप्प होती म्हणून आज तीही बरी वाटली.
परवाच्या डान्सपेक्षा आजचे सुभाचा डान्स जास्त मजेशीर होता.

सुभाच काहीतरी वेगळच रुप समोर येणार नंतर अस जाम वाटत आहे.उद्या निमकरांच्या घरात सुभा जालिंदर काकांबद्दल टेपा लावतोय अस वाटय आहे.
आणि बाळाकडे लक्षच जात नाही आता.सुभा खेळतोय तोपर्यन्त ठीक.त्याला थोडी विश्रांती द्यायला हवी.शिरियल लांबणार असेल तर बाकीच्यांना खेळू दे टी20,कारण सुभाला टेस्ट मँच खेळायची आहे.
पण सुभा जर खरच टेपा लावत असेल आणि हाच त्याचा वेगळा रोल असेल तर त्याच्या अभिनयाला सलाम.

Pages