बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<मेघा परवा जे बोलली ना पुष्की पैसे देऊन डॉक्टर झालाय ते, <<<
त्याचा मान्जरेकरान्नी मागच्या वेळी मेघाला झापले तेव्हा ओझरता उल्लेख केला होता. तेव्हा लगेच सईने पुश्कीकडे पाहिले. अन पुश्की मान हलवत सुचक हसलाही होता.

आ रे, पु स मेघाच्या माघारी काय बोलले ते तिला दाखवाय्लाच पाहिजे. मेघालाही कळु द्या , पु स काय काय बोलतात ते! .

केक खाणे, फासणे, नाचणे, बाबा गाडी.. हे असले टास्क अंतीम फेरीसाठी.
मला वाटते बि बॉ क्रियेटीव्ह टीम बहुतेक स्पर्धकांच्या क्रियेटीव्ह गुणांमूळे एव्हाना पूर्ण पकली आहे... त्यामूळे स्पर्धकांना जमतील असे टास्क देण्या शिवाय काही पर्याय नाही.
पण पहिल्या तीन चे सेटींग झालेलेच आहे तर हे असले शुल्लक टास्क कशाला ठेवले आहेत?
बाकी, आस्ताद पेक्षा ममा ऊत्तम गातात..!
शोले मधिल बसंती नंतर शरा च... [बि बॉ: जब तक तेरे पैर चलेंगे तू फिनाले मे रहेगी...!]
बिग बॉस प्रस्तुतः 'अमर फ्लर्टः' पुष्की... अरे ओ पुष्की... ...ईन आंसू को पोछ डालो.. आय हेट टियर्स...

आज आहे परत मेघा वर ढिश्क्यांव...ढिश्क्यांव.. सगळ्यांच >>
२ दिवस मेघा ने शिव्या खाल्ल्या नाहित त्यामुळे टीआर्पी ढासळला असेल बिबॉ चा...मग आता परत मेघा :-)..आणि शिवाय वीकेंड चा डाव मद्धे बोलायला काहीतरी पाहिजे...
आणि पर्सनल गोष्टींवर कोणी बोललं तर डायरेक्ट एलिमिनेट कराय्चे अधिकार मिळालेत न ममां ना.
मग कोणालातरी उचकवायचं, पर्सनल बोलायला भाग पाडायचं आणि बाहेर काढायचं असं काहितरी असेल डाव.

डायरेक्ट एलिमिनेट कराय्चे अधिकार मिळालेत न ममां ना... म्हणुन मेघाला या जाळ्यात अडकवलं बिग बॉसने..
आता मेघाच बाहेर जाणार मग..

योग, <शुल्लक टास्क>> ’क्षु’ल्लक असा शब्द आहे Happy

मेघा बाहेर पडली तर बोलणार कोणाबद्दल मग? आस्ताद, पुष्की आणि सईचा सामूहिक हृदयभंग होईल Wink

लोकहो असे काही नसेल, शेवटच्या काही आठवड्यात हिंदी बिबॉ मध्ये सुद्धा असे दाखवितात काही ठराविक स्पर्धकांना

ममां च्या विशेष अधिकाराचा वापर पूर्वीच बोललेल्या गेलेल्या बोलण्यांवर नाही होणार. आत्ता त्यावरून कुणी पर्सनल बोलले तर होईल. आजच्या क्लिप्स मधे तेच तेच मेघाचे सीन्स न दाखवता इतरांनी पण कुणाला काय बोललेय त्याची क्लिप्स दाखवावीत लोकांना. तमाम सगळ्या लोकांनी केलेत की गॉसिप्स.
काल शरा एन्टरटेनिंग होती. मजा आणली तिने. आस्ताद चे त्यावेळचे भाव बघण्यालायक होते. बाकावर लोळताना त्याला हे जग हा गेम सगळे मिथ्या असल्याचं (लेट )रिअलायजेशन झाले बहुतेक.
मी पाहिलेय की मेघा चे नाच अ‍ॅक्टिंग वगैरे पर्फॉर्मन्सेस एडिट होतात नेहमी Lol बहुतेक तिची डान्सिंग आणि अ‍ॅक्टिंग स्किल्स भयाण असणार Happy

Asach kahi karan kaadhun meghala kadhun ka takat naahit.. kiti diwas tichya war hallabol chalu aahe.. clips pan sagalya meghachyach dakhawalya aahet kay?.. sagalech bolale aahet na kiti mage.. boring n unfair this is

>>योग, <शुल्लक टास्क>> ’क्षु’ल्लक असा शब्द आहे Happy
पूनम, भा.पो. Happy

>>बहुतेक तिची डान्सिंग आणि अ‍ॅक्टिंग स्किल्स भयाण असणार Happy
अविश्वसनीय ! Wink
>>Asach kahi karan kaadhun meghala kadhun ka takat naahit..
तथास्तु! जोडीला स्मिता ला बर्थ डे चे रिटर्न गिफ्ट टू फिनाले पण देऊन टाका. Proud
एकदाची जगबुडी होवून जावू देत.. Lol

बिग बॉसच्या क्रियेटिव्ह टीमचे लोक आणि बिग बॉस स्पर्धक यांच्यात अधिक आळशी, निर्बुद्ध आणि कल्पनाशून्य कोण याची स्पर्धा चालू असल्यासारखे दिसते.
योग यांनी मागच्या पानावर मस्त आयडियाज दिल्या होत्या. पण बिबॉचं डोस्कं एवढं चालणं निव्वळ असंभव, ते आपले बाबागाडी बाबागाडीच खेळत बसणारेत.

अहो, इतके कंटाळवाणे प्रकार करूनही इतके लोक शो बघून इथे त्यावर बडबड करत असताना असताना कोण अजून कष्ट घेईल? Proud

हिंदी बिगबॉसचा एकही एपिसोड न बघितलेले पण मराठी बिगबॉसचा एकनएक एपिसोड बघणारे बरेच असतील..... अश्या प्रेक्षकांना आत्ता सगळे नवीनच आणि भारी वाटतय पण हेच टास्क आणि हेच प्रॉप्स मराठीच्या दुसऱ्या भागात रिपीट झाले तर अजुनच प्रेडिक्टेबल होउन जाईल बिग बॉस.... Hope they will not repeat it!

त्यातुन अभ्यास करुन येण्याचा कानमंत्र मेघाने दिल्यामुळे पुढचा सीझन अगदीच फुसका होउन जाईल

बाॅक्स चा टास्क आहे नवीन. इथे लोकांचे पेशन्स पणाला लागणार. हिंदीमधे गौहर-तनिशाच्या वेळेस जेव्हा हा टास्क झालेला तेव्हा विक्रमी भांडण झालेलं. कुशाल आणि अरमानमधे. बाॅक्सच्या आतील माणसाला बाहेर काढण्यासाठी बाहेरून घाण वस्तू, साबण किंवा ऊकसवणारे शब्द वापरायचे. जास्त त्रास मेघालाच होणार आहे. तिने अपशब्द वापरल्यामुळे.

काल तिकीट न मिळाल्यामुळे आस्तादचा चेहरा पार पडलेला. तो आणि रेशम आधीच frustrate झालेत तिकीट न मिळाल्यामुळे, राग काढायला संधीच शोधत असणार आणि याचा फायदा घेणार नाही तो बिग बॉस कसला. लगेच मेघाच्या क्लिप्स दाखवून घेतल्या.
एकात एक काय टास्क घेत आहेत ते कळेना, ते बाबागाडी टास्क संपला होता का कि फोम टास्क सुरु केलं? एका टास्क मधून एकाला आऊट करत आहेत बहुतेक . पुढचा टास्क साधा नॉमिनेशनने तिकीट न मिळून द्यायचं असेल तर मेघाचा होईल आऊट. कारण तिच्या ग्रुपला पण कारण पाहिजे तिला वोट आऊट करायला जे बिग बॉसने क्लीपने दाखवून दिलं

>>बिग बॉसच्या क्रियेटिव्ह टीमचे लोक आणि बिग बॉस स्पर्धक यांच्यात अधिक आळशी, निर्बुद्ध आणि कल्पनाशून्य कोण याची स्पर्धा चालू असल्यासारखे दिसते.
किंवा..हिंदी मधिल सर्व व ईथे शक्यता असतील तेही सर्व गेम्स या सर्वाचा मेघानी आधीच अभ्यास केलेला असल्याने, बि बॉ क्रियेटीव्ह टीम ने अगदीच बिंडोक गेम्स रचले असतील.. Wink
तरिही बर्‍याच लोकांचे असे म्हणणे आहे की या सर्वात तुम्ही परिस्थिती कशी हाताळता यावरून तुम्ही विनर ठरता.. Proud

बाकी हे जे काय क्लिप प्रकरण दाखवले जाणार आहे त्यात सगळ्यात वाईट्ट राडा मेघा कं मध्ये होणार.. कारण, रेशम, आस्ताद, स्मिता यांनी एकमेकांबद्द्ल पाठींमागे कधी वाईट्ट शब्द वापरलेले नाहीत. किंबहुना पत्रे पण एकमेकांनाच लिहीली होती. तेव्हा मेघा वि. ईतर असा राडा व्हायची शक्यता अधिक आहे. खरे तर हे काम आऊ असताना करायला हवे होते.. त्या मेघाच्या ही एक पाऊल पुढे होत्या त्या बाबतीत...! पण बाई सटकली.
'अमर फ्लर्ट' जोडीने एकमेका वि. काही विशेष टिप्पण्या केल्या असतील तर ते दाखवा.. मेघा चं काय नेहेमीचच आहे.

>>पुढचा टास्क साधा नॉमिनेशनने तिकीट न मिळून द्यायचं असेल तर मेघाचा होईल आऊट.
मेघा ला असेच थेट फिनाले टिकेट दिले तर टीआरपी ची खूप मोठ्ठी संधी जाईल आता.. अशा मोक्याच्या वेळी तर तिला प्रेक्षकांनी मत दिले तर फिनाले टिकेट द्याय्चे असे गणित असेल चॅनल चे.. लोकं त्यांची अत्यंत 'बहूमूल्य' मते मेघाला देणारच शिवाय ती विनर व्हावी म्हणून देखिल पुन्हा एकदा त्यांची 'बहूमूल्य' मते मेघाला देणारच... Proud पण तोपर्यंत channel needs to raise the stakes to all time high.. to make big business... trp, adds, calls, social media.. so this is bound to get 'exciting' before THE DAY! Happy

रच्याकने: मेघा जिंकली नाही तर नटश्रेष्ठ किरण माने हे 'पॅशनेट' कलावंतांचा मोर्चा काढतील का असा मुख्य प्रश्ण निर्माण होतो. बाकी ईतर सामाजिक सुरक्षिततेचे प्रश्ण जसे की ममां च्या घरावर दगडफेक, शेयर बाजारात घसरण, अमर फ्लर्ट जोडीवर टीका/धमक्या, जातीयवाद, ई. सर्वांची फार चिंता करायची गरज वाटत नाही. लोकं विसरून जातात. Proud

स्मिताचा PR काय मजबूत आहे, कितीतरी ऍक्टर्स तिच्यासाठी वोट अपील करत आहेत. कोणत्यातरी चॅनेलवर पण ते अपील्स येत आहेत.

अरे परत मेघाला गँग अप करून शिव्या घालण्यासाठी , कॉर्नर कराण्यासाठीच आजचा टास्क डीझाईन केलेला दिसतोय. जास्तीत जास्त मेघा काय बोलली आहे तेच शॉट्स दाखवले. बाकी आस्ताद , रे च फक्त एक्च शॉट तो सुद्धा पुश्कर संबंधात. आ रे काही बोलतच नाही कुनाबद्द्ल जसे काही
बिग बॉस कीती अनफेअर हे गेम तुमचे Uhoh
मागेपण ममा नी फक्त मेघाचा शॉट दाखवला होता. जुई इतके वेळा खोटे बोलत होती , वीट फेकली नाही म्हणुन तर तिचा शॉट मात्र एकदाही दाखविला नाही.

बॉक्स टास्क किती दिवसाचा आहे आता ?
काय आहे टास्क पाहिलं, तर हिंदेमधे म्हणे कामया पंजाबी ३६ तास राहिल होती त्या बॉक्स मधे Uhoh
टॉर्चर झेलणे प्रकार असेल तर सध्याच्या उर्वरीत लोकात पुष्कर जिंकेल असं वाटतय हा टास्क.

३६ तास! बाप रे Uhoh अवघड आहे. प्रेक्षकांना बघणे बोअरिंग होणार पण पुन्हा.
आणि जे टिकेत टु फिनाले रेस मधून बाहेर पडलेत तेही टॉर्चर करू शकतात का? आस्ताद, रेश्म वगैरे पटून च उठतील मग.

आजचा आख्खाच्या आख्खा टास्क फक्त आणि फक्त मेघाला टारगेट करायला होता..... बाकी लोक्सही भरपूर पर्सनल बोललेले आहेत पण ते सोयिस्कररित्या दाखवले नाही..... सुशांत, आस्ताद वगैरे मंडळी जे काही पुष्करबद्द्ल बोलले ते पर्सनल नव्हते?
व्हिलन गॅंग मेघाबद्दल आणि तिच्या श्रीमंतीबद्दल पर्सनल बोलले नव्हते?
आणि झाले की आता त्याबद्दल मेघाने मांजरेकरांच्या शिव्याही खाल्ल्या!
तेच तेच उगाळत राहू नका..... मूव्ह ऑन म्हणणाऱ्या मांजरेकरांचे आज जे उगाळले गेले त्याबद्द्ल काय मत आहे?
बट नेव्हर माइंड.... मेघाला फिनालेला पोहोचायला तिकिट टू फिनालेची गरज नाहीये.... प्रेक्षक देतील तिची साथ!

पण या सगळ्यात शरा एक माणूस म्हणून खुपच उठुन दिसली..... किती तो समजूतदारपणा!
मेघाला ती तेंव्हाच फार पोटतिडकीने समजावत होती की राग आवर!
काश मेघा उसका सुन लेती!
खुप जेन्युअनली चांगली वाटली आज शरा परत एकदा!

हायला, कमाल आहे इथे भक्तीची बाकी! असाही अधून मधून च बघतोय पण जर यात ती कुजकट, कजाग मेघा जिंकली तर पुन्हा कधी बिगबॉस बघणार नाही ही शपथ! (अर्थात त्याने काही फरक पडत नाही ही गोष्ट वेगळी)

काही असले तरी जे बोलले ते (प्रत्येकाने) निदान अ‍ॅक्सेप्ट तरी करावे. मेघाने एक दोन क्लिप्स मधे "पण मी अमूक नव्हते म्हणत, तू काहीतरी बरोबर ऐकले नसशील मी तर तमूक म्हणत होते" वगैरे एक्सप्लेनेशन्स दिली ते नाही आवडले. रेशम ला ती जे बोललीय त्यात मागे पुढे कमी जास्त करण्यासारखे काहीही नाहीये. ग्रेसफुल हेच होईल की सरळ म्हणावे हो मी बोलले तसे रागाच्या भरात किंवा ओके मी ते जे बोलले ते माझे मत होते. ते फिरवा फिरवी सारवा सारव हे पथेटिक वाटते.

>>ग्रेसफुल हेच होईल की सरळ म्हणावे हो मी बोलले तसे रागाच्या भरात किंवा ओके मी ते जे बोलले ते माझे मत होते. ते फिरवा फिरवी सारवा सारव हे पथेटिक वाटते.

अगदी अगदी!
मेघाचे ते चुकतेच जरा.... फार explanation देत बसते लोकांना!

त्याला एक्सपलेनेशन म्हणावे का हा प्रश्न पडतो ... मला तरी हेकेखोर पणा वाटतो....खोटं बोलणे हे खूप जास्त नॉर्मल आहे मेघासाठी....मला आवडायची आधी ती... आता स्मिता आवडते आणि रेशम पण आवडू लागली आहे.... मेघा एकटी च कशी बिचारी वगैरे आहे असा इथला सूर असला तरी तिने खूप घाणेरड्या लेव्हल चे पर्सनल कमेंट केलेत सर्वांवर...हे तर लपलेलं नाहीय पण तिच्या इतके कोणी केलेत असं मला वाटत नाही....नाही म्हणजे अस्ताद बोललाय तिच्या 5 लाखाच्या खरेदी वरून किंवा तिचा आवाज वगैरे पण अगदी तिला लग्नाआधी मुल झालं मग तिने दुसरं लग्न केलं यावरून कोणी तिच्याबद्दल वाईट साईट बोललं नाहीय....( सॉरी मला इकडे असं लिहायचं नव्हतं पण ती डोक्यात गेलीय ) आणि मेघा ने रेशम बद्दल तिच्या आधीच्या नवर्याबद्दल, बॉयफ्रेंड बद्दल वगैरे खूप पर्सनल लेव्हल वर जाऊन काय काय म्हटलंय...तितक रेशम ने काही म्हटलं नाहीय....किंवा स्मिता ने ही.. !
वर कोणीतरी अंधभक्त वगैरे ची उपमा इथल्या लोकांना दिलेली ती बरोबर च आहे असं वाटू लागलंय

इतके दिवस राहून जास्तीतजास्त चांगुलपणा जपून स्मिताने ठेवलाय. तिच्याबद्दल मोर ऑर लेस सर्वच बोललेत. ती task मध्ये बोलली सई ला आणि क्वचित कधी आ रे बोलतात तेव्हा बोलते तरी आ रे कुचाळक्या करतात तेव्हा ती कामं करत असते.

शरापण खूप चांगली वागते, गुणी आहे तशी, समजावते मेघाला, मेघाने ऐकायला हवं होतं तिचं. बाहेर ती सर्व बघून आलीय. पब्लिक बाहेर काय बोलतंय, कोणाच्या बाजूने आहे हेही तिला माहितेय त्यामुळे ते तिला फायद्याचं होतंय.

सर्वांनी जे voting केलं त्याबद्दल मला काही म्हणायचं नाही अगदी योग्य होतं, आ रे स्मिता पु चं, ज्या क्लिप्स दाखवल्या त्यावरून.

पण सई मेघाविरुद्ध गेली ते चुकीचं होतं असं माझं मत. मेघा कायम तिला महत्व देत आली मधली एक गोष्ट सोडली तर. सईने मेघाला उगाच मत दिलं, ती सईच्या विरोधात नव्हती. पुष्करला मात्र वाटेल ते बोलली होती मेघा. ऑलरेडी मेघा बाहेर होती सईने मत द्यायच्या आधी पण तिने मेघाला द्यायला नको होतं तरीही असं वाटतं. मग स्मिताला ३ मिळाली असती पण ऑलरेडी चार मेघाला होती. आता मात्र मेघा पाच मताने बाहेर पडली task मधून.

अनिश्का—++11
Mala pan aadhi khup avadaychi Megha Pan sarkhe shabt firvane, dusaryan baddal vait bolane— nahi avadat ata

अजून एक मेघा जर सर्व हिंदी bb कोळून प्यायली आहे तर एवढी मोठी चूक तिच्याकडून कशी झाली. ह्या क्लिप्स दाखवू शकतात हे तिला नक्कीच माहीती असेलना. मग इतक्या खालच्या लेवलपर्यंत उतरून बोलू नये हे नाही का लक्षात आले, शरा सांगत असतानाही.

हे जर scripted असेल तर सर्वजण acting उत्तम करतायेत, आपण उल्लू बनतोय आणि नसेल तर मागच्या आठवड्यात एका मागोमाग मेघा जे चुकीचं वागली ते वागून ती bb च्या जाळ्यात अलगद सापडली आणि ते सर्व तिच्यावर उलटलं. फिनालेला ती पब्लिक voting ने जाईल आरामात.

स्मिताबद्दल फार काही दाखवायला नव्हतं म्हणून bb ने स्वतःचं दिलेल्या task मधलं दाखवलं तर सई ला का राग यायला हवा. ती तर पाण्यात पहाते स्मिताला, task असो किंवा बाहेर.

ही सई खरंच प्रेमात आहे का पुष्करच्या. स्मिताला भोळी, innocent, cute म्हणाला तर नाही चाललं तिला. जस्मिन टेन्शनमध्ये असेल.

Pages