बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>या सीझनमध्ये सर्वात मोठं सर्प्राइज म्हणजे ममांच होते
हो... पूनम!
परवा घरात आलेले तेंव्हा जाणवले ते.... अगदीच प्रेमळ काका वाटले!
मुळात ते तसेच असावेत बहुतेक.... पण त्यांची एकुणात इमेज तरी तशी अजिबातच नाहीये!

पुढच्या आठवड्यात बहुतेक शरा जाईल बाहेर
मग फिनालेला आस्ताद आणि स्मिता पडतील बाहेर
मेघा सई आणि पुष्कर टॉप ३ मध्ये असतील असा सध्यातरी अंदाज आहे!

पुष्कर शेवटच्या तिघांत असेल असे नाही वाटत. नक्कीच मॉलमधून बाहेर पडेल तो. सै, मेघा, स्मिता असतील फायनलिस्ट्स असे चित्र दिसते.

ममानी मेघाला तु या शोमधे जान आणलिस म्हटल तेव्हा सर्वाचेच चेहरे पडले होते, आज सगळेच मेकप मधे टोन डाउन वाटले , आज अक्सेसरिज एक्षेन्ज होवुन रिपिट झालेल्या दिसल्या.
मेघा काहिवेळा चुकली असेल पण ९० दिवसात तिची एकही डल मोमेन्ट दिसली नाही, टास्क खेळून , किचन साभाळुन , अखण्द बड्बड करुन सदा उत्साहात दिसली कायम.

Final 5

डेलिया,
कॉस्मॅटीक डेंटिस्ट्री ट्रिटम्नेट आसेल, म्हणजे व्हिनिअर्स वगैरे .
गुगल इमेज सर्च करून बघा veneers.

काल ते लुटुपुटूचं टास्क कशाला होतं? "उजळदार " बल्ब्स ? असा शब्द आहे? लक्झरी बजेट म्हणावे तर या लोकांन सतत ते खाअण्यचे पदार्थ येत असतात बाहेरून. ते चिंग्ज सीक्रेट चे प्रॉडक्ट नेहमी खाताना दिसतात, काल पुन्हा त्या बरण्या. बघून पण कंटाळा आला.
बाकी एपिसोड फार कंटाळवाणा झाला. कोणालाच कोणाबद्दल तक्रारी नाहीत, कुणीच कोणाला पाण्यात पहात नाही. सगळे गुण्यागोविंदाने बसून एकमेकाची तारीफ करताना बघताना चीटेड फीलिंग आले मला तर बाई. आता शेवटचा आठवडा कशाला बघायचे यांचे कार्यक्रम!
आणि या लोकांना असं का वाटतं की पुष्की सई च्या रोजच्या १२३ थॅन्क्यू आय लव यू मधे लोकांना इन्टरेस्ट आहे?! Angry
त्यांची प्रेमाने थबथबलेली तोंडं स्क्रीन वर आली की मी फा. फॉ. करतेय आता.
स्मिता सोडून सगळयांचे कपडे संपले का? हल्ली वीकेन्ड चा डाव मधे मेघा अन सई चे झटॅक कपडे जाऊन अजागळ साड्या असतात. सई जुन्या मराठी सिनेमाची नायिका वाटत होती काल. चाफा बोलेना गाऊन काल सरप्राइजच दिले मात्र तिने!!

हो हो..... मी पण जाम हसलो त्या "उजळदार" शब्दावर.... मायबोलीवरचा धागा आठवला!
गम्मत म्हणजे आस्तादच्या तोंडी होता तो.... तो तरी काय करेल बिचारा!.... दिलय ते वाचून दाखवायच होत त्याला!
ते टास्क तरी कसले फुसके असतात!
मेघा आणि सईची गाणी बरी झाली.... शराची गाण्याची निवड चुकली काल
स्मिता फुल्ल बाहेर जायची तयारीच करुन बसलीय
मेघा आणि स्मिता एकमेकीना आवडतात हे काल परत एकदा जाणवले!

मै तुझ्या सगळ्या पोस्टला +++++++

उजळदार बल्ब म्हटल्यावर माझे डोळे पण Uhoh झाले. आणि आता एकच आठवडा राहिलाय तर इतकं खाणं तेही इतके सॉस कशाला पाठवलेले??? तिथली लोकं चिंग्जची प्रॉडक्ट खातायत हे कळलंय आता लोकांना, किती ती जाहिरात करत बसायची.

कालचा गोग्गोड एपिसोड अगदीच अजीर्ण झाला.

कितीही विंग्लिश बोललं, हाय फाय वागलं तरी सैने शेवटी मराठीच गाणं निवडलं. आणि म्हटलं पण उत्तम. शब्द आजिबात चुकले नाहीत. मस्त गायलं तिने.
स्मोकिंगमुळे रेशमचा आवाज किती फाटलाय. Sad आस्तादच्यासुद्धा आवाजावर वाईट परिणाम होतोय असे जाणवतेय.

>>कितीही विंग्लिश बोललं, हाय फाय वागलं तरी सैने शेवटी मराठीच गाणं निवडलं.<<
सईचं इंग्लिश हाय-फाय? काल स्मिताची स्तुती करताना ती चक्क म्हणाली - शी इज टू गुड टु बी ट्रु... Lol

सई किती दात विचकत आणि सतत लाडं लाडं बोलते. नारायणच्या गोष्टीतली कपर्दिका मोठी झाल्यासारखी वाटते.

>>कितीही विंग्लिश बोललं, हाय फाय वागलं तरी सैने शेवटी मराठीच गाणं निवडलं.>>ंमराठिच गाण गायच ही अट होती.

Ohh!
Btw, Resham is looking so composed and calm today. No 'Khunashipana' today.

Resham

काल सई पुष्कि किती मूर्खासारखे लाडंलाडं बोलत होते, म्हणे आस्ताद बरोबरच बोलला ( सई विदाउट पुष्कि कंप्लिट खचली असती )तू नसतास्/नसतीस तर मी इथे पोचलोच नसतो बोलून स्वतःचा वीकनेस दाखवत होते.
हेच मेघा म्हंटली असती तर नॅशनल लेव्हल इश्यु बनवला असता Happy
मला खरच स्मिता टॉप ३ मधे पहायला आवडेल, सई नाही.

आजच्या भागातली हाइट-
महेश- आज तुझा प्रवास संपला... रेशम साॅरी
रेशम- इट्स ओके महेश Uhoh
... आणि इतके दिवस जाणाऱयाला न मिळालेली पावर रेशमला दिली- अपेक्शेप्रमाणे आस्ताद ला वाचवलं !

रेशमला ममां बोलता बोलता बोलून गेले ना, की कट टू कट कॉम्पिटीशन होती. म्हणजे अस्तादलाही जवळ जवळ तितकेच वोट होते. थोडेफार हिला कमी पडले म्हणून हिला जावं लागलं. स्मिताची बाहेर पॉप्युलेरिटी यांना आता कळली असावी. .
म्हणून रेशमने अस्ताद ला सेफ केलं.

अचानक पॉवर देतात एलिमिनेटेड कॉटेस्ट्न्ट ला, तेही या स्टेजला !
रेशमने अस्तादला वाचवणे अपेक्षित असणार, तो पब्लैकच्या वोट्सने टॉप ५ मधे जसील कि नाही याचीही शंका असणार न्हणून ही पॉवर !
Btw कॉलर ऑफ द वीक मधे गेले २ दिवस एका कॉलरची चर्चा चालु आहे, स्वप्निल काळे, ज्याने कलर्सशी झालेला त्याचा फोन लॉग शेअर केला आणि टेलिक्स्स्ट होतोय कि नाही शंका व्यक्त केली होती.
बेसिकली मेघाला खूप एन्करेज करणारा आणि आस्ताद रेशमला काहीएतरी क्रिटिसाइझ करणारा कॉल होता जो नाहीच झाला टेलिकास्ट !

Pages