ओव्हररेटेड सेलिब्रिटी

Submitted by कटप्पा on 20 November, 2018 - 13:56

तुम्हाला ओव्हररेटेड वाटणारे कलाकार कोण आहेत आणि कशामुळे यांच्या चर्चेसाठी धागा उघडण्याचे पुण्य कर्म दोन महिन्यानंतर करत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ए आर रहमान .
जय हो कोणत्या अँगल ने ऑस्कर लेव्हल आहे???

कटाप्पा, ऑस्कर म्हणजे सर्वोच्च नाही हो. त्यामुळे ते सोडा. त्याचे बाकी संगीत अफलातुनच आहे की.

हल्ली बॉलिवुड सारखे मराठी तारकांचे पण लग्नसोहळे उगाच सारखे हायलाईट करतात. तिने कुठली साडी घातली, त्याने कुठला ड्रेस घातला, आणि हळद,जागरण गोंधळ,हनिमूनला कुठे गेले. सगळ भपकेबाजी.

टॅलंटच्या आणि स्टारडमच्या बाबतीत फक्त शाहरूख खानच आलोम बोग्राच्या जवळ जाऊ शकतो.>>> Lol जादुचा दिवा घासलात आता ऋन्मेष येईलच शाखाचे पोवाडे गायला.

रश्मी thank u. मलाही कोण बोग्रा माहिती नव्हतं Lol

सदगुरु अत्यंत ओव्हररेटेड इसम आहेत. >>> हे कोण, महागुरू माहितेयत.

जग्गी वासुदेव.

महागुरू ज्या गोष्टींसाठी ओळखले जातात त्याबाबतीत आज्याबात ओव्हररेटेड नाहीयेत. अंडरच.
sss आमची मुंबई, तुमची मुंबई, सबकी मुंबई sss

हल्ली बॉलिवुड सारखे मराठी तारकांचे पण लग्नसोहळे उगाच सारखे हायलाईट करतात. तिने कुठली साडी घातली, त्याने कुठला ड्रेस घातला, आणि हळद,जागरण गोंधळ,हनिमूनला कुठे गेले. सगळ भपकेबाजी <<<<<< मराठी तारका लग्नाचा खर्च काढायला देतात अकॅसेस मीडिया ला आणि कपडे, दागिने वगैरे ची जाहिरात करून तो ही खर्च निघतो

ओव्हररेटेड म्हणले की मला दिल दोस्तीचा पहिल्या सिझनम्धला आशुचा एपिसोड आठवतो. Proud ज्यात कैवल्य त्याला याचा अर्थ अती मौल्यवान असा सांगतो. मग येडा आशु , सचीन, मधुबाला , लता सगळ्यांना ओव्हर रेटेड म्हणतो. कैवल्य सोडुन सगळे भडकतात, आशुला घराबाहेर हाकलतात. पण आशु शेवटी माझी किंजल पण ओव्हर रेटेड आहे असे म्हणल्यावर सगळ्यांचे गैरसमज दूर होतात. Proud पण यु ट्युब वरुन पहिल्या दिदोदु चे सारे एपि गायब आहेत. झी ५ वर बघा मिळतायत का ते.

पण मालदिवज बेटावरून इन्सटाग्राम पोस्ट टाकणारे कुठे बसतात ( ओवर/अंडर/सबमर्ज्ड)?

रानभुली Lol
सदगुरु अत्यंत ओव्हररेटेड इसम आहेत>>>> +10000
अती होण्यास सुरुवात झाली आहे.
जग्गी वासुदेवच म्हटलं पाहिजे, सद्गुरु ही उपाधी फार वरची, ईशसमान आहे. Self proclaimed झालयं हे.

Jaggi Vasudev was married to Vijaya Kumari, known by her nickname Vijji. This was Kumari's second marriage. Prior to marrying Vasudev she worked in a bank, a position she retained until early 1996.[16] The couple had a daughter named Radhe. Kumari died on 23 December 1997. At that time her father alleged that Vasudev had murdered her; Vasudev asserted that she had attained mahasamadhi and claimed she had told him about it nine months before her death.[17][18] An FIR was filed against Vasudev but the police eventually closed the investigation due to lack of evidence.[17

सद्गुरूचा इतिहास

बायको महासमाधीत गेली म्हणे

https://en.m.wikipedia.org/wiki/Jaggi_Vasudev

हे कोण आहेत जिद्दु ?
Jaggi vasudev is good looking, witty, charming, has a great sense of humor, knowledgeable but Sadguru no thank you!!
आपल्याकडे व्यक्तीपूजा फार आवडते लोकांना!!

हे कोण आहेत जिद्दु ? >> कल्की-अम्मा भगवान हे प्रत्यक्ष विष्णूचे अवतार असून कलियुगात आपल्या कल्याणासाठी अवतरले आहेत.
https://en.wikipedia.org/wiki/Kalki_Bhagawan
सौथवाले जनरली येडेच असतात बहुतेक. जग्गी वासुदेव, नित्यानंद, सत्यसाई, कल्की-अम्मा , प्रेमानंद हे सगळे तिथलेच प्रोडक्टस आहेत.

Lol
नित्यानंद तेवढे E=mc sq मुळे आणि मी मी विडिओ मुळे माहिती आहेत. स्टँड अप समजून पहायचं. Proud
प्रवचन व कीर्तन सुद्धा स्टँड अप कॉमेडी वाटायला लागले आहे. Lol

इंदुरीकर महाराज फारच चांगले आहेत.
ते योग्य मानधन घेऊन प्रवचने करतात.
आपल्या परीने विनोद करून प्रबोधन करण्याचा प्रयत्न करतात.
त्यांनी केलेली १००% विधाने योग्य असतात असे नाही पण तरीही..
त्यांच्या नादाला लागून जीवनाचे/ संसाराचे वाटोळे झाले अशी उदाहरणे नाहीत.

Pages