तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कधी तरी अमेरिकेतल्या RTO (टॅग ऑफिस) ला जाऊन बघ शॉक वर शॉक बसतील ... कुठे हि एजन्ट नाही ... आपला नंबर आला कि जायचे आपले काम झाले कि निघायचे. मागे मी टॅग रिन्यू करायला गेलो तेव्हा तिथल्या माणसाने सांगितले PUC लागेल. म्हंटलं आता शोध PUC वाला, तर त्या कर्मचाऱ्यानेच लगेच जवळचा पत्ता सांगितला आणि म्हणाला परत आला कि नंबर नका लावू मला हात दाखवा मी लगेच करतो काम. मी PUC घेऊन परत आलो तर हा पठ्ठा लगेच तयार ... २ मिनिटात काम झाले ...

एक मुंबईकर म्हणुन आलेला अनुभव नक्किच सांगण्यासारखा.

एखाद वेळेस स्टॉर्म मुळे पॉवर आउटेज झालेलं असेल तर सिग्नल लाइट्स चालत नाहित. या सिच्युएशन मध्ये फोर वे स्टॉपचा नियम सगळ्या ड्रायवर्स कडुन कसोशीने पाळला जातो; ती गाड्यांची सिंक्रनाय्ज्ड मुवमेंट आपण सिविलाय्ज्ड सोसायटीत रहातो याची जाणीव करुन देते...

त्यातली ड्रेनेज सिस्टीम च अ‍ॅडिक्व्टेट असते. लॉजिकल रीझन आहे.>> >> म्हणजे नक्की काय? थोडा खुलासा कराल काय?

मी स्वित्झर्लंडला ज्या होटेल मध्ये राहायचो तिथेच खाली रेस्टराँट मध्ये डिनर घ्यायचो. एकदा माझ्या शेजारील टेबलवर एक फॅमिली बसलेली. नवरा बायको अन २ किशोरवयीन मुले.
त्यांनी मागवलेलं जेवण कोण्त ते माहीत नाही पण त्यासोबत आपल्याकडे दिल्ली साईड्ला जे छोटे लालचुटूक कांदे असतात तसे कांदे दिले होते. तर जेवण झाल्यावर त्या बाईने राहीलेले सगळे कांदे टीशू पेपर्स मध्ये गुंडाळले अन जवळील पिशवीत ठेवले

>> म्हणजे नक्की काय? थोडा खुलासा कराल काय?
आपल्याकडच्या बाथरूम्स मध्ये किंवा इकडे (अमेरिकेत) शॉवर/टब मध्ये आणि सिंक/बेसिन मध्ये सॉलिड वेस्ट ड्रेन होऊ शकत नाही. चोक होईल.

एका ठराविक किमतीच्या खरेदीवर काही सूट असेल आणि त्या खरेदीतली एखादीच वस्तू परत दिल्यास ती सूट परत घेऊन एकूण किंमत पुन्हा मोजतात आणि काही फरक असल्यास तो द्यावा लागतो हे मी अनुभवलं आहे पण अमित म्हणतो ते अगदीच अविश्वसनीय वाटलं.

मी लंडन ला गेले होते. सकाळी अकराच्या सुमारास भाजी वैगेरे आणण्यासाठी बाहेर पडले. आमच्या जवळच्याच एका घराच्या वई वर एक भला मोठा किल्ल्यांचा जुडगा पडला होता. त्यांच्या घराची कंपाऊण्ड वॉल जस्ट दीड दोन फूट उंच असते त्यामुळे जाणाऱ्या येणाऱ्या प्रत्येकाला तो सहज दिसत होता. मला त्या घरची बेल वाजवून त्या घरातल्यांना तरी कमीत कमी सांगावस वाटत होतं पण कदाचित आपल्यावरच शेकेल ह्या भीतीने मी तो विचार टाळला आणि गेले बाजारात. त्या दिवशी मी जवळ जवळ तीन तासांनी घरी आले तरी ही तो जुडगा तिथेच होता. कोणी ही त्याला हात ही लावला नव्हता. मला खर तर ह्या गोष्टीचा खूपच शॉक बसला होता पण नंतर विचार केला , इथे सगळीकडे कॅमेरे लावलेले असतात म्हणून कोणाच उचलायचं डेरींग झालं नसेल आणि घेऊन कोणा अनोळखी व्यक्तीला त्याचा फायदा तरी काय होणार होता

अमित म्हणतो ते अगदीच अविश्वसनीय वाटलं. << ते कॅश मधे घेतल असेल तर शक्य आहे.
आपल्याकडच्या बाथरूम्स मध्ये किंवा इकडे (अमेरिकेत) शॉवर/टब मध्ये आणि सिंक/बेसिन मध्ये सॉलिड वेस्ट ड्रेन होऊ शकत नाही. चोक होईल.<< मग अ‍ॅडिक्व्टेट(addicted) kaa?

चंदीगढला सगळं शहर एकसारखंच दिसतं. एखाद्या सेक्टर मधे चुकलात तर लवकर रस्ता सापडत नाही. सगळे सेक्टर हुबेहूब एकसारखे. एकाच रंगातले. रस्तेही काटकोनात. त्यामुळे सतत पत्ता विचारावा लागतो. पण व्हाईट कॉलर्ड लोकांकडून पता नही असे उत्तर येते. प आणि ता च्या मधे एक विशिष्ट हेल आणि ता वर जोर देऊन स्वर लांबवलेला. एकदा सतरा सेक्टरमधला बस अड्डा शोधताना एका सरदारजीला विचारलं बस अड्डा कुठेय .. तर तेच उत्तर दिले "पता नही "

मागे वळून पाहीलं तर बस अड्डा !

अगदी जोरात नाही पण झटका बसलाच. पुण्याला अगदी टफ आहे.

अमित म्हणतो ते अगदीच अविश्वसनीय वाटलं. >> हो. शॉकच होता तो. Proud अनेकवर्षे झाली त्यामुळे क्रेडिट का कॅश ते आठवत नाही. रिसिट दिलेली असं आठवतं.

मी यू.के. आल्यानंतर लगेच सततच्या पावसाच्या रिपरिपीमध्ये माझे बूट खराब झाले. ऑफिस सुटल्यानंतर जावे तर सगळी दुकानं ६ लाच बंद होतात हा मोठा शॉक होता. माझ्या साईजचा, बजेट मध्ये , आवडेल असा बूट सहजी मिळेना. किती पाऊंड महाग आणि किती पाऊंड म्हणजे स्वस्त हेही माहित नव्हते.
शेवटी एका मोठ्या दुकानात घुसले आणि पैशाचा विचार न करता बूट घेतला. काही दिवसांनी़ कळले की जिथे मध्यमवर्गीय भारतीय शक्यतो पाय ठेवत नाहीत अशा "House of fraser" मध्ये मी चुकून शिरले होते. ६-८महिन्यात तोही खराब झाला. एवढी महागाची इतक्या ब्रँडेड दुकानातून केलेली खरदी वाया गेली याचं मला प्रचंड वाईट वाटले होते.
एका मित्राने त्यांना ते बूट परत कर असा सल्ला दिला. मी आधी त्याला वेड्यात काढले. तरी कुठल्याही अपेक्षा न ठेवता मी दुकानात गेले.
"पावती?"
"नाहीये. टाकून दिली."
"खरेदीचे बँक स्टेट्मेंट?"
"नवीन होते. बँक अकाउंट नव्हते. कॅश दिली होती."
त्यावरही त्याने बुटांच्या खोक्यावरून काहीतरी शोधून बरीच खटपट करून मला पैसे परत केले. आणि वर "inconvenience charge" म्हणून £10 चे गिफ्ट कार्ड पण दिले.
६-८ महिने रोज वापरलेल्या (एका) बूटाचे सोल लूझ झाले म्हणून मला व्याजासकट पैसे परत मिळाले. अर्थात इतर सगळ्या दुकानात असे होईल असं नाही.

***
मध्यंतरी एका ठीकाणी जाताना रस्ता अगदी छोटा होता. एका वेळी एकचं कार जाइल असा. समोरून तीन गाड्या येत होत्या म्हणून नवर्‍याने कार बाजूला थांबवली. दोन कार गेल्यानंतर तिसरी कार पलिकडेच थांबली आणि आता तू जा म्हणून त्या ड्रायवरने खूण केली. खरतरं तिसरी कार पण सहज जाउ शकली असती पण गैरफायदा न घेणं, समोरच्याला आधी जाउ देणे, मधे न घुसणे हे इथे खूप मुळातूनच भिनलेलं आहे.

>>गैरफायदा न घेणं, समोरच्याला आधी जाउ देणे, मधे न घुसणे हे इथे खूप मुळातूनच भिनलेलं आहे.>> याचं कारण आपली अफाट लोकसंख्या असावी असं वाटतं. रोज उठून साध्या गोष्टींकरता करावा लागणारा संघर्ष. ह्यात आपला चान्स जायला नको म्हणून सगळ्यांनाच घाई पडलेली असते. आपला फायदा तेवढा बघायचा.

सायो +1
आपल्यात मिळेल की नाही याची कसलीच शाश्वती नसल्याने आहे ते ओरबाडून घ्या हे आपल्या डी एन ए मध्ये खोलवर रुजलय.

मला आणखी कल्चरल शॉक बसलेला जेंव्हा मी अमेरिकेत उरलेलं अन्न पार्सल द्या म्हणाले आणि त्यांनी मला रिकामा बॉक्स आणुन दिलेले ते बघुन बसलेला Proud

दुसरा कल्चरल शॉक जेंव्हा माझा अमेरिकन बॉस मला काही तरी विचारायला माझ्या टेबलवर आलेला... जनरली मला बॉस ने पिंग करुन बोलावुन घ्यायची सवय होती.

तिसरा शॉक जेंव्हा मला एका उबरवाल्याने डिनरला जाऊयात क अविचारलेलं तेंव्हा बसलेला Uhoh

चौथा शॉक माझ्या मित्राने १० वर्ष मोठ्या मुलीशी लग्न केलं तेंव्हा बसलेला

असे बरेच आहेत

एकदा असेच कब स्काउटच्या मिटिंगला गेले होते. लेकाच्या मित्राची आई भेटली. मी सहज तिच्या नव्या बाळाची चौकशी केली. तर ती म्हणाली - 'त्याला माझी .... थांब मला विचार करु दे.. हं.. त्याला माझी एक्स स्टेप मदर इन लॉ सांभाळतेय' माझा चेहरा बघून वर म्हणे - 'गोंधळ उडाला ना? माझा पण उडतो. आमची खूप मोठी ब्लेंडेड फॅमिली आहे.'

इथे लोकं डेटिंगच्या बाबतीतही फार सहजतेने ' तो अमका माझा हायस्कूल मधे बॉयफ्रेंड होता, फार चांगला आहे .नुकताच त्याच ब्रेकप झालाय ' वगैरे सांगून 'स्थळं' सुचवतात. किंवा ती अमकी तमकी आहे ना तिची मी एक्स डॉटर इन लॉ वगैरे ओळख सांगतात. मला सुरवातीला फार नवल वाटायचे.

छान धागा आहे. मजेशीर शॉक आहेत.

1) डिप्लोमाला असताना ज्या क्लासमेटच्या हॉस्टेल रूमवर कित्येक रात्री झोपलो, अभ्यास केला.. त्याचा रूमपार्टनर गे (समलैंगिक) होता हे समजले. माझ्यासाठी तेव्हा हे शॉकिंग होते. आता गे असणे नॉर्मल वाटते.

2) ऑर्कुटवर नवीनच असताना मोठ्या शायनिंगमध्ये रॅन्डम फ्रेंड रिक्वेस्टने काही मैत्रीणी जमवल्या. थोडीफार फ्लर्टींग वगैरे करायची स्वप्ने होती. पण एका मुलीने रात्री दिड वाजता कॉल केला आणि हॉट चॅट चालू केली. शॉक लागल्यागत घाबरून फोन कट केला. दुसरया दिवशी तिला ब्लॉक केले. आपले दुधाचे दात पडून चहाचे दात आले आहेत असे आजवर समजत होतो. पण जगात दारूचे दात असणारे लोकही आहेत हे समजले.

3) लग्नानंतर बायकोच्या गावी गेलो होतो. त्यांच्या प्रथेप्रमाणे एक पूजा आटोपल्यावर 15-20 लोकांना जेवायला घालायचे होते. ईतरवेळी 100 जमली असती. पण मी त्यांच्या जातीचा नसल्याने पकडून पकडून 15-20 माणसे जमवावी लागली.

त्यानंतर आणखी एक गंमत म्हणजे प्रथेचाच भाग म्हणून जेवण झाल्यावर त्यातील 4-5 ज्येष्ठ लोकांची खरकटी ताटे मला उचलायची होती.
याला मी तयार व्हावे म्हणून माझ्या सासरेबुवांनी माझ्यासमोर चक्क हात जोडले. कारण मी सो कॉलड उच्च जातीचा असल्याने याला नकार देईन आणि त्यांची मान खाली जाईल अशी त्यांना भिती.
अर्थात, आमच्याईथे महाप्रसादाला ईतक्या लोकांच्या पत्रावळी उचलल्या आहेत की हे माझ्यासाठी नॉर्मल होते.
पण मुंबईत आयुष्य गेल्यानंतर असे बायकोच्या गावी जाऊन जातपात अनुभवली तो एक सांस्कृतिक धक्काच होता.

4) 31 डिसेंबरच्या रात्रीच्या पार्टी आधी आम्ही संध्याकाळी आमच्यातल्याच एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्याची पुर्ण फॅमिली, बहिण आई वगैरे बीअर पित होत्या. मी पित नाही सांगितल्यावर सारे हसले मला. अगदीच बचकांडे झाल्यासमोर वाटले त्या पोरींसमोर. नशीबाने मी नॉनवेज खात असल्याने माझी माणसात गिणती केली त्यांनी आणि त्यांच्यात सहभागी होऊ दिले. नाहीतर हाकललाच असता.

क्रमश: ....

थोडे उद्या लिहितो..

एकदा माझ्या एका मैत्रिणीच्या आईने ३/४थ्या भेटीतच तिच्या ३(+ १ मोडलेल्या एंगेजमेन्ट्ची) लग्नांची आणि १० एक बॉयफ्रेन्ड्स ची स्टोरी सांगितलेली. माझ डोकंच गरगरायला लागलेलं. ती स्वतः चाईनीज होती पण तिच्या चॉईसेस एक्दम ईन्टर नॅशनल होत्या लग्नांमधे एक भारतिय पण होता. पण तो "काउच पटेटो" असल्यामुळे सोडले म्हणे. Happy

न्यायालय म्हणजे एकदम अनबायास्ड प्रकार त्यातुन सर्वोच्च न्यायालय म्हणजे आणखी स्कॉलर त्रयस्थ नजरेने न्यायदान करणारे असा काहीसा कवी कल्पनेतला आणि म्हणूनच अती बाळबोध (नाईव्ह) समज होता माझा.
अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश निवड आणि न्यायाधिशाचा राजकीय दृष्टीकोन किती महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे कायद्यांचे अर्थ लावण्यात आणि पर्यायाने निकालात कसा फरक पडतो हा मोठाच धक्का होता/ आहे.

साधारण १९७० च्या सुमाराचि घटना.
मी माझ्या जावेच्या माहेरी माझ्या लग्नानन्तर प्रथम गेले होते ठाण्याला. घरात खुर्ची बहुधा नसावी, कारण आम्हाला खाली पाटावर बसविले. स्वत:च्या घराचा टेम्भा मात्र फार होता. लहानसे बैठे घर.
नन्तर उपहार आला. एका अगदी लहान बशी मध्ये लाडूची बारीक गोळी आणि मोजून तीन लहान मोनको बिस्किटे. हे आमच्या हातात देऊन जाऊबाई अगदी शिश्ठपणे म्हणाल्या, " हे एक गोड आहे, आणि हे नमकीन. म्हणजे झाले आता."

माझ्या माहेरी त्या सर्वान्चे उत्तम अगत्य होत असे. हा असला कद्रूपणा बघून मला कल्चरल शॉक बसला.
हे वाचूनच जावेची जात समजावी.
ही बाई अखेरपर्यन्त अशीच होती. ती गेल्यानन्तर तिच्या नसलेल्या गुणान्चा खूप उदो उदो चालला आहे.
असे अनन्त अनुभव आहेत.
काही नातलग गुजराती नागर ब्राह्मण आहेत. ते तर करणे टाळण्यात याहूनही उस्ताद आहेत. वर स्वतःला अति ग्रेट समजून समोरच्या माणसाला पाडून बोलायला सतत तयार.
गेली कित्येक वर्शे अमेरिकेत राहून, करिअर करूनही असा सासुरवास अनुभवला आहे. हाही कल्चरल शॉकच.

>> अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधिश निवड आणि न्यायाधिशाचा राजकीय दृष्टीकोन किती महत्त्वाचा आहे आणि त्यामुळे कायद्यांचे अर्थ लावण्यात आणि पर्यायाने निकालात कसा फरक पडतो

हे भारतात सुद्धा असेच आहे. याविषयी काही महिन्यांपूर्वी एक लेख वाचनात आला होता.

अमेरीकेत शिकत असताना, जेव्हा माझी स्पॅनिश मैत्रीणीने डिक्लेर केले की ती गरोदर आहे आणि तिचा कालच ब्रेकअप झालं. ती मूल वाढवणार आहे.
मी आधी एकून होते तेव्हा शॉक असा नाही पण ती अगदी अशी सांगत होती की, वडा पाव खावून आले आताच.
मलाच तिच्या अभ्यासाची आणि होणार्‍या बाळाची चिंता.
थोड्याच दिवसात कॉलेज( युनिवर्सिटी) सोडून , आणखी एक म्हतारा ( तिच्यापेक्षा २० एक वर्षे मोठा) पण श्रींमत असा बॉयफ्रेंड मिळवला. त्यानेच तिचे हे मूल सुद्धा स्विकारले.
तिचे आई वडील शिकलेले होते खरे तर पण मुलगी अगदीच सुमार करीयरच्या बाबतीत, अभ्यासात बरी होती खरे तर पण लक्ष सारखं हा बॉफ्र्र, तो बॉफ्रे..

जिथे अनेक रस्ते एकत्र मिळतात (चारहून अधिक असले तरी आपल्याकडे त्याला "चौक"च म्हणतात) अशा ठिकाणी "एक्झिट" हि कल्पना तिकडे वापरली जाते. हा माझ्यासाठी सुरवातीला खूपच अपिलिंग शॉक होता. किती साधी कल्पना पण अजूनही आपल्याकडे का वापरत नाहीत याचे आश्चर्य वाटते...

आपल्याकडे: "तो फलाना चौक आहे? हां तिथे आलास कि एक सरळ रस्ता अमुकनगरला जातो... त्याच्या डावीकडे दोन रस्ते आहेत त्याच चौकात... त्यातला एक तमुकनगरला जातो बरोबर? काय? तुला माहित नाही तमुकनगरचा रस्ता? ओके. तिथे कुणालातरी विचार. आणि त्याच्या उजवीकडचा जो रस्ता आहे..." (वगैरे वगैरे...) Uhoh

त्यांच्याकडे: "तो फलाना राउंडअबाउट आहे? हां तिथे आलास कि थर्ड एक्झिट घे" Lol

एकाच वाक्यात खलास !

>>>अमेरिकेत वडापाव कुठे मिळतो ?<<<
अहो मी माझे विचार जे त्यावेळी आले मनात मैत्रीणीचे एकून ते लिहले. ती मैत्रीण एकदम शांत होती ...
वडा पाव मिळतो सगळीकडे... नॉट अ बिग डिल.

वडा पाव मिळतो सगळीकडे... नॉट अ बिग डिल. >>> Happy
एडीट केलेस का ? कारण आता आधी मला वाटले तसे वाटत नाहीये. मला प्रतिसाद वाचताना ती वडापाव खाऊन आली असे काहीसे वाटत होते.

Pages