Submitted by कटप्पा on 20 November, 2018 - 13:56
तुम्हाला ओव्हररेटेड वाटणारे कलाकार कोण आहेत आणि कशामुळे यांच्या चर्चेसाठी धागा उघडण्याचे पुण्य कर्म दोन महिन्यानंतर करत आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आपल्याकडे व्यक्तीपूजा फार
आपल्याकडे व्यक्तीपूजा फार आवडते लोकांना!!>>>+१
जी व्यक्ति स्वत:ची पूजा करून घेते ती मला झोल वाटते.
अगदी बरोब्बर.
अगदी बरोब्बर.
बायको महासमाधीमध्ये गेली
बायको महासमाधीमध्ये गेली म्हणे
तो मी नव्हेच मध्ये तो महाराज चन्द्रीला ढकलून देतो आणि उडून गेली म्हणून सांगतो
कोर्टात वकील विचारतो , उडून जायला ती काय पत्रावळ आहे काय ?
सदगुरु मला देवाचा प्रचार
सदगुरु मला देवाचा प्रचार करताना वगैरे दिसले नाहीत. त्यांची फिलॉसॉफी बरीचशी प्रॅक्टीकल आणि कार्पोरेट कल्चरला उपयुक्त वाटली. त्यामुळे व्यक्ती पुजा वगैरे अस काही वाटल नाही. बरेचसे योगा/मेडितेशटेशन रविशंकरासारखे वाटले. त्यांचा Dr Devi व्हिडीओ पाहिला आणि मला आवडला तो. व्यक्तीपुजा वगैरे माझ्यामते जिथे चमत्काराची वगैरे अपेक्षा असते तिथे. ते काही चमत्कार वगैरे प्रॉमिस करत नाही. व्हिडिओचे कॅप्शनस अॅट्रॅक्टीव्ह करणं हा बिझिनेस पार्ट आहे. एकंदरीच स्किल सेट्स शिकविणारे , कॉमन सेन्स सांगणारे वाटले.
मी बर्यापैकी नास्तीक आहे. म्हणजे गणपती बसविणे, सण साजरे करणे वगैरे करते पण देव भक्त नाही.
हे लिहिण्याच कारण म्हणजे मी कधीच असे फिलॉसॉफिकल, मेडिटेशन, योगा वगैरेचे व्हिडीओ किंवा कुठल्या महराजांना फॉलो केलं नाही. पण सद्गुरु वेगळे वाटले.
बरं ते विष्णु, शेषनाग आणि
बरं ते विष्णु, शेषनाग आणि लक्ष्मीचा अवतार म्हणे कसे आहेत? अंडररेटेड की ओवररेटेड
एम डी मेडिसिन !
एम डी मेडिसिन !
आमचा चान्स चुकला
मला त्या सद्गुरूंना इंग्रजी
मला त्या सद्गुरूंना इंग्रजी मधून अध्यात्म समजावताना ऐकून एकदम पु. लं. चं I is the you, in the you of the you हा असा मी असामी मधला प्रसंग आठवतो! तरी मी त्यांचे समोर आलेले पहिले दोन चार व्हिडिओ मन लावून पाहिले. नंतर मात्र हा नव्या जमान्यातल्या "शेवटी की नाही स्पिरीच्युवल हाच ना मार्ग खरा" म्हणणाऱ्या केशर मडगांवकर आणि मंडळींसाठी मांडलेला बाजार आहे असं वाटायला लागलं. का कुणास ठाऊक अध्यात्म आपलं मराठी किंवा संस्कृत मध्येच ऐकलं तर खरं वाटतं.
जग्गी वासुदेव. >>> धन्यवाद
जग्गी वासुदेव. >>> धन्यवाद कॉमी. नाव वाचून पण समजलं नव्हतं, पण नंतरच्या चर्चेवरुन आणि विकीपिडीया बघून लक्षात आलं कोण ते, ह्यांना मी ओळखत नव्हते पण परवा महाशिवरात्रीच्या आधी यांची जाहिरात सतत येत होती त्यांची एबीपी माझा वर, ईश योग का ईशा योग असं नाव होतं आणि संगीत, डान्स वगैरे पण दाखवत होते जाहिरातीत.
महाराष्ट्रात इतके संत होऊन
@जिज्ञासा >>+12345
महाराष्ट्रात इतके संत होऊन गेले 12व्या ते 16व्या शतकात. बाकी ठिकाणी अजून नवे नवे अवतार नाव बदलून येतच आहेत.
जग्गी वासुदेवना अजून
जग्गी वासुदेवना अजून स्वतःच्याच तमोगुणांवर विजय मिळवता आलेला नाही. हल्लीच लोकांनी ते कसे प्रत्येक गोष्टीत डायमेन्शन घुसडतात हे कंपाइल केलं होतं ते बरंच लागलं त्यांना. त्यांच्या ट्वीटस तेवढ्या वाचल्यात. जड शब्द वापरून गोल गोल घुमवतात.
एकच व्हिडियो पाहिला होता. शनी शिंगणापूरला स्त्रियांनी मंदिरात का जाऊ नये ते सांगणारा.
जग्गी वासुदेव म्हणजे
जग्गी वासुदेव म्हणजे नित्यानंद यांची फाड फाड इंग्लिश सफाईदार पणे बोलणारी आवृत्ती. गुणात्मक फरक नाही. त्यांच्य सिद्ध यंत्राची किंमत ऐकून डोळे पंढरे होतील.
काट्यांस जेथे भाव येतो ,
काट्यांस जेथे भाव येतो , गुलाब बिचारा होतो
दंश कलेस होतो शाहरूख सितारा होतो
अद्भुत सुंदर लेण्यास भणंग, म्हणती ओव्हररेटेड
माऊलीच्या निर्व्याज मायेचा कोंडमारा होतो
रविवर्म्याच्या कुंचल्याने अवतरतो देवलोक भूवरी
सुमार रसिकांच्या गर्दीत फापटपसारा होतो
सह्यशिखरावर कळसूबाईचा नजारा शोभतो
पाथर पुजूनी मुढांकरवी भंडारा होतो
Pages