Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
आमच्या पोट्ट्याचा एक मित्र
आमच्या पोट्ट्याचा एक मित्र पंजाबी आहे. तो मुलगा कधी खेळायला आला असेल आणि त्याला न्यायला त्याची आई आली तर, 'मेरा प्यारा बेटा...हो गया खेल के? आंटी को परेशान तो नही किया...' अशी सुरूवात करून मग हमखास 'कितनी देर हो गयी गले नही लगाया लाडले को, आजा बेटा मां को थोडा प्यार कर' असं लांबण लावते. ही आई माझ्यापेक्षा लहानच आहे वयानं पण तिला असे निरुपा रॉय डायलॉग मारताना ऐकून मला फार हसायला होतं. एकुणातच उत्तर भारतीय किंवा हिंदी भाषिक राज्यांमधले लोकं फार 'मिठी मिठी बातें' करतात. एकदम रोकठोक मराठी ऐकत-बोलत मोठं झालेल्या मला ते तसं बोलणं फार फेक वाटतं. कधी मजा वाटते, कधी इरिटेट पण होतं आणि १०-१२ महिन्यांच्या बाळाला पण 'आप' संबोधणार्या त्या लोकांना मराठी भाषा फार 'तू तू मै मै' वाटते.
अवांतर - बाय द वे इथे विशिष्ट
अवांतर - बाय द वे इथे विशिष्ट जाती चा थेट उल्लेख न करता कित्येकांनी जे किस्से लिहिलेत, त्याला अधोरेखित करत भभा यांनी एक काडीटाकू धागा उघडला होता जाती बद्दलचा... अॅडमिन नी तो उडवलेला दिसतोय.>>>>
आहे तो धागा. 'चालू घडामोडी -भारतात' मध्ये हलवला आहे.
आत्ता बघितलं, कुलूप लावलंय..
कितनी देर हो गयी गले नही
कितनी देर हो गयी गले नही लगाया लाडले को, आजा बेटा मां को थोडा प्यार कर >> किती गोड गिट्ट
आनंद आहे का तो धागा? धन्य आहे __/\__
बिपीन तुम्ही "आठ आण्यात लग्न"
बिपीन तुम्ही "आठ आण्यात लग्न" बद्दल म्हणताय का?
<<<फिनलॅंड. सहकारी हंगेरियन
<<<फिनलॅंड. सहकारी हंगेरियन आहे आणि त्याची मैत्रीण फिनिश.
>>>
अच्छा. फ्रेंड्स बघताना हा विचार मनात आला होत कि एवढे फटाफट डेटिंग, सेक्स, लग्नं, घटस्फोट, एकल पालक वगैरे खरंच तिकडे होत असेल का?? मग म्हणलं छया आपले चित्रपट, मालिका बघून भारतातल्या लोकांबद्दल अंदाज करता येतो का मग तिकडेपन तसंच असणार....
पण थोडाफार अंदाज आला इथले प्रतिसाद वाचून.
>> मावशीच्या गावी गेले होते.
>> मावशीच्या गावी गेले होते. तीथे बाजुच्या घरात लग्न कार्य होते.
गावाकडचे "लग्नातले जेवण" कल्चर आठवले. खूप खूप वर्षे झाली. आता कदाचित परिस्थिती बदलली असेल माहित नाही. पण लहानपाणी असे जेवायला बोलवायचे आणि पुरणपोळी, लाडू सोडले तर बाकी तिखटजाळ जेवण. मला तिखट अजिबात सहन होत नव्हते. हाल हाल व्हायचे. एकदा एका मित्राने त्याच्या घरचे कार्य म्हणून बोलवले आणि मी स्पेशल म्हणून मला बाहेर बाकीच्यांच्या पंगतीत न बसवता आत चुलीसमोर पाट घालून जेवायला बसवले. आणि हा गेला बाहेर इतर पाहुण्यांची सरबराई करायला. समोर दोन चुली. त्यावर मोठी भांडी रटरट करत होती. झाले. आधीच झणझणीत तिखट. त्यात आणि उन्हाळा. त्यात भरीला चुलीची धग. वाढणारा आग्रह करून वाढत होता. थोड्याच वेळात माझे अक्षरशः हाल हाल सुरु झाले. नाकाडोळ्यातून पाणी. बोंबाबोंब. लग्नाच्या घरात बसून मी रडत आहे असे जाणायेणाऱ्याला वाटत होते. एक त्या छोट्या लाडवाचाच काय तो आधार होता
(आताची परिस्थिती माहित नाही. पण त्या काळात एकंदर खेडेगावातले लग्नाचे कल्चर मला कधीच आनंददायी वगैरे वाटायचे नाही. कारुण्यच जास्त वाटायचे. विविध कारणांसाठी. पण वेगळा विषय आहे तो).
पु. ल. - सौम्य नास्तिक
पु. ल. - सौम्य नास्तिक
सुनीता बाई - कट्टर नास्तिक
सुनीताबाईंच्या आई - कट्टर आस्तिक
सुनीताबाईंचे वडील - सौम्य आस्तिक
तर सुनीताबाई आणि पु.ल. यांनी लग्नाचा निर्णय घेतला. सारं काही धार्मिक पद्धतीने व्हावं असा सुनीताबाईंच्या आईंचा आग्रह तर सर्व धार्मिक कर्मकांडे टाळावीत असा सुनीताबाईंचा निश्चय. खरे तर सुनीताबाईंच्या मते तर लग्नाचीही गरज नव्हती. तसेच एकत्र राह्यला (आजच्या काळात लिव्ह इन रिलेशनशिप म्हणतात तसे) काय हरकत आहे? असाच त्यांचा आधीचा विचार. पण नंतर घरच्यांच्या आणि पुलंच्या आग्रहाखातर त्या लग्नाला तयार झाल्या हे नशीब. पण लग्न करायचे तर ते रजिस्टरच हे मात्र त्यांनी पक्के ठरवलेले. बरं हे सगळं सुनीताबाईंच्या माहेरी ... एका खेड्यात. जिथे मॅरेज रजिस्ट्रेशन ऑफिस वगैरे काहीच नाही. तेव्हा तालुक्याच्या गावी जाऊन नोटीस दिली. रजिस्ट्रेशन ऑफिसातले अधिकारी म्हणाले की आम्हाला सवड होईल त्यानुसार कधीही येऊ. त्यामुळे लग्नाचा मुहूर्तही नाही. मग कधीतरी एकदा ते ऑफिसर्स आले तेव्हा सुनीताबाई घरगुती साध्या वेशात तर पु.ल. बनियन पायजम्यावरच. त्यातही ते गोठ्यात काम करीत असल्याने हात शेणाने माखलेले. तशाच अवस्थेत लग्न लागलं. रीतीप्रमाणे काहीच झालं नाही म्हणून सुनीताबाईंवर त्यांच्या आई प्रचंड नाराज झाल्या.
पु. लं. चे सासरे कर्मकांडाविषयी फारसे आग्रही नव्हते आणि स्वतः पु.ल. देखील नास्तिक असले तरी सासु सासर्यांच्या समाधानाकरिता सर्व धार्मिक विधीला तयार होते त्यामुळे सासु सासरे त्यांच्यावर नाराज नव्हतेच. शिवाय सासरेबुवांना रात्री देवळात धार्मिक गीतांचा कार्यक्रम व्हायला हवा होता त्यालाही पु.ल. मोठ्या आनंदाने आणि हौसेने तयार झाले. इतकेच नव्हे तर स्वतःच बाजाची पेटी वाजवित त्यांनीच गाणीदेखील म्हंटली. या सगळ्यामुळे ते सासरेबुवांच्या गळ्यातले ताईत ठरले.
हा किस्सा मी "आहे मनोहर तरी" मध्ये वाचला नाही. बहुदा कुठेतरी पु.लंच्याच लिखाणात वाचला आहे आणि आठवेल तसा लिहिला आहे. इथे मांडण्यात थोडाफार फरक होऊ शकतो.
बिपीन चंद्र, मला वाटतं थोडा
बिपीन चंद्र, मला वाटतं थोडा गोंधळ उडाला आहे.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
सुनीताबाई खेडेगावात नाही, तर रत्नागिरी शहरात रहात होत्या. त्यांचे वडील निष्णात फौजदारी वकील होते. ते घरी येता येता रजिस्ट्रारला घेऊन आले. बाकी घरगुती वेशात वगैरे बरोबर आहे, पण पुलं गोठ्यात बिठ्यात काम करत नव्हते हो
आई रजिस्टर लग्नावर नाराज होती हे बरोबर आहे. पण दुरावा वाढला असा उल्लेख मला तरी आठवत नाही. मी आहे मनोहर तरी बर्याच वेळा वाचलं आहे.
आणि यात कल्चरल शॉक कुठे आहे?
उत्तर भारतीय किंवा हिंदी
उत्तर भारतीय किंवा हिंदी भाषिक राज्यांमधले लोकं फार 'मिठी मिठी बातें' करतात>> हा अनुभव मीही घेतलाय. एक जबलपूरची रूममेट होती. ती आमच्यासमोर तिच्या बॉयफ्रेंडशी फोनवर बोलताना " आपको भी ढेर सारा प्यार" हे वाक्य बोलली होती एकदा![Lol](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/lol.gif)
" आपको भी ढेर सारा प्यार" >>>
" आपको भी ढेर सारा प्यार" >>> अर्र्र्र्र्र्र!
बिपिन धन्यवाद किस्सा इथे लिहिल्याबद्दल.![Happy](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/happy.gif)
{{{ बिपीन तुम्ही "आठ आण्यात
{{{ बिपीन तुम्ही "आठ आण्यात लग्न" बद्दल म्हणताय का?
Submitted by सिम्बा on 28 June, 2018 - 18:42 }}}
होय. घटना तीच आहे पण इथे वेगळ्या शब्दांत मांडलेली दिसतेय.
http://web.bookstruck.in/book/chapter/50445
http://cooldeepak.blogspot.com/2008/01/blog-post_29.html
वावे,
मी वाचलेला किस्सा पु. लं. च्या शब्दातला होता त्यातले उल्लेख जरा वेगळे होते. रात्रीच्या गाण्यांत स्वतः नवरदेवाने पेटी वाजविणे वगैरे भाग वाचल्याचे मला खात्रीने आठविते आहे. सुनीताबाईंनी लिहिलेल्या वरच्या लिंकमधल्या किश्श्यात त्याचा उल्लेख नाहीये. धार्मिक विधी वगळून व मुहूर्त न पाहता केले गेलेले लग्न हा आजच्या काळीही अनेकांना कल्चरल शॉक वाटतो.
अर्थात हा ज्याच्या त्याच्या वाटण्याचा भाग आहे. मला तर अनेकदा लोक सायंकाळी सात नंतरही त्यांच्या घरी आलेल्या पाहूण्याला चहाचे विचारतात तेही धक्कादायक वाटते. अरे ही काय चहा प्यायची वेळ आहे?
रात्रीच्या गाण्यांत स्वतः
रात्रीच्या गाण्यांत स्वतः नवरदेवाने पेटी वाजविणे वगैरे भाग वाचल्याचे मला खात्रीने आठविते आहे>> हो हे मलाही आठवतंय. मला वाटतं ' गणगोत' मधे आहे.
आफ्रिकेत अनुभवलेले cultural
आफ्रिकेत अनुभवलेले cultural shock.
१) गल्लीतल्या किराणा सामनाच्या दुकानात सर्व प्रकारची दारू, कंडोम इ.
२) नवीन होतो तेव्हा मला बॉस ने बोलावणं पाठविले office girl कडे मला तिची भाषा येत नव्हती तर तिने चक्क माझा हात पकडून बॉस कडे नेलं. (परस्त्री चा पहिला स्पर्श)
३) मशीन मध्ये एका चा बोट गेला ( तुकडा) तरीही त्याच्या चेहऱयावर काही भाव नाही आणि त्याचा जोडीदार तोच तुकडा प्लास्टिक च्या पारदर्शक पिशवीत टाकून पूर्ण कारखान्यात फिरत राहतो.
४) आधी मूल मग लग्न
इतर हि आहेत पण ते येथे टाकू शकत नाही
पुलं गोठ्यात काम करत आहेत,
पुलं गोठ्यात काम करत आहेत, तेही हात शेणाने माखून वगैरे अगदीच कसेतरी झाले इम्याजिन्यून
पुलं गोठ्यात काम करत आहेत,
पुलं गोठ्यात काम करत आहेत, तेही हात शेणाने माखून वगैरे अगदीच कसेतरी झाले इम्याजिन्यून >>> ह्याच धाग्यावर कल्चरल शॉक बसला म्हणा की!![Wink](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/wink.gif)
पुलं गोठ्यात काम करत आहेत,
पुलं गोठ्यात काम करत आहेत, तेही हात शेणाने माखून वगैरे अगदीच कसेतरी झाले इम्याजिन्यून << ते ही सासर्यांच्या घरी ...
जोहान्सबर्ग आणि केप टाऊन मधे
जोहान्सबर्ग आणि केप टाऊन मधे कॅबची ड्रायव्हर स्त्री होती. हा धक्काच होता. पैकी केप ची जी होती ती मुस्लिम होती. तिने सांगितल्यावर समजले ते. राहणी भलतीच मॉडर्न होती. हा ही धक्काच.
>> आफ्रिकेत अनुभवलेले
>> आफ्रिकेत अनुभवलेले cultural shock
मी विचारणारच होतो अफ्रीका, चीन, कोरिया वगैरे मधले शॉक नाहीत का या धाग्यावर, तोच हे वाचले. बापरे!![Uhoh](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/uhoh.gif)
पुलंनी गणगोत मधे लिहिला आहे
पुलंनी गणगोत मधे लिहिला आहे त्यांच्या लग्नाचा किस्सा! काही गोठ्यात वगैरे काम करत नव्हते. आणि अगदी पुलं गोठ्यात काम करत आहेत, हात शेणाने माखलेत अशी कल्पना केली तरी त्यामुळे कसेतरी का वाटावे ? म्हणजे गोठा साफ ठेवणे आणि इतर उस्तवार जमते म्हणून कौतुक, आश्चर्य समजू शकते पण कसेतरी वाटणे ? माझ्यासाठी कल्चरल शॉक!
>> कॅबची ड्रायव्हर स्त्री
>> कॅबची ड्रायव्हर स्त्री होती. हा धक्काच होता.
अगदी अगदी. युरोपात बसच्या ड्रायवर स्त्रियाच बघितल्या अनेकदा. अगदी इंटरसिटी ट्रान्सपोर्टच्या सुद्धा. कल्चरल धक्काच होता.
(आताची परिस्थिती माहित नाही.
(आताची परिस्थिती माहित नाही. पण त्या काळात एकंदर खेडेगावातले लग्नाचे कल्चर मला कधीच आनंददायी वगैरे वाटायचे नाही. कारुण्यच जास्त वाटायचे. विविध कारणांसाठी. पण वेगळा विषय आहे तो). >> वेगळा धागा काढून लिहा मग याच्याबद्दल.
अमेरिकेत आल्यावरचे कल्चरल शॉक
अमेरिकेत आल्यावरचे कल्चरल शॉक अनेकांनी लिहिले आहेत त्यात माझीही थोडी भर... इतर वेळी शिंकल्यावर अगदी एक्स्क्युज मी म्हणत हाताला सॅनीटायझर लावायला पळणारे हे लोक भर मीटींग मधे, वर्गात वगैरे जोरजोरात नाक शिंकरतात. म्हणजे शिंकेसारख्या ज्या गोष्टी वर आपला कंट्रोल नसतो त्यासाठी माफी मागतात पण नाक शिंकरताना, जे पटकन बाहेर जाऊन करता येत, काही म्हणत नाहीत!.. तोच प्रकार "पर्सनल स्पेस" चा.. रांगेत उभे रहाताना दुसर्यापासून चार हात लांब थांबतात जेणेकरून त्याचा वाराही लागू नये. पण ह्यांच्या बाथरूम मधे जेमतेम उंचीचे स्टॉल अगदी शेजारी शेजरी असतात. दुसरा माणूस आपला कार्यक्रम उरकत असताना बाकि समस्त बाथरूमला त्याचा वास आणि आवाज सहन करावा लागतो!! अजूनही मला शेजारच्या स्टॉल मधे कोणी येऊन बसले कि प्रचंड ऑकवर्ड होते...
अवांतर - अनेक प्रतिसादात लोकांनी जाती चे उल्लेख केले आहेत. म्हणजे अमुक एका जातीचे सरळ नाव नाही घेतले पण "आरोपी" ची जात काढली आहेच. ह्याची खरच गरज आहे का? लोकांना आपण नुसते "लोक" म्हणून बघूच शकत नाही का? ते अमुक तमुक जातीचे असलेच पाहिजेत का? असतील काही घरात विचित्र लोक आणि पद्धती.. म्हणून त्यांच्या जातीचा उल्लेख करून इतर अनेकांना तोच शिक्का मारायचा का? अगदी सरळ तसे म्हणाले नाही तरी जातीचा उल्लेख केला कि तसाच अर्थ घेतला जातो ना? जातीचे भूत एवढे घट्ट बसले आहे आपल्या मानगुटीवर?
>> कॅबची ड्रायव्हर स्त्री
>> कॅबची ड्रायव्हर स्त्री होती. हा धक्काच होता.
पुण्यातुन रात्री सुटणार्या काही खासगी ट्रॅव्हल्सच्या ड्रायव्हर महिला आहेत. विशेष म्हणजे उत्तरेकडील राज्यांत जाणार्या या बसेसचा प्रवास १६ ते १८ तास असतो तेव्हा रात्रीची ड्रायव्हिंग या मुली करतात आणि दिवसा पुरुष.
पुलंच्या लग्नाचा गणगोतमधला
पुलंच्या लग्नाचा गणगोतमधला उल्लेख आहे तो बरोबर आहे. सुनिताबाईंचे वडील श्री. अप्पा (सदानंद महादेव) ठाकूर हे रत्नागिरीतले नामांकित वकील होते. रत्नागिरीतलं गोगटे जोगळेकर कॉलेज आहे त्याच्या शेजारीच त्यांचं घर होतं, जिथे आता 'सदानंद निवास' नावाची नवीन वास्तू आहे (तिथे कोण रहातं माहिती नाही. म्हणजे ठाकूर कुटुंबीयांची पुढची पिढी की अन्य कोणी हे माहिती नाही). त्याच रस्त्याच्या विरुद्ध बाजूला रत्नागिरीचं जिल्हा आणि सत्र न्यायालय आहे. तिथे श्री ठाकूर वकिली करत. पुल-सुनिताबाईंच्या लग्नाच्या वेळी त्यांनीच रजिस्ट्रारला घरी आणलं होतं. रजिस्टर पद्धतीने लग्न झालं आणि मनःपूर्वक शुभेच्छा-आशीर्वाद दिले गेले. संध्याकाळी सत्यनारायण झाला. त्यावेळी सतरंज्या घालायलाही नवा जावई मदतीला आला आणि त्याचंच सुरेख गाणंही झालं. यात कुटुंबीयांमधे दुरावा आल्याचा उल्लेख नाही.
असो. अवांतराबद्द्ल क्षम्स्व.
तेव्हा रात्रीची ड्रायव्हिंग
तेव्हा रात्रीची ड्रायव्हिंग या मुली करतात >>> बापरे.. धक्कादायक आहे
चौकट राजा,
चौकट राजा,
{{{ पण ह्यांच्या बाथरूम मधे जेमतेम उंचीचे स्टॉल अगदी शेजारी शेजरी असतात. दुसरा माणूस आपला कार्यक्रम उरकत असताना बाकि समस्त बाथरूमला त्याचा वास आणि आवाज सहन करावा लागतो!! अजूनही मला शेजारच्या स्टॉल मधे कोणी येऊन बसले कि प्रचंड ऑकवर्ड होते...}}}
या स्टॉल्सच्या दरवाजांना आतून कडीदेखील नसते. तसेच होस्टेल वगैरेमध्ये कॉमन बाथरुम म्हणजे अक्षरशः कॉमन असतात. एका मोठ्या बाथरुममध्ये आठ दहा शॉवर्स ओळीने चार चार फूटांवर असतात. मध्ये कुठलाही आडोसा नसतो. सगळे बिनधास्त बिनकपड्यांचे आंघोळी करत असताना एकमेकांना दिसतात. हाईट म्हणजे अशी होस्टेल्स स्त्री-पुरुष सर्वांकरिता कॉमन असतात आणि सगळे कॉमन वेळेत आंघोळ करत असतात. हे एखाद्याला अविश्वसनीया वाटू शकतं पण ते खरंय.
बाके सगळं ठीक आहे पण >> या
बाकी सगळं ठीक आहे पण >> या स्टॉल्सच्या दरवाजांना आतून कडीदेखील नसते. >> हे जरा अती होतय.![Rofl](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/rofl.gif)
चौकट राजा च्या पहिल्या पॅराशी
चौकट राजा च्या पहिल्या पॅराशी सहमत. अचाट प्रकार आहे. जेवताना ही करतात तसे अनेकजण इथे.
जेवताना ढेकर देणे भारतात चालते. किंबहुना ती पोचपावती आहे. इथे नाही. जेवताना नाक शिंकरणे इथे चालते. भारतात हाकलून देतील.
बाकी जातीचे उल्लेख गंमतशीर आहेत आणि मजेखातर केलेले आहेत. इतके सिरीयसली घेउ नका.
या स्टॉल्सच्या दरवाजांना आतून
या स्टॉल्सच्या दरवाजांना आतून कडीदेखील नसते. तसेच होस्टेल वगैरेमध्ये कॉमन बाथरुम म्हणजे अक्षरशः कॉमन असतात. एका मोठ्या बाथरुममध्ये आठ दहा शॉवर्स ओळीने चार चार फूटांवर असतात. मध्ये कुठलाही आडोसा नसतो. सगळे बिनधास्त बिनकपड्यांचे आंघोळी करत असताना एकमेकांना दिसतात. हाईट म्हणजे अशी होस्टेल्स स्त्री-पुरुष सर्वांकरिता कॉमन असतात आणि सगळे कॉमन वेळेत आंघोळ करत असतात. हे एखाद्याला अविश्वसनीया वाटू शकतं पण ते खरंय. >>>
हे जर तुम्ही स्वतः अनुभवलं असेल तर आयुष्यात पुन्हा कश्याचाच कल्चरल शॉक बसायला नको. 'आणि दर महिन्याच्या तिसर्या मंगळवारी तिथे सामुदायिक प्रेमालाप पण चालू असतो' असे काही वाक्य दिसेल असे वाटले पण भ्रमनिरास झाला. ![Proud](https://dk5wv51hv3hj1.cloudfront.net/files/smiley/packs/hitguj/proud.gif)
अगदी अगदी. शिंकलं... साधं सू
अगदी अगदी. शिंकलं... साधं सू सू (नाकाने) केलं की इनफेक्शन स्प्रेड नको व्हायला म्हणून घरी जा... सॅनिटायजर चोपडा. पण त्या नॅपकिनवर जोरदार नाक शिंकरणे इज टोटली ओके अॅट एनी प्लेस.
Pages