तुला पाहते रे अर्थात सुबोध भावे

Submitted by वेडोबा on 24 November, 2018 - 03:48

तुला पाहते रे पहिल्या धाग्याच्या 2000 पोस्ट्स पूर्ण झाल्या, पुढची चर्चा इथे करूया.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरांबरोबर सगळी नाती तोडा? ही काय त्या ७० च्या दशकातील लोकांसारखी वेगवेगळ्या "हैसियत" मधे सरांशी वागत होती का?

जिन्यात झेंडेला वचन देताना निमकरांनी बघायला हवे होते. गैरसमज व्हायचाच असेल तर तो जबरी व्हावा.

आणि ईशामॅडम ने सरांपासून दूर जाणे चे लॉजिक काय? सरांच्या बरोबर ईशाची पण सुरक्षा नाही का बघता येत? ८० तिथं ८५.

मागच्या भागात ईशाची आई अशिक्षित आहे असे मला वाटले होते. कारण ईशाच्या पर्समधून पडलेली चिठ्ठी तिच्या समोर धरली तरी त्यात काय लिहीले आहे असे ती निमकराला विचारत होती. आणि बाजूला झोपलेल्या ईशाला न कळू देता ती वाचायची असूनही निमकर ती मोठ्याने वाचून दाखवत होते.
पण या पुढच्या भागात ती हिशेब लिहीत आहे. म्हणजे वाचताही येत असावे Happy

मागच्या भागात ईशाची आई अशिक्षित आहे असे मला वाटले होते. कारण ईशाच्या पर्समधून पडलेली चिठ्ठी तिच्या समोर धरली तरी त्यात काय लिहीले आहे असे ती निमकराला विचारत होती. आणि बाजूला झोपलेल्या ईशाला न कळू देता ती वाचायची असूनही निमकर ती मोठ्याने वाचून दाखवत होते.
पण या पुढच्या भागात ती हिशेब लिहीत आहे. म्हणजे वाचताही येत असावे >>>>>>> हे भारी होतं. जे दुसर्‍याने ऐकू नये असं असत तेच लोक मोठ्या मोठ्या आवाजात बोलत असतात. फोन कोणी केलाय हे कळूनही, हॅलो शन्या / हॅलो राधिका असं का बोलतात कळत नाही.

ईशा सरंजामे अ‍ॅण्ड कंपनी कडून रेकमेन्डेशन घेणार काय इण्टरव्यू ला? मला "नानू सरंजामे" (तो ही सरंजामेच) परिचय आठवला. "सरंजामे अ‍ॅण्ड कंपनीत नोकरी करत होती. काहीही काम करत नसे. डेस्क वर झोपा काढत व बॉसला गोष्टी सांगत बसायची. एक दिवस *** दुखतं का असा प्रश्न पडला आणि तेव्हा समजले की *** लाथ मारून हाकलून दिलेले आहे..."

ईशाचा इण्टरव्यू. लीक झालेला

"तुमचा बायोडेटा वाचला. पण तुमची डिग्री अजून मिळालेली नाही?"
"हो पण परीक्षा दिलेली आहे. मला डिग्री मिळेल याचा मला विश्वास आहे. तुमचा माझ्यावर विश्वास आहे का?"
"थांबा थांबा. सरंजामे आणि कंपनीचा टर्न ओव्हर काय आहे?"
"(स्वगत) ट र्न ओ व्ह र म्ह ण जे.... सर मी तुमच्याकरता डबा आणला आहे. माझी आई हे खूप छान करते"
" अहो टर्न ओव्हर म्हणजे काय तुम्हाला माहीत नाही का?"
"(चिंताक्रांत, पण समोर इमॅजिनरी विक्रांत दिसल्यावर हसू येते चेहर्‍यावर. मग विक्रांत सांगतो) साडे तीन हजार कोटी"
"बरं. तुम्ही राजनंदिनी साडीचा खप कसा वाढवला?"
"लोकांना आहेत त्या साड्या पुढे बरीच वर्षे वापरता येतील अशा आयडिया सांगून"
"मग तसे झाले तर लोक नवीन साड्या का घेतील?"
"मग तरीही नाही खप वाढला तर आपण साड्यांचे ड्रेस बनवायचे, ते ड्रेस विटले की त्याची टेबलपुसणी बनवायची, ती फाटली की त्याची फरशीपुसणी...."
"(मुलाखतकार खुर्चीवरून पडून पुन्हा बसतो) अहो थांबा थांबा. जाउदे. बरं हे सांगा कंपनीतील कॉन्फिडेन्शियल पेपर्स तुम्ही कसे सेफली सांभाळाल?"
"मी ते माझ्या घरी नेउन टेबलावर ठेवून देइन. म्हणजे कोणालाच मिळणार नाहीत (स्वगत - फक्त आईला त्यात चकल्या बांधून देउ नकोस म्हणून आठवण करावी लागेल. ये चकल्या के लिए नही है बाबू! इथे खुदकन हसते)"
"(मुलाखतकाराला आपल्या खुर्चीला सीट बेल्ट असता तर बरे झाले असते असे वाटते). पण तेथे कोणी ती फाइल उघडून बघितली तर?"
"सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. अकबर आणि बिरबलाची....."
(सुमारे दहा मिनीटांनंतर)
"अहो पण त्या गोष्टीचा या प्रश्नाशी काय संबंध? बरं ते जाउ दे. आता सांगा, की एका व्हीपी ने वैयक्तिकरीत्या एका कर्मचार्‍याला पाच लाख रूपये दिले. तर ते त्याच्या पगारातून कापून घेउन त्या व्हीपीपर्यंत पोहोचवायला पेरोल सिस्टीम मधे काय काय करावे लागेल? "
"सर तुम्ही का हे प्रश्न मला विचारत आहात? तुमचा माझ्यावर विश्वास नाही का? माझा तुमच्यावर विश्वास आहे. माझा सरांवर खूप विश्वास आहे. पण सर मनातले मला का सांगत नाहीत? मला सरांसोबत बोलायला का आवडते? मायरामॅडम माझ्याशी का अश्या वागतात?
"बास बास, पुढे सांगायची गरजच नाही. तुम्हाला नोकरीवर घेताना ऑन प्रमोशनच घेत आहोत. बंगलोर की लंडन पोस्टिंग ते ठरवा."

फारेन्ड! Rofl Rofl

<<<सर मी तुम्हाला एक गोष्ट सांगते. अकबर आणि बिरबलाची....."<<< या वाक्याला खुर्चीवरुन पडता पडता थोडक्यात वाचले. Rofl

फारएण्ड Lol Lol !!! फारएन्ड यांचे प्रतिसाद बघून तू.पा.रे. बघणारे सर्व प्रेक्षक झी मराठी ऐवजी मायबोलीवरचा हा धागाच वाचत बसतील.

फारएण्ड Lol Lol हसून हसून वाट लागली
आणि ईशामॅडम ने सरांपासून दूर जाणे चे लॉजिक काय? सरांच्या बरोबर ईशाची पण सुरक्षा नाही का बघता येत? ८० तिथं ८५>> हे खरं आहे .. पण शेंडे चा मुद्दा पण बरोबर होता .. कि इशा विकनेस आहे सुभा ची हे कळल्यावर तो जाळीचा बनियन इशा ला त्रास देणार त्यापेक्षा नकोच ना ते डबल काम .
पण त्यासाठी सगळे संबंध (म्हणजे काय ?! आणि कोणते ?! हे तो लेखक च जाणे .. इतकं कसतरीच वाटलं ते ऐकायला Uhoh ) तोडायचे ? आणि वचन याने घेतलं ते ती पाळेल कशावरून ?बरं वचन घे पण नुसतं तात्पुरतं जरा धीर धरा .. फोन करू नका भेटू नका एवढं सांगणं ठीके .. संबंध तोडा म्हणे .. कै च्या कै च

हे भारी होतं. जे दुसर्‍याने ऐकू नये असं असत तेच लोक मोठ्या मोठ्या आवाजात बोलत असतात. फोन कोणी केलाय हे कळूनही, हॅलो शन्या / हॅलो राधिका असं का बोलतात कळत नाही.>> हो अगदीच किंवा बरोब्बर दरवाज्याकडे पाठ करून बोलायचं सो मागून आपलं कोण येऊन ऐकतंय ते कळायला नको

ईबाळाला आणि झेन्डेला एकत्र शॉर्ट मेमरी लॉस झालाय का? Uhoh विसला कधीही न भेटण्याच वचन दिलय/ घेतलय हे विसरलेत की काय दोघे?

बाळ इंटरव्ह्यूची जोरदार तयारी करत आहे,पण बाळाला जर विचारल की सरंजाम्यांकडे काय बरं शिकलीस बाळ,तर काय सागेल बाळ? >>>>>> फक्त प्रेम, प्रेम आणि प्रेम. बाकी शिकण्यासारख/ करण्यासारख काहीच नव्हत तिकडे म्हणा.

बादवे, रुपाली नव्हती का आज तिची तयारी घ्यायला?

सुभा झेंडे सीन मस्त होता, काय स्माईल देतो सुभा खतरनाक! >>>>>>>>>> अगदी अगदी. 'विल यू मॅरी मी, ईशा?' विचारताना तर किलर दिसत होता. वेडिन्ग डेस्टिनेशनविषयी झेन्डेने विचारल तर विसने ' चॉपरमध्ये हवेत लग्न करु' अस काहीतरी उत्तर दिल. Proud

पण मला एक कळत नाहीये की, विस पहिल्यान्दाच एका मुलीला प्रपोज करतोय अस का वागतोय? शितुला त्याने प्रपोज केल नव्हत का? Uhoh

येस्स...मलाही अगदी तेच आठवलेलं... Happy नासिरुद्दीन...!!>> अगदी अगदी मला हि सेम हेच आठवलं. >>>>> मलाही

सुबोध कसला गोड हसला टर्न ओव्हर सांगताना... >>>>>>> +++++++११११११११ त्याची एन्ट्री सुद्दा मस्तच होती. मला वाटल आता हा शाहरुख स्टाईल पोझ देतोय की काय आल्या आल्या. Lol

तमाम २० (तीच्या साठी) ते ५० (त्याच्या साठी) >>>>> ३०-४० च्या वयोगटातील स्त्रिया सुभासाठी बघत नसतील कशावरुन? डायरेक्ट ५० का?

ज्यांना आवडतोय (जास्त आहे ही संख्या) त्यांना तो म्हणजे हॅन्डसमतेची परिसीमा वाटतोय >>>>>> अगदीच हॅन्डसमतेची परिसीमा वगैरे अस काही नाहीये हो. याआधी सुभाने रोमॅन्टिक भुमिका केल्या असतील, पण या भुमिकेत तो पहिल्यान्दाच आवडू लागलाय इतकच. Happy

ईबाळची डिग्री ' बॅचलर ऑफ बिझिनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन ' आहे अस आज कळल.

फारएण्ड Rofl

>>> फारएण्ड>>> Wink Biggrin
मी पण सगळं खरखरीत रडक्या ई बाळाच्या आवाजात imagine केलं...
आणि झेंडे,इ बाळ सगळ्यांनाच वचनाचा विसर पडला वाटतं.. ती रडी 1 मिनिट रडण्याचा नाटक करून, परत टुणटुणीत होऊन ,निघाली दुसरा सरंजामे शोधायला... म्हणून विक्या तिला लवकर प्रपोज करेल की आपला पत्ता कट करील ही बया परत दुसऱ्या कोणाच्या तरी खांद्यावर डोकं ठेवून,गोष्टी सांगून,डब्बा खायला घालून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कंपनीला करोडोचा फायदा करून देणाऱ्या आयडिया (कित्ती हुशार हैं मेरा बाबू,बाकीचे ढगोळे कुठचे )त्यांना सांगून.... हुश्श.... Angry

शितु विकूची नक्की कोण आहे ,बायको, मैत्रीण,शेजारीण,त्याच्यासोबत पेपर टाकणारी,कामवाली,काहीच कळत नाही.
केड्या सध्या ठरवतोय की शितुला नक्की कोण दाखवायच?

सुबोध कसला गोड हसला टर्न ओव्हर सांगताना... >>>>>>> +++++++११११११११ त्याची एन्ट्री सुद्दा मस्तच होती. मला वाटल आता हा शाहरुख स्टाईल पोझ देतोय की काय आल्या आल्या. Lol>>>>>>>> अगदी सहमत.... व्हाईट शर्ट वर एकदम मस्त दिसत होता...

शितु विकूची नक्की कोण आहे ,बायको, मैत्रीण,शेजारीण,त्याच्यासोबत पेपर टाकणारी,कामवाली,काहीच कळत नाही.
केड्या सध्या ठरवतोय की शितुला नक्की कोण दाखवायच?>>>> अजुन विचार करत अससतील

फारएण्ड >>> Rofl Rofl

आणि ईशामॅडम ने सरांपासून दूर जाणे चे लॉजिक काय? सरांच्या बरोबर ईशाची पण सुरक्षा नाही का बघता येत? ८० तिथं ८५>> हे खरं आहे .. पण शेंडे चा मुद्दा पण बरोबर होता .>>+१ तसेच इबाळ नाही दिसले तर विस सगळी सुरक्षा व्यवस्था वेशीला टांगून चाळीत जातो. कंपनीचा व्यवहार, सुरक्षाव्यवस्था, मायराबरोबर इबाळाला विसपासून दूर करायचा कट आणि त्यातून जाळीची शोधाशोध. कुठे कुठे पुरणार झेंडे!!
पण ते वचन घेऊन काही उपयोग नाही. इबाळ सोईस्करपणे वचन विसरुन जाते. मागे मायरालाही तिने वचन दिले होते कि सरांच्या पुढे-पुढे करणार नाही. पण २-४ दिवसही शांत बसली नव्हती.

आणि बाजूला झोपलेल्या ईशाला न कळू देता ती वाचायची असूनही निमकर ती मोठ्याने वाचून दाखवत होते.>>>+१ तिला डोळे मिटून कोण काय बोलत आहे ते ऐकायची सवय आहे हेही त्यांना माहीत नाही.

त्याच्यासोबत पेपर टाकणारी,कामवाली >>> ह्ह्हह्हा
फा, up , योग चालू दे सिक्सर्स, हसून हसून वाट लागली। इथे ती गुरुमाय कोकलतेय आणि मी हसते आहे इथल्या कमेंट वाचून, किती ओव्हर अक्टिंग करावी माणसाने! बिंडोकपणाचा कळस आहे झी च्या शिरेल्स. लॉजिकली कुणीही वागत नाही, Btw Lpg च्या बाबांना कसं पटवणार विस?

होना, ते तर आधीपासून इबाळासाठी योग्य वयाचा जोडीदार हवा असे म्हणत होते. पण ते इतके गुळुमुळू आहेत कि जास्त विरोध नाही करायचे.

अरे क्काय! नुसतं तू माझ्याशी लग्न करशील का इतकं विचारायला किती वेळ घेतोय सुभा!!
ती बया, एका पायावर तयार आहे. अन सुभा उगाच गडबडतोय! Lol

झेंडे काल घुसला होता त्या बिल्डींगचा जिनाच होता आज इशा व नानू बोलत होते तो. नवं लोकेशन दिसतंय.

काल नानू व आज बाबा-आई कसले रॅम्प वाॅक करत आले चाळीच्या जिन्यातून.
नानू फारच अगतिक होतो बुवा त्या इशासाठी. चिडचिड होते अगदी.

आपणच हे वचन, उधार पैसे काही बाही लक्ष्यात ठेवतो....त्या ई ने मागे मायरा ला म्हटलं होतं की पैसे पगारातून कापून घ्या....मग जॉब सोडला होता तेव्हा फायनल सेटलमेंट मध्ये सांगायला हवं होतं इतके पैसे भरा वगैरे... त्या खु क खु मध्ये पण त्या मेंगळ्या मान्शीच्या अंगठीचे पैसे विक्या ने दिले होते...आज पर्यंत त्या मेंगळीला माहीत नाही ते.... तसच हे आता इथल्या विक्याला कळणार नाही ..ती बायको झाल्यावर पण नाही सांगणार त्याला... चालू बाबू...

आजचा एपिसोड बघितला नाही. पण ऐकून कळलं की डबा न्यायचा नाही यावरून ईबाळला तिचे बाबा प्रवचन देत होते.

सुभा फार गोड आणि ईशा ढिम्म..
ती हिरोईन पण वाटत नाहीये.. हिरोईन च लाजण्या च काम पण सुभानेच करायचं तर ईशा ने काय करायचं..
सुभा मात्र सही व्हाईट शर्ट मस्त.. ईशा ला बरे ड्रेस आणि हेअर स्टाईल द्यावी ही कळकळीची विनंती..
बाकी वो पटेल क्या बीच मे घुम राहा था Lol

नानू फारच अगतिक होतो बुवा त्या इशासाठी. चिडचिड होते अगदी.+11111111111111 अगदी अगदी! चालू आहे lpg, बाबांसमोर मारे सोजवळ असल्याचा आव आणते आणि जिन्यात विस ला गाठून प्रपोज करा ना ओ सर चाललेलं असतंय हिचं Angry बिचारा आमचा विसं कसा काय लागला हिच्या गळाला !
बाबा बरोब्बर बोलले तिला आज, एक बाबा म्हणून करेक्ट होतं ते.

Pages