बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेघाला स्मिता आवडते पण स्मिताला मेघा आवडत नाही... मे बी आ रे च्या इन्फ्लुएन्समध्ये!

सई डोक्यात गेली परत! शराला प्रश्न विचारल्यावर मेघा पुन्हा जस्टीफिकेशन द्यायला गेली त्यावेळी मेघाला वाईट तर्हेने सुनावले तिने.
पुष्कीशी बोलताना किती सॉफ्ट आणि मेघा व इतरांशी बोलताना किती धार येते तिच्या बोलण्याला.

आ रे पेक्षाही सई गेलेली आवडेल आता.

>>निगेटीव्हिटीने पिंपल्स आलेत तिला वगैरे पर्सनल रिमार्क्स मारले होते ,
त्यात काही चूक नाहीये.. खुद्द वैद्यक शास्त्रात हे दिलेले आहे की निगेटीव्हिटी मूळे टॉक्झिन्स सिक्रीट झाल्याने त्याचे दृष्य रूपांतर म्हणून पिंपल्स, स्किन रॅश, जास्ती घाम, किंवा ईतर काही दुष्परिणाम दिसून येतात.

मेघाने मात्र अगदीच खूपच खालची पातळी गाठली पुष्कर व रेशम बद्द बोलताना.. एव्हडे करून मी असे बोललेच नाही किंवा पुन्हा सारवा सारव करायचा प्रयत्न केला. असो. घाणीत दगड मारल्यावर घाणच ऊडणार आहे. बि बॉ ने खरे तर ही घाण आता या घरातून बाहेर काढायला हवी आहे. पण अशा मानसिकतेच्या लोकांना बाकी लोकं कसे काय आपले 'बहूमूल्य' मत वगैरे देतात याचेच जास्ती आश्चर्य वाटते. आस्ताद, रेशम, पुष्कर जर खरेच नालायक वगैरे असतील तर लोकं त्यांना बाहेरचा रस्ता दाखवतीलच. पण मेघा धाडे सारख्यांना विजेते ठरवले तर काय संदेश जातो समाजात? की मेघा धाडे हाच समाजचा आरसा आहे? बि बॉ याचा विचार करतील अशी आशा करुयात. आपल्या समाजात त्यापेक्षा नक्कीच वरच्या पातळीचे/चांगल्या विचारसरणीचे लोक आहेत अशी खात्री आहे. रियालिटी गेम शो च्या नावाखाली ईतक्या रसातळाला आपली मानसिकता व वागणूक असावी असा संदेश पसरवला जाईल, एका जबाब्दार चॅनल कडून असे वाटत नाही. तशी अपेक्षा नाही.
त्यापेक्षा स्मिता व शरा यांना जिंकवून दिले तरी चालेल. सर्व खेळात स्मिता ने मेघा पेक्षा सरस खेळ केला आहे आणि व्यक्ती म्हणून तर स्मिता वा शरा च्या बाजूलाही ऊभे रहायची खरे तर लायकी नाही मेघाची.

भूषण, सुशांत, जुई हे स्पर्धक होते, त्या घरात राहिलेले होते. त्यामूळे त्यांनी काहिही अभिप्राय देणे वा आता सोशल मिडीयावर मते मांडणे हा त्यांचा अधिकार आहेच. तेही स्पर्धक होते तेव्हा त्यांच्या चूकीच्या कृत्यामूळे वा वागणूकीमुळे बाहेर गेलेच... तेव्हा मेघा च्या बाबतीतही ते होणे न्याय्य च ठरेल.

फॉर द रेकॉर्डः
मेघा रेशम बद्दलः फोटो कुणाचा लावलाय आणि झोपते कुणाच्या बेड वर (कुणा बरोबर). बाहेर दुसरा वाट बघतोय आणि ईथे रंगरलीया सुरू आहेत..
रेशम ने मेघाला फक्त एव्हडेच विचारले: ईतक्या पर्सनल लेव्हल च्या कॉमेंट्स करायची काय गरज होती? तू माझ्या गेम बद्दल बोल मला काहीच आक्षेप नव्हता... या प्रशाण्वर खरे तर शरा मान डोलावत होती.. ईतर सदस्य प्रचंड स्ट्रेस मध्ये दिसले.. पण मेघा मात्र ऊलट आवाज चढवून मी तसे बोललेच नाही हेच सुनावत होती... disgusting! shame!

मेघा हेटर्स नी कीतीही आक्रस्ताळेपणा केला तरी गेल्या २ एपिसोडनंतर मेघाचा सपोर्ट अजुनच वाढलेला आहे. मेघाची लोकप्रियता कमी कराण्यासाठीच जर हा डाव बिग बॉस ने टाक्ला असेल तर तो सपशेल त्यांच्यावरच उलटलेला आहे. आणि सगळी बिग बॉस टीम तोंडावर आपटलेली आहे.
बाकी अत्तापर्यंत मोस्ट हेट्रेड मिळवलेला स्पर्धक आहे - जुई या बाईंना दोन्ही ग्रुपचे लोक हेट करतात.
आणि मोस्ट लव्हेबल स्पर्धक आहे - स्मिता या बाईं दोन्ही ग्रुपच्या लोकांना आवडतात.

बाकी कोणाला नाही तरी जुई ला सर्वात तिरस्कर्णीय स्पर्धक म्हणुन बक्षीस मिळायलाच हवे.

मेघाने मात्र अगदीच खूपच खालची पातळी गाठली पुष्कर व रेशम बद्द बोलताना >> हेहे Biggrin
रेशम ताई बॉयफ्रेंड चा फोटो लावून राजेश बरोबर झोपत होत्या हे पाहिलेय बरे सगळ्या प्रेक्षकांनी . मेघानी नविन काय सांगितले ते, तिनी तर बिचारीनी फक्त्त रा च्या बेडवर झोपते म्हणले , रा बरोबर झोपते ते नाही बोलली ती.
ह्यालाच हीपोक्रसी म्हणत असावेत बहुतेक , म्हण्जे रे ताई रा दादा बरोबर झोपणार , त्याच्या मांडीवर बसणार , एकत्र बाथरूम मधे जाणार, ते सगळे बघणार. पण कोणी काही बोलायचे मात्र नाही, जो बोलेल तोच वाईट ....

मेघा रेशम बद्दलः फोटो कुणाचा लावलाय आणि झोपते कुणाच्या बेड वर (कुणा बरोबर). बाहेर दुसरा वाट बघतोय आणि ईथे रंगरलीया सुरू आहेत.. >> ह्याच्या खोटे काय आहे , खोटे असेल तर मेघाला disgusting म्हणता येईल .
पण हे सगळे खरेच आहे आणि प्रेक्षकांनी बघितलेय तेव्हा disgusting कोणी असेल तर रा रे चे वागणे आहे. आणि shame सुद्धा रा रे लाच वाटली पाहिजे.
रच्याकने , रे रा चे चाळे बघून सर्व प्रेक्षक , ममा सुद्धा त्यांना अशाच पद्धतीने बोलले होते.

पब्लिक सपोर्ट मुळे मेघा व big boss च्या सपोर्ट मुळे रे फायनल ला पोचुन शेवटी रे ला जिंकवतील..
म्हणजे दोन्हीकडच्या fansचा रोष नको.
ईतक्या सगळ्या त्रासातुन मेघाला निदान top2 मधे घेतलं बि बीने म्हणुन मेघा fans समाधान मानतील व रे जिंकली तर तिच्या fansसाठी दिवाळीच.
मेघा जिंकली तर सै काय रिएक्ट होईल सांगता येत नाही.
पण हेच जर पुष्की जिंकला (God forbid तस होऊ नये Happy ) तरी हारुनही सै बै नाचत सुटतील..आणि पुष्की मात्र आभाराचं भाषण ठोकत बायकोकडे पळत सुटेल.. मग कोण सै, कुठली सै..

रेशम ज्याला 'पर्सनल' विषय म्हणाते आहे त्यावर एका माणसाने केस टाकली होती.
अग बाई, या रे बाईला कोणीतरी समजावा रे, अशा गोष्टी 'खाजगी' जागेत केल्या ( आपापल्या घरात ) तरच 'पर्सनल' असतात आणि रहातात. ५० कॅमेर्‍यांसमोर केलेले प्रेमाचे चा़ळे जे नॅशनल टेलेव्हिजन वर दाखवले जातायेत ते 'पर्सनल' कसे असतील / राहतील ? या शोमधे काहीही खाजगी असूच शकत नाही. इथे लोक सगळे बघायलाच बसलेत ना . एव्हढी सुद्धा अक्कल या ४३ वर्षाच्या बाईला नाही का ?

पब्लिक सपोर्ट मुळे मेघा व big boss च्या सपोर्ट मुळे रे फायनल ला पोचुन शेवटी रे ला जिंकवतील..
म्हणजे दोन्हीकडच्या fansचा रोष नको.
ईतक्या सगळ्या त्रासातुन मेघाला निदान top2 मधे घेतलं बि बीने म्हणुन मेघा fans समाधान मानतील व रे जिंकली तर तिच्या fansसाठी दिवाळीच.
मेघा जिंकली तर सै काय रिएक्ट होईल सांगता येत नाही.
पण हेच जर पुष्की जिंकला (God forbid तस होऊ नये Happy ) तरी हारुनही सै बै नाचत सुटतील..आणि पुष्की मात्र आभाराचं भाषण ठोकत बायकोकडे पळत सुटेल.. मग कोण सै, कुठली सै..

Submitted by Chaitrali on 13 July, 2018 - 17:08>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>१००

फुल्ल धमाल चित्र उभे राहिले Happy भागो भागो सै बाई आयी Happy

>>पण कोणी काही बोलायचे मात्र नाही, जो बोलेल तोच वाईट ....
मला वाटते तुमचा गोंधळ होतो आहे.
अर्थातच सर्वच सर्वांना कॅमेरा समोर दिसले आहे...पण मेघा रेशम च्या पाठीमागे कॅमेरा समोर तसे वैयक्तीक कॉमेंटस करत आहे.. खेरीज मी तसे बोलले नाही अशी सारवा सारव करते आहे हा मुद्दा 'काल' होता. आणि तेव्हडाच प्रश्ण तीला रेशम ने विचारला.. ज्याच्यावर मेघा कडे काहीच ऊत्तर नव्हते. असो. स्वताच्या स्वार्थासाठी मेघा किती खालच्या पातळीला जाऊ शकते व प्रसंगी आपल्या मित्रांना देखिल धोका देऊ शकते हे आता जगजाहीर आहे.. तेव्हा कुणिही कितिही केले तरी वस्तूस्थिती बदलणारी नाही. ईथे मेघा हेटर्स किंवा रेशम फॅन असा प्रश्ण येतच नाही.

[आता फक्त मेघा चे तसे बोलणे दाखवले आ ऊ चे वगैरे का नाही.. हा प्रश्ण बि बॉ ला विचारावा लागेल! पण त्याने मेघा जे वागली ते बरोबर ठरत नाही असे खुद्द तीचे स्पर्धक मित्रच म्हणतात. ]

बाकी चालू देत...

बिग बॉसमधील स्पर्धकांना खरे तर कळायला हवे की हा एक खेळ आहे. एका घरात विविध स्वभावाच्या व्यक्तींबरोबर काही महिने एकत्र राहताना आपला मूळ स्वभावावर कंट्रोल ठेवायला हवा. तोंडाला येईल ते बराळयाचे, वाटेल तसे वागायचे.... तेही एवढ्या कॅमेºयासमोर...
जिंकेल कोण हे महत्वाचे नाही. पण येथून बाहेर पडल्यावर काही दिवसातच घरात राहून एकमेकांचे मित्र झालेल्या या सदस्यांना बाहेर गेल्यावर पुन्हा त्या मित्राविषयी आपुलकी वाटेल का?
खेळ जिंकण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलायची गरज होती का?
‘जे पेरले ते आता उगवले’ आहे एवढी मात्र नक्की...

>>खेळ जिंकण्यासाठी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन बोलायची गरज होती का?
‘जे पेरले ते आता उगवले’ आहे एवढी मात्र नक्की...
well said..!
मी आधी म्हटले तसे: कुठल्या गोष्टि साठी काय किंमत मोजायची हे ज्याचे त्याने ठरवायचे. बि बॉ मधील प्रत्येक स्पर्धकाने ते केले आहे. व त्याची किंमत मोजली आहे... काहि अजूनही अदा करत आहेत. sai and pushkar has yet to face the harsh moment when they may realise what they will have to repay back either for loss or win! Sai in perticular has actually stepped even bit lower than Resham and Rajesh.. it is quite shameful and pityful...
मेघा ने देखिल केले आहे. पण मेघा ने मोजलेली किंमत ही बहुतेक तीला आयुष्यभर चुकती करावी लागेल असे दिसते...
ती विजयी झाली तर तीच्या पुढील' प्रवासा' करता शुभेच्छा. फक्त ती विजयी झाली तर काहिही किंमत मोजा, कुठल्याही पातळीला जा... असा चूकीचा संदेश दिला जातो. कारण, ऊगाच खेळ आहे खेळ म्हणून बघा अशा सोयीस्कर अरग्युमेंट मागे लपताना, हजाराने पोस्टी तर वैयक्तीक स्वरूपाच्या पडल्यात ईथे आणि ईतरही सर्वत्र! तेव्हा हा सगळाच प्रकार आता खेळ व्यतिरीक्त ईतर सर्व असा झाला आहे. आणि म्हणूनच त्याचा निकाल व निश्कर्ष चूकीच्या मार्गाने जात असेल तर त्याचे बळेच समर्थन करणे मला वैयक्तीक योग्य वाटत नाही म्हणून हा पोस्ट प्रपंच.
पुन्हा एकदा, या सर्वात स्मिता म्हणूनच सर्व दृष्टिने एक ऊत्तम स्पर्धक म्हणून निश्चीतच ऊठून दिसते. मला वाटते मराठी बि बॉ मधिल ती एकमेव स्पर्धक असेल जीने खूप काही चांगले कमावले आहे. तीच्या पुढील प्रवासा करीता विशेष शुभेच्छा! मी स्मिता चा फॅन आहे, आणि याचा मला अभिमान आहे.
असो. ही शेवटची पोस्ट.

योग, परत एकदा सगळ्या पोस्ट आवडल्या,.
मी या आठवड्यात एकही एपी बघितला नाही, सो त्यावर काही बोलणार नाही

पण इथल्या काही पोस्ट वाचून अंदाजा आला की भक्त भक्त म्हणजे काय☺️

असो,
कोणीही जिंको वा हारो, पण मेघा माणूस म्हणून निश्चितच खूप वाईट व्यक्ती आहे, असे माझे मत झालेय. पुष्कर , सई तिच्याशी जसे वागले ते योग्यच आहे.

शराचे खरेच मेघाच्या हातातले माकड झालेय, ती खूप ओव्हर ऍक्टिग करते असे मला वाटते, खरेतर, स्मिताच्या खालोखाल ती मला मनाने चांगली वाटते, फक्त मेघापासून जरा वेगळी होऊन एकटी खेळायला हवी.

बाकी, सईने रेशम अन राजेशबद्दल एक स्टेटमेंट केले होते आता तेच आता तिच्याबद्दल बोलावेसे वाटतेय, ज्या पद्धतीने ती पुष्कर च्या मागे लागलीये ते बघून

योग सर्व पोस्ट्स आवडल्या. मेघाचे कुठे चुकलेय तेच लोकांना कळत नाहिये. आणि खुद्द मेघाला सुद्धा. त्यामुळे जखम डोळ्याला आणि फुंकर कानाला असं झालं होतं काल. मेघा देत असलेलं स्पष्टीकरण अगदी लेचंपेचं होतं.
अस्ताद मेघाबद्दल बोलताना "हीला हिचा नवरा कसा काय झेलत असेल" हे बोलला होता. पण यात कुणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडालेत असं मला नाही वाटत. पर्सनल कमेंट असली तरिही त्याला एक लेव्हल असते जी अस्तादने (खालची) गाठली नाहिये. पण मेघाने डायरेक्ट रेशमच्या कॅरेक्टर वर अटॅक केला. जे मलाही नाही आवडलं.
आणि ज्या संदर्भाने मेघा रेशमबद्दल हे बोलत होती ते अत्यंत चूक होतं. सर्वांनी गँगप करून तिला टास्कवरून सुनवलं होतं तर तिने सुद्धा ती पेरीफेरी सोडायला नको होती. मग ते उत्तम भांडण झालं असतं. पण मेघाला तेव्हा कुणालाच उत्तर देता आलं नाही आणि तीने घाणेरड्या पर्सनल कमेंट्स केल्या.

रेशम सुद्धा हखाच्या चारित्र्याबद्दल बोलली होती, पण केव्हा, जेव्हा हखा ने हिला (रेशमला) सेम लाईन्स वर काहीतरी सुनवले होते तेव्हा. तिने लूकिंग लंडन टॉकिंग टोकियो केले नव्हते.

त्यामुळे मेघा मनातून खूपच उतरली आहे.

काल लिहिल्याप्रमाणे मेघाने एक्सप्लेनेशन देणे , शब्द फिरवणे, सॉरी म्हणणे हे पथेटिक वाटले. बोललीस रागाच्या भरात तर ओन कर ना ! येस मी बोलले, आहे हे असे आहे अशी भूमिका घेतली असती तर आवडले असते मला. शरा त्या मानाने सगळ्याच क्लिप्स मधे अगदी पॉजिटिव्ह दिसली. अर्थात हेही लक्षात घ्यायला हवे की बिबॉने त्यांना आपण जे बघायला हवेय तेच दाखवले.
आस्त्या परवापासूब डिप्रेस्ड वाटत आहे. काल तर झोपेत किंवा दारू पिऊन बोलत आहे की काय असे वाटले!
पुष्की -सई चे आता हेल्दी फ्लर्टिंग, बेस्ट फ्रेन्ड्स इ. च्या पुढे पाऊल पडले आहे असे दिसते. अर्थात राजेश- रेशम ने जे केले त्याच्या १०% पण नाही हे खरे आहे. यात सईपेक्षा पुष्कीचा जास्त राग येतो मला. त्याच्यासाठी ती तत्पुरत्या कंपॅनियनशिप ची गरज भागवणारी गुड लुकिंग गर्ल आहे. तो कितीही प्रॉमिसेस करत असला तरी बाहेर गेल्या गेल्या बायको मुलीला बघून त्याचे हे भूत उतरणार आणि सई चा हार्ट ब्रेक होणार आहे हे नक्की.
एकंदरीत असं वाटतंय की सोशल मिडियामुळे आणि शो च्या झालेल्या चर्चेमुळे इथून बाहेर पडल्यावर स्पर्धकांच्या आयुष्यावर त्यांना वाटले होते त्यापेक्षा खूप जास्त इम्पॅक्ट पडणार आहे आणि कदाचित बराच जास्त काळ.

मेघा धाडे सारख्यांना विजेते ठरवले तर काय संदेश जातो समाजात? की मेघा धाडे हाच समाजचा आरसा आहे? बि बॉ याचा विचार करतील अशी आशा करुयात. आपल्या समाजात त्यापेक्षा नक्कीच वरच्या पातळीचे/चांगल्या विचारसरणीचे लोक आहेत अशी खात्री आहे. >>
सिरियसली? Happy आदर्श नागरीक स्पर्धा कधीपासून झाली ही Lol
अस्ताद मेघाबद्दल बोलताना "हीला हिचा नवरा कसा काय झेलत असेल" हे बोलला होता. पण यात कुणाच्या चारित्र्यावर शिंतोडे उडालेत असं मला नाही वाटत. >>का नाही ? तिचे आणि तिच्या नवर्‍याचे संबंध या लोकांना माहित नसताना केलेली कम्नेट होती ती. उलट बिबॉ च्या घरात कॅमेर्‍यासमोर रेशम ने जे केलेय तेच मेघाने फक्त बोलून दाखवलेय ना? तिने शब्दशः एकाचा फोटो लावून दुसर्याच्या( दुसर्‍याबरोबर) बेड वर झोपणे हे कॅमेर्‍यासमोर केले आहे. मग कॅरेक्टरवर अटॅक कसा होतो हा? जे मेघा म्हटली ते केले नाही का रेशम ने? तिचे काय चुकले असेल तर ते बोललेले मान्य न करणे !!

>>ते सगळे बघणार. पण कोणी काही बोलायचे मात्र नाही, जो बोलेल तोच वाईट ....

जंगल में मोर नाचा किसी ने न देखा
हम जो थोड़ी सी पी के ज़रा झूमें हाय रे सबने देखा
अस झालय थोडस मेघाच!

बाकी इथेच नाही पण बाहेरही रेशम आस्तादचे एकेकाळचे समर्थक सोयिस्करपणे स्मिताचे समर्थक झालेले बघून मज्जा येतीय!

आज मिरच्यांच्या धुरीचे टास्कही हिरीरीने करताना दिसतीय मेघा.... चला उद्याच्या मेघाबॅशिंगची सोय झाली!

<काल तर झोपेत किंवा दारू पिऊन बोलत आहे की काय असे वाटले!>
होप. दारू पिऊन बसल्यासारखा दिसत होता खरा तो..
तो जाईल अशी शक्यता दिसतेय. जरा निरिक्षण केलेत तर असे आढळेल की ज्या सदस्याचा जायचा नंबर असतो त्याला डिप्रेस्ड, वैतागलेला, घर सोडायच्या तयारीत असलेला असा दाखवतात. सर्व वेळेस असेच झालेय.

या शो चा सगळ्यात जास्त फायदा स्मिताला होईल. कारण तिची इमेज तिने उंचावली आहे स्वतःच्या चांगल्या वागण्याने आणि तिची अनेक टॅलेंट्स दाखवून. 'पप्पी दे पारूला' सोडून बर्याच जणांना ती माहिती पण नव्हती. तिला चांगला प्लॅटफाॅर्म मिळालाय.
बाकी कुणाला काही पाॅसिटिव्ह मिळेल असं वाटत नाही. रेशम, मेघा, आस्तादला तर निगेटिव्ह रिस्पाॅन्सला सामोरं जावं लागेल. सईला पुष्करकडून हर्ट होण्याचे चान्सेस दिवसेंदिवस वाढतायत.पुष्करला काहीच फरक पडणार नाहीये. शराला पण.

बाकी काही असो, ज्या प्रयोजनासाठी एक आख्खा दिवस खर्चण्यात आला, त्या मेघाची पॉप्युलॅरीटी कमी करण्यात बिबॉ यशस्वी झालेले दिसत आहेत. Lol

का नाही ? तिचे आणि तिच्या नवर्‍याचे संबंध या लोकांना माहित नसताना केलेली कम्नेट होती ती. उलट बिबॉ च्या घरात कॅमेर्‍यासमोर रेशम ने जे केलेय तेच मेघाने फक्त बोलून दाखवलेय ना? तिने शब्दशः एकाचा फोटो लावून दुसर्याच्या( दुसर्‍याबरोबर) बेड वर झोपणे हे कॅमेर्‍यासमोर केले आहे. मग कॅरेक्टरवर अटॅक कसा होतो हा? जे मेघा म्हटली ते केले नाही का रेशम ने? तिचे काय चुकले असेल तर ते बोललेले मान्य न करणे !! >> पण मेघा जेव्हा हे बोलली तेव्हा हे पर्सनल बोलायची गरज नव्हती. टास्क बद्दल आणि सगळे तिच्या खोटं बोलण्याबद्दल गँग अप करून बोलले होते. त्यामुळे आरोप प्रत्यारोप हे समांतर हवे होते.
रेशम अस्ताद पुष्कर सई मेघाला गेम बद्दल बोलत होते आणि ती पर्सनल बोलत होती कुठेच ब्रिज नाही.

>>दारू पिऊन बसल्यासारखा दिसत होता खरा तो..

त्याला आधीच माहिती होत ना की मेघा त्याला बेवडा वगैरे म्हणणार आहे.... त्यामुळे रोलमध्ये शिरला असेल तो!
चांगले बेअरिंग घेतले होते त्याने Wink

अरे तिने कबूल केलेय ना की तो तिचा आउटबर्स्ट होता....
सगळ्यांवर प्रचंड चिडल्याने कंट्रोल सुटला होता तिचा.... भले भले गंडले असते अश्या सिच्युएशनमध्ये..... तिही हलली होती..... त्याबद्दल तिने सगळ्यांची माफीही मागून झाली आहे..... हेच बोललीस आणि हेच लपवलेस खुस्पट काढत बसलय पब्लीक..... आयते कोलीत दिलेय तिने लोकांच्या हातात!

दस्तुरखुद्द मांजरेकर सर म्हणून गेलेत "let bygones be bygones" (पण हे इतरांनी करायचे..... बिग बॉस मात्र तेच तेच परत परत उगाळत बसणार!)

मी या आठवड्यात एकही एपी बघितला नाही, पण इथल्या काही पोस्ट वाचून अंदाजा आला की भक्त भक्त म्हणजे काय☺️ >>> हे अत्ता पाहिले. अरे काय! किती म्हणजे किती ती आयरॉनिक आहे हे - एकही एपि न बघता अंदाज आला म्हणणे >> दुसर्‍यांना अंध भक्त म्हणणे त्याच लायनीत >> Rofl

अरे तिने कबूल केलेय ना की तो तिचा आउटबर्स्ट होता....
सगळ्यांवर प्रचंड चिडल्याने कंट्रोल सुटला होता तिचा.... भले भले गंडले असते अश्या सिच्युएशनमध्ये..... तिही हलली होती..... त्याबद्दल तिने सगळ्यांची माफीही मागून झाली आहे..... हेच बोललीस आणि हेच लपवलेस खुस्पट काढत बसलय पब्लीक..... आयते कोलीत दिलेय तिने लोकांच्या हातात! >>>
स्वरूप सर्व पटले. तिने गोष्टी फक्त मान्य करून (ओन करून) सोडून दिल्या असत्या तरी ओके होतं. ती पुढे त्याचं स्पष्टीकरण देत बसते ते मेन कोलित आहे पब्लिकच्या हातात.

या आठवड्यात एकही एपी बघितला नाही, पण इथल्या काही पोस्ट वाचून अंदाजा आला की भक्त भक्त म्हणजे काय☺️ >>> हे अत्ता पाहिले. अरे काय! किती म्हणजे किती ती आयरॉनिक आहे हे - एकही एपि न बघता अंदाज आला म्हणणे >> दुसर्‍यांना अंध भक्त म्हणणे त्याच लायनीत >> Rofl

>>>> बघा, परत एकदा प्रचिती दिली भक्तांनी

मी, स्पष्ट लिहिलेय की या आठवड्यात नाही बघितले, पण मेघाने जी मुक्ताफळे उधळली तो एपी बघितलंय अन त्यावर ममा तिला किती प्रेमाने ओरडले तेही लिहिले होते इथे

मेघा कितीही चुकीची वागली तरी तिचे समर्थन करणे, तीच किती बरोबर हे सांगणे, याला भक्तगिरी नाही म्हणणार तर काय Uhoh

बाकी, मी जे पाहिले नाही त्यावर काही लिहिलेही नाही

सो, खरेच चालू द्या तुमचे

दस्तुरखुद्द मांजरेकर सर म्हणून गेलेत "let bygones be bygones" (पण हे इतरांनी करायचे..... बिग बॉस मात्र तेच तेच परत परत उगाळत बसणार!>>> अगदी अगदी!
मेघा वर गॅन्ग अप होवुन येण्याचा आ रे ला अधिकार काय होता? पुश्किला बोलली ना ती , त्याने बघितल असत की
मेघाच जे तोन्ड सुटल होत त्याने फाय्दा बीबॉचाच झाला की प्र्चण्ड टिआर्पी
आस्त्ताद तिच्या ९ लाखाच्या खरेदिवरुन बोलला होता की
तुझ्या पैशाचि तु सिगारेट पितोस हेच आर्ग्रुमेन्ट तुला लाव की बाबा.
रारे वर आउ आणि सै ने पण खुप गॉसिपीग केलय , चिक्कार कॉमेन्ट केल्यात पण काल सगळ्या क्लिप्स मेघाच्याच दाखवल्या .
रेशम आस्ताद ने तर क्लिप न दाखविता पण मेघाचाच नाव घेतल असत त्याना फक्त पूशकिला टर्न करायच होत
सै तर मम म्हणूण पुश्कि बोले वहि सहि है म्हनुन तयार असते मेघाला बाद करायचे प्लॅन दोघान्चे बनतच होते बीबॉने थाली मे सजा के रिझन दिया है!
मेघाची चुक आहेच यात , गेम खेळताना कितिही राग आला तरी तोन्डावर ताबा हवाच, तिने चिडुन जो काय त्रागा केला त्यात कितिही तथ्य आणि सत्य असल तरी त्याने तिचा मुद्दा कुठेच क्लियर होत नाही.

>>तिने गोष्टी फक्त मान्य करून (ओन करून) सोडून दिल्या असत्या तरी ओके होतं. ती पुढे त्याचं स्पष्टीकरण देत बसते ते मेन कोलित आहे पब्लिकच्या हातात.

अगदीच मान्य दक्षिणा..... पण बाकीच्यांनी तरी तिच्या सॉरीनंतर कुठे सोडून दिले..... ते पण ताणतच बसले होते की!
एकुणात तिच्या सॉरीपेक्षा तिला खाली दाखवण्यात आणि टोचून बोलण्यातच त्यांना रस होता असे दिसले!
रेशम आत तिच्याकडून सॉरी बिरी म्हणून घेउन हग-बिग करुन बाहेर येउन कोचावर बसली तरी तिच्या आणि पुष्कीच्या भांडणात काड्या करतच होती की!
टोमणे तर किती मारत असतात आ आणि रे तिला!

खोक्याच्या टास्कमध्ये स्मिता जिंकावी. सैला चांगली सणसणीत कानाखाली बसेल.
मेघाचं चुकलं ह्यात दुमत नाहीच, पण त्याचा फायदा रेशमला व्हावा असा बिबॉचा खासा प्रयत्न चाललेला दिसतोय. मेघाला यापुढे तोंड शांत ठेवावंच लागणार आहे नाही तर काही खरं नाही.

कालचा एपिसोड फक्त मेघाला ब्लॅक लिस्टला टाकण्यासाठीच होता. त्यांनी तेवढंच दाखवलं. बाकी सगळे संतच बसलेत तिथे. आध्यात्मिक चर्चा काय नि कलात्मक चर्चा काय.

बाकी इथे येऊन कशाला सांगायला हवं सारखं ‘तुमचं चालू द्या‘ असं. तुम्ही नाही सांगितलंत्/लिहीलंत तरी ते चालणारच आहे.

Pages