तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

फारेण्ड, सवता सुभा कोटी उच्च
मी सिरीयल बघत नाहीये. सुभा छान छान दिसायलाय का एवढ्यात? त्या इशुकली ला आय लव्ह यु बोलला का?

सुभात आणि तिच्यात अजिबात केमिस्ट्री नाही. तो जेव्हा जेव्हा तिच्याकडे बघतो तेव्हा फक्त मायेनं बघतो असंच वाटतं. काल पण तिच्या पापणीचा केस काढताना, बाऊ झाला? तोओओओओ बघ उंदीर पळाला असं म्हणेल असं वाटलं.

बाकी जेव्हा जेव्हा तो कातिल एक्सप्रेशन्स देतो तेव्हा तो स्क्रीनवर एकटाच असतो.

तो जेव्हा जेव्हा तिच्याकडे बघतो तेव्हा फक्त मायेनं बघतो असंच वाटतं. काल पण तिच्या पापणीचा केस काढताना, बाऊ झाला? तोओओओओ बघ उंदीर पळाला असं म्हणेल असं वाटलं.

बाकी जेव्हा जेव्हा तो कातिल एक्सप्रेशन्स देतो तेव्हा तो स्क्रीनवर एकटाच असतो. >>>>>>>>>>>> +++++++++++++१११११११

तो जेव्हा जेव्हा तिच्याकडे बघतो >>>>>>>>>>>>>>>>> पण त्याच बघण एक वेड लावणार असत.. डोळ्यात डोळे घालुन बघण .. ए क द म कातिल....

आज च्या मटा ला त्याची मुलाखत आलीय....

हो ना... त्याचं बघणं , हसणं...एकदम..मनापासून, इंटेंस, सुंदर!

आणि ती...हसताना किती भयाण हसते.... त्याने काही म्हटलं की...आधी क्षणभर थांबते आणि मग हळूहळू सावकाश ओठ आवळत हासते.... डोळ्यांत एकदम बेरकी भाव, कसा पटविला..असे! हे काय हो सर....असे खर्जात म्हटलेले शब्द!
माझा छोटासा संसार म्हणे........!!! सु भा सोबत काय बारक्या दोन खोल्यांत रहायचं नाहीए...तिलाही हे माहिती आहे!

Angry

सवता सुभा Rofl
कालचा भाग थोडासा पाहताना झेंडे साठी अचानक नवीन नाव सुचलं.. झेंडेनक्षत्र ! Wink
का? तर तो सुभाच्या केबीन मधे अश्या पद्धतीने डोकावून पहात होता की आपल्याला तसं पाहताना कोणीतरी म्हणेल की काय की ते पहा.. उगवलं झेंडेनक्षत्र ! असं वाटत होतं.

माझा छोटासा संसार म्हणे >>> काल मला हे ऐकल्यावर जानूबाईची फार फार आठवण आली. तिला निदान आपल्या बाबांची काळजी होती. भविष्यात काय करायच विचारल्या बरोबर छोटासा संसार..........................

माझा छोटासा संसार म्हणे >>> काल मला हे ऐकल्यावर जानूबाईची फार फार आठवण आली. तिला निदान आपल्या बाबांची काळजी होती. भविष्यात काय करायच विचारल्या बरोबर छोटासा संसार.......................... >>>>> हो अग दी बरोबर .... म ला वाट्ल अस म्हणेल.... आई बाबा ना खुशीत ठे वे न... विमान प्रवास त्यान्चि स्वप्न पुर्ण करेन... तर हि ... माझा छोटासा संसार ....समोर चा माणुस बघुन पिल्लु सोडते... आ णी स्वप्न बद्लते....

सवता सुभा>> Lol

फारेण्डा, सवता सुभा नाही पण सवता उभा केला केला होता ना बारक्या टिल्लूच्या रुपात. पण त्या सुभाने त्या उभ्याला आडवा केला! Wink

हो ना...आणि सु भा तरी काय असल्या फालतू गोष्टींवर अगदी जीव टाकतो .. पाणीपुरी काय अन छोट्या छोट्या गोष्टींतला आनंद काय ! कैच्या कैच!
" सर..घर मोठं असलं काय नी छोटं असलं काय..महत्वाचं आहे ते माझ्या सोबत असणारा माझा माणूस! जो माझ्यावर प्रेम करेल, माझी काळजी घेईल...... मग बाकी इतर गोष्टींनी काहीच फरक पडत नाही " ................ यंव नि त्यंव...!
कोण लिहीतं असे डायलॉग्ज आणि असे प्रसंग...!!

सवता सुभा! एकदम भारी कोट.. Lol

<<आणि ती...हसताना किती भयाण हसते.... त्याने काही म्हटलं की...आधी क्षणभर थांबते आणि मग हळूहळू सावकाश ओठ आवळत हासते.... डोळ्यांत एकदम बेरकी भाव, कसा पटविला..असे! हे काय हो सर....असे खर्जात म्हटलेले शब्द!<< अगदी अगदी.... ! कसा पटवला असेच खुनशी हावभाव असतात तिचे. मनापासुन.. निर्मळ प्रेम वै कधी दिसलेच नाही.

सुभाच्या ऐवजी कोणी बघण्यापेक्षा ईशा ऐवजी कोणी बघायची गरज आहे >> मृण्मयी देशपांडे!! नेहमी तिची Marathi matrimonyची ऍड लागते तेव्हा तेच वाटतं

पण त्या सुभाने त्या उभ्याला आडवा केला! Wink>>> हहहहहाहाहाहा

कोण लिहीतं असे डायलॉग्ज : >>>>> शर्वरी पाटणकर

स्निग्धा..... Happy हो हो......आठवली..!!
समीर धर्माधिकारी : पर्याय! कुणाला..? ईशाला? Happy
आपण ईशाला पर्याय शोधतो आहोत.. सुभा ला नव्हे!

सवता सुभा Lol Lol Lol

सुभात आणि तिच्यात अजिबात केमिस्ट्री नाही. तो जेव्हा जेव्हा तिच्याकडे बघतो तेव्हा फक्त मायेनं बघतो असंच वाटतं. काल पण तिच्या पापणीचा केस काढताना, बाऊ झाला? तोओओओओ बघ उंदीर पळाला असं म्हणेल असं वाटलं.

बाकी जेव्हा जेव्हा तो कातिल एक्सप्रेशन्स देतो तेव्हा तो स्क्रीनवर एकटाच असतो. >>> + १२३४५६७८९

सवता सुभा >> महान _/\_
ईबा च्या बाबतीत मात्र- जे सोर्‍यातच नाही ते चकलीत कसे येणार अशी गत आहे Lol Lol अगदीच पटलंय हे
सुभात आणि तिच्यात अजिबात केमिस्ट्री नाही. तो जेव्हा जेव्हा तिच्याकडे बघतो तेव्हा फक्त मायेनं बघतो असंच वाटतं. काल पण तिच्या पापणीचा केस काढताना, बाऊ झाला? तोओओओओ बघ उंदीर पळाला असं म्हणेल असं वाटलं.>> हो ना .. अरे काय चालै काय !!

परवा ज्या दिवशी इशा ने परत ऑफिस जॉईन करणं अपेक्षित होतं तेव्हा मायरा सुभा च्या किती जवळ जवळ जात होती .. !! जरा कमी #metoo च वाटत होत! असं कोणाला फोन धरून ठेवायला दुसरी व्यक्ती लागते का !? आणि हि तर असिस्टंट वाईस प्रेसिडंट आहे ना ?! सेक्रेटरी पण इतकं अंगचटीस जाऊन नाही काही करणार ! आणि आजच्या आपल्या या या मिटींग्स आहेत असं ती डायरी समोर धरून सांगत होती .. अरे समोर लॅपटॉप आहे ना .. त्यात आजच्या दिवसाच्या काय मिटींग्स आहेत हे बघ ना लोटस नोट्स मध्ये.. किंवा जे काय असेल दुसरं मेल च असेल त्यात किंवा रिमायंडर चे पॉप अप्स येतात कि !! .. कै च्या कै च! Angry
ते जाऊद्या .. तर तेव्हाचं सुभा ची ऍक्टिंग भारी होत .. त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं , उगाच सैरभैर किंवा आज इशा येणार हे कुठेतरी डोक्यात असल्यामुळे ती केव्हा येईल ? / येईल कि नाही हे सतत डोक्यात आहे असं दाखवत होता .. त्यात ती मायरा मध्ये मधे लुडबुड करत होती .. आणि मग इशा आल्याबरोब्बर काय त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव एका क्षणात झरझर बदलत गेले !! एकदम छान रिलॅक्स हसला !! मस्त अभिनय

तर तेव्हाचं सुभा ची ऍक्टिंग भारी होत .. त्याचं कशातच लक्ष लागत नव्हतं , उगाच सैरभैर किंवा आज इशा येणार हे कुठेतरी डोक्यात असल्यामुळे ती केव्हा येईल ? / येईल कि नाही हे सतत डोक्यात आहे असं दाखवत होता .. त्यात ती मायरा मध्ये मधे लुडबुड करत होती .. आणि मग इशा आल्याबरोब्बर काय त्याच्या चेहऱ्यावरचे हावभाव एका क्षणात झरझर बदलत गेले !! एकदम छान रिलॅक्स हसला !! मस्त अभिनय>>>>>> +१११११११११११

मी काल कित्येक दिवसांनी बघितले तुपारे Happy मायरा च्या प्रेमाच्या कबुली च्या भागानंतर. मला आवडला कालचा भाग Happy

>>किंवा जे काय असेल दुसरं मेल च असेल त्यात किंवा रिमायंडर चे पॉप अप्स येतात कि !! .. कै च्या कै च!

एव्हडा कानामागून घास घ्यायची ही गरज नाहीये.. ते स्मार्ट 'ईघड्याळ' वर देखिल असे मिटींग शेड्युल व रीमांय्डर्स येऊ शकतात. पण ते घड्याळ IMU, ILU मेसेजींग च्या पलिकडे गेलेच नाही.. criminal waste of production property! त्यामूळे लेखकांकडून अशी अपेक्षा ठेवणे म्हणजे नोटबंदीनंतर भिकार्‍याने डेबीट मशिन घेउन फिरावे अशी अपेक्षा ठेवण्या सारखे आहे. Proud SGI मधला एकंदर सरंजामी कारभार बघता नक्की यांनी एव्हडा मोठा धंदा ऊभा केला कसा? वॉरन बफेट नंतर, सॉरी राधिका मसाले नंतर बहुतेक हेच..! Proud
असो.

ईतके एपिसोड्स झाले तरी अजून मालिकेचा फोकस काय हेच कळेना..

ईतके एपिसोड्स झाले तरी अजून मालिकेचा फोकस काय हेच कळेना..>>

कोणत्या मालिकेचा फोकस कळतो??
सगळ्या सारख्याच रोज मालिका वेगळे वळण घेते मग त्या मालिकावाल्यांनाच कळत नाही आपण कोणत्या दिशेला निघालेलो. मग भरकटल्या सारखे करतात. मग जमेल तसे वाटेल तसे कधी इकडे कधी तिकडे करत पाण्याचा भरपूर वापर करुन रस्सा वाढवत बसतात...

Pages