ओव्हररेटेड सेलिब्रिटी

Submitted by कटप्पा on 20 November, 2018 - 13:56

तुम्हाला ओव्हररेटेड वाटणारे कलाकार कोण आहेत आणि कशामुळे यांच्या चर्चेसाठी धागा उघडण्याचे पुण्य कर्म दोन महिन्यानंतर करत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपाशी बोका, फक्त ग्लॅमर महत्वाचे असले तर कलेकडे कोण बघणार? बॉक्स ऑफिसला गल्ला किती केला, पहिल्या दहा श्रीमंतात कितवा नंबर आहे , पहिले दहा मोस्ट पॉप्युलर ऍक्टर यात कितवा नंबर आहे, या फोटोत काय शायनिंग मारलीय याच्या लिंक्स द्याव्यात.

अलंगाई ओली हा सागर संगममचा तमिळ मधे डब झालेला अवतार आहे. सागर संगमम ला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाच, शिवाय इतरही बरेच पुरस्कार मिळाले. रशिया मधे हा सिनेमा याच नावाने रिलीज झाला होता. बीबीसी च्या मस्ट वॉच १०० मधे हा सिनेमा तेव्हां होता. कमल चे असे बरेच सिनेमे आहेत. नावं आठवत नाहीत. ईश्वर या सिनेमाचं खूप कौतुक झालेलं होतं. पण त्याचा मूळ सिनेमा स्वातीमुथ्थम पाहिला आणि अनिल कपूरने पाट्या टाकलेल्या जाणवल्या. मेयरसाहब इतका नव्हता आवडला. त्यातलं बॉडी ट्रान्स्फॉर्मेशन हा नंतर कमलला शाप ठरला. तो त्यातच अडकत गेला.

दक्षिणेचा दुसरा गुणी अभिनेता म्हणजे मामुट्टी. हा मल्याळम सिनेमाचा सुपरस्टार. दूरदर्शनच्या प्रादेशिक सिनेमाच्या स्लॉट मधे त्याचा एक सिनेमा पाहिला आणि प्रभावित झालो. त्यात तो जमीनदार कि गावचा मुखिया वगैरे मातब्बर कुणीतरी असतो. रस्त्यात खुर्ची टाकून दादागिरी वगैरे. हे सर्व त्याने फक्त डोळ्यातून व्यक्त केले आहे. चेहरा विलक्षण बोलका. बरेचदा हातवारे सुद्धा कमल हसनप्रमाणेच बरेच काही व्यक्त करणारे. त्याचे थोडेसे सिनेमे पाहण्यात आले. मग हिंदीत त्याने बाबासाहेबांची भूमिका केली ती वाखाणण्यासारखीच होती.

अशा अभिनेत्यांवर खरं तर वेगळा धागाच हवा. कमल हसन वर तर पाच सहा भाग निघतील इतकं भरभरून बोलण्यासारखं आहे.

अशा अभिनेत्यांवर खरं तर वेगळा धागाच हवा>>
अंडररेटेड अभिनेते, नाटकं, पुस्तकं, चित्रपट यावर कुणीतरी धागा काढायची वाट बघतो आहे.

<<< ग्लॅमर महत्वाचे असले तर कलेकडे कोण बघणार? बॉक्स ऑफिसला गल्ला किती केला, पहिल्या दहा श्रीमंतात कितवा नंबर आहे ...>
खरं आहे तुम्ही म्हणताय ते. पण कमल हसनला "रंगरंगोटी कलाकार" बोलणार्‍याबद्दल काय बोलणार मी. अगदीच राहावले नाही म्हणून लिंक दिली, याबद्दल क्षमस्व.

सागरसंगमम हिंदी डब्ड सुद्धा आहे युट्यूबवर. तो बघायला घेतला आधी, पण त्यात हिंदीत ट्रान्सलेट केलेली गाणी भयानक वाटली. म्हणून तामीळच बघितला. जबरदस्त केलाय कमल हसन ने.

कमल हसन चा एक तो भयंकर दिसत असतो आणि जेल मधून घाबरवतो असा काहीतरी पिक्चर पाहिला होता.अभय नाव का?पण नंतर जास्त काही ऐकले नाही त्याबद्दल.पूर्ण बघायचा होता.
मला तर तो मुंबई एक्स्प्रेस सारख्या अचाट अतर्क्य पिक्चर मध्ये पण आवडला होता.

बॉक्स ऑफिसला गल्ला किती केला, पहिल्या दहा श्रीमंतात कितवा नंबर आहे , पहिले दहा मोस्ट पॉप्युलर ऍक्टर यात कितवा नंबर आहे,
>>>>>>

मानवमामा तुम्ही माझ्या अंगणी नांदते माझ्या नवरयाच्या दुसरी बायको बघता का?
पदर खोचला, कंबर कसली, मसाले कुटले, नाही म्हणायला एखादे झक्कास पॉवरप्वाईंट प्रेजेंटेशन बनवले आणि केली तीस की तीनशे करोडची कंपनी टेकओवर...

पैसे कमावणे एवढे सोपे नसते ओ..
कलाक्षेत्रात तर नाहीच नाही..
तुम्ही लोकांना एंटरटेन करू शकलात तरच विकला जाता. नाहीतर आयुष्यच्या आयुष्य स्ट्रगल करण्यात जाते.

दर दिवशी किमान शंभर लोकं या मायानगरीत हिरो बनायला येतात.
पण गेल्या शंभर वर्षात त्यापैकी फक्त एक आणि एकच शाहरूख खान झाला आहे.

बरेच लोक या सिनेतारकांना जोखायला अभिनय हा एकच निकष लावतात. आणि ईथेच चुकतात. अभिनय हा अनेक निकषांपैकी एक निकष आहे. संवादफेक, नृत्य, हावभाव, हातवारे, एनर्जी, एक्शन, स्क्रीन प्रेजेन्स, लूक्स, स्टाईल वगैरे अनेक पैलू असतात.. सर्वांचे मिळून शेवटी ध्येय एकच असते की जे काही साकाराल ते लोकांना अपील झाले पाहिजे वा लोक एंटरटेन झाले पाहिजेत. जर तेच होत नसेल तर तुम्ही अभिनयात तीसमारखान का असेनात ते व्यर्थ आहे. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास कितीही तंत्रशुद्ध फलंदाज असा पण धावा करून संघाला जिंकवून देण्याची क्षमता नसेल तर तुमची किंमत शून्य वा तितकीच कमी आहे.

शाहरूखबाबत बोलायचे झाल्यास त्यात हे ईतर गुण ईतके अफाट आहेत की त्याकडे अभिनयक्षमता देखील बरेच ताकदीची आहे हे लोकांच्या लक्षातच येत नाही. जर कोणी अंडररेटेड कलाकारांबद्दल धागा काढणार असेल तर तिथे पहिले नाव शाहरूख द अभिनेता हेच मी लिहेन.

असो.. पैसा कमावण्याबद्दल जे झाले तेच लोकप्रियतेबद्दल.. सोपे नसते ओ लोकप्रिय होणे.. करोडो लोकांची मने जिंकणे.. हे काही राजकारण वा निवडणूका नाहीत की खोटी आश्वासने देऊन वा गाजर दाखवून लोकांना फसवाल आणि भक्त बनवाल.. ईथे तुम्ही कोणाला भ्रमात नाही ठेऊ शकत.. शाहरूख हा शाहरूख आहे म्हणून लोकप्रिय आहे.. म्हणून आज तो जाहीरातींमधील बिगेस्ट ब्राण्ड आहे !

कमल हसन संदर्भात वरील काही पोस्ट वाचून तो ओवरहाईप आहे हे विधान मला मागे घ्यावेसे वाटतेय..

आणि त्या ऐवजी तो कमालीचा ओवरहाईप आहे असे म्हणावेसे वाटतेय Happy

आमचे एक त्या जमान्यातील काका सांगायचे कमल हसन बद्दल.. काय तर म्हणे सदमा चित्रपटात शेवटच्या दृश्यात श्रीदेवीला आठवण करून द्यायला त्याची माकडाची नक्कल पाहून लोकांना त्याची सहानुभुती वाटण्याऐवजी थिएटरात लोकं खिदळत होते. आता बोला, काय कामाचा मग तो अभिनय Happy

कमल हसनच्या पंक्तीत बसणारा गुणवान पण ओवरहाईप कलाकार म्हणजे ए आर रेहमान !
जर संगीत हा गाण्याचा आत्मा असेल तर शब्द हे त्याचे श्वास झाले. रेहमानसाहेबांची बरेच गाणी हा श्वासच घुसमटवून टाकतात.
तसेच संगीताचा आत्मा असतो ते मेलोडी. रेहमानसाहेबांच्या गाण्यात तुलनेत मेलोडीचा अभावच आढळतो. जतीन ललित. नदीम श्रवण वगैरे मंडळींनी नव्वदीच्या दशकापर्यंत ती राखली होती. मग हळूहळू संगीत गडबडू लागले.. ते रेहमानमय होऊ लागले.

अजून एक चटकन आठवणारे गुणवान पण ओवरहाईप प्रकरण म्हणजे अजय अतुल. या ओवरहाईपनेसवर सैराटनंतर कळस चढवला गेला.
झिरोचे पहिले गाणे ऐकले का? सैराट आणि धडक यांच्या टायटल ट्रॅकचे तुकडे जोडत गाणे बनवले आहे. शाहरूखवर चित्रित झाल्याने गाण्याला करोडो हिटस मिळतील, पण काही नवीन द्या रे भावांनो, मलाही तुम्ही फार आवडता. आणि एक मराठी माणूस म्हणून तुमचा अभिमानच आहे.

कमल हसन, मामुंटी, मोहनलाल उत्तम अभिनेते.

फार पूर्वी शाळा कॉलेजात असताना दर रविवारी दुपारी दूरदर्शनवर प्रादेशिक भाषेतले चित्रपट दाखवायचे तेव्हा अनेक बघितले आहेत. आता नावंही आठवत नाहीत पण भूमिका काही अगदी आठवतात ह्यांच्या. सागरसंगमम आठवतोय, ईश्वर ज्यावरून केला तो मूळ पिक्चर पण चांगलाच लक्षात आहे, थेवर मगन पण आठवतोय कमल हसनचा. त्याचबरोबर रागिणी, रेवती, सुहासिनी ह्याही आवडायच्या.

रुन्म्याला बाळगुट्टी मिळालेली दिसते, परत सुरु झाला. मधे बरेच दिवस बरं वाटत होतं माबोवर वाचन करायला. आता परत selective skip कराव लागणार..

हो.इतका उमदा चेहरा आणि पर्सनॅलिटी, अभिनय असून जिमी शेरगील खूप लहान रोल्स मध्ये दिसतो.त्याला त्याच्या ताकदीच्या भूमिका मिळायला हव्यात.

माकडाची नक्कल पाहून लोकांना त्याची सहानुभुती वाटण्याऐवजी थिएटरात लोकं खिदळत होते. आता बोला, काय कामाचा मग तो अभिनय Submitted by ऋन्मेऽऽष on 28 November, 2018 - 22:59>> ऋन्मेऽऽषजी यावरून कमल हसनचा अभिनय निकृष्ट होता हे न दिसता प्रेक्षक कोणत्या कॅटेगरीतले होते ते दिसून येते. सिल्क स्मिताला बघण्यासाठी आलेले प्रेक्षक असावेत. तुमची शेवटचा सिन बघितल्यावर काय रिऍक्शन होती ते लिहा.

Sadma is overhyped movie. I agree with Runmesh for first time about Kamal Hasan. He is boring and overrated especially after he started concentrating more on make up than acting Happy

अरेरे!! काय विचारसरणी आहे इथल्या काही लोकांची कमल हसन बद्दल, किंवा एकुणच उच्च गुणवत्ता असलेल्या अभिनेत्यांबद्दल.

सदमा या नावाचा अर्थ लोकांना कळला नाही, लोकांपर्यंत त्या अभिनेत्याच्या भावनाच पोहोचल्या नाहीत, त्या दृष्यातले कारुण्यच लोकांना कळले नाही, मग काय कळले या पीटातल्या प्रेक्षकांना? की फक्त तद्दन कमर्शीयल नटांच्या माकडचेष्टाच कळतात ? आय रीयली वंडर !!

स्मृती (मेमरी हो, ) हरवलेल्या श्रीदेवीला , कमल हसन अंगाई वगैरे गाऊन, तिच्यातल्या लहान मुलाबरोबर स्वतः मुल होवुन तिला जपतो, तिची काळजी घेतो. दुसरा कुणी असता तर गैरफायदाच घेतला असता ना? ( हा सिनेमा आहे हे सोडा, पण वास्तवात असे घडते ) , तिला डॉ कडॅ नेतो. पण जेव्हा या बयेची ( सॉरी माझ्या शिव्या त्या पात्राला आहेत, श्रीदेवीला नाहीत हे कृपया लक्षात घ्यावे ) स्मृती म्हणजे मेमरी परत येते ना, तेव्हा ती त्याला ओळखतच नाही. मग तो लहान मूल बनुन माकडचाळे करुन तिला ओळख देऊ पहातो, पण ती त्याला ओळखत नाही. हाच तो सदमा म्हणजे धक्का असतो.

काय आहे ना, असे सिनेमे कळायला स्वतः त्या भुमिकेत शिरावे लागते, नुसते शे दोनशे नर्तकांबरोबर कंबर हलवली म्हणजे नृत्य वा अभिनय येतो असे नाही. आणी असेच माकडचेष्टा करणारे नट आजकाल चलतीत आहेत.

सदमा ह्या सिनेमातील श्रीदेवीचे काम अत्यंत वाईट आहे. आधीच डोक्याने कमी असलेल्या अभिनेत्रीने डोक्याने कमी असलेले पात्र रंगवले आहे असे वाटते. कमल हसनचे कामही फारसे आवडले नाही. भडक आणि बटबटीत. दक्षिणेत ह्याच्या मूळ सिनेमाला डोक्यावर घेतले गेले म्हणून ह्याची हाईप निर्माण झाली असावी. शेवटचे रेल्वे स्टेशनवरचे दृष्य तर हास्यास्पद होते. थोडा अंडरप्ले असता तर बरे झाले असते.
गजब हा सिनेमा ज्या तमिळ सिनेमावरुन काढला आहे (कल्याण रमण?) त्यातले कमल हसनचे काम बरे होते. श्रीदेवीचेही. (किंवा भाषा कळत नसल्यामुळे बरे वाटले असेल!)
रजनीकांत हा एक अत्यंत ओव्हर हाईप्ड नट आहे. तमिळ लोक त्याला इतके डोक्यावर का घेतात ते अनाकलनीय आहे. त्याचे ते अचाट आणि आचरट सिनेमे, त्याचे दिसणे, सिगरेट फेकून विविध प्रकारे पेटवण्याची विविध प्रकारे गॉगल डोळ्यावर चढवायची व उतरवाय्ची माकडचेष्टा, मारामारीच्या नावाखाली विज्ञानाच्या मूलभूत नियमांची केलेली क्रूर चेष्टा हे सगळे लोकांना इतके का आवडते ते कधी कळले नाही.

हो सदमा शेवटचा सिन खरच कॉमेडी सिन आहे आणि कमल ने जाम हसवले आहे.
जबरी एक्सप्रेशन्स आहेत, लोकांना हसवणे इतके सोपे नाही.

Pages