Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फोकस ओन्ली सुभा
फोकस ओन्ली सुभा
मागच्या आठवड्यात बघणे सोडून
मागच्या आठवड्यात बघणे सोडून दिले.. धाग्यावर चक्कर टाकली एकही पोस्ट नाही .. मला वाटले सगळे संपले :). पण धन्य आहात, नवा धागा दहा पाने इतका दंगा केलात .. तुमच्या पोस्ट वाचून त्या भयंकर विनोदी प्रसंगाचा आनंद घेण्यसाठी जंप करत एपिसोडस पहिले ..मला तुपारे च्या नादी लावणाऱ्या मायबोलीकरानो, देव तुम्हाला माफ करणार नाही :))
माउलींना रेड्याकडून वेद वदवून घेताना पण इतके efforts घ्यावे लागले नसतील.. इतके इबाळाला सुभाकडून "आय लव्ह यु" म्हणवून घ्यायला घ्यावे लागत आहेत .. :))
माउलींना रेड्याकडून वेद वदवून
माउलींना रेड्याकडून वेद वदवून घेताना पण इतके efforts घ्यावे लागले नसतील.. इतके इबाळाला सुभाकडून "आय लव्ह यु" म्हणवून घ्यायला घ्यावे लागत आहेत .. :)) >>>>>> हो.... बरोबर...
महा एपीसोड चा प्रोमो आला....
शनिवारचा एपिसोड पाहिला.
शनिवारचा एपिसोड पाहिला. त्यात ईबाळाचा बनेलपणा आणखीनच उठूनच दिसत होता. झेन्डेला कस दटावल तिने, 'सर आहेत ना आत? " , नन्तर तर मायरा विस बोलत असताना, झेन्डेच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करुन सरळ आतच शिरली. 'मे आय कम ईन' वगैरे मॅनर्स सुद्दा नाहियेत हिला.
मायराच विसबरोबर जवळीक करणे ते पटल नाही. मला ईशापेक्षा तिच प्रेम खर वाटत. पण तिने ईशाच्या लेव्हलला जाता कामा नये.
आजच्या भागात तर विस कनिन्ग वाटला. त्या बेट लावण्याच्या सीनमध्ये शेवटी विस कॉफी पिता पिता झेन्डेकडे असा बघतो, तेव्हा तो ' तुला काय वाटतय, मी इशाच्या जाळयात फसलोय? कोण कोणाच्या जाळयात अडकलय ते तुला शेवटी कळेलच.' म्हणतोय असे वाटत होते.
झेन्डे मायराचा पर्स सीन विनोदी होता.
सवतासुभा
माउलींना रेड्याकडून वेद वदवून घेताना पण इतके efforts घ्यावे लागले नसतील.. इतके इबाळाला सुभाकडून "आय लव्ह यु" म्हणवून घ्यायला घ्यावे लागत आहेत .. : >>>>>>>> अहो वृन्दा, सुभाला रेडा का म्हणतायत. ईबाळ आणि माउली?
>>ईतके एपिसोड्स झाले तरी अजून
>>ईतके एपिसोड्स झाले तरी अजून मालिकेचा फोकस काय हेच कळेना..>>
>> कोणत्या मालिकेचा फोकस कळतो??
ऊपरोध होता.. प्रश्ण नव्हे. असो.
'सवता सुभा' या ऑल टाईम हीट शीर्षकाखाली एक STY धागा ऊघडावा.. आणि या मालिकेला निर्णायक वळण द्यावे.
(request on behalf of Subha)
>>कोण कोणाच्या जाळयात अडकलय ते तुला शेवटी कळेलच.' म्हणतोय असे वाटत होते.
बहुतेक तो दुसर्या हाताने खिशातून फ्लॅट ची चावी काढेल आणि या खेपेस झेंडे ला वाईट्ट ढोस देईल- "यन्ना रास्कल्ला, माईंड ईट".
पण त्याच बघण एक वेड लावणार
पण त्याच बघण एक वेड लावणार असत.. डोळ्यात डोळे घालुन बघण .. ए क द म कातिल... तर तेव्हाचं सुभा ची ऍक्टिंग भारी होत .. त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं , उगाच सैरभैर किंवा आज इशा येणार हे कुठेतरी डोक्यात असल्यामुळे ती केव्हा येईल ? / येईल कि नाही हे सतत डोक्यात आहे असं दाखवत होता .. त्यात ती मायरा मध्ये मधे लुडबुड करत होती .. आणि मग इशा आल्याबरोब्बर काय त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव एका क्षणात झरझर बदलत गेले !! एकदम छान रिलॅक्स हसला !! मस्त अभिनय>>>>>> ++++++११११११११
माझा छोटासा संसार म्हणे >>>>>> विसच स्लॅमबुक वाचून तिला माहितच असेल की हयाचा कर्जतला भला मोठ्ठा बन्गला आहे ते. म्हणून हा सगळा ड्रामा.
हो ना...आणि सु भा तरी काय असल्या फालतू गोष्टींवर अगदी जीव टाकतो .. पाणीपुरी काय अन छोट्या छोट्या गोष्टींतला आनंद काय ! कैच्या कैच! >>>>>>> सॉरी आगो, हे मात्र पटल नाही. छोटया छोटया गोष्टी, मका खाणे, पाणीपुरी वगैरे हया गोष्टी फालतू नसतात.
" सर..घर मोठं असलं काय नी छोटं असलं काय..महत्वाचं आहे ते माझ्या सोबत असणारा माझा माणूस! जो माझ्यावर प्रेम करेल, माझी काळजी घेईल...... मग बाकी इतर गोष्टींनी काहीच फरक पडत नाही " ................ यंव नि त्यंव...!
कोण लिहीतं असे डायलॉग्ज आणि असे प्रसंग...!! >>>>>. हे असे डायलॉग्ज सिरियल्समध्येच शोभतात.
झेंडेनक्षत्र >>>>>>
ती विक्रांत ची काकू..? खुक खु मधली >>>>>>>> खुक खु वरुन आठवल, तिकडचा विक्रांत 'लक्ष्मी सदैव मन्गलम' मध्ये व्हिलन झालाय सध्या.
बहुतेक तो दुसर्या हाताने
बहुतेक तो दुसर्या हाताने खिशातून फ्लॅट ची चावी काढेल आणि या खेपेस झेंडे ला वाईट्ट ढोस देईल- "यन्ना रास्कल्ला, माईंड ईट >>>>>>>
पण हे मी कालच्या भागाबद्दल बोलत होते.
पुढच्या भागात मध्ये पाहताना
पुढच्या भागात मध्ये पाहताना मी आणि संभाजी पाहायला आलेला माझा नवरा दोघ एकत्र म्हणालो,, की सुभा खिशातून किल्ली काढणार
नवरा म्हणे बघ इशा कशी म्हणते छोट घर ,, फुटपाथ वर राहणार ,, मी म्हटलं समोर साक्षात विस दिसताना तिला काय जातंय म्हणायला
बहुतेक तो दुसर्या हाताने
बहुतेक तो दुसर्या हाताने खिशातून फ्लॅट ची चावी काढेल आणि या खेपेस झेंडे ला वाईट्ट ढोस देईल- "यन्ना रास्कल्ला, माईंड ईट">> हो मला पण असं वाटलं .. नेहेमी "पुढच्या भागात " हे दिसत नाही मला.. पण काल चक्क दाखवलं कट न करता !
काहीतरी करा म्हणावं ड्रीम
काहीतरी करा म्हणावं ड्रीम सिक्वेन्स दाखवा , ओढण्या उडवा, ओढण्या अडकू द्या शर्ट च्या बटणात,, पुस्तकं पडू दे उचलून देऊ दे,, काहीतरी करा पण प्रेम दाखवा फक्त सुभाच्या डोळ्यात नाही तर दोघात,,
महाएपिसोड मध्ये पण ईशा का$$$ य हो सर ,, प्रेम हे असं असत ,, जीवन हे तसं असतं,, करत बसणार
ड्रीम सिक्वेन्स दाखवा >>>>>>
ड्रीम सिक्वेन्स दाखवा >>>>>>> दाखवलेला ना ड्रीम सिक्वेन्स चकल्या तळताना.
हो सुभा कातिल दिसला होता ,,
हो सुभा कातिल दिसला होता ,,
एक भाबडा प्रश्न. जालिंदर
एक भाबडा प्रश्न. जालिंदर काकांच काय झाल?ते सबस्टिट्यूट फिल्डर,बँट्स्मन ,बॉलर यापैकी कोणी होते का?
गेले दोन दिवस पाहिली नाही,पण आज महारविवारचा प्रोमो पाहिला आणि कुठेतरी वाटल की आता शितु लवकरच येईल
बाय माझे,काय तो प्रोमो,लगीन होण्याआधीच विकू बाळाला कर्जतच्या घरी नेऊन तिथे मागणी घालणार आहे,काय बाळासाठी गाडी काय पाठवणार आहे,फुलांचा सडा काय पाडणार आहे,हातात हात घालून काय जाणार आहेत घरात.
शाहजहान पण लाजेल
सुभा वर खूपच जीव ओवाळून टाकणार्यांनो माफी असावी,
पण आता सुभाचा म्हणजे विकूचा म्हातारचळ वाटायला लागला आहे.
केड्याला धू धू धुतला पाहिजे.
तो पापणीचा केस ती फु करून
तो पापणीचा केस ती फु करून उडवते, तो उडालेला केस कुठे पडला तेसुद्धा सुभाने नजरेने दाखवलं... जबरदस्त ! बारीक बारीक बारकावे मस्त जाणलेत सुभाने.
पुढच्या भागात मध्ये पाहताना
पुढच्या भागात मध्ये पाहताना मी आणि संभाजी पाहायला आलेला माझा नवरा दोघ एकत्र म्हणालो,, की सुभा खिशातून किल्ली काढणार
नवरा म्हणे बघ इशा कशी म्हणते छोट घर ,, फुटपाथ वर राहणार ,, मी म्हटलं समोर साक्षात विस दिसताना तिला काय जातंय म्हणायला>>>>>>>>> ++++++11111111 हाहाहाहाहा...
तो पापणीचा केस ती फु करून उडवते, तो उडालेला केस कुठे पडला तेसुद्धा सुभाने नजरेने दाखवलं... जबरदस्त ! बारीक बारीक बारकावे मस्त जाणलेत सुभाने.>>>>>>> त्याच्या याच अभिनय कौशल्या ने भारावुन टाकलय
>>काहीतरी करा म्हणावं ड्रीम
>>काहीतरी करा म्हणावं ड्रीम सिक्वेन्स दाखवा , ओढण्या उडवा, ओढण्या अडकू द्या शर्ट च्या बटणात,, पुस्तकं पडू दे उचलून देऊ दे,, काहीतरी करा पण प्रेम दाखवा फक्त सुभाच्या डोळ्यात नाही तर दोघात,,
अरेरे.. निदान ड्रीम सिक्वेंस मधे तरी 'ऊमेद' दाखवा.
दोघांना 'चंचूबध्द' होताना दाखवा.
होवू देत चर्चा... निघू देत मोर्चे... होवू द्यात एफ आय आर.. मराठी माणसाने का म्हणून मागे रहायचे.. मालिकांच्या इतिहासात असे मैलाचे चंचू दगड आता यायलाच हवेत. गुरू आणि शनाया नंतर आता पाऊल पुढेच टाकायला हवे.
(No subject)
विसं खरंच चळलाय. इशाबेबीला
विस खरंच चळलाय. इशाबेबीला वाटतंय की तो मागच्या पिढीचा आहे म्हणून बुजरा आहे. गैरसमज लवकरच दूर होईल
इबेबीचं एकूण आयुष्यच कसलं बुळबुळीत वाटतं. काही झालं की आपलं, "हो बाबा". तिची आईच चांगली ठणकाबाई आहे आणि इंटरेस्टींग जगते.
सौ. मायरा विलास झेंडे होणार असं वाटतंय. (तिला उगं लांबडे झगे दिलेत सद्ध्या)
त्याच्या याच अभिनय कौशल्या ने
त्याच्या याच अभिनय कौशल्या ने भारावुन टाकलय>>>+1111111
अभिज्ञा मस्त ऍक्टिंग करते,
अभिज्ञा मस्त ऍक्टिंग करते, चेहरा, डोळे - अफाट एक्स्प्रेशन देते, ऍक्टिंग मधे तोडीस तोड आहे सुभा च्या.
कॉलेजनंतर लगेच छोटा संसार काय
कॉलेजनंतर लगेच छोटा संसार काय? काही मास्टर्स, पुढे शिकायचे, आई बाबांना खूश ठेवायचे असलं काही नाही का?
परवा विसं पण असं काय म्हटला? हल्लीच्या मुलींना लग्नापेक्षा नोकरी महत्वाची वाटते? काहीतरीच ... हिचे काय असं वय पळून जातंय का? त्याचं जात असेल भले.
शिरियल जरा बोअर झाली आहे
शिरियल जरा बोअर झाली आहे.म्हणून जरा हा टाईमपास.
शितु कोण आहे.पर्याय खालीलप्रमाणे
1.विकूची लग्न न झालेली प्रेयसी
2.विकूच्या मागे बाळासारखी लागलेली चाळकरीम कम त्याच्यासोबत पेपर टाकणारी.
3.विकूची लग्नाची पण मेलेली बायको
4.विकूची मरून परत जिवंत होऊन आलेली बायको
5.भूत
6.रामसे बंधूंच्या सिनेमात असतात तसा आत्मा
7.बाळाचा पुनर्जन्म
8.विकूच्या सिक्रेटरूममधील फोटोत टांगलेली
9.सिक्रेट रुममधील कोमात असलेली
10.रूग्ण(आंधळी,मुकी,बहिरी,पांगळी,वेडी)
11.यापैकी काहीही नाही.
बापरे मला एवढ सुचत तर केड्याला काय काय सुचत असेल.
बाकी ठीक पण सुभा ने ईशाला हेड
बाकी ठीक पण सुभा ने ईशाला हेड करणे अतीच .. मोजून 10-12 दिवस पण ऑफिसमध्ये आली नसेल ती..
3 नं. लग्नाची हयात नसलेली
3 नं. लग्नाची हयात नसलेली बायको
बंद खोलीत काय असेल ह्यावरही
बंद खोलीत काय असेल ह्यावरही मतं घ्यावीत काय?
1. जुने फोटो
2. शितुच्या आठवणी, शितुचीच खोली
3. शितू
4. विकुच्या चाळीतल्या वस्तू
विकूच्या चाळीतल्या वस्तू>>>>+
विकूच्या चाळीतल्या वस्तू>>>>++++11111111
जबरदस्त.
5) खुद्द शितु
5) खुद्द शितु
>>5) खुद्द शितु
>>5) खुद्द शितु
म्हणजे ईशा = Jane Eyre
विस = Mr Rochester
शितु = Mr Rochester ची पहिली बायको की काय?
बापरे.
प्रेम असावं जुनं,, बायको झाली
प्रेम असावं जुनं,, बायको झाली तर किंमत आणि महत्व रहात नाही,, म्हणून अधुरा प्यार,, आणि खोलीत जुन्या चिठ्या चपाट्या
सवता सुभा Rofl
सवता सुभा Rofl
ईशाला पर्याय 'पसंतं आहे मुलगी' मधली लीड रोल - नाव आठवत नाही, छान अभिनय करायची व स्मार्ट सुद्धा .
पण केडयाच्या शिरेलीसाठी - OVERQUALIFIED
Pages