Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48
तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
त्या जगप्रसिद्ध पार्टीत ते एक
त्या जगप्रसिद्ध पार्टीत ते एक दोन चमे कुठून उपटले होते? म्हणे ईशा रॉयल्टी/कॉपीराईट घ्यायला आली असेल तत्सम डायलॉग मारत होता. >>> नवीन पब्लिक आहे काही आजकाल.
त्या चम्याला असे वाटले बहुधा की आत्ता ऑफिस मधे कळालेली बातमी ईशाला आपोआप कळून ती लगेच कॉपीराइट घ्यायला आली सुद्धा?
बाय द वे, रॅण्डम बॅट फिरवताना एखादा शॉट क्लासिकल बसावा तसे एक नकळत लीगली करेक्ट कॉमेण्ट आली आहे ती - लीगली पाहता ईशा कॉपीराइट्/रॉयल्टी मागू शकते. मी तेव्हा ही सिरीज पाहात नव्हतो, पण फ्लॅशबॅक मधे एकदा सीन पाहिला तेव्हा ती ही कंपनी जॉइन करायच्या आधी ते वाक्य वापरते ना? म्हणजे त्यावर तिचा स्वतःचा कॉपीराइट असेल, कंपनीचा नाही. कंपनीने तिला नोकरी देताना तो कंपनी वापरेल वगैरे सांगून घेतले असेल तर नाही मागू शकणार.
अर्थात इतके डिटेलिंग हे लोक करत असते, तर मायराने पर्सनली दिलेले पाच लाख रू नंतर पगारातून वसूल करणे, टेंडर ची फाइल घरी, मायरा च्या एव्हीपी ते हाउसकीपर जबाबदार्या, गेटवे ऑफ इण्डिया खरेदी असले प्रकार दाखवले नसते
कालचा एपिसोड तो बोअर डान्स, सर माझा तुमच्यावर विश्वास आहे वगैरे मधेच संपला. या सिरीज मधे सर्वात प्रमाण मराठी तो रस्त्यावर ज्याला वडापाव दिला तो बोलतोय. बाकी सगळे म्हणजे "त्याने तुझ्यासोबत असे करायला नको होते", "मी तुमच्यावर विश्वास केला" वगैरे.
निमकर कोठेही निघाले की रूपाली समोर येतेय. आणखी एक "गरिबांची तुपारे" तर निर्माण होत नाही ना यातून? "स्पिन ऑफ?"
सुभा काल मिठी सिन मधे काय
सुभा काल मिठी सिन मधे काय एक्सप्रेशन्स देत होता, अवघडलेला.. मंद हास्य ईई
>>>>>>>
अगदी खरं.. काय एक्सप्रेशन्स देतो.. पुर्ण सिरिअल त्याने व्यापली आहे.. इबाळाला तर कोणी बघतही नसेल... मान हलवुन .. नुसतं डोळ्यातुन इशाला काही काही विचारतो ते पण मस्त..
सुभा ने दाढी ठेवावी .. शोभते त्याला.. क्लिन शेव्ह पेक्शा..( आता तो थोडिच ऐकणार ,, पण बोलायला काय जातं)
सर्वात प्रमाण मराठी तो
सर्वात प्रमाण मराठी तो रस्त्यावर ज्याला वडापाव दिला तो बोलतोय.>>>>>>>>
खर्र्रच
निमकर कोठेही निघाले की रूपाली समोर येतेय. आणखी एक "गरिबांची तुपारे" तर निर्माण होत नाही ना यातून?>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

<<झिंगाट गाण्यावर नाचताना
<<झिंगाट गाण्यावर नाचताना सगळेजण "दैवजात दुःखे घडता" वर नाचल्यासारखे नाचत होते. सद्ध्या त्याचं जे चाल्लंय ते पाहून सिरीअलमधील सैराट पाहिल्यासारखं वाटतंय.<<

<<बाकी काल बाळाला कोट दिल्यावर थोपटताना " निंबोणीच्या झाडामागे"हे गाण कित्ती ग्वॉड वाटल असत<< हे भारीय!
<<निमकर कोठेही निघाले की
<<निमकर कोठेही निघाले की रूपाली समोर येतेय. आणखी एक "गरिबांची तुपारे" तर निर्माण होत नाही ना यातून<< अगाया... काय पण जोडी! निमकर अन रुपाली!

निमकर आणि रूपाली,omg,सुपर
निमकर आणि रूपाली,omg,सुपर जोडी,फारऐण्ड,आगे बढो.मजा येते,वाचायला.
काहीही...... खरंच..पण तो
काहीही...... खरंच..पण तो सीन फारदाच रिपीट होतोय...निमकर रस्त्यात...आणि रुपाली मग लपते.........चेहेर्यावर घाबरलेले भाव...
गरिबांची तुपारे......... आम्ही ती मराठीतली कुणीतरी आहे ना घार्या डोळ्यांची ..तिला गरिबांची ऐश्वर्या राय म्हणतो तसे.....
कालच्या भागात विकूला मिठी
कालच्या भागात विकूला मिठी मारताना कस बाळ फूल एनर्जेटिक होत आणि घरी आल्यावर काय ग बाई ते तोंड .
बाळाच्या मोठ्या बाबांनी बाळाच्या छोट्या बाबांना काही ऑफिससंबधात प्रश्न विचारले,त्यात बंगलोरच्या प्रमोशनचाही प्रश्न होता,जयदीपने बाळाला कामावरून काढून छोट्या बाबांनी परत बाळाला कामावर का घेतल असाही प्रश्न होता,बाळ डॉक्टरकडे न जाता हाफिसात का गेल हाही होता.
पण या सगळ्या प्रश्नांना छोट्या बाबांनी स्वत:ला जबाबदार ठरवून गाडी बरोबर जालिंदर स्टेशनात उतरवली.आणि बाळ,तिचे पालक यांची सहानुभूती पण मिळवली.
उगाच नाही विकू एवढा मोठा बिझिनेसमन झाला.
>> आणि बाळ,तिचे पालक यांची
>> आणि बाळ,तिचे पालक यांची सहानुभूती पण मिळवली.>>>>>>>>>
थोडक्यात गंडवलं बाबांना..
>>>>> कालच्या भागात विकूला मिठी मारताना कस बाळ फूल एनर्जेटिक होत आणि घरी आल्यावर काय ग बाई ते तोंड .>>>>>
बरं नसताना हसायला आलं तर ते कसं दखवावं ते कळलच नाही तिला..
शेव्टी ईबाळाने परत एक्दा
शेव्टी ईबाळाने परत एक्दा सुभाला आठ्व्ण करावी म्हणुन पुन्हा एकदा ,'आय ट्रस्ट यु,आय ट्रस्ट यु... करत म्हणुनच घेतले 'आय लव्ह यु'!

पण आपला पठ्ठ्या काहि म्हणाय्ला तयार नाहि अजुन
9 डिसेंबरला महा एपिसोड मध्ये
9 डिसेंबरला महा एपिसोड मध्ये प्रपोज करणार असं वाचलं कुठेतरी..
9 डिसेंबरला महा एपिसोड मध्ये
9 डिसेंबरला महा एपिसोड मध्ये प्रपोज करणार असं वाचलं कुठेतरी..
फारएन्ड आणि up भारी पोस्ट्स:)
फारएन्ड आणि up भारी पोस्ट्स:)
फारेण्डा, किती मन लावून
फारेण्डा, किती मन लावून 'तुपारे' पाहतो रे! सगळ्ळं डिटेलिंग!
ते वरती वेडोबा यांचे चाहते
ते वरती वेडोबा यांचे चाहते व्हा असं दिसतयं सारखं ते येवढं मजेशिर वाटतयं.. मस्त नावं आहे वेडोबा..
मालिका एखादाच भाग बघितली पण
मालिका एखादाच भाग बघितली पण इथे वाचायला मज्जा येते.
नक्की काय सांगितलं जालिंदर बद्दल?
बाळं मात्र एखादं खेळणं
बाळं मात्र एखादं खेळणं मिळाल्यासार्खं हसत होतं
" टेडी बिअर तु मला खुप्प आवडतोस I love uuuu , "
मिठी मारताना जे ही $$$ करुन हसली ती तशीच शेवटपर्यंत, लाजणे नाही.. अवघडलेपणा नाही,, प्रेम नाही,, ओलावा नाही.. काह्ह्ही काही नाही..>>>>>> बापरे हसून हसून मेले
एक "गरिबांची तुपारे" तर
एक "गरिबांची तुपारे" तर निर्माण होत नाही ना यातून?>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
Rofl
बाबा ईशा ला शोधत नसून रुपलीलाच शोधत असावेत दरवेळी.. म्हणून तर रस्त्यावर मिठ्या मारणारी इशा न दिसता रुपलीच सापडते
नक्की काय सांगितलं जालिंदर
नक्की काय सांगितलं जालिंदर बद्दल? >>>>> काही नाही. विस चाळीत राहत असताना आधी पेपर टाकायच काम करायचा. नन्तर त्याने जालिन्दरबरोबर एक बिझनेस पार्टनशिपमध्ये सुरु केला. काही काळानन्तर बिझनेसवरुन त्यान्च्यात मतभेद झाले. सो, विस काही माणसान्बरोबर त्या बिझनेस मधून बाहेर पडला. बिझनेस बुडाल्याच्या रागात जालिन्दरने त्याच्यावर दोन वेळा हल्ला केला. एका हल्ल्यात झेन्डेने जिवावर उदार होऊन विसला वाचवलेल असत. जालिन्दर जेलमध्ये जातो. त्यानन्तर जालिन्दरची बायको मरते. त्याचाच बदला घेत असावा विसवर.
विस जर चाळीत असताना बिझनेस करत असेल तर तो सरन्जामेना कस ओळखतो? बर, जयदीपचे वडील त्याला दत्तक घेतात अस म्हणायच तर विस त्यावेळी लहान असावा. मेबी तो अनाथ असेल, एखाद्याकडे आश्रित म्हणून राहत असेल, आपल्या आईवडिल कोण हे माहित नसेल, तेरा चौदा वर्षाचा असताना पेपर टाकण्याचा धन्दा करत असेल, जयदीपच्या वडिलान्नी तेव्हाच त्याला दत्तक घेतल असेल. काहीच कळत नाही बुबा, लेखकासारखी मीसुद्दा कन्फ्यूजड झालीये.

सगळयान्चे प्रतिसाद लय भारी.
काल विस ईशाईला हळदीच दुध करायला सान्गितला होता, त्याने ईशाच्या घश्याला आराम पडेल म्हणे.
ईशा जेव्हा विसला 'तुम्ही देवमाणूस आहात, माझा तुमच्यावर विश्वास आहे' वै वै म्हणते, तेव्हा सुभाच्या चेहर्यावर गोन्धळाचे ' एवढा विश्वास हिचा माझ्यावर? ' एक्सप्रेशन्स होते.
काल सुबोध तिला त्या
काल सुबोध तिला त्या फोटोवाल्या माणसाला भेटायला नेतो तेव्हा म्हणाला, "इशा, तू घाबरू नकोस. (fullstop) मी गाडीत आहे हे विसरू नकोस."(fullstop)
म्हणजे काय?
1. तू न घाबरता जा. मी गाडीतच आहे. माझी काळजी करू नकोस.
2. तू जा. न घाबरता जा. मी दिसणार नाही कारण मी गाडीत आहे.( दगाफटका झालाच तर पोलिसांना बातमी देईन.)
3. तू जा, पण मी गाडीत आहे हे लक्षात असूदे, नाहीतर परत जाताना बसनं जाशील.
एक फायदा दोघांच्याही लक्षात आलाय. खुले आम कुठेही, कितीही मिठ्या मारु शकतात ते आता. बघणा-याला वाटतंय की बापलेक आहेत. (साप भी मरे, लाठी भी ना टूटे.)
काल त्यानं तिला विचारलं की तापाची गोळी मागवू? - ती नको म्हणाली ते पटकन् ऐकलं. वाटेतही गोळी नाही घेतली. घरी गेल्यावर गार्गीला सांगितलं तिला हळद दूध द्यायला. ( रोज देत जा म्हणावं. )
अरे सरंजाम्या, डाॅक्टरला का नाही बोलवलंस?
Submitted by सूलू_८२ on 28
Submitted by सूलू_८२ on 28 November, 2018 - 18:17
काल सुबोध तिला त्या फोटोवाल्या माणसाला भेटायला नेतो तेव्हा म्हणाला, "इशा, तू घाबरू नकोस. (fullstop) मी गाडीत आहे हे विसरू नकोस"
म्हणजे काय?
1. तू न घाबरता जा. मी गाडीतच आहे. माझी काळजी करू नकोस.
2. तू जा. न घाबरता जा. मी दिसणार नाही कारण मी गाडीत आहे.( दगाफटका झालाच तर पोलिसांना बातमी देईन.)
3. तू जा, पण मी गाडीत आहे हे लक्षात असूदे, नाहीतर परत जाताना बसनं जाशील.
एक फायदा दोघांच्याही लक्षात आलाय. खुले आम कुठेही , कितीही मिठ्या मारु शकतात. बघणा-याला वाटतं की बापलेक आहेत. (साप भी मरे, लाठी भी ना टूटे.) >>>>>>>>>>>>>>>>>>>>हहहहहहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहाहा
मिठी मारताना जे ही $$$ करुन
मिठी मारताना जे ही $$$ करुन हसली ती तशीच शेवटपर्यंत, लाजणे नाही.. अवघडलेपणा नाही,, प्रेम नाही,, ओलावा नाही.. काह्ह्ही काही नाही..>>>>>> होना.
जालिंदरबद्दल ऐकुन इपालक त्यांना पडलेले सगळे प्रश्न विसरले. इतक्या वेळा माना डोलवत होते कि वाटले तेव्हढ्यातच विसने इबाळासाठी मागणी घालायला हवी होती. तेव्हा त्यालाही माना डोलावल्या असत्या.
थॅंक यु आनंदी
थॅंक यु आनंदी
मी कधीच सोडलंय झी मराठी बघणं, फालतू मालिकांसाठी माझा वेळ का घालवू! तोच वेळ माबो वर आणि वाचण्यात घालवते. सुभासाठी मालिका बघायचा पेशन्स नाही बाबा आपल्यात!!
आईग्ग,मेधावि,सॉल्लिड.हसण
आईग्ग,मेधावि,सॉल्लिड.हसण कंट्रोलच होत नव्हत
आजच्या भागात तर बाळ झेंडेना जे वचन देते ते"मैं गीता पर हात रखके कसम खाती हूं ,जो कहूंगी सच कहूंगी ,सच के सिवा और कुछ नही कहूंगी, अशा धर्तीच होत.
आज बाळाला रडताना बघवतच नव्हत ,म्हणजे वाईट वाटत होत म्हणून नाही तर बाळ आता फारच डोक्यात जायला लागल आहे.सहनशक्ती संपत आली आहे.
पण शितु साठी सोडवत नाही आहे.
पुढील भागात विस झेंडेना
पुढील भागात विस झेंडेना म्हणाला की मी ईशाची जबाबदारी घेणार.. तिला लग्नाला मागणी घालणार.. बोला आता ..
ही एकच सिरिअल बघतेय मी सध्या ते पण इथे येऊन लिहायचं म्हणून जास्तच मन लावून
मी सरांशी असलेले सगळे संबंध
मी सरांशी असलेले सगळे संबंध तोडते- हे काय मराठी वाक्य आहे? किती बेक्कार अर्थ होतो याचा, त्यात ते lpg तासाला 1 वाक्य बोलणार
आनंदी लगे रहो, येऊ देत
आनंदी लगे रहो, येऊ देत कमेंट्स
विकू लग्नाची मागणी घालणार
विकू लग्नाची मागणी घालणार
बाळ आणि छोट्या बाबांच्या लग्नात मोठे बाबा कन्यादान करणार.
महाएपिसोड म्हणजे पिळ पिळ
महाएपिसोड म्हणजे पिळ पिळ पिळणार.. एक दोन तासाचा असणार.. एपिसोडभर कधी एल यु म्हण्तो म्हणुन होतकरु रसिक प्रेक्षक डोळ्यात, कानात,प्राण आणुन बघणार.. मग एपि संपायला ४ सेकंद राहिले असताना सुभा आउट ऑफ नो व्हेअर एल उ म्हणुन टाकणार .. आणि काही मोठं , रोमँटिक भारी होइल
या अपेक्शेमधे असलेले रसिक होतकरु प्रेक्शक ट्रॉमा मधे जाणार.
नाहीतर बसने परत जाशील...
नाहीतर बसने परत जाशील...
फारेंड आणि UP भारी लिहीताय...
Pages