ओव्हररेटेड सेलिब्रिटी

Submitted by कटप्पा on 20 November, 2018 - 13:56

तुम्हाला ओव्हररेटेड वाटणारे कलाकार कोण आहेत आणि कशामुळे यांच्या चर्चेसाठी धागा उघडण्याचे पुण्य कर्म दोन महिन्यानंतर करत आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<एक मराठी नेता (नाव लिहायची सोय नाही Happy )
Submitted by ड्रॅकुला on 21 November, 2018 - 20:40>>
Hehehe lets have some guesses
राठा? उठा? शप? अप? देफ? निग? Or someone else???

माझी पर्सनल लिस्ट
प्रियांका चोप्रा - ओव्हरअकटिंग,आता तर ओठ,नाक पण खिसकलय बेकार... दात पुढे..
श्रद्धा कपूर - acting नाही ,कॉन्फिडन्स च नाही ,ओकवॉर्ड देहबोली.. गाता येत नाही..चिरका आवाज.. भयंकर smile, ...जबडा आ वासून हसते...एकूण एक दात दिसतात...
परीणीती चोप्रा- आधी आवडायची पण आता हवा गेलीये डोक्यात आगावू झालीये
रणवीर-आधी आवडायचा ..आता... अति करतोय....
राज कपूर - खूप कारण आहेत.... पण मेन कारण स्वतःच्या ठेवायच्या झाकून आणि दुसऱ्याच्या पहायच्या वाकून...
शम्मी कपूर-तो प्रत्येक सिन मध्ये किती हलतो... एका ही सिन मध्ये न हलता सरळ उभा नाहीये...
दिलीप कुमार.. फारसा नाहीच आवडला कधी..

राज कपूर - खूप कारण आहेत.... पण मेन कारण स्वतःच्या ठेवायच्या झाकून आणि दुसऱ्याच्या पहायच्या वाकून...>> अगदी

तिसरं भोक कशासाठी? तीन हात आहेत तिला?>> अहो मान आहे तिला. असं बोलू नये. Proud डॉबी आठवला उशीचा अभ्रा घालणारा.

तिसरं भोक कशासाठी? तीन हात आहेत तिला?>>>

दोन हात काढले बाहेर, पण मुंडकं कशातून बाहेर काढणार?

टायगर श्रौफ , हृतिक रोशन: ना acting ना रूप.. फक्त नाच आणि जिम मध्ये कमावलेलं (?) शरीर.. हृतिक रोशनला तर ऑफ कॅमेराही धड बोलता येत नाही हेमावैम
बाकी लिस्ट:
दिलीप कुमार
रणवीर सिंग
कपूर फॅमिली (राज कपूर ते तैमुर)
शर्मिला टागोर
राजेश खन्ना
मलायका अरोरा
धोनी आणि कोहली वगळता आत्ताची इंडियन क्रिकेट टीम
AIB चे सगळे
सई ताम्हणकर
अमेय वाघ
प्रिया बापट
आणि
महागुरू

(बाकी झानवी, श्रद्धा कपूर , परिणीती, सोनम कपूर इ लिस्ट ला मम)

टायगर श्रॉफ आणि ह्रितिक आवडत नाही????
कानावर हात ठेवून किंचाळणारी बाहुली.
दोघेही आपल्या मेहनतीने पुढे आले आहेत.शरीर कमावण्यासाठी कष्ट करत असतात.
टायगर आधी बायकी वाटायचा, पण आता छान वाटतो मिश्या ठेवल्यावर.त्या सुपरहिरो जाट वाल्या पिक्चर मध्ये मस्त आहे.
ह्रितिक तर सुंदर आहेच.मला znmd मध्ये खूप आवडतो.

ह्रितिक>> एका गाण्यात आवडला होता, ते सोनम बाई आहेत त्याच्याबरोबर.. रीमिक्स आहे..
धीरे धीरे से :डोबः
एरवी विशेष आवडत नाही चेहरा.. डान्स भारी करतो

मस्त धागा आहे, कच्चा लिम्बू पुर्ण सहमत
दिलीप कुमार
रणवीर सिंग
कपूर फॅमिली (राज कपूर ते तैमुर)
शर्मिला टागोर
राजेश खन्ना
मलायका अरोरा
धोनी आणि कोहली वगळता आत्ताची इंडियन क्रिकेट टीम
AIB चे सगळे
सई ताम्हणकर
अमेय वाघ
प्रिया बापट
आणि
महागुरू

फॅमिली (राज कपूर ते तैमुर) >>> Rofl

माझ्या लिस्ट मधे सुबोध भावे आधी मला खूप आवडला पण आता मात्र अतिशय डोक्यात जातो

आर्ची.

खरं तर तिचा दोष नाहीये. लहान आहे ती अजून. लोकांनाच अक्कल नाही ती कुठे उद्घाटनाला वगैरे आली की तिला बघायला प्रचंड गर्दी, चेंगराचेंगरी, लोकांचे मोबाईल्स, चीजवस्तू चोरीला जाणे इत्यादी. तशीच दिसणारी ती दुसरी पण जरा एकदोन शेड्स ब्राईट, डोळा मारणारी - प्रिया प्रकाश वॉरिअर. तिचे इतके विडीओ वॉट्सॅपने आले की मेमरी फुल्ल होऊन गेली. अर्थात इथेही दोष पब्लिककडेच जातो. या मुली थोडीच म्हणतात आमचा एवढा उदोउदो करा म्हणून..

एकदा सुनील गावसकरने एका पुरस्कार समारंभात खोचकपणे सांगितले होते की मला पुरस्कारांसाठी एक नवीन घर घ्यावे लागणार आहे. त्याच समारंभात लता मंगेशकर यांनाही पुरस्कार दिला गेला. त्या वेळी एक लाटच आली होती. गल्लीपासून ते मंत्रालयापर्यंत सर्वत्र फक्त सुनील गावसकर, लता मंगेशकर आणि कधी कधी इतरांमधे भीमसेन जोशी, आशा भोसले यांच्यातच पुरस्कार दिले जात. प्रत्येक पुरस्काराबाबत वृत्तपत्रात पहिल्या पानावर छापून येई. मग कुणी कुणाला कशी कोपरखळी मारली, लोक कसे हसले याची साद्यंत वर्णने येत. नंतर नंतर हे अजीर्ण होऊ लागले. गावसकरला ही त्याचा वीट आल्याने त्याने आपली नाराजी व्यक्त केली होती.

आता वृत्तपत्रांची जागा टीव्ही चॅनेल्सनी घेतली आहे. पूर्वी दूरदर्शनवर सटीसहामाईला सेलेब्रिटी टीव्हीवर येत. आता रोज उठून त्यांचे बोबडे बोल ऐकावे लागतात. सेलेब्रिटी होणे ही चूक नाही. मात्र अतिपरीचयात अवज्ञा असे होऊ लागते. मीडीयाचा उत्साह जरी असला तरी सेलेब्रिटीजने काळजी घ्यायला हवी.

पूर्वी अमिताभ बच्चन सारखे बडे स्टार्स फारसे इंटरव्ह्यूज देत नसत. दूरदर्शनवर येत नसत. कारण आपली चेहराकिंमत कमी होते अशी भीती त्या वेळी असायची. आता उलटे झाले आहे. टीव्हीवर आपली छबी दिसली नाही तर आपल्याला लोक विसरणार तर नाहीत ना ही भीती कलाकारांना वाटते. त्यात मराठीत सिनेमात पण तेच कलाकार, नाटकातही तेच आणि मालिकेतही तेच शिवाय अधून मधून गप्पा मारायला, मुलाखती प्रमोशन्स यामुळे आपल्या कॉलनीतलेच कुणी ते आहेत असे वाटू लागते.

खाजगी वाहीन्या सुरू झाल्यापासून दिवाळी, नव वर्ष अशा प्रसंगात कलाकारांची चांदी होऊ लागली. त्यात गंमत म्हणजे दूरदर्शनच्या जमान्यापासून दिवाळीला रमेश देव आणि सीमा देव यांना बोलावले जायचे. मग एखादा मुलाखतकार त्यांना बोलते करायचा. खरे म्हणजे ते वाटच बघत असायचे. मग ठरलेली गाणी दाखवत. हळू हळू रमेश देव लाडात येऊन सीमा देव यांना काहीतरी रोमँटीक बोलत. "एक माणूस रुसलय बरं का " छाप काहीतरी. मग सीमा देव लाजत. ते पाहून प्रेक्षक खूष होत. नंतर त्यांची वयं झाली. तरी यात खंड पडला नाही. आता अगदी पांढरे केस झाले, अजिंक्य देव मध्यमवयीन झाला तरी त्यांचा हा छेडछाड आणि लाजालाजी हा कार्यक्रम चालूच राहीला होता. एका अ‍ॅवॉर्ड कार्यक्रमात टिंगल झाल्यावर मग आवरते घेतले गेले.

असेच आवरा कॅटेगरीतले महागुरू आहेत. इतरांना आवरा म्हणायची पाळी यायच्या आत त्यांनी सावरावे.

असेच आवरा कॅटेगरीतले महागुरू आहेत. इतरांना आवरा म्हणायची पाळी यायच्या आत त्यांनी सावरावे.>>
what is best time to leave>> before others ask you to go..

बरेच आहेत, पण तुपारे च्या कमेंट्स वाचून हल्ली मला एकच ओव्हर रेटेड कलाकार वाटतो तो म्हणजे सुबोध भावे.

एक चाळीशी ओलांडलेल्या, केस पांढरे अन सुजलेला चेहऱ्याच्या माणूस कसा काय कुणाला इतका आवडू शकतो ??? पण अर्थात आवड आपली आपली Proud

VB शी सहमत. सुबोध भावे चांगला अभिनेता आहे, जनरल कळकट मराठी हिरोज पेक्षा बरा दिसतो, पण तेवढंच. त्या धाग्यावर त्याच्या स्तुतीच्या जेवढ्या पोस्ट्स पडतात, तेवढं काहीच वाटत नाही. आज सविता दामोदर पाहिला, त्यात तर अजिबात आवडला नाही.
बाकी माझ्या ओव्हर रेटेड लिस्टमधले बरेच वर उल्लेखले गेले आहेत, त्या व्यतिरिक्त मला रक सनसनीखेज माव लिहायचं आहे, ज्यासाठी मला फटके खावे लागतील, श्रीराम लागू - हे कोऱ्या शिष्ट आणि निर्विकार डोळ्यांचे ऍक्टर वाटायचे मला. कधीच कोणत्याच सिनेमा मध्ये आवडले नाहीत आणि नटसम्राट मध्ये तर नाहीच. विक्रम गोखले क्वचित तरी ठीक वाटले पण ते सुद्धा प्रचंड दबदबा असलेलं नाव असताना मला मात्र फारसे भावले नाहीत. या दोघांच दिसणं, एक्सप्रेशन आणि सगळे रोल सगळीकडे सारखच वाटलं मला.

Pages