ओव्हररेटेड सेलिब्रिटी

Submitted by कटप्पा on 20 November, 2018 - 13:56

तुम्हाला ओव्हररेटेड वाटणारे कलाकार कोण आहेत आणि कशामुळे यांच्या चर्चेसाठी धागा उघडण्याचे पुण्य कर्म दोन महिन्यानंतर करत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दगडू हलवाई गणपती
सिद्धी विनायक गणपती
लालबाग गणपती
नको इतका उदोउदो. सेलेब्रिटी लोकांच्या वावरामुळे अनाठायी महत्त्व मिळालेले गणपती.
हे देव कमी आणि सेलेब्रिटी जास्त आहेत.

हा तर समाज मानसिकतेचा स्वभावच आहे. एकदा डोक्यावर घेतले की पार लोकांना त्या सेलेब्रिटींचा उबग आणतात.
त्याला कारण आपली अवास्तव महत्व प्राप्त झालेली (आपणच ते केले आहे) प्रसार माध्यमे हे आहेत...

खरं तर आपल्या इथे प्रसारमाध्यमेच ( त्याना जनमानसात आणि समाजात मिळालेले अनन्यसाधारण महत्व) overrated आहेत !

मला सेलेब्रिटी ही कन्सेप्टच ओव्हररेटेड वाटते.>>
सहीच!

मी टिव्ही क्वचित बघतो (streaming services वगळता), वर्तमानपत्र वाचत नाही. त्यामुळे कोण ओव्हररेटेड आणि बरेचदा कोण सेलिब्रिटी आहे हे पण कळत नाही, फरक पडत नाही.

पण मी काय म्हणतो रेटिंगचं कशाला ?
आपल्या आवडी निवडी वयानुसार बदलत असतात कुणी काहीही म्हणो..
कालपर्यंत आवडणारं उद्या आवडत नाही ..जेव्हा जे आवडेल त्याच्या प्रेमात पडावं Happy
मुळात आपल्याकडे सेलिब्रेटींना डोक्यावर घेतात तेच चुकीचे आहे..
त्यांना माणूस न ठेवता देव करतो आपण

धन्यवाद सस्मित ☺️- मी मुद्दाम मुक्ता बर्वे लिहिले नाही.. लोक म्हणतील काय हेच नाव सारखे सारखे देतो मी.
अजूनही मला तिचा अभिनय monotonous वाटतो. कोणत्याही चित्रपटातून उचला, कुठेही टाका - सेम एक्सप्रेशन्स आणि डायलॉग डिलिव्हरी.
माबोवर उगाच कौतुक करतात तिचे.

अरे यार राहुल देशपांडेला सोडा रे... मला त्याचं गाणं आवडतं (त्याच्या आज्याचं गाणं आणि आवाज जास्त आवडतो). माणूस म्हणून पण खूप साधा वाटतो. याच नावाचे आणखी दोघे आपापल्या क्षेत्रात प्रसिद्ध आहेत. पैकी एक चित्रकार आहे. तो सेलेब्रिटी सारखा वागत नाही. एका कार्यक्रमात जज्ज म्हणून आहे. मात्र त्याच्या प्रतिक्रिया अत्यंत संयत असतात.

मी मुद्दाम मुक्ता बर्वे लिहिले नाही.. लोक म्हणतील काय हेच नाव सारखे सारखे देतो मी.
अजूनही मला तिचा अभिनय monotonous वाटतो. कोणत्याही चित्रपटातून उचला, कुठेही टाका - सेम एक्सप्रेशन्स आणि डायलॉग डिलिव्हरी.
माबोवर उगाच कौतुक करतात तिचे.
Submitted by च्रप्स on 23 November, 2018 - 19:00

आघात, मंगलाष्टक वन्समोअर, मुंबई पुणे मुंबई आणि एक डाव धोबीपछाड हे सिनेमे आणि अग्नीशिखा मालिका या सगळ्यामधला अभिनय एकसारखा वाटतो?

{{{ अरे यार राहुल देशपांडेला सोडा रे... मला त्याचं गाणं आवडतं (त्याच्या आज्याचं गाणं आणि आवाज जास्त आवडतो). माणूस म्हणून पण खूप साधा वाटतो. }}}

सहमत. अतिशय डाऊन टू द अर्थ.

{ अरे यार राहुल देशपांडेला सोडा रे... मला त्याचं गाणं आवडतं (त्याच्या आज्याचं गाणं आणि आवाज जास्त आवडतो). माणूस म्हणून पण खूप साधा वाटतो >> ++११११११११ मुळात त्याला प्रसिद्धी चा हव्यास नाही. आवाज इतका सुंदर असुनही.

स्वप्निल जोशी ..
सोहा अली खान..
धनुष
विजय (पुली ,थेरी मधला हिरो)
तेजश्री प्रधान..
नेहा महाजन,
स्पृहा जोशी
पवनकल्याण
रवितेजा.
व्यंकटेश
लेडी गागा..
बाॅब मार्ली..
अजुन बरेच आहेत..सध्या इतके पुरे...

विजय कशाला, संपूर्ण southindian हिरो मंडळीच ओव्हररेटेड आहेत, रजनी आणि कमल पासून धनुस पर्यंत.

ओवररेटेड या संकल्पनेची व्याख्या करायला हवी.
माझा प्रयत्न ---- >

एखाद्या व्यक्तीचे / गोष्टीचे अवास्तव अतीशयोक्त झालेले कौतूक !
ज्याला त्या क्षेत्रातले ओ कि ठो कळत नाही तोही एखाद्याला नावाजत रहातो, आपण तसे न केल्यास आपण अज्ञानी आहोत असे सिद्ध होइल या भीतीने !

ओवररेटेड या संकल्पनेची व्याख्या करायला हवी.
माझा प्रयत्न ---- >

एखाद्या व्यक्तीचे / गोष्टीचे अवास्तव अतीशयोक्त झालेले कौतूक !
ज्याला त्या क्षेत्रातले ओ कि ठो कळत नाही तोही एखाद्याला नावाजत रहातो, आपण तसे न केल्यास आपण अज्ञानी आहोत असे सिद्ध होइल या भीतीने !

आघात, मंगलाष्टक वन्समोअर, मुंबई पुणे मुंबई आणि एक डाव धोबीपछाड हे सिनेमे आणि अग्नीशिखा मालिका>>>
मी यापैकी कुठले नाही पण दोघी आणि चकवा बघितलेत. चांगली वाटली मुक्ता बर्वे.

च्रप्स, कुणी डोक्यात जाईल इतपर्यंत कुणाला बघूच नये.

एखाद्याचे अजीर्ण होईल असे कौतुक ज्याप्रमाणे नकारात्मक साईड इफेक्ट्स निर्माण करते त्याचप्रमाणे एखाद्याबद्दलचा अजीर्ण होईल असा तिरस्कार सुद्धा त्याच्याबद्दल सहानुभूती उत्पन्न करू शकतो. पूर्वी (आणि आताही) मीडीयाने अती केले, सोशल मीडीयाने बॅलन्स असायला हवे.

सेलेब्रिटी वर्शिप सिंड्रोम हा एक आजार आहे त्याचप्रमाणे सेलेब्रिटीजबद्दल वाटणारी असूया हा ही. या दोन्ही टोकाला जाणार नाही इतपत आपणही स्वतःला सांभाळायला हवे. सेलेब्रिटीजच्या यशस्वी होण्यामधे अनेकदा त्याचे कष्ट आणि भाग्य यांचा हातभार असतो. बरेचदा गुणवान मंडळींना मागे सारून काहींना संधी मिळते. संधी मिळाल्यावर मात्र तिचे सोने केले जाते. यात त्या सेलेब्रिटीचा दोष काहीच नाही. उलट यातून शिकण्यासारखे आहे. त्याचप्रमाणे गुणवान असूनही संधी न मिळालेल्या, यश न मिळालेल्यांकडूनही शिकण्यासारखे असते.

ओव्हररेटेड या शब्दाचा अर्थ म्हणजे इतरांकडून डोक्यावर घेतले जाणे असा ग्रह झाल्याने प्रतिसाद दिले होते. मात्र सेलेब्रिटी हे स्वतःच ओव्हररेटेड आहेत असा अर्थ अभिप्रेत आहे असे वाटतेय.

कमल हसन, रजनीकांत हे अतिशय डाऊन टू अर्थ लोक आहेत. त्यातही रजनीकांत हा अतिशय कुटुंबवत्सल, साधा माणूस आहे. त्याच्या फॅन क्लब ने तमिळनाडू मधे शाळा बांधल्या आहेत. अनेक समाजोपयोगी कामे केली आहेत. अशा कामांना तो सढळ हस्ते मदत करतो. त्याची जाहीरात होत नाही. त्याची पत्नीही समाजसेविका आहे. तिनेही कधीही आपल्या कामाची जाहीरात पतीच्या लोकप्रियतेसाठी केलेली नाही.

याउलट काही सेलेब्रिटीजना बिझनेस / मीडीया हाऊस बांधून घेतात. मग त्यांच्याकरवी दुष्काळासाठी एक कोटी रूपये मदत , अमूक आपत्तीत तमूक सेलेब्रिटीची फलाणी मदत अशा बातम्या सुरू होतात. त्याचा उपयोग त्या सेलेब्रिटीच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी होतोच पण ज्याने हे सर्व स्पॉन्सर केलेले असते त्यांना त्याचे रिटर्न्स मिळतात. ब्रॅण्ड अ‍ॅम्बॅसॅडर ही त्यामानाने अधिकृत आणि सभ्य कल्पना आहे.

या अशा गिमिक्सना ओव्हर रेटेड म्हटले गेले असते तर ठीक होतं. अर्थात प्रत्येकाच्या मताचा आदर आहेच.

विजय कशाला, संपूर्ण southindian हिरो मंडळीच ओव्हररेटेड आहेत, रजनी आणि कमल पासून धनुस पर्यंत.>>> अगदी अगदी

कुणी डोक्यात जाईल इतपर्यंत कुणाला बघूच नये.>>>>+११११११

पण स्पृहा ला सोडा, चांगली वाटते ती.

एकेकाळी मला फक्त हृतिकच थोडेफार हिरोचे फिचर्स असलेला वाटायचा,

अजून एक, अवांतर होईल की काय माहीत नाही तरी लिहिते.

हे हिरो हिरोविन च्या सोबत सेल्फी काढायला, त्यांना बघायला लोक इतके पागल का असतात हेच कळत नाही. तेही माणसेच तर आहेत मग का?
मी तर कधी कुणी दिसला/ली तरी वळून सुद्धा बघत नाही, त्यात काय एव्हडे Uhoh

ओवररेटेड असे काही नसते.
आपल्याला जी व्यक्ती फारशी आवडत नाही वा फारशी भारी वाटत नाही तिच्यात ईतरांना काय आवडते हे न कळल्याने वाटणारी असूया वा पोटदुखी असते जी आपल्याच अज्ञानातून आली असते.

अर्थात हे हुमायून नेचरच आहे. तर कोणी वाईट वाटून घ्यायची गरज नाही. मी सुद्धा याला अपवाद नाही. मलाही कैक लोकं ओवररेटेड वाटतात.

माझी लिस्ट

१) अजय देवगण - बरेचदा असह्य होतो हा माणूस. लोकं याला पुरस्कारही देतात.

२) स्वप्निल जोशी - माझा आवडता आहे हा. पण तटस्थ विचार करता मर्यादीत गुणवत्ता असूनही मराठी चित्रपटसृष्टीचा शाहरूख खान म्हणून ओळखला जातो.

३) करन जोहर - शाहरूखच्या जीवावर बनलेला सेलिब्रेटी. आज स्वताची ओळख तोरयात मिरवतो.

४) सचिन तेंडुलकर - नक्कीच एक असामान्य फलंदाज. गावस्कर कपिल यांच्या पंक्तीत बसणारा खेळाडू पण गौरवला देवासारखा जातो. खेळाडूंमधील पहिले भारतरत्न त्याला देणे हे अति आहे. फलंदाजीतही आता कोहली त्यापेक्षा सरस आहे हे सचिनला देवाचा दर्जा देऊन ठेवल्याने मान्य करणे क्रिकेटप्रेमींना अवघड जातेय.

५) अक्षय कुमार - तसा आवडतो. पण फुकटफाकट मनोजकुमार बनवून ठेवलाय याला. सुपर्रस्टरच्या स्पर्धेत तीन खानांच्या पंक्तीत याला मान देणे हास्यास्पद आहे.

६) रणवीर सिंग - वाह्यातपणा डोक्यावर घ्यायचा जमाना आहे हा त्यामुळे अश्यांची चलती असल्यास नवल नाही. काही लोकं याला अगदी शाहरूखनंतरचा सुपर्रस्टार समजतात. करीअरच्या या टप्प्यावर नकारात्मक भुमिका करून शाहरूखच्या पावलावर पाऊल ठेवायचाही याचा प्रयत्न आहे. पण शाहरूखसारखेच युथ आयकॉन म्हणून याला बघणे हे अति आहे.

७) अशोक सराफ - लक्ष्मीकांत बेर्डेचा कॉमेडी पार्टनर. लक्ष्मीकांत बेर्डे एकसुरी विनोदनिर्मिती करायचा म्हणून अशोक सराफ किती भारी असे कौतुक करायची एक प्रथा आढळते.

८) दादा कोंडके - क्रिकेटमध्ये काही प्लेअर जसे ठराविक कंडीशनमध्येच चमकतात आणि तश्या कंडीशन नसल्यास त्यांचे सदोष तंत्र उघडे पडते. तसेच सिनेमांबाबतही असते. फक्त ईथे ते कलाकार न जमणारया चित्रपट आणि भुमिकांच्या वाट्यालाच जात नाहीत त्यामुळे उघडे पडत नाहीत. तरी अश्यांच्या मर्यादा आपणच लक्षात घेऊन त्यांना तितकेच गौरवणे अपेक्षित असते. जास्त झाले की ते असे ओवरहाईप लिस्टमध्ये येतात.

९) कमल हसन - रंगरंगोटी कलाकार.

१०) ......

लिहितो आठवेल तसे...

Pages