Submitted by कटप्पा on 20 November, 2018 - 13:56
तुम्हाला ओव्हररेटेड वाटणारे कलाकार कोण आहेत आणि कशामुळे यांच्या चर्चेसाठी धागा उघडण्याचे पुण्य कर्म दोन महिन्यानंतर करत आहे.
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
अजय देवगणच नाव वाचून चक्क
अजय देवगणच नाव वाचून चक्क आश्चर्य वाटल..
ऋ बहुतेक तुम्ही मैं ऐसाही हूॅ, कंपनी,दृष्यम ही सिनेमे पाहीले नसतील..
अभिनय चांगला जमतो त्याला...आणि early 90's मध्ये एक्शन हीरो म्हणून एक वेगळी ओळख त्याने निर्माण केलीय ते ही इतर तगडे हीरो स्पर्धक असताना..
आणि आय थिंक अशोक सराफ ओव्हररेटेट सेलेब्रिटी नाहीयेत...
असो तुमच तसं पर्सनल मत असू शकत...
90 मध्ये शाखा चोपायचा
90 मध्ये शाखा चोपायचा सगळ्यांना- त्याला कॉम्पितिशनच नव्हती.
त्यामुळे 90 चा शाखा ओव्हररेटेड नव्हता, आत्ताचा नक्कीच आहे.
अशोक सराफ प्रचंड अंडररेटेड
अशोक सराफ प्रचंड अंडररेटेड आहे उलट. सो कॉल्ड उच्चभ्रूंन्च्या डोळ्यात सलतो तो. त्याची रेंज मराठी सिनेमावाल्यांना कळलेलीच नाही असे वाटते. चौकट राजातल्या त्याच्या आणि सुलभा देशपांडेच्या एका सीनला तर प्रत्येक वेळी डोळे पाणावतात. कॉमेडीचा उत्तम सेन्स, टाईमिंग जबरदस्त, उत्तम वाचन, प्रेझेन्स ऑफ माईंड यामुळे कॉमेडीत तो यशस्वी झाला पण सिरियस भुमिकासुद्धा खुप अभ्यासपुर्वक निभावतो तो. चांगली नाटकं, सिनेमे आता मिळायला हवीत त्याला.
उलट, मिलेनियल्स लक्ष्यालाच ओव्हररेट करतात असे वाटते. त्याची रेंज असपेक्षा फारच मर्यादित वाटते.
'बाबा लगीन' या घाणेरड्या
'बाबा लगीन' या घाणेरड्या नावाचा सिनेमा कुणी पाह्यलाय का नाही माहित नाही, पण त्यातला अशोक सराफचा 'बाबा झोलझाल' अप्रतीम.
रणवीर सिंग - वाह्यातपणा
रणवीर सिंग - वाह्यातपणा डोक्यावर घ्यायचा जमाना आहे हा त्यामुळे अश्यांची चलती असल्यास नवल नाही. >>>>>>>>>>>>>>>
अयकायच्याकायबोलुनर्हायलानतु.
अशोक सराफ प्रचंड अंडररेटेड
अशोक सराफ प्रचंड अंडररेटेड आहे उलट+११११
अयकायच्याकायबोलुनर्हायलानतु.+११११११११११११
<<६) रणवीर सिंग - वाह्यातपणा
<<६) रणवीर सिंग - वाह्यातपणा डोक्यावर घ्यायचा जमाना आहे हा त्यामुळे अश्यांची चलती असल्यास नवल नाही.>> एकदम अ मा न्य !
त्याला अभिनय करण्याजोगे रोल मिळाले तर तो ते ही उत्तम करू शकतो.
"दिल धडकने दो" मधले दोन प्रसंग आवर्जून पहा.
१. प्रियांका जेव्हा दोन्ही फॅमिलींसमोर आपले म्हणणे मांडते त्या प्रसंगात तिच्या , अनिल कपूरच्या आणि झरीना वाहबच्या बोलण्यावर , त्याची चेहेर्यावरची Expressions" केवळ लाजवाब. डोळ्यातून किती प्रखरतेने तो भावना व्यक्त करतो !
२. शेवट अनिल ठीक आहे हे कळतं आणि मग होणार्या चारही कुटुंबियांच्या संवादाच्या प्रसंगातला त्याचा अभिनय आणि शब्द्फेक अतीशाय अप्रतीम
पशुपत + १
पशुपत + १
प्रत्येक कॅरेक्टर चोख करतो तो.
वाह्यात्पणा अभिनयात नसतो. बाकी वेळेला सिनेम्याच्या बाहेर करतो.
फक्त रण्वीर आहे म्हणुन बाजीराव, दुष्मनकी देखो जो वाट लावली म्हणुन नाचलाही असेल असं वाटतं
२) स्वप्निल जोशी - माझा आवडता
२) स्वप्निल जोशी - माझा आवडता आहे हा. पण तटस्थ विचार करता मर्यादीत गुणवत्ता असूनही मराठी चित्रपटसृष्टीचा शाहरूख खान म्हणून ओळखला जातो.>>>>>> तुझा आवडता आहे, म्हणूनच या ढब्ब्याचे अभिनय गुण दिसेनात तुला.
५) अक्षय कुमार - तसा आवडतो. पण फुकटफाकट मनोजकुमार बनवून ठेवलाय याला. सुपर्रस्टरच्या स्पर्धेत तीन खानांच्या पंक्तीत याला मान देणे हास्यास्पद आहे.>>>>>>>> मनोजकुमारने कधी कॉमेडी रोल केला होता का? जरा मायबोली व्यतीरीक्त इतर वाचनीय लेख पण वाचत जा अधून मधून.
अशोक सराफ - लक्ष्मीकांत बेर्डेचा कॉमेडी पार्टनर. लक्ष्मीकांत बेर्डे एकसुरी विनोदनिर्मिती करायचा म्हणून अशोक सराफ किती भारी असे कौतुक करायची एक प्रथा आढळते. >>>>>> ज्या विषयी अजीबात माहिती नसते ना, त्या विषयी लिहुन हास्यास्पद होऊ नये कधी.
) कमल हसन - रंगरंगोटी कलाकार.>>>>>>>> नुसते २- ४ हिंदी सिनेमे पाहिले की आपण किती उच्च दर्जाचे प्रेक्षक आहोत असा गोड गैरसमज बाजूला ठेव जरा. हिंदी व्यतीरीक्त इतरही भाषिक चित्रपट आहेत. ते पण पहात जा, नाही भाषा कळली तरी.
पण माझा शाहरुख आणी आणी माझा बोलका बाहुल स्वप्नीलच कसा ग्रेट हे सिद्ध करण्याच्या नादात इतरांना मनसोक्त नावे ठेऊन त्याच्या वर परत परत पोस्टी पाडुन हे कलाकार उच्च ठरणार नाहीयेत.
खालील जोड्यांमधून एक कुठलाही
खालील जोड्यांमधून एक कुठलाही सेलेब्रिटी निवडा ( एका जोडीत प्रत्येकी एक )
१. जॉनी वॉकर आणि अमिताभ बच्चन
२. दिलीपकुमार आणि शक्ती कपूर
३. रणवीर सिंग आणि पृथ्वीराजकपूर
४. सनी देओल आणि मधुबाला
५. सनी लहाने आणि दारासिंग
६. शाहरूख खान आणि अमर सिंग
७. अक्षय कुमार आणि विजय मल्ल्या
८. कॅटरीना कैफ आणि जॉनी लिव्हर
रश्मे किती लाह्या
रश्मे
किती लाह्या फुटायल्यात
ढब्ब्या शब्द लय आवडलाय
पूर्वी राजेश खन्ना ओव्हररेटेड
पूर्वी राजेश खन्ना ओव्हररेटेड होता. पण हे ओव्हररेटिंग जनतेकडून त्याच्या फॅन्सकडून असायचे. मुली त्याला रक्ताने प्रेमपत्र लिहीत, त्याच्याकरिता वेड्या काय होत, तो जाईल तिथे गर्दी आणि त्याच्यासारखे मोठमोठ्या कॉलरचे शर्ट घालणे असायचे.
सध्याच्या काळातले ओवररेटेड सेलिब्रिटीज्
भारतीय -
फोगट भगिनी
ऋजुता दिवेकर
आणि ऑल्टाईमे ओवररेटेड अर्थातच -शोभा डे
अभारतीय -
मलाला युसूफजै
सनी लहाने तात्याराव लहाने
सनी लहाने तात्याराव लहाने यांची कोण?
पण माझा शाहरुख आणी आणी माझा
पण माझा शाहरुख आणी आणी माझा बोलका बाहुल स्वप्नीलच कसा ग्रेट हे सिद्ध करण्याच्या नादात इतरांना मनसोक्त नावे ठेऊन त्याच्या वर परत परत पोस्टी पाडुन हे कलाकार उच्च ठरणार नाहीयेत.>>> नाहीतर काय.
स्वप्निल जोशी असलेली साधी जाहीरात पण पाहायची इच्छा होत नाही .
अगं काय करणार दक्षिणा ? हा
अगं काय करणार दक्षिणा ? हा काहीही लिहीतो. एखाद्या तामिळ माणसाला विचार म्हणावं कमल हसन च्या सिनेमा बद्दल, तो जास्त चांगले समजावुन सांगेल. अशोक सराफचा बीनकामचा नवरा बघावा, उत्कृष्ट ग्रामिण विनोद आहे. आणी म्हणे अशोक सराफ एकसूरी काम करतो.
मुळात स्वजो ला जाहिराती
मुळात स्वजो ला जाहिराती मिळतात का ☺️
एक चमकोगिरी फेम पोलीस अधिकारी
एक चमकोगिरी फेम पोलीस अधिकारी....
भरत जाधव - चेहऱ्यावरील भाव आणि अभिनयाचा हेल कायम एकच असतो
मंगेशकर कुटुंबीय - गानाबजाना सोडून बाकीच्या गोष्टी.. कोणत्या ते ओळखा
नोबेलवाले - कैलाश सत्यार्थी काका , तेरेसा बाई , मलाला ताई
साऊथ मधील बहुतेक सगळीच कलाकार मंडळी अपवादासाठी विजय सेतुपती सारखे कलाकार आहेत म्हणा ...
हा माणूस एक जबरदस्त अभिनेता आहे... इथे अंडररेटेड लोकांचा धागा असता तर मी पहिलं नाव त्याच टाकलं असत ... त्याचे बहुतेक सिनेमे वेगळ्याच कथावस्तूचे असतात आणि त्याचा अभिनय पण त्यांना साजेसा ... ज्यांना तो माहित नाही आणि चांगले सिनेमे पाहायची आवड आहे त्यांनी जरूर त्याचे सिनेमे पाहावेत ///
जिड्डू ...१०० टक्के सहमत..
जिड्डू ...१०० टक्के सहमत..
विजय सेतुपती बेस्ट ....
सुंदर अभिनय ...माझा आवडता अभिनेता..
नुकताच रिलीज झालेला ९६ तमिळ movie
जरूर पहा मिळाला तर
ओवररेटेडचा अर्थ काय?
ओवररेटेडचा अर्थ काय?
तर काही वा बरेच लोकांनी ज्यांना गरजेपेक्षा जास्त भाव दिला आहे.
जर मी एखाद्या अश्या कलाकाराचे नाव घेतले तर अर्थातच त्या कलाकाराला जास्तीचा भाव देणारी लोकं माझ्याशी वाद घालायला येणे स्वाभाविकच आहे. किंबहुना कोणी वाद घालायला आलाच नाही तर तो कसला डोंबलाचा ओवररेटेड कलाकार, त्याला कोणी भावही देत नाही असा त्याचा अर्थ झाला
आणखी एक म्हणजे ओवररेटेडचा अर्थ फालतू वा कमी दर्जाचा कलाकार नाही तर यात एखादा बरा वा चांगला दर्जा असलेला कलाकारही असू शकतो. फक्त त्या कलाकाराला गरजेपेक्षा जास्त भाव दिला जातो असे मला वाटते ईतकेच.
मी माझ्या आवडत्या स्वप्निल जोशीचे नाव देखील तटस्थपणे विचार करून घेतले आहे यातच माझा मुद्दा सपष्ट होतोय !
असो, अमिताभ बच्चन (सेकंड इनिंग) हे एक उत्तम उदाहरण आहे. माझ्या आवडत्या माधुरी दिक्षितचेही नाव यात घेऊ शकतो.
वर कोणीतरी राजेशखन्ना यांचे नाव घेतलेय ते मला पटत नाही. राजेश खन्ना असो वा शाहरूख खान. हे सुपर्रस्टार मंडळी आहेत. अश्यांमध्ये एक एक्स फॅक्टर असतो. ज्यांना तो भावतो त्यांच्या ते आवडीचे होतात. बाकीच्यांना मात्र या फॅन फॉलोईंगचे रहस्य कळेनासेच होते ईतकेच.
वर मी ओवरहाईप म्हणून अमिताभच्या सेकंड इनिंगचे नाव घेतलेय. पूर्वीचा एंग्री यंग मॅन अमिताभमध्ये एक एक्स फॅक्टर होता. तो ओवरहाईप नव्हता. तो अमिताभ सुपर्रस्टार होता.
....
@ रश्मी, माझी पोस्ट पुन्हा वाचा. एकसुरी अभिनय अशोकमामा नाहीतर लक्ष्यादादाबद्दल म्हटलेय. किमान तेवढा आरोप मागे घ्या
कोणीतरी मला वर कमल हसनचे थेट ईतर भाषेतील चित्रपट बघायचा सल्ला दिला म्हणजे हिण्दीत त्याने काही विशेष केले नाही हे मान्य तर..
...
अवांतर - दुसरयाची लाईन छोटी करून आपली मोठी होत नाही याची मला कल्पना आहे. आणि मला तशी गरजही वाटत नाही. कारण शाहरूख खान हा सुपर्रस्टार ऑफ द ऑल टाईम मिलेनियम होता, आहे आणि राहील !
भले झिरोचा बॉक्स ऑफिसवर गल्ला झिरो का भरेना
@Ashwini_९९९ मागील आठवड्यातच
@Ashwini_९९९ मागील आठवड्यातच पाहिला ... अगदी शेवटच्या क्षणापर्यंत वाटलं कि ती दोघे एकत्र येतात कि काय ?
काल आदिती बालनचा आरूवी पाहिला ... जबरदस्त कलाकृती आहे ... तुम्ही प्लिज पाहाच... जोसेफ गॉर्डन लेवीट च्या २०११ सालच्या ५०/५० चित्रपटानंतर पहिला चित्रपट असेल जो पाहताना रडू थांबत नव्हतं (शेवटच्या टप्प्यात)
वेगवेगळ्या कालखंडातली /
वेगवेगळ्या कालखंडातली / स्तरामधली वेगवेगळी आवड एकाच धाग्यावर.
कमल हसनचा सागर संगमम पाहून कुणाचे मत बदलले तर आवडेल वाचायला. असे अनेक सिनेमे आहेत जे भाषा कळत नसतानाही केवळ त्याच्या अभिनयासाठी पाहीलेत.
कमल हसनचा सागर संगमम पाहून
कमल हसनचा सागर संगमम पाहून कुणाचे मत बदलले तर आवडेल वाचायला. असे अनेक सिनेमे आहेत जे भाषा कळत नसतानाही केवळ त्याच्या अभिनयासाठी पाहीलेत. >>>>> हा सिनेमा पाहून मी कमल हसनची जबरदस्त फॅन झाले, त्याचा अभिनय तर चांगला होताच पण विहिरीच्या काठावर/बांधावर ( याला काय म्हणतात माहीत नाही मला), केलेलं नृत्य म्हणजे अफलातून. या सिनेमानंतर मी कमल हसनचे समजणाऱ्या आणि न समजणाऱ्या भाषांमधले सगळे सिनेमा पाहिले.
पुष्पक, मेयर साहब (डब),
पुष्पक, मेयर साहब (डब), स्वाथी मुथेम (तेलगू) ह्यातील कमल हसन मला आवडला आणि मी त्याचा फ्यान झालो,असाही आमच्या प्रत्येक रूम मध्ये कमल हसन फ्यान आहे.
लक्ष्मीकांत बेर्डे एकसुरी
लक्ष्मीकांत बेर्डे एकसुरी विनोदनिर्मिती करायचा म्हणून अशोक सराफ किती भारी असे कौतुक करायची एक प्रथा आढळते.>>>>>. ओके, माझे शब्द मागे घेतले, पण अशोक सराफचे कौतुक करावे ही प्रथा आहे? अशी ही बनवाबनवी मध्ये त्याचा सचीन सोबत मोलाचा वाटा होता. अजून कित्येक असे आहेत, किती लिहीणार?
वर मीच सांगीतले आहे तुला की इतर भाषीक चित्रपट पण बघ. पण तू अजूनही हिंदीच्या प्रेमातुन बाहेर येत नाहीस. कमलने काय २-४ च हिंदी केले, त्यात काय !! असे जर म्हणत असशील ,तर मी पण हेच म्हणेन की शाहरुख ने फक्त आणी फक्त बाजीगर, दिदुलेजा, स्वदेस, चक दे इंडिया आणी चेन्नई एक्सप्रेस मध्येच ठसा उमटवला, बाकी सारे भंकस !! चालेल??
हो, कमल हसनचा सागरसंगमम अफाट, तसेच गिरीश कर्नाडचा सूर संगम पण मस्त. क्लासिक सिनेमे आहेत हे.
सगरसंगमम बघतोच आता.
सागरसंगमम बघतोच आता.
सनी लहाने तात्याराव लहाने
सनी लहाने तात्याराव लहाने यांची कोण? >>> ह्सू थांबतच नाहीये
प्रिन्सेस डायना
प्रिन्सेस डायना
ज्यांना लक्ष्मीकांत
ज्यांना लक्ष्मीकांत बेर्डेच्या बरोबरच अशोक सराफ माहीत झाले, त्यांच्याबद्दल अतीव करुणा व्यक्त करतो.
कमल हासनhttps://youtu.be/SV
कमल हासन
https://youtu.be/SV-smzc09Cw
सलंगाई ओली, भाषा कळण्याची गरज नाही.
यथो हस्त, तथो दृष्टी
यथो दृष्टी तथो मन:
यथो मन: तथो भावो
यथो भावो तथो रस:
प्रिन्सेस डायना>
प्रिन्सेस डायना>+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११
Pages