बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो! सगळेच हाउसमेट्स सध्या मेघाच्या बाबतित इन्सिक्युअर फिल करता आहेत , मेघाला येणारे कॉल्स सगळ्ञाना नर्व्हस करत होते, शराला सेफ करायच क्रेडिट रेशम का घेत होती?
त्याना वाटल आपणही वाचु आणि पैसेही वाचतिल, स्मिता आणि शरा ला चान्स दिला म्हणे ? त्या विक आहेत हे समजुन , म्हणजेच तुम्ही strong आहात असा (ओव्हर ) कॉन्फिडन्स होता म्हणा की मग!

हौअसमेट्स्नी वोटाउट केलं तर कोणाला करतील दिसलय ना परवा ? >>> हो पण आता patch up झालं त्यांच्यात, अर्थात मेघा मला आवडत असल्याने त्याबद्दल काही वाटत नाही, मीन्स तिलाही नको करायला.

अजून एका डावाची शंका येते, आ जिंकावा किंवा स जिंकावी असं channel च्या मनात असेल तर, जाऊदे. संशय का खरं ते नंतर समजेल. आता नाही लिहीत.

एनीवे पुष्कर आणि आस्तादचं अभिनंदन करते फिनालेला गेल्याबद्दल.

अस्तादला फिनालेला अक्षरशः ढकललंय.

फिनालेला माझ्यामते केवळ तीनच सदस्य डिझर्व्हिंग आहेत : मेघा आणि स्मिता, शरा, पुष्की पैकी कोणीतरी दोन.

काल मी क्लिप्सचा एपि पाहिला. केवळ मेघाला फोकस ठेऊन तिच्याच आणि तिचा आउटबर्स्ट झाला असतानाच्याच क्लिप्स जास्त दाखवल्या. सई आणि पुष्कर दोघे मिळून तिच्याविरुध्द रे आणि आ शी कित्तीतरीवेळा बोलले आहेत, ते का नाही दाखवले?

जर मेघाचं कोणाच्या बॉयफ्रेंड बद्दल बोलणं पर्सनल तर मग जिथेतिथे मेघाच्या नवर्‍याबद्दल बोलणंही चुकीचंच ना? अस्ताद, सुशांतला किती तरी वेळा ' मेघाचा नवरा कसा काय तिच्याबरोबर रहात असेल?' असा प्रश्न पडायचा. इतकंच काय, दोन गटांनी जी स्किट्स केली त्यातल्या अस्ताद-रेशमच्या गटानं मेघाच्या घरी पार्टी आणि आदित्य पावसकरचा आवाजही वापरला होता. हे पर्सनल नाही? या क्लिप्स का नाही दाखवल्या?

स्मिताला मेंदू नाही, अक्कल नाही असं कित्येकवेळा अस्ताद बोललाय. आणि त्याबद्दल माफी देखिल मागितलेली दिसली नाहीये. हे पर्सनल नाही?

सईला जाडी म्हटलंय अस्ताद आणि नंकि नं. ते पर्सनल नाही?

नेमक्या मेघाविरुद्धच्याच क्लिप्स दाखवून लगेच वोटिंग घेणे हे सरळसरळ काय दर्शवते? त्यापेक्षा बिगबॉसनं स्वतःच डायरेक्ट मेघाला बाद करायचं होतं. कशाला उगाच ताकाला जाऊन भांडं लपवायचं?

Rofl Rofl Rofl

काही भक्त किती आंधळे असतात नाही Biggrin

तुनळी वरची सुशांत जुई भूषण क्लिप बघितली
ती बघून खात्री च होतीये की बिबॉ आधीपासूनच स मे पु च्या फेवर मधे आहेत
फक्त सुशा जुई राजेश आस्त्या भूषण रेशम किती वाईट हे दाखविले पण त्यांना तसे वागायला प्रोवोक केले ह्या तिघां ने हे नाही दाखविले , मग तेच वाईट दिसले

सई बाबत जे ह्यांनी बोलले ते खरे मानले तर ती खूप चिप आणि डेस्पो वाटते,

Watch 9:05 onwards , caller swapnil Kale reveals all details ! >>>
पाहिला आणि ऐकलं. ".. मी मेघाला सांगितलं की २०१४ मधे जशी मोदींची लाट आली होती, तशीच सध्या तुझी लाट आली आहे".. इथपर्यंत ऐकलं, त्यापुढे नाही. कारण हा कॉल खरा असेल तर तो टेलिकास्ट न होण्याचं कारण समजलं ! Wink

डिज्जे, मस्त आहे तो व्हिडिओ. तू सांगितल्यापासून मी देखिल ऑनेस्टली इन्सेनचे व्हिडिओज फॉलो करतेय. मस्त आहेत ते दोघेही - राजेश आणि विकास.

मामी,
ते बोलावतीलच, आपणही बोलवु Happy
माझी मैत्रीण म्हणे आज सकाळी वुट वर आलाय तो फोनकॉल , देशातल्या लोकांनी चेक करून सांगा आलाय का !

खरी deserving तर मेघा ch आहे पण काल आणलेल्या फालतू ज्योतिषाच्या अनावश्यक bhavishyamule वाटतंय की पुष्कर जिंकेल की काय... तुम्हाला कोणाला नाही वाटले का तस?

माझी मैत्रीण म्हणे आज सकाळी वुट वर आलाय तो फोनकॉल , देशातल्या लोकांनी चेक करून सांगा आलाय का ! >> मी वरवर पाहिलं, अजून तरी नाही दिसलाय.

काल आणलेल्या फालतू ज्योतिषाच्या अनावश्यक bhavishyamule वाटतंय की पुष्कर जिंकेल की काय.... +१

मेघा किंवा स्मिताच जिंकायला हव्यात..स्मिता खुप नाही आवडत पण मेघा नंतर सेकंड प्रेफरन्स तिलाच..
आस्तादला काल बरोबर सांगित्लं अ‍ॅटिट्युडबद्दल...बळ्च फिनालेला ढकललय त्याला.. चेहेर्यावर मगरुरीचे भाव कायम..

पाहिला आणि ऐकलं. ".. मी मेघाला सांगितलं की २०१४ मधे जशी मोदींची लाट आली होती, तशीच सध्या तुझी लाट आली आहे".. इथपर्यंत ऐकलं, त्यापुढे नाही. कारण हा कॉल खरा असेल तर तो टेलिकास्ट न होण्याचं कारण समजलं >>> कॉल
नाही दिसला पण त्यांच्या discussion मधे स्वप्निल काले औरंगाबाद यांच नाव आल.पुष्कर खूप insecure झालेला दिस्तोय. त्या कॉल नन्तर आस्ताद म्हनतोय की मी वर्षभर जाणार नाही औरंगाबाद ला मेघा चा फैन मला शोधुन मारेल.

Checkout Discussing cities of Maharashtra! on Voot https://go.voot.com/cKtXf2lTAO

हा कॉल फ़ेस बुक वर पण viral होतोय.

मला तर तो सई ला आलेला कॉल पं आवडला त्या caller ने विचारल की मेघा मैत्रीण म्हनून तुला सर्व सान्गते अणि तु सर्वांंन्ना का संगतेस. सई ने सावरुन न्यायचा प्रयत्न केला की तस काहि नाही आमच्यात मी पूश्कि ला सांगू शकते n ऑल. पण त्या caller ने हेका सोडला नाही आणि म्हणालि की पुष्कर लाच नाही तर तु बाकिच्यांंना पण सान्गतेस. तेव्हा सई ने लगेच मी कधी सान्गते करुन विसरन्याच नाटक केला Lol पण मेघा काय समजायच ते समजून गेली .

https://youtu.be/Z-_A8tUkAlY
रे ला अजुनही आश्चर्य वाटतय स्मिताऐवजी ती कशी काय बाहेर पडली?.
मेघा फेक नाहीये म्हणतीये चक्क..!!

रेशम काँस्पिरसी थियरी नुसार रेशम गेली बाहेर.. Proud पण ती आधी म्हणली तसे डिग्निटी व ग्रेस ठेवून. बि बॉ जिंकण्याची भूक तिच्यात कधीच दिसली नाही हे खरेच. पण कायम स्वताच्या टीम शी व गेम शी लॉयल खेळली.
बाकी एक तर ममा कं मायबोली वाचतात किंवा जासूस कं ईथले फीड्बॅक आत पोहोचवत असावेत. नाहीतर अचानक ८० दिवसांनंतर जुई, भूषण, सु. कं ने सई पुष्कर ची मिडीया मध्ये पोल खोल केल्यावर सई चे त्यांच्या बाबतीत मी चुकले वगैरे ई. फेक ऊपरती होणे हे अगदीच ऊघड डॅमेज कंट्रोल होते. शेवटी मुली ने दिवे लावले म्हटल्यावर लोकुर कं कडे दुसरा पर्याय नाही.
मेघा चे देखिल तेच... गेले दोन आठवडे (गिल्ट मोमेंट..!) तीचे फॅन्स डेमेज कंट्रोल मोड मध्ये गेले. त्यात काल रेशमच्या पाया पडणे वगैरे तर फारच हास्यास्पद किंवा केविलवाणे होते. जो बूंद से गई वो हौद से नही आती...!
त्यातही स्मिता बद्दल सार्वत्रिक गुड विल बघता खुद्द ममां ना ते मान्य करावे लागले ते ऐकून मेघा कं अजूनच घाबरलेली दिसते.. बि बॉ ला मेघाने कंटेंट दिला मात्र गुड्विल स्मिता ने मिळवले.
आता आस्ताद सेफ झाल्याने अजून घबराट झालेली दिसते. पुन्हा पुन्हा तेच जुने रेफरेंसेस व मेघा चा प्रचार नव्याने सुरू झालेला दिसतो.
'स्वप्निल काळे' नामक कॉल ईथे व्हायरल करायचा ऊद्देश स्पष्टच आहे.
तेव्हा मेघा ला वाचवायचे तर पुढील बळी शर्मिष्ठा चा देणार बहुतेक.. कारण स्मिता ला तूफान मते पडत आहेत आणि आस्ताद सेफ झाल्याने आता रेशम व आस्ताद साठीची सर्वच मते तिलाच मिळणार. ऊलट मेघा, सई, शर्मिष्ठा यांच्यात मते विभागली जाणार. रेशम ने एकाच दगडात (तिला दिलेली पॉवर) असे अनेक पक्षी टिपले आहेत! वेल प्लेड!
रच्याकने: पुष्कर बि बॉ जिंकणार असे मेसेजेस फिरत आहेत.. मात्र सई आणि पुष्की यांच्यात गोष्टि पुढे गेल्या आहेत अशी शंका आहे..

चॅनल भैसाटले आहे. इतके शेवटच्या स्टेजला पोहोचल्यावर शो जास्त इन्टरेस्टिंग होण्याइअवजी ड्रॅग होतो आहे . सगळ्या आयडिया संपल्या यांच्या. त्या उपाध्ये ना आणले होते की एकदा, पुन्हा काय ज्योतिषी! स्पर्धकांनादेखिल त्याची वायफळ बडबड ऐकून कंटाळा आल्या सारखा वाटला Happy महा बोरिंग एपिसोड.
रेशम च्या आठवडाभराच्या आणि कालच्या पण बोलण्यावरून वाटले की तिला अन आस्ताद ला अजूनही अंदाज नव्हता स्मिता त्यांच्याहून जास्त लोकप्रिय असेल याचा. तुमच्यासोबत फिनले मधे चॉइस दिला तर कुणाला न्याल तर आस्ताद म्हणे स्मिताला कारण मग मी जिंकायचा चान्स जास्त असेल !

मस्ताद फायनल ५ ला पोहोचला.
स्मिता जिंकावी असं मला वाटतंय.
पुष्क्या ऑव्हर कॉन्फिडन्टली आईला सांगत होता की मी ट्रॉफी घेऊन येतो. तोंड बघ. काही जिंकणार वगैरे नाही तो.
इव्हन मेघा पण जिंकू नये असं मला वाटतं. स्मिता, अस्ताद पैकीच कुणितरी.
शर्मिष्ठा मला ओके वाटत होती, पण तिने स्मिताला दिलेला धोका पाहून ति मनातूनच उतरली.

काही कंटेंट न देता,टास्क अर्ध्यातून सोडून ही म मां कडून रे चं कौतुकच झालय कायम व सो मि वर त्यांना व big boss ला यासाठी भरपुर शिव्या पडल्यात.
सो आम्ही अनफेअर नाही हे दाखवण्यासाठी रे ला बाहेर काढलं bb ने.
आ च्या व तिच्या मतांमधे फार काही फरक नव्हता म्हणाले म मा.सो प्रेक्षकांचा कल कळल्यामुळे घाबरुन रे ने आ ला सेफ करुन घेतलं...कारण त्याला पाठिंबा देणारं आता कोणीच नाही..
btw रे चे प्रवास संपल्या सांगितल्यावर आ दादाचा चेहरा का असा झाला एरंडेल प्यायलासारखा?तो बाहेर का निघुन गेला?
रे ताईला बाहेर घालवायची घाई झाली होती का Lol
निघ बाई आता.. खुप तै तै खेळलो आपण..

हे मिडविक एलिमिनेशन अजुन बाकी आहे का?विडिओ फिरतोय युट्युब वर. का तो जुना आहे विडिओ?

शर्मिष्ठा बावळट आहे. मै तुलसी तेरे आंगन की असे ममां नी म्हटले त्यात काही अतिशयोक्ती नाही. ती पण विनर नसून फॉलोअर कॅटेगरी आहे.
सई- पुष्कीचे प्रकरण मैत्रीच्या केव्हाच पुढे गेले आहे याच्याशी सहमत. काल हम दिल दे चुके वगैरे ऐकून आता घरी जाऊन चपला खाणार पुष्की असेच वाटले.
हो मिड वीक एलिमिनेशन होणार आहे या आठवड्यात. काहीतरी फडतूस स्कूल टीचर टास्क दिसला प्रिव्ह्यू मधे.

>>शर्मिष्ठा मला ओके वाटत होती, पण तिने स्मिताला दिलेला धोका पाहून ति मनातूनच उतरली.
नंकी तिला म्हणला होता की तीचे मेघाच्या हातचे xxx होईल बाकी काही नाही. ती एक पाऊल पुढे गेली.. मेघा कडून बॅक स्टॅबिंग, चिटींग चा ४ आठवड्यात क्रॅश कोर्स घेऊन पुढे गेली.. आता खरे तर हाच गेम तिने मेघा बरोबर खेळला पुढील आठवड्यात तर मजा येईल. असेही सई आणि पुष्की मेघा ला मत देणार नाहीत्/वाचवणार नाहीत... एखादा एलिमीनेशन चा टास्क आलाच तर ते मेघाला एलिमीनेट करायला बघतील.
थोडक्यात पुढील आठवडा मेघा साठी अतीशय धोक्याचा व स्मिता साठी फायद्याचा ठरू शकतो.. मेघाने ८० + दिवस जो डोलारा स्वताच्या हाताने रचला तो तीच्याचा चूकीमुळे आता कोसळणार की काय अशी लक्षणे आहेत.
काल आलेले व्यक्ती हे ऊपाध्ये नसून एक सन्माननीय व सर्वमान्य असे जग प्रसिध्द ज्योतिषी संदीप अवचट होते. he is well respected.. he was approached by Barack Obamas' team during election for consulting.. he predicted 2 terms for Obama and he was the ony one who predicted Trump to become President. खेरीज त्यांनी काल सांगितलेले व दिलेली माहिती खूपच छान होती.. सर्व स्पर्धक ऊत्सुकतेने ऐकत होते. ग्रह वा पत्रिका हे भविष्य ठरवत नाहीत तर crunch time मध्ये निर्णय व कृती कुठल्या दिशेने ठवेली यश मिळू शकते या बद्दल मार्गदर्शन केले. शरद ऊपाध्ये स्टाईल नुसते चेहेरे बघून स्वभाव, भविष्य यांच्या मसालेदार गप्पांपेक्षा अवचट यांचे नाव बर्‍यापैकी गांभीर्याने व क्रेडिबिलिटी ने घेतले जाते.
असो. भविष्य, पत्रिका, ज्योतीष वगैरे ईथे नकोच.. पण पोस्ट करताना आधी सर्व माहित करून घेऊन मग पोस्ट केले तर बरे.

he predicted 2 terms for Obama and he was the ony one who predicted Trump to become President. >> Happy Happy
माहिती घेण्याचा प्रश्न नाही, तेच काल सांगत होते की ओबामांनी मला कन्सल्ट केले आणि ट्रम्प चे भविष्य मी सांगितले असे. (मीच एकट्याने सांगितले असे ते स्वतः पण म्हटले नाहीत Happy ) पण असं आहे की उपाध्ये काय अन हे काय. ज्योतिषी म्हटले की याहून जास्त रिस्पेक्ट ने मी विचार करू शकत नाही Happy आणि त्यांचे कालचे बोलणे काहीही इन्साइटफुल वाटले नाही.

@ दक्षिणा:
बि बॉ संपल्यावर आस्ताद बद्दल तुझे वैयक्तीक मत काय आहे ते ऐकायला आवडेल.. झोपाळ्यावर बसल्याप्रमाणे गेल्या काही आठवड्यात तुझे मत चांगलेच झुलले आहे.. Wink
किंवा भुंग्या ला विचारून खास मायबोली साठी त्याचा एक पोस्ट बिबॉ ईंटरव्ह्यू घेऊन टाक.
रच्याकने: तो गातो मस्तच.. आकारांमधील थोडा धूर सोडल्यास! Happy

https://youtu.be/Z-_A8tUkAlY
रे इथे म्हणतेय की' मला वाटलं नव्हतं बाहेर जाईन' पण bb house मध्येतर म्हणत होती की 'मला काल संध्याकाळपासुनच वाटत होतं की मी बाहेर जाईन'.सर आस्ताद काळे काल खुपच overacting करत होता आणि रे जाताना फुकनळ्या नेईल म्हणून आधीच garden मध्ये गेला.स्मिता-मेघा-शरा जाव्यात फायनलला.☺

आस्ताद ने बि बॉ मधे म्हन्टलेली गाणि एकत्रीत पणे कुठ ऐकायला मिळतील?

रेशम चा मुलखतीचा व्हिडिओ पाहिला आत्ता. राजेश सोबत प्युअर फ्रेन्डशिप च होती म्हणाली Happy क्या बोलनेका. स्मिता ला त्या दोघांपेक्षा जास्त वोट मिळाली हे अजूनही झेपलेले दिसत नाहीये.

रेशम चा मुलखतीचा व्हिडिओ पाहिला आत्ता. राजेश सोबत प्युअर फ्रेन्डशिप च होती म्हणाली Happy क्या बोलनेका. >>
याचा अर्थ "ती" सगळी तिची अ‍ॅक्टींग स्किल्स होती :-)....

आजच्या भागात सई न पुष्की परत मेघा वर चिडलेत म्हणे....का तर तिने त्यांचे फोटो फाडले...
येडे झालेत का ? त्यांनी मेघा चा फोटो फाडला तर फेअर न तिने फाडले तर लगेच चिडायचं...म्हणजे तुम्ही राजरोस पणे तिला सांगणार की आम्ही एकमेकांना च सपोर्ट करणार न तिने स्वतः चा सपोर्ट वेगळी कडुन मिळवायचा प्रयत्न केला की लगेच चिडाचिडी...मेघा ने आता प्लीजच त्याना भीक घालु नये...

सई न पुष्की चं सो कॉल्ड हेल्दी फ्लर्टींग बघुन आता हसायला येत आहे..बर ते दोन्ही साईड्ने असतं तर ठीक होतं..
पण सई अतिच जास्त सिरीअस झालिये न पुष्की तिला फक्त वापरुन घेत आहे हे बघुन अजुन जास्त करमणुक होते आहे...

सई ने "चाफा बोलेना चाफा चालेना" गायलं तसं तिला घराबाहेर आल्यावर...
"पुष्की बोलेना, पुष्की भेटेना ,
पुष्की काही केल्या मला भाव देइना" असं गायची वेळ येईल बहुतेक

Pages