बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मेघाला या घरात जितकं टार्गेट केलं जातं तितकं ईतर कुणालाच केलं जात नाही. रेशमने मेघाच्या बोलण्याचा जो विपर्यास केला तसं मेघा बोलली नव्हती मग तिने स्पष्टीकरण द्यायलाच पाहिजे, तिच्या तोंडी काहीही घातलं तर ती का कबूल करेल. पुष्कर वाईट अॅक्टर आहे हे ती त्याच्या अॅक्टींग करिअरविषयी बोलत नव्हती. ते कळण्याईतकी पुष्करला समज नाही त्याला ती काय करणार. स्मिताविषयी ती बोलली हे तिने स्मिताला त्याचवेळी सांगून तिची माफी मागितली होती, परत परत काय तेच तेच. आस्तादला ती बोलली हे तिने कबूल करायला हवे होते. सईतर उगाच काहीतरी म्हणे तू पुष्करविषयी का बोलली, सई आणि पु मेघाविषयी किती पाठीमागे बोलतात त्याचा मेघाने उच्चारही केला नाही. सई फारच खुनशी आहे. रेशमला काही फरक पडत नाही तर कशाला आली होती मेघाकडे तक्रार घेऊन. सईने स्मिताचे नाव घेतले असते तर टाय झाला असता. सई स्मिताला कितीवेळा डंब बोलली आहे हे सई सोईस्करपणे विसरली आणि बिबाॅतर काय...

सईने स्मिताचे नाव घेतलं असते तर टाय नसता झाला, चंपा. आ रे स्मिता आणि पुष्करने मेघाला वोट दिलं होतं. मेघाच बाहेर पडली असती पण सईने मेघाची मैत्री स्मरली हे तरी झालं असते.

मेघाने स्मिताला एवढं स्पष्ट सांगितलं नसणार, वरवर सांगितलं असणार. तिला आत्ता समजलं असणार आणि मेघाने तिचे नाव घेतलं मग तिने क्लीप बघून घेतलं. मला स्मिताने सईचं नाव घेतलं असते तर नक्कीच जास्त आवडलं असते. आ दादा, रे ताई चा आणि क्लिपचा प्रभाव.

स्मिताला क्लिप पण काय दाखवली body shaming दाखवलीच पण आज दाखवलं नाही पण प्रोमोत होतं की आ रे म्हणतायेत की ही स्मिता मेघाच्या बाजूने झालीय का वगैरे. ती trap मध्ये आली, grp मधल्याना उगाच आपला संशय येतोय, ह्या दोन्ही गोष्टींमुळे तिने मेघाचं नाव घेतलं.

मेघाच्या मुलीची क्लिप पुष्करला दाखवली हे खुपच चुकलंय बिग बॉसचे. तिच्या बाजुने बोलायलाही कुणी नाही बाहेर Sad मेघाच्या क्लिप्स कमी पडल्या का कि तिच्या मुलीलाही यात खेचावे. अतिशय निंदनीय बिग बॉस आणि मांजरेकर.

मेघाचा नवरा कसा तिला झेलत असेल? सईशी लग्न झाले तर कसा हातुन खुन होईल, शर्मिष्ठा कशी बावळट आहे , पुष्कर कसा मुलींच्या मागे लपतो हे सर्व बोललेले आ , रे मात्र सेफ.

सईने मेघाविषयी ज्या घरभर काड्या लावल्या त्या नाही दाखवल्या. रेशम मारे म्हणते मला काहीच फरक पडत नाही मग कशाला गेली स्पष्टीकरण द्यायला. ते तिच्या बॉयफ्रेंडसाठी होते हे कळतंच. स्वतः किती काँट्रॅडीक्ट करते स्वतःचेच. नॉमिनेशनचा फरक पडत नाही म्हणत, तोंड पाडून तर बसते की. आस्त्या बाळ पण रडत होते तिच्या कुशीत.

मेघाशिवाय बिग बॉसचा एकही एपिसोड होत नाही. तिच्यापुळे जे कंटेट मिळालंय त्याला तोड नाही. तिलाच जिंकवणे भाग आहे बिग बॉसला. टिकीट टू फिनाले केव्हाचेच निळालेय तिला. नव्हे, केव्हाचेच कमावले आहे तिने.

बिग बॉस बघणं केंव्हाच थांबवलंय.... मेघा फायनल २ मधे असेल तरच पुढचे २ भाग पहाणार (नंतर ) आणि फायनल पहाणार

मेघाला खोटं बोलते , बॅक बिचिंग करते म्ह्नणारे प्रत्यक्षात अजिबातच खोटं बोलत आणि बॅक बिचिंग करत नाहीत की काय? का फक्त तिला टिव्हीवर दाखवतायेत म्हणुन तिला हे करण्याचा आधिकार नाही?

बाकी अस्ताद लोकांना फार घालून पाडुन बोलतो आणि रेशम ने राजेश प्रकरणात जे केलंय ते चिप होतं... त्या दोघांनाही बिग बॉस मधे काही इंटरेस्ट नाही, ज्या साठी पैसे घेता ते तरी नीट करा...

सुशान्त भूषण जुई ची प्लॅनेट मराठी वरची मुलाखत , वाटलं नवह्तं या लोकांचं बोलणं मी कधी इतकं एंजॉय करेन, आवश्य बघा.
https://youtu.be/OTSSc-NrMk0
भूषण म्हणतो सई त्याच्या चादरीत घुसून जबरदस्ती त्याला किस करत होती, सुशान्त म्हणतो हे उलट झालं अस्स्तं तर ??? मी अगदी हेच लिहिलं होतं (सई आवडायची त्या काळात तरीही ).
टु द पॉइंट बोललाय सुशान्त चक्क, पुष्कर आणि त्याचं सो कॉल्ड स्त्री दाक्षिण्य, त्यानी स्मिता विषयी केलेल्या चीप कॉमेंट्स, डिक्टेटरशिप टास्कचा दुटप्पीपणा, सईच्या व्हॉयलेन्ट गोष्टी आणि ड्रामा या बद्दल सुशान्तची मतं आउची मिमिक्री फस्त ऐकण्यासारखी
आहेत.
वाटलं नाही सुशान्त इतका एंटरटेनिंग असे आणि या लोकांशी कधी माझे विचार जुळतील Proud
बाकी या तिघांना अजुनही गेम कळलाच नाही हे सुध्दा तितकच सत्य, काही बडबड जाम विनोदी आहे या तिघांची, ते ऐकूनही फार करमणूक झाली.
काय तर म्हणे आम्ही आध्यात्मिक वेळ घालवायचो तो नाही दाखवला, ट्रॉफी साठी आम्ही कधी या लोकांसारखे उत्सुक नव्हतोच , आम्ही जिंकायची काहीच प्लॅनिंग नाही केली, आम्ही सिनियर खूप काम असणारी माणसं, आम्हाला पीआर ची गरज नाही, आम्ही कधी बिग बॉस पाहिलच नाही या आधी, बाकड्यावर आमच्या आमच्या कॅज्युअल् गप्पा मारायचो पण ते दाखवलच नाही म्हणे Proud
अरे येड्यांनो आध्यात्मिक गप्पा, जिंकण्याची जिद्द नसणे, गेम बद्दल सिरियस नसणे, भलत्याच विषयावर बाहेरच्या कंटाळवाण्या गप्पा कशाला दाखवेल बिग बॉस Rofl
बाकी जुईला अजुनही हेट्रेड फेस करायला लागते, थ्रेटनिंग मेसेजेस येतात , ईंडस्ट्रीतले लोक काम देणार नाहीत चिन्ता वाटते, डिप्रेशन येते आणि बाहेर जायची भीती वाटतेय हा प्रकार क्रीपी आहे.
आपला आवडता स्पर्धक नाही जिंकला तर पब्लिक काही पण करतय, इतकी हेट्रेड खुद्द बिबॉ ने पसरवली आहे ज्याचा काँटेस्टन्ट्सना त्रास होणार आहे, शो संपला कि भांडणं संपली होणार नाहीये, उलट इंडस्ट्री लहान असल्याने आपापसात कोल्ड वॉर / डर्टी बिझनेस सुरु रहाणार !

मेघाच्या मुलीची क्लिप पुष्करला दाखवली हे खुपच चुकलंय बिग बॉसचे. >>> अगदी अगदी.

सईने मेघाविषयी ज्या घरभर काड्या लावल्या त्या नाही दाखवल्या. >>> खरं आहे.

माझ्यामते सईने व्यवस्थित मेघाचा फायदा घेतला आणि आता पार उलटली. तिच्याबद्दल काही दाखवलं नाही विशेष तरीही पुष्करला बोलली म्हणून मेघाला फिनाले च्या task मधून बाहेर काढलं तिने आपल्यातर्फेही.

दीपांजली, पाहिला विडिओ. चक्क सुशांत सांगतोय की मांजरेकरांना ४/५ पॉइंट्स काढुन मिळतात की आज याच्यावर बोला, त्याच्यावर बोला. जुईबद्दल हे बोला, सईबद्दल हे बोला वगैरे. अजब आहे!

पण मग चॅनेल च्या मनात काय आहे. एकाच्या पाठीमागे तर एकाच्याच काही दिवस लागायचं का. मागे स्मिताला फार बोलायचे, परवा तिचं कौतुक केलं आणि मेघाला जे target करतायेत ते continues. Trp साठी असं इतकं का. ती चुकली त्याची शिक्षा जरा अति दिली bb ने. मेघा पण सगळं होऊन फार सई सई करत होती.

अजूनही माझ्या मनात येतंय पण हिंदी bb चा अभ्यास करून आलेल्या मेघाकडून इतक्या प्रमाणात कसं झालं, हे उलटूही शकतं हे तिला नक्कीच माहिती असणार.

मला तर सई fev आहे bb ची असं वाटायला लागलंय काही दिवस, तिला वरवर बोलतात.

इन्टरेस्टिंग आहे ती क्लिप. त्या तिघांचा सै आणि पुष्कीवर राग दिसतोय जास्त Happy तरी नवल वाटते, जुईला सईच्या लाँग हग्ज बद्दल आक्षेप वाटतो तर रेशम -राजेश बद्दल कसे काय अज्जिबात काही बोलली नाही ?!!
मला सुशांत पुष्कीबद्दल बोलताना ऐकून फार हसु आले. विशेषतः पुष्कीने स्मिता कडून मसाज करून घेतला. तर म्हणे याने तर पार शर्ट काढून मसाज करून घेतला. नंदकिशोर ने निदान कपडे तरी नव्हते काढले, नुस्ता टास्क म्हणुन सांगितले शरा ला मसाज करायला. Lol
आऊची नक्कल पण फनी आहे.

किती predictable झाला कालचा टास्क. तिला बाहेर काढायला एकच मार्ग आहे , हाऊसमेट्स चं वोटिंग घेऊन वोट आऊट करणे. ती राहिलीच फिनाले पर्यंत तर तेच होणार. पुष्कर सगळ्या दगडांवर हात ठेवायला जातोय. तिला वोट आऊट पण केलं, नंतर चर्चा पण करू म्हणे. तसही त्याला आणि सईला तिला बाहेर काढायला कारणच लागणार होतं. आस्ताद दुसऱ्यांकडून सॉरीची अपेक्षा ठेवतो , स्वतः कधी म्हणालाय कि नाही त्यालाच माहित. रेशम आत जाऊन सॉरी ऐकून आली , बाहेर तेच सुरु केलं. आख्या एपिसोडच्या केंद्रस्थानी मेघा होती.
बरं ते घाणेरडा ऍक्टर म्हणाली ते मी ऐकलं नाही, क्लिप अर्धवट होती ती.
पुष्कर-सई , राजेश-रेशम मार्गावर आहेत असं वाटायला लागलंय . ते बघून खरंच कंटाळा येतो.पुष्कर तर डोक्यात जातो. किती स्वार्थी असावं माणसाने.
मला असं वाटायला लागलाय TRP साठी बिग बॉसने जरा जास्तच केलंय . आता कुठून काय सावरू असं झालंय त्यांना . त्या नादात it all has become too ugly. पुढचा सीजन नसावाच.

ती मुलाखत पहिली, काही मुद्दे पटले, काही नाही. पण आम्ही सिनिअर्सचा माज ,जो बीबॉच्या घरात दिसलेला, तो खरंच आहे. पुष्कर नेहमीच मुखवट्यात वाटलाय.
आणि एडिटिंगमुळे एवढी बेअब्रू होणार असेल , तर कोणी येणार नाही पुढच्या सिजनला , कारण मराठी इंडस्ट्री छोटी आहे. हे मी मागे पण लिहिल्यासारखं वाटतंय.

मला असं वाटायला लागलाय TRP साठी बिग बॉसने जरा जास्तच केलंय . आता कुठून काय सावरू असं झालंय त्यांना . त्या नादात it all has become too ugly. पुढचा सीजन नसावाच. >>> अगदी अगदी.

जुईला अजुनही हेट्रेड फेस करायला लागते, थ्रेटनिंग मेसेजेस येतात , ईंडस्ट्रीतले लोक काम देणार नाहीत चिन्ता वाटते, डिप्रेशन येते आणि बाहेर जायची भीती वाटतेय हा प्रकार क्रीपी आहे.>> यात अजून एक म्हणजे तिला वाटतेय की खरच लोक चपलेने मारतील की काय..
यामुळेच इथे जो काय पर्सनल कंमेन्ट चा धुमाकुळ घातलेलला आहे काहीजणांनी तो डोक्यात जातो..

अरे काय, कित्ती ऑबव्हियस करतायेत शो, तिकिट टु फिनाले मेघाला इतक्या सहज द्यायच नाही , ओके फेअर इनफ पण पुन्हा तेच मागच्या आठवड्यातलं उगाळतायेत ज्याच्यावर मेघाने प्रत्येकाची वन ऑन वन माफी मागून झाली आहे.
मेघाला टॉर्चर करा टीआरपी घ्या हे इतकं बायस्ड आणि ऑबव्हियस प्रकारे करत आहेत याचं आश्चर्य वाटतय.
बाकी लोकांनी सुध्दा अति प्रचंड गॉसिप केलय शो मधे , शिव्या दिल्यायेत ‘हिच्या आइचा, स्क्रु हर‘, मेघाचा नवरा इ. अनेक मेघाविषयी पर्सनल लेव्हलला बोलून झालय , आस्तादने सई आउटडेटेड कपडे घालते, निगेटीव्हिटीने पिंपल्स आलेत तिला वगैरे पर्सनल रिमार्क्स मारले होते , सईने रेशमच्या ऑर्गॅझम विषयी बडबड केली होती, पण हे टास्क मेघाला आउट करायला चक्क डिझाइन केलं, तेवढ्याच क्लिप्स दाखवल्या आणि पुन्हा आता वीकेन्डचा डाव तसाच मांडणार ममा !
इतर सदस्यांनी मांडलाच होता डाव ऑलमोस्ट , शर्मिष्ठा या स्टेजला सर्वात मॅच्युअर्ड वाटली.
पुष्कर सईने जो डाव फिरवला तो अपेक्षितच होता, पुष्कि सर्वात मोठा ऑपॉर्च्युनिस्ट आहेच , सईने मम म्हंटलं कारण तशीही मेघा नकोच होती त्यांना, पण आता बॉक्स वालं पुढच फिजिकल अ‍ॅक्टिव्हिटी टास्क आलय, जिथे त्यांना मेघापेक्षा स्मिता टफ जाणार आहे काँपिटीटर म्हणून.
बर जर इतकं वाइट वाटलय पुष्करला तरी पुन्हा तेच कि मेघा आपण चर्चा करु, का तर उद्या तिने कमी टॉर्चर करायला हवं म्हणून !
जाउद्या, बॉक्स टास्क मधे स्मिता किंवा शरा जिंकावं अशी फार इच्छा पण बहुदा पुष्किच घेणार तिकिट Sad

शरा छा गई यार! मस्त सपोर्ट केला मेघाला काल. मेघा तिला नॉमिनेट करणार असे म्हणालेली क्लिप दाखवली तरी.
पु सै, सन्धिसाधु आहेत हे मेघाला एव्हाना कळले असेलच.

पु सै, सन्धिसाधु आहेत हे मेघाला एव्हाना कळले असेलच >>> कितीदा कळलं तरी तिचं सई सई सुरुच रहाणार.

शराला पुष्कर वाचवायचं ठरवत होता तेव्हा मेघाने , तिचा विचार करु नकोस हे सांगितलं होतं. त्याने सईला वाचवलं अर्थात तेव्हा एलिमिनेशन नव्हतं.

मेघाने शरापेक्षा नेहेमी सईला साथ दिली, ही सईच कायम पुष्की पुष्की करत होती, करत रहाते, करत रहाणार. तिने मेघाला वोट बाहेर काढायला दिलं. शराने मात्र साथ दिली आहे मेघाला.

सुशांत-जुई च्या विडीओत जुई म्हणतीये मेघा-सै चे पीआर फालतू आहेत... मग स्मिताच्या पीआरच काय? त्यांच्याच सांगण्यावरुन सगळे अ‍ॅक्टर्स वोट अपील करतायत ना स्मितासाठी?
खुद्द जुई=सु-भु सुद्धा.. नाहीतर त्यांच्या रे ताईसाठी का नाही करत आहेत अपील?
त्याच्या आधी सुशांत म्हणाला आमच्या मनात मेघाबद्दल काही राग नाही..

नक्की यांना मेघाच्या विरोधात बोलायचय की तिला चांगलं म्हणायचय?
सै- पु बद्दल जामच राग दिसतोय सु च्या मनात.

उद्या एकाला टिकीट टू फिनाले मिळेल जो बाॅक्सचा टास्क जिंकेल. पण मग बाकीचे सगळेच नाॅमिनेट होणार ना? अजून 7 लोक शिल्लक आहेत. त्यापैकी 2 गेले पाहिजेत ना बाहेर फिनालेच्या आधी?

Pages