बिग बॉस - मराठी - विजेती मेघा धाडे चे हार्दिक अभिनंदन

Submitted by दक्षिणा on 9 July, 2018 - 10:07

बिग बॉस मराठी, लोकांनी आवडिने पाहिले, हिरिरीने वाद घातले, आवडत्या स्पर्धकाला पाठिंबा दिला.

या आधीच्या भागाची लिन्क https://www.maayboli.com/node/66376/

अनेक स्पर्धक आले, पाहुणे आले आणि गेले.

उरली फक्त मेघा धाडे.

me_201807110053.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रेशमचा पोस्ट एलिमिनेशन इंटर्व्हू तिनं अजूनही मुर्खांच्या नंदनवनातच बसून दिलाय का?

म्हणे मला अ‍ॅक्सेप्ट करता येत नाहीये की मी एव्हिक्ट झाले आणि वर म्हणतेय की ऑडियन्सला पण हे पचायला कठीण जात असेल. अजूनही म्हणे लोकं विचार करत असतील की स्मिता कशी राहिली आणि मी कशी काय बाहेर आले? तिच्या बोलण्यावरून ती आणि अस्ताद अगदी धरूनच चाललेले की स्मिता जाणार. ती तिघांच्यात वीकेस्ट आहे असं वाटलेलं रे ला. वाच बाई वाच सावकाशीनं सोमि वाच मग कळेल तुला (कदाचित).

राजेश आणि तिचं नात समजण्यात म्हणे लोकांनी थोडी चूक केलीये. ते जे काय होतं ते म्हणे नॉर्मल आणि प्युअर फ्रेंडशीप होती. आत्तागं बया!

म्हणे नॉर्मल आणि प्युअर फ्रेंडशीप होती. आत्तागं बया!>> इथे कुणीतरी नाहि तरी म्हटलच होतं ना बेड शेअरींगच काय...तशीच हि तिची प्रतिक्रिया.. शिवाय मांडीवर बसणंहि सहजच असतं ना सगळ्यांना.. मग अजुन काय.

योग,
अगदी पहिल्यांदा मला अस्ताद खूप आवडत होता. पण इकडे त्याचं वागणं बोलणं कधी कधी खूप खटकलं. त्यामुळे आवडण्याची डिग्री कमी झाली आहे. Happy
पण तो फायनल ५ मध्ये गेला ते मात्र मला छान वाटलं.
काल मला अचानक असं वाटलं की सई मेघा पुष्कर, सई मेघा पुष्कर, सई मेघा पुष्कर खूप झालं यार. या पैकी खरंच कुणीच फायनल ला जायला नको. Sad

btw रे चे प्रवास संपल्या सांगितल्यावर आ दादाचा चेहरा का असा झाला एरंडेल प्यायलासारखा?तो बाहेर का निघुन गेला?
रे ताईला बाहेर घालवायची घाई झाली होती का >>>> मला वाटल, तो 'सासरला ही बहिण निघाली, भावाची ही लाडी' या मोड मध्ये होता. रेशमतै जाणार याचे दु:ख लपवण्यासाठी तो बाहेर निघून गेला असावा. Lol पण भावाने फोटा मात्र बहिणीचाच फाडला . Uhoh

उपाध्येन्नी मेघाची रास Leo सान्गितली होती, पण अवचट मिथुन म्हणाले! Uhoh

सई म्हणे समजुतदार, आदर्शवादाकडे झुकणारी, विचार करुन बोलणारी.

बादवे आज 'आज काय स्पेशल' मध्ये शरा आली होती. म्हटल हि इथे कशी काय? हिच एलिमिनेशन कधी झाल? नन्तर कळल, तो गेल्या वर्षीचा एपिसोड होता. साडी मात्र कालचीच होती.

स्कूल टास्क प्रोमोवरुन तरी एन्टरटेनिन्ग वाटतोय. बघुया.

>>योग,
अगदी पहिल्यांदा मला अस्ताद खूप आवडत होता. पण इकडे त्याचं वागणं बोलणं कधी कधी खूप खटकलं. त्यामुळे आवडण्याची डिग्री कमी झाली आहे
ओक्के! बदाम चा पिस्ता झालाय का? Wink

>>सई मेघा पुष्कर खूप झालं यार. या पैकी खरंच कुणीच फायनल ला जायला नको. Sad
तसं काही झालं तर अवघे भूमंडळ डळमळेल.. जमिन ममां ना पोटात घेईल, कलर्स मराठी वाहिनी ढगात जाईल, वगैरे वगैरे..

असो. कलर्स वर सूनध्यान बच्चे कं पर्व येतय.. लेगच झी मराठी ने गायन सम्राट पर्व घोषित केले आहे...! मला तर वाटलं होतं झी वाले 'मी बॉस' वगैरे असा काही कार्यक्रम काढतील. पण पेटंट, लायसंस वगैरे आड येत असावं.

फिनालेला गेलेले दोघेही ढकलगडी आहेत.... फुल्ल जुगाड करुन त्यांना तिथे पोहोचवलेले आहे!
फिनालेला असे लोक हमखास गळपटतात!
सो उरलेल्या लोकांना चांगला चान्स आहे!

बाय द वे: ते सुशांत आणि चमूपण म्हणाले की मेघाबद्दल आम्हाला काही प्रॉब्लेम नाही, चक्क रेशमपण बाहेर आल्या आल्या म्हणाली की मेघा फेक नाही पण इथल्या काही आयडींचा मेघाद्वेष काही संपायच नाव घेत नाही!
नेते गळ्यात गळे घालून फिरतात अन कार्यकर्ते नडत बसतात तसे झालेय लोकांचे!

नेते गळ्यात गळे घालून फिरतात अन कार्यकर्ते नडत बसतात तसे झालेय लोकांचे!>>>> करेक्ट्ट्ट Lol
शो संपल्यावर कुठे कुठे पार्टी करायची हे पण ठरलं असेल त्यांचं...आणि आम्ही इथे भक्त-विभक्त(?) तलवारी उपसतोय. Uhoh

https://go.voot.com/7m1kMdEgBO

ही वरची लिंक बघा, हे sai ani पुष्कर पण काय गोड गोड मैत्री वाले वाटत नाहीत.. पुष्कर sai ला म्हणतो कसे आपण एका sipper मध्ये पाणी पितो ना खि खि खि... पोराचं लक्षण पण काही बर दिसत नाही.. त्यांना वाटतं आपली pure फ्रेंडशिप लोकांना खुपच आवडते.. पण खरच कोणीतरी यांना सांगा रे की आता आम्ही बोर झालोय...

नाहीतर काय. सई-पुष्करला तर एका फ्रेममधे पण बघवत नाही आता. रेशम-राजेशला बोलून दमली सई. ममांनी सरळ सांगितलंच ना पुष्करला. जरा बाकी लोकांशी पण बोलत जा.

तो 'सासरला ही बहिण निघाली, भावाची ही लाडी' या मोड मध्ये होता. >> Rofl

रेशमचा पोस्ट एलिमिनेशन इंटर्व्हू तिनं अजूनही मुर्खांच्या नंदनवनातच बसून दिलाय >> अगदी अगदी Happy राजेशसोबतच्या रिलेशनशिप बद्दल तर तिला आणि बर्‍याच लोकांना स्मृतीभ्रंश झाला असावा असे वाटतेय Happy
कलर्स च्या पेज वर सई- पुष्कीचा व्हिडिओ आहे एक. सई म्हणतेय उश्या शिवायच्या टास्क मधे मेघाने पैसे खोटे मोजले आणि बिबॉ ला रक्कम जास्त सांगितली. आय वॉज किनई सो शॉक्ड बर्का. मला नाही असं खोटं पटत वगैरे, मग लगेच पुष्कीला सात्विक संताप आला Happy अरे मग त्यानंतरच ती कॅप्टन वगैरे झाली ना? एवढी खर्‍याची चाड होती तर तेव्हा का नाही बोलली हे?

सईचं कसं आहे की ती एक वय वाढलेलं लहान मूल आहे. फक्त स्वार्थ कळतो तिला. मेघानं दरवेळी हिच्या चुका पोटात घालायच्या पण हिनं मेघानं केलेली एकच चूक किती ताणून धरली आणि त्यावेळेपासून खरे रंग दाखवलेत.

मला वाटत अता स्पर्धा मेघा वि.. सई, पुष्कर आहे...
अशी आशा आहे की मेघाला आता तरी निट समज येईल व ती चांगल खेळेल..
मेघाने शर्मीष्ठा व स्मीताशी एकत्रीत येउन बकीच्याना बाहेर काढायला हव...

आता इथून पुढे आस्त्या, सई आणि पुष्की हे लाँग हगर्स एकत्र राहतील असे मला वाटतेय. Happy
आणि मेघाने माफी मागणे, पाया पडणे, माझी माण्सं, प्रेम वगैरे फालतू प्रकार सोडून डोके जागेवर ठेवून फुल्ल फोर्स ने स्वतः साठी खेळलेले तिच्या फॅन्स ना जास्त आवडेल असे वाटते. गेले २-३ आठवडे मला स्वतः ला तरी तिचा गेम झेपलेला नाही.

मेघाच्या बाबतील बोलायचे तर आ सारखा दुश्मन परवडला पण सई सारखी मैत्रीण नको. तो नवीन व्हिडीओ बघितला स पु चा, मेघा प्रत्येकवेळी कशी वाईट खेळली task तो. सई फार इमानदारीत, प्रामाणिकपणे खेळली ना सर्व.

सईचं कसं आहे की ती एक वय वाढलेलं लहान मूल आहे. फक्त स्वार्थ कळतो तिला. मेघानं दरवेळी हिच्या चुका पोटात घालायच्या पण हिनं मेघानं केलेली एकच चूक किती ताणून धरली आणि त्यावेळेपासून खरे रंग दाखवलेत. >>> अगदी अगदी.

पुष्की सईडे मला पूर्वीपासून बोअर होतात मीन्स healty flirting, हे मी मागेही सोशल मिडियावर लिहिलं fb वर तर एकाने मला आम्हाला आवडतं असं लिहिलं, आता तेच लोक्स लिहितायेत डोक्यात जातं Lol

रे रा तर पार डोक्यात जायचे, पण रा गेला लवकर बरं झालं.

हल्ली मी fb वर लिहायचं सोडून दिलं.

मेघाने माफी मागणे, पाया पडणे, माझी माण्सं, प्रेम वगैरे फालतू प्रकार सोडून डोके जागेवर ठेवून फुल्ल फोर्स ने स्वतः साठी खेळलेले तिच्या फॅन्स ना जास्त आवडेल असे वाटते. गेले २-३ आठवडे मला स्वतः ला तरी तिचा गेम झेपलेला नाही.

नवीन Submitted by maitreyee on 16 July, 2018
>>>>>>>>>>>>>>>>>>.

पुर्ण सहमत....

मेघाने माफी मागणे, पाया पडणे, माझी माण्सं, प्रेम वगैरे फालतू प्रकार सोडून डोके जागेवर ठेवून फुल्ल फोर्स ने स्वतः साठी खेळलेले तिच्या फॅन्स ना जास्त आवडेल असे वाटते. गेले २-३ आठवडे मला स्वतः ला तरी तिचा गेम झेपलेला नाही. >> अगदी अगदी.

>>आणि मेघाने माफी मागणे, पाया पडणे, माझी माण्सं, प्रेम वगैरे फालतू प्रकार सोडून डोके जागेवर ठेवून फुल्ल फोर्स ने स्वतः साठी खेळलेले तिच्या फॅन्स ना जास्त आवडेल असे वाटते. गेले २-३ आठवडे मला स्वतः ला तरी तिचा गेम झेपलेला नाही

अगदी अगदी!
पण आतल्या आत वोटआउट वोटआउट खेळले गेले तर लोकांच्या गुडबुकात असलेले बरे असा होरा असावा तिचा!
बाहेरची काळजी नसावी तिला.... आतल्यांना संधीच हवीय तिला बाहेर काढायची..... ती मिळू नये हा प्रयत्न दिसतोय तिचा!

काल आलेले व्यक्ती हे ऊपाध्ये नसून एक सन्माननीय व सर्वमान्य असे जग प्रसिध्द ज्योतिषी संदीप अवचट होते. >>>> योग, आपलीच वाचण्यात गल्लत झालेली दिसतेय. मैत्रेयी यांनी “ त्या उपाध्येना आणले होते की एकदा, पुन्हा काय ज्योतिषी!!” असे लिहीले आहे.

आता trump जिंकल्यावर आम्हीपण खुप पैजा जिंकल्यात Happy आणि कालच predict केल्यानुसार France पण जिंकला तर आम्हालापण सर्वमान्य जोतिषाचार्य म्हटलं तर चालतंय काय... Wink

ज्योतिषाने बोर केलं. रेशम बाहेर होणार आधीच कळलेलं, सो त्यात इंटरेस्ट नव्हता. तिथे तिला संध्याकाळपासूनच जाणवत होतं , पण बाहेर आल्यावर मात्र तिला वाटलंच नव्हतं ती बाहेर येईल.
त्या बहुचर्चित फोन कॉल नंतरची चर्चा आत्ता पाहिली. पुष्कर जळून खाक झालाय. कोणी मेघाला चांगलं म्हटलेलं पण सहन होईना त्याला. त्याला आणि आस्तादला गिफ्ट मिळालंय तिकीट. तो नॉमिनेशनमध्ये आला असता तर खरंच त्याला रिऍलिटी चेक मिळाला असता. आस्तादला बऱ्यापैकी कल्पना अली असावी आता, स्मितापुढे तो कुठे आहे ते.
मेघा , स्मिता टॉप २ असाव्यात.

घरात नवीन दोन Trio बनणार असं दिसतंय. मेघा-शरा-स्मिता. कारण तिघींचं बरं जमतं आणि एकमेकींबद्दल फार काही तक्रारी नसतात. आणि पुष्कर-सई-आस्ताद. कारण तिघंही आक्रस्ताळे, सतत तक्रार करत राहणार, बाऊ करत राहणार आणि एकमेकांबद्दल असतील नसतील एवढ्या तक्रारी त्यांच्या उर्वरित तिघींबद्दल आहेत.
बिबाॅच्या आजपर्यंतच्या प्रवासात जवळजवळ सर्वच सदस्यांचे स्वभाव किंवा वागणूक 180° (चांगल्या अर्थाने) बदललेली दिसली. पण आ-पु-स कायम तसेच वागत राहिले. कायम किरकिरे. बाहेर सगळ्यात जास्त निगेटिव्ह रिव्ह्युज् मिळवणारे आणि त्यात सातत्य ठेवणारे हे तिघेच असतील.

घरात नवीन दोन Trio बनणार असं दिसतंय. मेघा-शरा-स्मिता. कारण तिघींचं बरं जमतं आणि एकमेकींबद्दल फार काही तक्रारी नसतात. आणि पुष्कर-सई-आस्ताद. कारण तिघंही आक्रस्ताळे, सतत तक्रार करत राहणार, बाऊ करत राहणार आणि एकमेकांबद्दल असतील नसतील एवढ्या तक्रारी त्यांच्या उर्वरित तिघींबद्दल आहेत.
बिबाॅच्या आजपर्यंतच्या प्रवासात जवळजवळ सर्वच सदस्यांचे स्वभाव किंवा वागणूक 180° (चांगल्या अर्थाने) बदललेली दिसली. पण आ-पु-स कायम तसेच वागत राहिले. कायम किरकिरे. बाहेर सगळ्यात जास्त निगेटिव्ह रिव्ह्युज् मिळवणारे आणि त्यात सातत्य ठेवणारे हे तिघेच असतील.
>>>>>> मेघा,स्मिता,शरा-आवडेल पाहायला पण loyalty माती खाते.

Voting Lines बंद आहेत!
म्हणजे आता आतल्या आत निर्णय होणार असेल तर मेघाचे अवघड आहे!
काय हा फालतूपणा आहे यार!

फुल्ल मनमर्जी चालू आहे!

Pages