बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

शरा खरचं बावळट आहे म्हणे सेम मते झाली तर पुन्हा दुसरा टास्क होईल. अरे होऊदे की उलट तुला कदाचित फायदाही होऊ शकतो त्यात. आणि सारखं काय स्मिता एलिमिनेट झाली तर फिनाले टिकीट वाया जाईल. अरे वाया कसं जाणार टिकीट, जर स्मिता गेलीच असती तर बिबॉने पुन्हा टास्क घेतला असता.आणि तेव्हा पुसैशरा तिघेच असते टि टू फि च्या स्पर्धेत.

स्मि मे शरा trio बेश्टच....पण टास्कवेळी मात्र ते ग्रुप मध्ये शिरतात.किचनमधील कामे-गार्डनमधील गप्पा भारीच...voot वर तिघींचे unseen video मस्त आहेत.

आज स्मितासाठी खरोखर वाईट वाटल..... शरा इमोशनल फुल ठरली..... जिच्यामुळे पुष्की निवडून आला त्या शराला साधे thanks सुद्धा म्हणताना दिसला नाही तो!
मागच्या टास्कमध्ये ग्रूपशी गद्दारी केल्याचा जो ठपका मेघावर लावण्यात आला ते कुठेतरी आज हा डिसीजन घेताना मनात असणार तिच्या.... पण आजची सिच्युएशन पूर्ण वेगळी होती..... सई पुष्की एकमेकांना मते देणार हे लख्ख दिसत असताना त्यांना शराला बोलायचा अधिकार राहीला नसता!
पुष्की आधीच लोकांच्या नजरेतून उतरलेला आहे..... त्यात असा shortcut (बिग बॉसने दिलेल्याच का असेना!) ने फिनालेला पोचल्याचा त्याच्या मतांवर परिणाम होणार!

जे फिनाले वीकमध्ये नॉमिनेशनमधून वाचून फिनालेला पोचतील ते पुष्कीपेक्षा जास्त कॉंफिडंट असतील!

स्मिता नेहेमीच शब्द पाळताना दिसलीय. तशी आजही. शराला दिलं तिने मत.

परत माझं तेच वाक्य. मला स्मिताची खरंचं काळजी वाटतेय. काय असेल bb च्या मनात तिला पुढे नेण्याबद्दल काय माहीती. channel चा लाडका आ, म मां चा soft कॉर्नर रे ला. प्रेक्षकांची लाडकी स्मिता. काय होणार काय माहिती.

पुष्कर लकी नेहेमीप्रमाणे, बैलगाडीतून उतरून सेफ झाला. आ, रे, मेघा तिघांना बाहेर काढण्यात हातभार.

आता bb ने अशी योजना करावी की तो सैड्याला दगा देईल. सेफ करायला देऊ नये.

श रा एवढी केविलवाणी होऊन स पु ला का सांगत होती, माझं नाव घ्या. ते थोडीच घेणार होते. जिने घेतलं तिची किंमत नाही श रा ला.

म मां आणि मे मां आलेले तेव्हा कितीतरी वेळा मेघा शर्मिष्ठा आम्ही दोघी किचनमध्ये काम करतो सांगत होत्या मे मां ला. बिचारी स्मिता स्वतः काही नाही बोलली किंवा दोघींपैकी कोणीच तिचं नाव नाही घेतलं. ती कित्ती राबत असते किचनमध्ये. स्मिताला सवय नाहीच पुढे पुढे करणे, स्वस्तुती करणे. पण tv वर दाखवतात त्यात दिसतं की मे मां ना की ती पण काम करते.

स्मिता खरंच ग्रेट आहे. God bless her.

स्मिता किचनमधे नाही दिसत अ‍ॅक्चुअली मला, ऑमलेट करताना आणि एकदा चिकन एपिसोड मधे दाखवली होती.
बाकी मेघा आणि शरा च दिसतात.
आजचा एपिसोड पाहिला नाही पण स्मिताला मिळायला हवं होतं तिकिट!
आता मलाही स्मिता जाणार असं वाटायला लागलय रविवारी , तिच्या पीआर ची कॉपी करून आता अस्ताद रेशम पब्लिकलाही सेलिब्रिटी शाउटाउट मिळायला लागलेत अचानक.
त्यानंतर मिडवीक एलिमिनेशन असेल तर शरा किंवा मेघा जातील अनफॉरच्युनेट्ली!

मला दिसते स्मिता किचन मध्ये. अगदी gas जवळ उभी राहून करत नसली तरी काहीना काही चीर वगैरे करत असते. चिंग मध्ये फ्राईड राईस परतताना दिसली.

स्मिता राहायला हवी, नाहीतर जाम वाईट वाटेल मला. सगळीकडे active प्लस कुचाळक्या करत असतात सर्वजण तिथे कमीतकमी सहभाग. चांगलं वागून तिला फळ चांगलं द्यायला हवं bb ने. स्मिता फायनलमध्ये हवी.

मेघाला काढतील असं वाटत नाही, ती असेल फायनलमध्ये. शेवटी निकाल नाही सांगू शकत पण लास्ट डे २२ ला ती नक्की असणार, स्पर्धक म्हणून.

सर्वात पॉप्युलर असून अत्ता ज्या प्रकारे डिफेम करणं चालु आहे मेघाला, काहीतरी छुपा अ‍ॅजेंडा / कसलं तरी प्रेशर नक्की दिसतय .
वोटींगने नाही होणार ती आउट , कारण कुठलेही सोशल मिडीया पहा, ट्विटर्/इन्स्टा/फेबु ,युट्युबर्स मेजॉरीटी लोक मेघाला सपोर्ट करातायेत, इतरांची नावं शिव्या घालण्यासाठी मोस्ट्ली , इतरांचे फॅन्स अगदीच नगण्य दिसतात.
त्यामु़ळे ती वोट आउट होणार नसेल तर हाउसमेट्स वोटींगने आता काढतील तिला असा निगेटिव व्हाइब येतोय.
शराने पुष्करला वाचवलय, शिवाय ती फिनाले मधे कंपिट करायला सोपी म्हणून तिला नाही काढणार हाउसमेट्स.
कळेलच सोमवारी.

या लोकांना हेल्दी टास्क खेळणं येतच नाही का? अक्कलशुन्य माणसं. एखाद्याच्या जीवावर बेतले असते. बॉक्स होल्स ब्लँकेट ने कवर करणे मिरचीची धुरी देणे. कोंडून जीव नसता गेला. यांनी खरंच हिंदी बिग बॉस ची क्रिएटिव्ह टीम आणयला हवी. मूर्ख लोक.

>>या लोकांना हेल्दी टास्क खेळणं येतच नाही का?

हेल्दीच खेळत होते ते.... कुणालाच त्रास द्यायचा नाही असा स्टॅंड त्यांनी घेतला होता पण बिग बॉसला बघवले नाही ते!
मिरचीची धुरी द्यायला तो स्टॅंड, हवा घालायला पुठ्ठा, कोळसे वगैरे बिगबॉसने बहुतेक त्या बॉक्सबरोबरच आत पाठवले होते
आणि त्या बॉक्सच्या टास्कमधून कुणी बाद व्हायचे नाही हे देखील आधीच ठरले असावे नाहीतर मग मांजरेकरांनी आत येउन काय केले असते?

पण तरीही टिकीट टू फिनाले असे वोटआउट वर घेण्यापेक्षा टास्कच्या निकालावर ठरले असते तर ते जास्त योग्य झाले असते!

हिंदी बिग बॉस कितीतरी पटींनी बरंय यांच्यापेक्षा. तिथे हेल्थवर अटॅक नाही करत. तसा फारसा विचार ही कोणाच्या मनात नाही येत (ओम बाबा अपवाद )

Confused bb मराठी.... डोक्यावर पडलेली क्रिएटिव टीम.... बकवास tasks....लहान मुले खेळतांना त्यांना कंटाळा येतो आणि ते मध्येच चालू खेळ थांबवून दुसराच गेम सुरू करतात asach काहीसे bbm मध्ये घडतंय.... उदाहरणार्थ केक खाण्याच्या taskche काय झाले... बॉक्स task bb कंटाळले mhanun बंद केला... म्हणजे ase होईल ka... की galli क्रिकेट मध्ये ज्या मुलाचा cricketcha सेट (bat, ball, stump etc).. त्या मुलाचा clean bold झाला tari त्याला आउट करत nahit... हास्यास्पदच आहे सर्व प्रकार... आपण एवढे जीव तोडून विचार मांडतो... किंवा bbm साठी voting करतो त्याला काहीच अर्थ रहात नाही..

म मां ला मिफ्ता आणि बिग बॉस एकच वाटतंय का?
How can a host be so personal??
सलमान आणि त्याच्या घरचे बिबॉच्या घरात आलेले ऐकलं नाही कधी.

म मां ला मिफ्ता आणि बिग बॉस एकच वाटतंय का?
How can a host be so personal??
सलमान आणि त्याच्या घरचे बिबॉच्या घरात आलेले ऐकलं नाही कधी.

सई पुष्कि सेम रा.रे मार्गाने चालले आहेत, भयंकर डोक्यात जातायेत त्यांचे स्टुपिड टॉक्स, सो कॉल्ड हेल्दी फ्लर्टींग.
बॉक्सच्या आतून सुध्दा पुष्कि आय मिस यु , अशक्य अनॉयिंग !
सई तर पूर्ण गेली आहे कामातून, तिचा फोकसच हल्लाय, फक्तं पुष्कि हवाय तिला, the way she looks at him, deeply in love and endless PDA with married man !
सई शरा ला म्हणे मला वोट दिलस काय आणि पुष्किला दिलस काय एकच आहे Uhoh
पुष्कर सगळ्यात hypocrite वाइट फायदा घेतोय सईचा आणि वर मी कसा बायकोशी लॉयल, मी फॅमिली मॅन वगैरे वगैरे !
शरा नी खरच स्मिताला द्यायला हवं होतं वोट पण मधेच गृप लॉयल्टी वगैरे आठवल तिला !
पुष्करला मेघाचं त्या दिवशीचं रागात बोललेलं बोलणं लागलं असेल पण तो खरच जे काही आहे ते फक्त आणि फक्त मुलींमुळेच आहे पुन्हा एकदा प्रुव्ह झालं, सई शराचं वोट नसतं आणि फक्तं बॉक्स टास्क वर निकाल अता तर आज नक्की स्मिता जिंकली असती, ती म्हंटली सुध्दा बिचारी कि हे टास्क माझं फॉर्टे होतं पण बिबॉनी ते टास्क रद्दच केलं , बिग बॉस स्वतः कनफ्युज्ड आहे जाम, वोटींग घ्ययाच होतं तर बॉक्स टास्क दिलाच का ?
केक टास्क कशाला दिलं आणि पुढे काय झालं त्याचं ?
अ‍ॅक्चुअली ,फोम, बाबागाडी, बॅक बिचिंग कोणी केलं वगैरे छोटी छोटी लुटुपुटु टास्क देण्या ऐवजी एकच टफ असलेला हा बॉक्स टास्क सगळ्यांना द्यायला हवं होत २ दिवस.
निम्मे लोक डे १ , निम्मे दुसर्या दिवशी, उरलेल्या लोकांनी टॉर्चर करायचं !
Btw पुष्कर म्हंटला होता कि जनरली मुली स्वार्थी असतात !
रिअ‍ॅलिटी चेक पुष्कर , मेघा मुळे २दा आणि शरा सईमुळे तिसर्यांदा कॅप्टन झाला आहेस, डिक्टेटर टास्क मधे मेघानी त्याच्यासाठी पायावर नाक रगडलं, मेघा-सईनी त्याला त्या नेकलॉक मधून सोडवलं तरी हा रडत होता मला करुद्या टास्क, या दोघी क्रेडीट घेउ नयेत म्हणून !
काल मेघाला यानीच आउट केलं तरी मेघा वॉज हॅपी फॉर हिम. मला मेघाची एवढी एकच गोष्ट खटकते, त्या पुष्कर सई मधून अजुनही बाहेर पडत नाहीये ती Sad
सध्याच्या घडीला बिबॉ पुष्कि मधेच पोटेन्शिअल विनर बघतोय असं दिसायला लागलय आता !
आज ममा कित्ती थकलेले अनकमफर्टेबल वाटत होते , उगीच घुसले घरात !

रच्याकने काल कोणी नोटीस केलं का की जेव्हा मेधा घरात आली तेव्हा सगळे तिच्याशी बोलत असताना फक्त मेघाने पाणी आणून दिले आणि सगळे मांजरेकर यांना hug करत असताना पण तीच फक्त पाया पडली.आता याला तिची स्ट्रटेजी म्हणावी की आणखी काही.मला तर genuine वाटलेले हे.

Salmaan yeto gharat shevatchya athavdyat

मेघा जे बोलली ते चुक होतं म्हणणार्‍यांना एक प्रश्न - तुम्हाला ३ महिने अशा १५ लोकांसोबत एका बंद घरात ठेवलंय जे सतत तुम्हाला पाण्यात पहातात किंवा फक्त फायदा घेतात किंवा तुम्हाला जे कराल त्यावरुन टोमणे मारत रहातात अशा लोकांबद्दल चिडुन तुम्ही कितपत सौम्य प्रतिक्रिया देउ शकता? त्यात बिग बॉस आणि ममा पण मेघा बॅशिंगवरच उतरलेले

आता इथे वरच उदाहरण पहा की - कोणी तरी कोणाला तरी भक्त म्हणल्याबद्दल हसलं तर किती तिळपापड होउन कुठल्या लेवल ला भांडणं आलीयेत?

नाही म्हणजे कितीही बेस्ट असली तरी मेघा ही मनुष्य प्राणी आहे हो, देव किंवा संत नाही

आणि एक लक्शात घ्या, घराबाहेर पडलेल्या कोणत्याही व्यक्तीला मेघाशी काहीच प्रॉब्लेम नाहीये, सई- पुश्कर बॅशिंग मात्र चालू आहे. मेघाला नॉमिनेट करताना रेशम सुद्धा ती स्ट्राँग प्लेअर आहे हे कारण देतात, यातच तिचा स्वभाव नेमका काय आहे ते समजुन येतं...
>>>>>
+१००
आजूबाजूला एवढे दिवस एवढी निगेटिव्हीटी असताना स्ट्रॉंग राहणे खूप अवघड आहे. सतत लोक तुम्हांला टारगेट करत असताना, तुमचे मित्रसुद्धा तुमची साथ देत नसताना स्फोट होणे साहजिक आहे. तरी खूप उशिरा स्फोट झाला मेघाचा. मी तिच्या जागी असते तर एवढे नसते सहन केले. ( ती जे काही बोलली ते योग्य होते असे माझे म्हणणे नाही. मी तर गेले दोन आठवडे बिग बॉस पाहणेच बंद केले आहे.) पण ती खूप स्ट्रॉंग आणि बरीच matured वाटते मला. काही दोषही आहे. पण मग तसे ते सगळ्यांच्यातच असतात.

<<आजूबाजूला एवढे दिवस एवढी निगेटिव्हीटी असताना स्ट्रॉंग राहणे खूप अवघड आहे. सतत लोक तुम्हांला टारगेट करत असताना, तुमचे मित्रसुद्धा तुमची साथ देत नसताना स्फोट होणे साहजिक आहे. तरी खूप उशिरा स्फोट झाला मेघाचा. <<< +१०००००००

सई-पष्किइबद्दल डीजे ला +१११११११! आता मला ते हेल्दी फ्लर्टिंग नाही वाटत. इतके दिवस एकत्र सतत राहिल्याने तसे होणे हे आश्चर्य नाही पण सई स्वतःला हर्ट करून घेणार आहे यात.
पुष्की दोन्ही ग्रुप्स ना चालणारा असल्याने तिकिट मिळाले त्याला, आणि त्याचेच आता विनर होण्याचे चान्सेस बरेच दिसतायत.
बिबॉ ला बॉक्स टास्स्क उरकायची घाई झाली फार. नाहीतर कोण कसे बाहेर पडतेय ते बघणे इन्टरेस्टींग झाले असते.

पुष्कर खरंच 'उधार की जिंदगी' जगतो आहे बिबाॅमधे. मान्य करायला जड जाईलंच त्याला हे.
सई आणि त्याचं खरंच जास्त झालंय आता. सई काय त्याच्यासाठी winner's spot पण सोडून देईल का? रेशम आणि राजेशला हसणारे हे लोक, आपण पण त्याच वाटेवर चाललोय हे बघत नाहियेत वाटतं.

ममां काल घरात आले ते प्रकरण बोअर झालं. ओळाखता येऊ नये इतकं बेअरिंग गेलेलं होतं माणसाचं. एक कनवाळू म्हातारा पाहुण्यासारखा येऊन आशीर्वाद वगैरे देऊन गेला. असं वाटत पण नव्हतं की हे बिग बॉस चं घर आहे ज्याचे ते स्वतः होस्ट आहेत. जरा आब राखायचा न त्या पोझिशन चा.

कालच्या episode मध्ये last 2 minutes मध्ये sai पुष्कर la म्हणाली... You have no idea what kind of affection I have for you... Show संपल्यावर सांगेल... याचा अर्थ काय समजायचा??

Pages