तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे कुत्रेवाले जे कोणी आहेत त्यांना मुम्बैत बोलवायला हवंय.>>>अगदी हेच्चं लिहीणार होतो. थोडे लोक आमच्याकडेही पाठवा.

नै ओ वत्सला ते आष्ट्रेलियातलंना... चैना चं चाल्लं व्हतं नैका?

कांगारू मी खाल्लाय, पण नेदरलँड मध्ये.
मी गाय, डुक्कर वगैरे काहीही खायला तयार असतो यावर खुश होऊन माझ्या डच मित्रांनी haggis नावाची स्कॉटिश डेलिकसी, घोड्याचं मटण असलेले सँडविच, कच्च्या माशाची sashimi असं कायबाय आवर्जून खिलावलेलं मला . कांगारू पण त्यातलाच
हे सगळं भारतातल्या लोकांना सांगितलं की त्यांना धक्का बसतो Happy

गीता जुलिया, विष्णु महमद नावाची माणस माझ्या ओळखीची होती.
<<
खलील मोडक, इजाज पाटणकर असली नांवे कोकणात आहेत.

फार पूर्वी केरळात पहिल्यांदा फिरायला गेलेलो असताना कोवालम बीचवरच्या एका हॉटेलात कालामारी नांव वाचले. हे काय विचारल्यावर त्या नमुन्याने 'लोकल फिश होता हय' असं उत्तर दिलं. म्हटलं नवा काय प्रकार आहेत ते पाहू.

तळलेला स्क्विड आणून दिला त्याने. आधी ऑक्टोपस वाटलेला.

अर्थात मला काडीचा फरक पडत नसला, अन चवीला छान होता, तरी मी हे काय खातोय हे पाहून काकू अन माझे सोबत असलेले मित्र/वहिनी कं. वॉज इन शॉक.

इथे पुण्यात ऍबसोल्युट बार्बेक्यू मध्ये ओकटोपस, इमू, ससा, बदक वगैरे खायला मिळतं.
मुंबईत मोहम्मद अली रोड वर भेजा फ्राय साठी मांडून ठेवलेले मेंदू बघुन धक्का बसलेला पण अंड्याच्या भुर्जी सारखा दिसणारा भेजा फ्राय फारच चविष्ट होता. तिथेच तितर की बटेर पण खाल्लाय
शार्क मासा आमच्या कोकणात सर्रास खाल्ला जातो यावर माझा एक वैदर्भीय मित्र विश्वासच ठेवायला तयार नव्हता.

धागा आवडला.
मला बसलेले काही सौम्य शॉक.
- नागालँड चे लोक कुत्रे खातात हे बच्याबच्या ला माहितीय. पण मला एक नागालँडी भेटल्यावर त्याने कुत्रा खत नाही असं सांगितल्यावर धक्का बसला होता.
- mp त केळी डझनच्या जागेवर किलोवर भेटल्यावर पण
छोटा शॉक बसला होता.
(माझा मायबोलीवर पहिला प्रतिसाद).

यावल, जळगाव भागातुन पण केळी किलोवर आणली आहेत आम्ही! यावलला तर दीड रु किलो ने केळी घेतली होती 1993 मध्ये...अर्थात तिथेच पिकतात म्हणून ! तो सगळा पट्टा केळीचाच...
दिल्लीत दूध किलोवर आणि गोडेतेल लिटरवर आणलंय.

अमेरिकेत वर्गामधे बाहेरुन जेवण आणुन वर्ग चालु असतांना मुलांना खातांना बघुन आश्चर्य वाटल होतं.>>आमच्या स.प.महाविद्यालयात(पुणे) भौतिकशास्त्राच्या सरांनी आम्हाला लेक्चरला यायला कितीही उशीर झाला तरी चालेल तसेच वर्गात यायला परवानगी घ्यायची काहीच आवश्यकता नाही त्यावर चालू वर्गात कधीही जेवण्/डबा खाऊ शकता असे सांगितले तेव्हा मोठा सुखद धक्का बसला होता Happy
एव्हढे चांगले सर तिकडे नाही टिकले....पी. एच डी करायला कॅलीफॉर्नीयाला गेले. Happy

किलो वरून आठवले.
मी कोल्हापूरात असे पर्यंत आम्ही कलिंगड कायम एक नग १० रुपये/२० रुपये असे विकत घेत होतो.
पुण्यात पहिल्यांदाच कलिंगड किलोवर विकतात हे पाहून मला शॉक बसला होता.

कोल्हापुरात दारात म्हैस आणून तिचे दुध निरसे प्यायला देतात
धक्का असा नाही पण तोवर गवळी दूध द्यायचा हे माहिती होते पण म्हैस अशी पाळतात आणि पिळतात ते पाहून गंमत वाटलेली आणि ते काहीही न मिक्स केलेले निरसे दुःध पिता पिता दमछाक झालेली. इतके चवदार दूध कधीच नाही मिळाले परत

एकदम सुरुवातीला शॉक होते,
खायची गोष्ट पायाजवळ ठेवणे, लंचबॉक्स वर बसणे ,
संडासात फरशीवरच डबा, कॉफी कप ठेवणे...
हा एक अलीकडेच पाहिलेला फोटो, ( कसस काय वरून),
E8417EF3-A6C5-4107-B2BB-33013BCF8637.jpeg

फोन मधे डोकं , हात बिझी आणि म्हणून ड्रिंक पायाशी फलाटावर ठेवतानाचा.. ट्रेन आली तशी ड्रिंक उचलले.. आणि सीटवर पुन्हा ते मांडीवर ठेवले.

अंबाला रेल्वे स्टेशनला रात्री दीड वाजता आम्ही उतरलो. थोड्याच वेळात एक ट्रेन युपी वरून आली. तेव्हां हा शॉक पहिल्यांदा बसलेला. नंतर नियमित दृश्य झालं हे.
https://www.facebook.com/rajeshsiju/posts/2036483636424591

कोल्हापुरात दारात म्हैस आणून तिचे दुध निरसे प्यायला देतात >>> लहान असताना चुलत आजीने गंगावेस तालमीबाहेर असं म्हशीचं ताजं गरम घट्ट पेलाभर दूध पाजलं होतं. तिन्ही त्रिकाळ दूध पिणारी मी, अर्धा ग्लास कसा बसा प्यायल्यावर आजीच्या तोंडाकडे काकुळतीला येवून बघत बसल्याचं आठवतंय. तिने सगळं प्यायला लावलं होतं. ब्रेक घेत घेत प्यायलं होतं इतकं जड होतं ते. आयुष्यात परत तशी संधी आली नाही निरसं भेसळहीन दूध प्यायची.

युपीला जाणार्‍या/येणार्‍या ट्रेन किंवा व्हया असणार्‍या ट्रेन्स म्हणजे भितीच वाटते.. इतकं घाण पब्लिक असतं चढणारं.. तुमचा डबा एसी असला तरी लगेच बंद करून घ्यायचा..( जे कठिण असतं ) ट्रेन स्टेशनला थांबल्य्स की. पहिल्यांदा कोलकत्ता जाताना, गोरक्षपुरला थांबलेली तो लोंढा पाहिला.. भयाण वाटले...
बिहार, पटणा मधली ती झोंबणारी, मारामारी करणारी लोकं पाहून शॉकच बसला होता. त्यात तो राईच्या तेलाचा वास ...
ईंटरनेट वरून खालची क्लीप साभार.
https://youtu.be/PmEq_-73_f0

Ti train bharatatli vatli nahi. Bangali bhashet lihilay.
I am sorry parantu rai chya telacha vas hi atyant vait racist comment vatli. Uttar pradesh che asale tari bhartiya aahet he visarayla nako. Ha dhaga majhya alpamatipramane gamati/ aashchary ashya visheshanansathi kadhalela asava! Konala hin lekhanyasathi nahi. Chu bhu dya ghya.

ती ट्रेन भारतातीलच आहे .पूर्व उत्तर रेल्वे NE railway असे डब्यांवर लिहिलेले आहे मध्ये एका डब्यावर ट्रेनचे नाव वाचता येत नसले तरीए देवनागरी आहे हे दिसते.
राजसी यांच्या पोस्ट मी वाचत नाही कारण वाचायला आणि समजायला त्रास होतो. एक तर त्यानी शुद्ध मराठी अथवा शुद्ध इंग्लिश मध्ये लिहावे. बहुधा मोबाइल वरून असावे. . ही पहिलीच ओळ असल्याने लक्शात आलं की ही ट्रेन भारतातील नाही असे त्याना म्हनायचे आहे.

Pages