ओव्हररेटेड सेलिब्रिटी

Submitted by कटप्पा on 20 November, 2018 - 13:56

तुम्हाला ओव्हररेटेड वाटणारे कलाकार कोण आहेत आणि कशामुळे यांच्या चर्चेसाठी धागा उघडण्याचे पुण्य कर्म दोन महिन्यानंतर करत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो सदमा शेवटचा सिन खरच कॉमेडी सिन आहे आणि कमल ने जाम हसवले आहे.>>>>>> Rofl हायला, च्रप्स तुम्हीच बाकी होता आता इथे यायचे. Proud

@ किरणुद्दीन, अहो नकारात्मक उर्जा दिसणारच हो इथे, कारण बहुतेक लोकांना खानावळ सोडुन इतर ठिकाणचे सात्विक जेवण पचत नाही. Proud Light 1

भरपूर नकारात्मक उर्जेचा प्रभाव जाणवतोय धाग्यावर >> असे नका म्हणु.
शाहरुख सुद्धा "मला Jim Carrey च्या positive energy चा हेवा वाटतो आणि त्याच्या सारखाच न संपणारा energy चा झरा माझ्यात असावा म्हणून मी प्रयत्न करत राहतो' असे मागे म्हणाला होता.
जशी रसेल क्रो आणि जिम कॅरी ह्यांच्या अभिनयाची तुलना अनाठायी आहे तीच गोष्ट कमल हासन आणि शाहरुख च्या अभिनयाच्या जातकुळीला लागु पडते.
चाहत्यांनी आपल्या टोकाच्या आवडी निवडी एखाद्या कलाकाराचे प्रतिमा हनन करण्यास वापरू नये. पण अशा कलाकारांकडून चांगल्या गोष्टी नक्की शिकाव्या आणि योग्य ठिकाणी त्या चांगल्या गोष्टींचा उदो उदो जरूर करावा.

हायझेनबर्ग यांना +७८६
अगदी चाबूक मुद्दा..

काही लोकं शाहरूख हा कमल हसनपेक्षा कसा डावा आहे हे दाखवायला त्यांच्या अभिनयाची तुलना करतात...

काही लोकं शाहरूख हा सलमानपेक्षा कसा डावा आहे हे दाखवायला सलमानच्या बॉक्स ऑफिसवरच्या गल्ल्याशी तुलना करतात..

काही लोकं शाहरूख हा अमिताभपेक्षा कसा डावा आहे हे दाखवायला दोघांच्या केबीसीचा टीआरपी दाखवतात...

काही लोकं शाहरूखचा फॅन फॉलोईंग तर काहीच नाही हे दाखवायला थेट राजेश खन्ना द काकांपर्यंत जातात..

काही लोकं दिलीपकुमारचा देवदासच कसा शाहरूखपेक्षा भारी हे आवर्जून सांगतात..

अगदी हॉलीवूडच्या जिम कॅरीपासून आपल्या गल्लीतील अक्षयकुमार या सर्वांची तुलना शाहरूखशी होते.. एकेकाळी रातोरात स्टार झालेला हृतिक रोशन ते कालपरवा आलेले रणबीर वा रणवीर सारखी पोरेही सुपर्रस्टार बनण्यासाठी शाहरूखची जागा घेऊ ईच्छितात..

यातच सारे आले !

कमल हसनला मी ओवररेटेड म्हटलेय वा रंगरंगोटी कलाकार म्हटले तरी त्याच्या अभिनयाला हलके लेखले नाहीये. जर कोणाला त्याचा अभिनय शाहरूखपेक्षा भारी वाटत असेल तर असेना .. शाहरूखने कधी स्वत:ला भारतातील सर्वोत्तम अभिनेता म्हटले आहे ..

मुळात शाहरूख आणि कमल हसन तुलना आलीच कशी?
म्हणजे मी कमल हसनला ओवरहाईप म्हटले आणि मला शाहरूख आवडतो म्हणून का?
मला तर पर्सनली कमल हसन शाहरूखशी तुलना करण्यायोग्य वाटत नाही. अमिताभ वगैरे ठिक आहे.. भारताचा आजवरचा सर्वश्रेष्ठ क्रिकेटर कोण या प्रश्नाचे उत्तर शोधताना सचिनची तुलना कपिल, गाबस्कर वा धोनीशी करेन.. रोहीत शर्मा किंवा लक्ष्मणशी नाही. ईतके सिंपल आहे हे Happy

ऋन्मेऽऽषजी यावरून कमल हसनचा अभिनय निकृष्ट होता हे न दिसता प्रेक्षक कोणत्या कॅटेगरीतले होते ते दिसून येते.
>>>>

ज्या कॅटेगरीतला पिक्चर बनवणार त्या कॅटेगरीतील प्रेक्षक लाभणार .. लोकं पैसे खर्च करून थिएटरात जातात ते आपल्या कॅटेगरीला साजेसेच चित्रपट बघायला.. आता तुम्हीच ठरवा कमल हसनच्या चित्रपटांची आणि ते बघायला येणारया प्रेक्षकांची कॅटेगरी.. मला या क्लासमासच्या वादात पडायचे नाहीये Happy

हो सदमा शेवटचा सिन खरच कॉमेडी सिन आहे आणि कमल ने जाम हसवले आहे.
जबरी एक्सप्रेशन्स आहेत, लोकांना हसवणे इतके सोपे नाही.
>>>>

जर दिग्दर्शकाचा हेतू प्रेक्षकांना हसवायचा असेल तर कमलला फुल्ल मार्क्स.. जर तसा हेतू नसेल तर एकूणच त्या प्रकाराला हास्यास्पद बोलू शकतो Happy

मुळात सदमा हाच ओवरहाईप चित्रपट आहे.
त्यापेक्षा पुष्पक मस्त आहे. त्यातला कमल सुद्धा जास्त भावतो. त्यात संवाद नाहीयेत हे त्याच्य पथ्यावरच पडलेय. संवादात तो जरा गडबडतो.

आणि मित्रांनो हे सुद्धा विसरू नका,
कमल हासन आणि शाहरूख ह्या दोघांनाही एकमेकांच्या अभिनयाबद्दल निरतिशय आदर असल्या कारणानेच कमल हासन सर्वेसर्वा असलेल्या पिरिअड ड्रामा 'हे राम' मध्ये स्पेशल भुमिकेत अमिताभ नाही आमिर नाही तर कमल हासनच्या आग्रहास्तव खास शाहरूख स्पेशल भुमिकेत आहे. (मी वरती 'हे राम' म्हणत सुतोवाच केले होते पण सविस्तर लिहिले नाही - माझीच चुकी). कमल त्याच्या स्वतःच्या एवढ्या महागड्या अँबिशिअस प्रोजेक्टमध्ये अ‍ॅक्टिंगच्या बाबतीत तडजोड करेल का? म्हणजेच शाहरूखसुद्धा कमल सारखा चांगला अभिनेता आहे हेच तर सिद्ध होते.
जिथे ती दोघे एकमेकांच्या अभिनयक्षमतेचा आदर करतात तिथे दोघांच्या चाहत्यांनी वाद घालून काय होणार?

शाहरूख पाहुणा कलाकार म्हणून थोडासाच होता खरा त्यात, पण क्लायमॅक्सला येऊन भाव खाऊन गेला. मी तो चित्रपट जिथे शाहरूख दिसतो तेवढाच पाहिला आणि तरीही मला सारा चित्रपट काय आहे हे समजले...

हाब तुमचे लॉजिक गंडलेले असायचे पूर्वी तरीही तुम्ही पूर्णच गंडलेले नसायचे. आता मात्र तुम्ही कुणाच्या संगतीला येऊन बसला आहात हे पाहणे क्लेशकारक आहे.
किल्लीच्या एका धाग्यावर (65584) च्रप्स आणि ऋन्मेष हे एकमेकांचे ड्युआयडी असावेत अशी एक चूक तिथे झालेली आहे. हे खरे असेल तर त्यांचे विचार जुळतीलच.

नाही हो त्याने आधी दिलाय प्रतिसाद - आणि मी कोट केल्यानंतर त्याने संपादित केला आधीचा प्रतिसाद.

अरेरे मेरीच गिनो
फार वाईट वाटले तुम्हाला माझा प्रतिसाद क्लेशदायक वाटला त्याचे.
मी शाहरुख आणि कमल दोघेही आपापल्या जागी मोठे आणि यशस्वी कलाकार आहेत असे म्हणालो. काही चुकले का? असेल तर मोठ्या मानाने माफ करा.
तुम्हाला बरे वाटावे म्हणुन तुमच्यासाठी काही करू शकतो का? जरूर सांगा.

मलाही सदमा अतिशय बाळबोध वाटला होता.
श्रीदेवी आणि शाह्ररुख का इतके लोकप्रिय झाले हे कोडे मी खूप प्रयत्न करूनही सुटलेले नाही. मी त्याना आवडून घ्यायचा सर्वतोपरी मनापासून प्रयत्न केला ... पण नाही हो ते शक्य !

खानावळीचा मी फ्यान आहे, त्याचबरोबर कमल हसनचाही.
शाहरुखची तुलना फक्त अमिताभ बरोबरच होऊ शकते. दोघांना टक्कर देणारा अद्यापतरी बॉलीवुड मध्ये कोणीही नाही.

हायझेनबर्ग, मी तुमच्याशी टोटली सहमत आहे, पण..... हा पणच मध्ये येतो. कारण आम्ही कुणीही आमच्या आवडत्या कलाकाराला मुद्दाम ज्याच्या त्याच्यात आणत नाही, जे ऋन्मेष करतो. मी तर म्हणेन की ऋन्मेषने मायबोलीवर शाहरुखला जेवढे बदनाम केलेय, तेवढे कुणीच केले नसेल.

मी अमिताभ फॅन आहे, कमल हसनची नाही. पण जे चांगले आहे त्याला चांगलेच म्हणणार. मला फौजीत आवडलेला शाहरुख स्वदेस व चक दे मध्ये पण आवडला, कारण त्या खरोखर चांगल्या भूमिका होत्या. पण ज्या पद्धतीने ऋमेष , जिथे तिथे शाहरुखला मध्ये ओढुन त्याची बदनामी करतो आणी शाहरुक पुढे इतरांना कमी लेखतो, हो कमी लेखतोच , त्या पद्धतीने शाहरुख लोकांच्या मनातुन उतरतो. अती तेथे माती होणारच.

अमिताभच्या जंजीर, दिवार, शोलेचे कौतुक करणार्‍या लोकांनी त्याच्या महान, पुकार या तद्दन फालतु सिनेमांची साफ वाट लावली होती. मग शाहरुख, सलमान काय चीज आहेत !!

ज्या क्षणाला ऋन्मेष, शाहरुखला मध्ये घुसवणे सोडेल, त्या क्षणाला मायबोलीवरचे यच्चयावत धागे सुटकेचा निश्वास टाकतील !!

अहो मेरिच gino - माझ्या प्रतिसादाच्या वरती रूनमेश ने सेम प्रतिसाद टाकला होता, नंतर डुप्लिकेट प्रतिसाद म्हणून संपादित केलाय- तुम्ही अर्धाच स्क्रीनशॉट टाकलाय ☺️

त्याने खालचा प्रतिसाद ठेवला आणि वरचा डिलीट केला( double पोस्ट)

@रश्मी,

आम्ही कुणीही आमच्या आवडत्या कलाकाराला मुद्दाम ज्याच्या त्याच्यात आणत नाही, जे ऋन्मेष करतो.
>>>>
आम्ही म्हणजे कोण? माबोवर शाहरूख विरोधकांनी एखादा ग्रूप बनवला आहे का? असल्यास मला त्याचे सदस्यत्व घ्यायला आवडेल Happy

जोक्स द अपार्ट,
तुम्ही तुमच्या आवडत्या कलाकाराचे जितके कौतुक करता मी देखील माझ्या आवडत्या कलाकाराचे तितकेच कौतुक केले पाहिजे अशी अपेक्षा का? हो, मला चारचौघांपेक्षा जास्त कौतुक आहे शाहरूखचे Happy

..

मी तर म्हणेन की ऋन्मेषने मायबोलीवर शाहरुखला जेवढे बदनाम केलेय, तेवढे कुणीच केले नसेल.
>>>>>>
ओह गनिमी कावा, असं मुद्दाम उलटं म्हणून तुम्ही मला शाहरूख कौतुकापासून रोखू पाहता आहात Happy

जोक्स द अपार्ट, शाहरूख सुपर्रस्टार आहे. त्याची खरोखरच कोणी कुठे बदनामी करत असेल तरी त्याला काडीचाही फरक पडत नसेल. त्यालाच टेंशन नही तर आपण कश्याला आपली झोप उडवा Happy

...

मी अमिताभ फॅन आहे, कमल हसनची नाही.
>>>>>
दोघेही ओवरहाईप आहेत.
अमिताभ सेकंड इनिंगवाला हा.. आधीचा एंग्री यंग मॅन सुपर्रस्टार होता.

....

मला फौजीत आवडलेला शाहरुख स्वदेस व चक दे मध्ये पण आवडला, कारण त्या खरोखर चांगल्या भूमिका होत्या.
>>>>
कोणाला स्वदेस चकदेचा शाहरूख आवडतो तर कोणाला डीडीएलजे, मोहोब्बतेचा.. दोन्ही वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट आहेत. दोघांचा प्रेक्षकवर्ग वेगळा आहे. आपली आवड ती क्लास आणि ईतर सारे मास असे का समजावे? प्रत्येकाच्या मताचा आणि आवडीचा आदर करावा.

...

पण ज्या पद्धतीने ऋमेष , जिथे तिथे शाहरुखला मध्ये ओढुन त्याची बदनामी करतो आणी शाहरुक पुढे इतरांना कमी लेखतो, हो कमी लेखतोच , त्या पद्धतीने शाहरुख लोकांच्या मनातुन उतरतो. अती तेथे माती होणारच.
>>>>>>>>>>
अशी उदाहरणे मला दाखवल्यास आवडतील.
उलट मी कमल हसन वा अमिताभ यांना शाहरूखपेक्षा चांगले अभिनेतेच म्हटले आहे.

.......

अमिताभच्या जंजीर, दिवार, शोलेचे कौतुक करणार्‍या लोकांनी त्याच्या महान, पुकार या तद्दन फालतु सिनेमांची साफ वाट लावली होती. मग शाहरुख, सलमान काय चीज आहेत !!
>>>>>
याचा अर्थ ईतकाच की जे कट्टर फॅन शाहरूखला लाभले आहेत ते अमिताभकडे त्याकाळी नव्हते Happy

च्रप्स लाजवू नका _/\_
तसेही आधीच कोणीतरी या धाग्यावर ओवररेटेड म्हणून माझे नाव घेऊन झाले आहे Happy

आणखी एक ओव्हररेटेड सिलेब - राधिका सुभेदार.

काय ते कौतुक त्या नवऱ्याची बायको धाग्यावर, भरपूर फॅन आहेत .

आई ग्ग.. सिरीअसली का.. तिचे कौतुक करतात लोकं.. तिला बघून मला त्या गुरुनाथची फार फार दया येते.

अहो पण माझी इतकी पात्रता नाहीय तुमचा ड्यु आयडी होण्याची. ☺️>>>> अरेरे च्रप्स , हा असला प्रतिसाद तुमच्या कडून निदान मलातरी अपेक्षित नव्हता. भले तिरकस असेल तरी तुमचे प्रतिसाद चांगले असायचे

असो

ए आर रहमान .

जय हो कोणत्या अँगल ने ऑस्कर लेव्हल आहे???

Pages