बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आडो Lol
बाकी खोक्याच्या टास्क मधे फिजिकल फिटनेस आणि स्टॅमिना ची टेस्ट होणार असे दिसते. छळ सहन करणे यात पुष्की चिवट आहे, रादर त्याला छळ झालेला हवाच असतो की काय असे वाटते मला कधी कधी Happy फिजिकल फिटनेस मधे सई सर्वात फुस्की आहे. नंतर शर्मिष्ठा ? स्मिता आणि पुष्की मधे अवघड आहे ठरवणे कोण जास्त स्ट्राँग आहे ते.

>>सुशान्त भूषण जुई ची प्लॅनेट मराठी वरची मुलाखत , वाटलं नवह्तं या लोकांचं बोलणं मी कधी इतकं एंजॉय करेन, आवश्य बघा.
https://youtu.be/OTSSc-NrMk0

चांगलीच पोल खोल केली आहे सई, पुष्कर ची.. एकूणात सई पेक्षा मेघा परवडली असा सूर दिसतोय.. आणि पुष्कर ला कपडे बदलायला सई पण त्याच्या बरोबर बाथरूम मध्ये गेलेली म्हणे. बराच वेळ... Uhoh
ये दोनो तो सबके बाप निकले..!
[this explains quite few things between them over last few weeks..! ]

बाकी इथे येऊन कशाला सांगायला हवं सारखं ‘तुमचं चालू द्या‘ असं. तुम्ही नाही सांगितलंत्/लिहीलंत तरी ते चालणारच आहे.>>>> अहो हे आमच्यासारख्या भक्तांसाठी दिलेलं प्रोत्साहन असतं. आम्ही कुणाच्या बाजूने बोललो नाही तर ते विरोध कुणाला करतील नाही का... Lol

छळ सहन करणे यात पुष्की चिवट आहे, रादर त्याला छळ झालेला हवाच असतो की काय असे वाटते मला कधी कधी>>>> सहमत. आतापर्यंतच्या सगळ्याच टास्कमधे पुष्करने चिकाटी दाखवलेली आहे. फक्त टास्क चालू असताना तो ' मी किती tough आहे, मी हे करणारंच, यासाठीच आलोय ना' वगैरे बोलतो. मात्र टास्क संपला की रडायला मोकळा.

आणि पुष्कर ला कपडे बदलायला सई पण त्याच्या बरोबर बाथरूम मध्ये गेलेली म्हणे. बराच वेळ... Uhoh
ये दोनो तो सबके बाप निकले..!>>> अगदी..
जुईने विटा फेकून मारायच्या आधी पाणी भरलेले फेकून मारले होते म्हणे तिला.. आपल्याला दाखवलं नाही हे..
आता खरं खोटं बिग बॉसच जाणे

एकूणात सुशांत ला निदान जाणीव झाली होती असे वाटले, की प्रेक्षकांना जे दिसले त्यात तो नक्कीच निगेटिव्ह दिसला आहे.
बाकी सोशल मिडियावरचा अपोझिट पार्टीचा सगळाच सपोर्ट पीआर स्पॉन्सर्ड आहे, अ‍ॅक्चुअल पब्लिक चा काहीच हात नाही असे मानणे किंवा माझेही हजार सपोर्टर्स आहेत अन तेही मनात आणले तर सोशल मिडिया वर राडा घालू शकतात ( घाला की मग कोणी अडवलेय?) हे पुन्हा हास्यास्पद आणि अडाणी असण्याचे लक्षण आहे.

अगदी!
स्मिता किती लॉयल आहे! तिने शरालाच मत दिलं!

त्या ट्रायोला अजुनही गेम कळलाच नाही अस वाट्तय त्या मुलाखतित, जुईची बड्बड अजुनही तितकिच इरिटेटिन्ग वाटते
तिचा सुर मेघा-सई बिरुद्ध अजुनही तसाच आहे, तिघानी ठरवुन ३ नाव घेतली शेवटि म्हणे स्मिता विनर व्हायला पाहिजे, आत असताना सिनियर च्या ऑरात याच्या खिजगणतितही ही मुलगी नव्हती .

पुष्कि जिंकला ना ?
मला तर तो टॉप २ मधे दिसतोय ज्या प्रकारे शो चाल्लाय !

पुष्कर फायनलिस्ट, नो नोमिनेशन, captain Angry
बास की त्या मिठ्या... सै-पु चं चांगलच सुत जुळलय.. आता जस्मिनचा विचार नाही येत का पुष्कीच्या मनात..

शरा मुर्ख नं. १ आहे >>> काय केले शरा ने?
जिंकला का पुष्की. वाटलंच होतं. फिनालेत म्हणाजे टॉप ५ की ३ मधे?

फिनालेत म्हणाजे टॉप ५ की ३ मधे?>> माझाही असाच प्रश्न होता, पण टॉप ३ का टॉप २ ?
टॉप ५ मध्ये तो ऑलरेडी आहे ना

बॉक्स टास्क थांबवून वोटींग घेतलं म्हणे.
बिबॉ ला कंटाळा आला का ? Uhoh
जाउदे, जे अपेक्षित होतं तेच झालं Sad
आता वाटतय कि लफडेबाज पुष्किसई लाच टॉप २ करणार आणि मग जो कोणी ट्रॉफी दुसर्यासाठी त्याग करायला तउआर होईल तो विनर का ?

इथल्या सर्वांना एक प्रश्न, मेघा , स्मिता, रेशम आणि सई पैकी कोणती व्यक्ती तुमच्या घरात 100 दिवस राहिली तर तुम्हाला चालेल? विचार करून उत्तर द्या..

जुई जो सईचा पुष्किचे कपडे बदलण्याबाबत व्हिडिओ बद्दल बोलली तो व्हिडीओ वुट वर होता म्हणे, पुष्किला बिकिनी घालायला मदत केली तिने, दार लाऊन बाथरुम मधे, ट्विटर वर मागे शेअर करत होते लोक.

मेघा जे बोलली ते चुक होतं म्हणणार्‍यांना एक प्रश्न - तुम्हाला ३ महिने अशा १५ लोकांसोबत एका बंद घरात ठेवलंय जे सतत तुम्हाला पाण्यात पहातात किंवा फक्त फायदा घेतात किंवा तुम्हाला जे कराल त्यावरुन टोमणे मारत रहातात अशा लोकांबद्दल चिडुन तुम्ही कितपत सौम्य प्रतिक्रिया देउ शकता? त्यात बिग बॉस आणि ममा पण मेघा बॅशिंगवरच उतरलेले

आता इथे वरच उदाहरण पहा की - कोणी तरी कोणाला तरी भक्त म्हणल्याबद्दल हसलं तर किती तिळपापड होउन कुठल्या लेवल ला भांडणं आलीयेत?

नाही म्हणजे कितीही बेस्ट असली तरी मेघा ही मनुष्य प्राणी आहे हो, देव किंवा संत नाही

आणि एक लक्शात घ्या, घराबाहेर पडलेल्या कोणत्याही व्यक्तीला मेघाशी काहीच प्रॉब्लेम नाहीये, सई- पुश्कर बॅशिंग मात्र चालू आहे. मेघाला नॉमिनेट करताना रेशम सुद्धा ती स्ट्राँग प्लेअर आहे हे कारण देतात, यातच तिचा स्वभाव नेमका काय आहे ते समजुन येतं...

स्मिता नो डाऊट चांगली आहे तशी सई नो डाऊट वाईट आहे..

मेघाने सई ऐवजी स्मिताशी मैत्री करायला हवी होती पण फायद्यासाठी दोस्ती हा तिचा स्वभावच नाही ना

सर्वांना एक प्रश्न, मेघा , स्मिता, रेशम आणि सई पैकी कोणती व्यक्ती तुमच्या घरात 100 दिवस राहिली तर तुम्हाला चालेल? विचार करून उत्तर द्या..
<
कोई शक ?
मेघा अर्थात, बकबक चालते मला , डंब लोक नाही !
गप्पा मारायला कन्टेन्ट सर्वात जास्तं तिच्याचकडे असणार आणि याशिवाय किचन तिच्या हवाली करून उंडारायला मी मोकळी Wink

इथल्या सर्वांना एक प्रश्न, मेघा , स्मिता, रेशम आणि सई पैकी कोणती व्यक्ती तुमच्या घरात 100 दिवस राहिली तर तुम्हाला चालेल? विचार करून उत्तर द्या..

>>>
मला मेघा आवडेल कारण ती फार छान मैत्रिण आहे शिवाय ती बडबड करते , मला बडबड लागते..
म्हणजे स्मिता कितीही मस्त असली तरी आमचे सुर जुळतील असं वाटत नाही.. मला ती आवडते पण तिच्यासोबत राहु नाही शकत मी...

रेशम सोबत मी बोअर होईन

सई स्वार्थी आहे त्यामुळे मला ती आवडणाच नाही शिवाय दर सोमवारी तिचं आजारपण कोण काढत बसणार?

जुई जो सईचा पुष्किचे कपडे बदलण्याबाबत व्हिडिओ बद्दल बोलली तो व्हिडीओ वुट वर होता म्हणे, पुष्किला बिकिनी घालायला मदत केली तिने, दार लाऊन बाथरुम मधे, ट्विटर वर मागे शेअर करत होते लोक.>> तो विडिओ मी ट्विटरवर पाहिलेला. पुष्करने बिकिनी घातलेली तेव्हाचा आहे .

शरा मेघासारखीच आणि मेघाइतकीच बावळट आहे. माझे मित्र-मैत्रिणी किती का शिव्या घालेनात का मला, वेळ आल्यास सेव्ह नको करूदेत, पन्नास तिखट शब्द ऐकवूदेत, पण मी त्यांना मदत करणारंच. त्यांचंच घोडं पुढे जाऊदे.
शराने हे फक्त आता तिची मैत्री प्रुव्ह करण्यासाठी केलं आहे, ज्याची पुष्करला काही पडलेली नाहीये.

पुष्कर खरोखरच लकी आहे.
प्रत्येक वेळी त्याची एकट्याची अ‍ॅबिलिटी नसताना मैत्रीणींनी तारून नेलय, मेघामुळे २ दा कॅप्टन आणि आता शरामुळे फिनाले, मज्जा!

Pages