बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तिकीट to finale मधून आस्ताद आणि रेशम बाहेर पडलेत आता बाकीचे 5 जण राहिलेत .उद्यासगळ्यांची बॅक बिचिंग दाखवणार आहेत

चला आस्ताद आणि रेशमने आता बेंच पकडला.... बरच झाल म्हणत असतील दोघे.... नाचानाची नको..... टास्क नको काही करायला..... बसतील आता कुचाळक्या करत!

त्या केक फासाफासी च्या टास्कच्या निमित्ताने का होईना रेशमला आळशी म्हणण्याचे धाडस केले फायनली लोकांनी!

तिकीट to finale मधून आस्ताद आणि रेशम बाहेर पडलेत आता बाकीचे 5 जण राहिलेत >> हे कसे? बाकीचे ४ तर आधीच गेले होते ना फिनाले ला ?की तो त्यांचा गैरसमज होता?

सपु कित्ती फुटेज खातात यार टू मच. त्यांचेच दाखवतात जास्त. कित्ती bored.

फिनाले म्हणजे अगदी शेवटचे तीन का, ते आ रे ला नाही मिळालं. स्मिता काय बावळट चान्स असून सईला काढलं नाही. असो आ ची गाडी पार्क नाही केली पुष्करने त्यामुळे तो नाही पोचला.

आता उद्या फिनाले मधून स्मिताला काढतील आणि मग शरा ला म्हणजे आपोआप स पु मे फिनालेमध्ये.

त्या केक फासाफासी च्या टास्कच्या निमित्ताने का होईना रेशमला आळशी म्हणण्याचे धाडस केले फायनली लोकांनी! >>> हो. तिला काही उत्साहचं दिसत नाहीये एकंदरीत, आधीही फार दिसला नाही, आता तर अजिबात नाही. पण राहायचं आहे मात्र मनातून शेवटपर्यंत.

उद्या, एकमेकांच्या माघारी कोणकोण काय बोललं ते दाखवून बिबॉ सगळ्यांमध्येच लावून देणार आहेत!
परत एकदा राडा

हो ना आर्या, बरं एकेकाला कशाला दाखवता. सर्वांना एकत्र बसून दाखवा.

पहिला केश तेल task आ रे आणि स्मिता जिंकले. पटापट शोधलं त्यांनी सर्व.

स्मिता मेघाबद्दल जे बोलली ते मेघाला दाखवणार. मेघाचे स्मिताला Lol

स्मिताबद्दल शोधून काढायला लागले असतील, तशी ती फार नाही करत बिचिंग. क्वचित ह्या लोकांच्या नादाला लागून बोलते पण सर्व करतात त्या तुलनेत, काहीच नाही.

मेघा पुष्कर सई शमा हे अंतिम आठवड्यात गेले आहेत आणि या सगळ्या खेळातून एक एक जण बाहेर पडणार जो शेवट राहील तो डायरेक्ट finale ला पोहचणार

फिनाले म्हणजे अगदी शेवटचे तीन का, ते आ रे ला नाही मिळालं. स्मिता काय बावळट चान्स असून सईला काढलं नाही. असो आ ची गाडी पार्क नाही केली पुष्करने त्यामुळे तो नाही पोचला.

आता उद्या फिनाले मधून स्मिताला काढतील आणि मग शरा ला म्हणजे आपोआप स पु मे फिनालेमध्ये>>>>>>> या रविवारी आ स्मि रे मधील एक जाणार, उरले सहा. सोमवारी परत नॉमिनेशन्स त्यात जे नॉमिनेट होणार त्यातील एक गुरुवारी किंवा शुक्रवारी बाहेर, उरले पाच जे फायनलला उभे राहणार.
टिकीट टू फिनाले म्हणजे डायरेक्ट या पाचात. तो सोमवारच्या नॉमिनेशनमधून सेफ आसणार.

टिकीट टू फिनाले म्हणजे डायरेक्ट या पाचात. तो सोमवारच्या नॉमिनेशनमधून सेफ आसणार. >>> एकचं निवडणार ना मग task मधून.

पण आता एका grp मध्ये चार आणि दुसरीकडून फक्त स्मिता आहे. हे चौघं तिला कशाला जाऊ देतील पुढे. स्मिता हवी जायला डायरेक्ट.

कोण कोणाच्या मागे बोलल हा सुध्दा जर टिकेट टु फिनाले टास्क असेल तर , त्यावरून वोट्स घेऊन एखादा स्पर्धक होईल त्या राउंडमधे बाद, मेघाच जर परवाची क्लिप दाखवली तर.

कालच्या भागात शमाचा डान्सच काय त्यातल्या त्यात इंटरेस्टिंग होता.
आजच्या भागात मेघाच्याच जास्त क्लिप्स असणार आहेत. तिने शांतपणे चूक झाली, रागाच्या भरात बोलले म्हणत कमीत कमी बोलणे तिच्या दृष्टीने योग्य ठरेल. जितकं तिच्या बोलण्या बद्दल स्पष्टीकरण द्यायचा ती प्रयत्न करेल तितकी ती तोंडावर पडेल !

पुष्कीची पुन्हा बाथरुम ब्रेक विना हालत झाली आज Lol आता कुणावर ओरडेल बिचारा Happy
सई पण खादाडखाऊ असल्याने केक खायला पुढे झाली होती पण तिलाही अजीर्ण होईपर्यन्त खावा लागला केक ! आस्त्याला सुरुवातीला पुष्कीने बाद केल्यामुळे जांभया देत बसला होता. रेशम ला बाद होण्याचे सोयर सूतक दिसले नाही.
काय ना पण! असे मायनॉरिटी मधे चिलटासारखे आउट होणारे आस्त्या आणि रेशम कुठे आणि काहीच आठवड्यांपूर्वी राजेश -सुशांत आणि मेजॉरिटीच्या पावरमुळे गुंडागर्दी करणारे तेच दोघे कुठे! क्या से क्या हालत हो गयी! मजा वाटते मला Happy
सिरियसली, पण पुष्की -सई ही फार फार बोअर करतायत. काय ते मुशी मुशी मार्शमेलो टॉक सारखं. ए तुला काय झालं, ए मला सांग ना आपण बेस्ट फ्रेन्ड्स ना. ए जेव ना. ए मी भरवणार बर्का तुला, ए मी सॉरी , नाही गं बाळा मीच सॉरी. नको ना ऑशं बोलू... याईssक्स! बाsssssssस करा आता !! ब्यॅक्क! हे तिघेच फिनाले ला राहिले तर कठीण आहे! डायबिटिस होईल बघणार्‍यांना!

मै +१
सई पुष्कि अज्जिबात आवडत नाहीयेत .
तरीही एकेकाळी मायनॉरिटी अस्स्लेले गृप रुल करताना बघून आणि त्याकाळी दादागिरी करणारे लोक गप्प पडून आउट झालेले बघून मजा आली.
आज पुन्हा एकदा स्मिता बिबॉ मधल पॉलिटिक्स जमत नाही प्रुव्ह केलं.
सईला कशाला वाचवलं ? तिने रेशमला वाचवाव म्हणून ?
आज शर्मिष्ठानी मजा आणली, बिबॉरुपी डिक्टेटर बहुदा जाम खुष झाला तिच्या लावणीवर, किती वेळा नाचवलं आणि तीही मस्तं नाचली Happy
मला आवडेल सगळ्या सिनियर्सना डावलून उद्या तिला फिनाले तिकिट मिळाल तर !
आज केक खाऊन पुष्किच पोट बिघडणे, सईची उलटी बघून कोणाला मेघा आणि दूधओव्हरडोस एपिसोड आठवला Wink

आ च्या डोक्यात श रा इतकी बसलीय ना! दर वेळी पुष्कीसोबत त्याचे चालु असते... "आम्ही काय ८० दिवस इथे .. घासली काय ! वाईल्ड कार्डवाल्यान्ना काढा वै वै! पण श रा टफ फाईट देतेय.
आ ला नाचायचा काही चान्सच नव्हता. या वेळी स्मितालाही काही नाचायला दिले नाही. रे चा डान्स एकदाच झाला. बिबॉ शरा आणि पुष्कीलाच इतका त्रास का देत होते? शराने शेवटपर्यन्त बेअरीन्ग सोडले नाही पण. मस्त नाचली. मजा आली.

सगळेच बोअर टास्क्स असल्यामुळे आज आता लावालाव्या करणार बिग बॉस. पण परत तेच तेच आरोप आणि तोच तोच डिफेन्स. काही मजा नाही त्यात. फक्त मेघाला कळावं की सई तिच्यामागे तिच्याबद्दल खूप बोलते, तिला सईबद्दल जितकं वाटतं ते सईला तिच्याबद्दल वाटत नाही. बॅकबिचिंग हा टास्क असेल, तर आज मेघा जाईल आस्त्या आणि रेशमबरोबर बसायला बाकावर. 'सर्वात जास्त केक कोणी खाल्ला' हाही टास्क असेल तर पुस्की-सई पैकी एक बाहेर जाईल. स्मिता किंवा शमाला मिळायला हवं तिकिट टु फिनाले.

काल रे आणि आ बाहेर पडलेत (सध्यासाठी तरी) यातच मला आनंद आहे... Happy ( पुढचं पुढं ...)
आता उरलेल्या ४ पैकी टिकीट टु फिनाले कोणालापण मिळुदेत...
मेघा किंवा स्मिता ला मिळावं अशी मनापासुन ईच्छा आहे Happy
आ आणि रे नि पहिल्या दिवसापासुन एक पण टास्क मनापासुन केलं नाहिये...राजेश असताना सगळ्या लोकांवर अरेरावी, येता जाता मेघा स्मिता साई पु ला टोमणे मारणे, बघावं तेव्हा लोळत रहाणे ,नाहितर पीसीओ इइतकच करताना दिसत आहेत...त्यांना बिबॉ च्या फिनाले ला (असच) नेलं तर काय फायदा...बिबॉ च्या फॉर्मॅट मद्धे बसतच नाहियेत हे लोक....असो....
आस्ताद ची बाबा गाडी काल बाहेर ठेवली पुष्की नी तेव्हा आ चं तोंड बघुन मला असुरी आनंद झाला ( पाताळविजयम मधल्या राक्षसा सारखं हसावसं पण वाटलं पण अजुन बिबॉ काहीही करु शकतं त्याला न रे ला वाचवायला सो ज्या दिवशी तो बाहेर पडेल त्या दिवशी हसेन मी हा हा हा )
कालच्या ईतक्या बोअर एपि मद्धे पण मेघा न स्मिता बाहुल्यांशी बोलुन लोकांना जरातरी एंटरटेन करत होत्या...न शरा ची लावणी मस्त..मजा आणली तिने....
केक खायला घालुन पु आणि सै ची अवस्था परत खराब..एकंदर बिबॉ मद्धे पु च्या पोटावर फारच अत्याचार झालेत ;-)..
( मेघा सासु सुन चा एपि आठवला परत....)
आज बिबॉ परत आग लावणार वाटतं...मेघा विरुद्ध परत भडका...मेघा सै पुश्की एकत्र येउन रे न आ ला उडवतील या भितीने बिबॉ त्याना एकत्र येउच देत नाहित म्हणायचं Happy

आस्ताद आणि रेशम किती हॅरॅस करतात मेघाला, सतत घालून पाडून बोलणं, खिल्ली उडवणं, अपमान करणं, बोलू न देणं, काही नाही तर तुच्छ कटाक्ष टाकणं. या परिस्थितीतही ती अजिबात खचून न जाता फक्त खेळाचा विचार करते, आरेशी नीट बोलते, स्पष्टीकरण देते, शांत राहते. कधीतरी तिचा भडका उडणारच जे अगदी व्हॅलीड आहे. खूप सहनशक्ती असलेली माणसं खूप सहन करतात आणि एक दिवस त्यांचा बांध फुटतो तशी आहे ती.

आस्ताद आणि रेशम किती हॅरॅस करतात मेघाला, सतत घालून पाडून बोलणं, खिल्ली उडवणं, अपमान करणं, बोलू न देणं, काही नाही तर तुच्छ कटाक्ष टाकणं. >>
काल पण प्रत्येकाला त्याची त्याची गाणी सांगताना मेघा ला "मेरी मर्जी" गाणं आलं तेव्हा आ ने...हे फक्त गाणं आहे तुला असं काही करायचं नाहिये अशी काहितरी कमेंट केली ....अरे काय....जा ना पुढच्या दारी असं झालं मला...सतत मेघा ला का बरं बोलतो...

आ रे दुश्मन तरी आहेत, त्याचं वागणं आवडत नाहीच पण सपु मेघाशी कसे वागले आणि तो फोन आला एकीचा मेघाला की तू मागे ऐकलं का नाहीस म मां चं की ही दोघे तुला दगा देतायेत, लांब का नाही राहिलीस, ते ऐकून पुष्करला साक्षात्कार झाला आणि patch up केलं तेव्हा, नाहीतर पु ज्युनियर आस्ताद आणि स ज्युनियर रे प्रमाणे वागत होते.

आस्तादचा स्वभाव काही सुधारेल असं वाटत नाही. पराभव दिसला तरी वागणे तसंच पण good human being दाखवण्यासाठी श रा ला शब्द दिला, तो पाळला मात्र.

ह्या सगळ्यात पुष्कर फार धूर्तपणे पुढे जातोय. बैलगाडीतून उतरणे, आ शी मैत्री मैत्री दाखवून काल त्याला सेव्ह न करणे. मे स ला वेळ आली तर दगा देणार नक्की. मे ला फार काही वाटणारं नाही पण सैबै प्रेमात पडल्यात ना.

<< तो फोन आला एकीचा मेघाला की तू मागे ऐकलं का नाहीस म मां चं की ही दोघे तुला दगा देतायेत, लांब का नाही राहिलीस, ते ऐकून पुष्करला साक्षात्कार झाला<< हो का? मग या फोनच मी काही पाहिले नाही.

मेघाचा भडका ऊडू नयेच. नाहीतर कठीण आहे तिचं. ममां तो कुणाला तरी बाहेर काढण्याचा अधिकार तिच्यावरच वापरणार.

सर्वांनीच शांत राहावं आता.

आज एकेकाला बोलावून क्लिप्स दाखवणार कोण काय बोललं मागे ते, त्यापेक्षा सर्वांचेच सर्वांना एकत्र बसवून दाखवा की.

मेघा परवा जे बोलली ना पुष्की पैसे देऊन डॉक्टर झालाय ते, आणि अस्ताद बेवडा, छपरी वगैरे ते दाखवणार आहेत आज.
बाकी सर्वांचं माईल्ड आहे मला वाटते.

हो मेघा दोन दिवस अति बोलत होती, खालच्या पातळीचे.

मी फेसबुकवर खालची कमेंट टाकली आज. खूप दिवसांनी टाकली.

सगळ्यांचेच दाखवा आणि सर्वांनाच दाखवा काय काय कोण बोललं ते, एका hall मध्ये बसवून मोठ्या स्क्रीनवर सर्व दाखवा. असं एकेकाला बोलावून सिलेक्टिव्ह कशाला. आम्ही ऑलरेडी आधी बघितलं आहे. कोणाचेच backbitching, कुचाळक्या आवडल्या नाहीत. मग ते माझ्या आवडीचे स्पर्धक असोत किंवा नावडीचे.

Pages