तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>ट्रेन मध्ये चढायला लाईन लावतात. आणि खूप गर्दीच्या वेळी काही ठराविक स्टेशन वर पुशर असतात>>+१
तसंच ट्रेन डिले झाली आणि तुम्हांला ऑफिसला पोचायला उशीर होणार असल्यास ट्रेनमधून उतरल्यावर स्टेशनवरचा स्टाफ तिकिट सदृश काहीतरी घेऊन उभा असतो ज्यावर ट्रेन उशीरा आल्यामुळे तुम्हांला पोचायला उशीर झाला असं लिहिलेलं असतं.
तसंच सगळीकडे असणारी बिडे टॉयलेट्स.

मस्त धागा आहे.
"पाहुणे" शब्दावरून आठवलं. मला पण नुकतंच कळलंय की काहि घरात जावयाला पाहुणे म्हणतात.
माझ्या शेजारणीचा नवरा दुबईवरून आला, तिची आई तिला म्हणाली पाहुण्यांची बॅग रिकामी कर. कपडे धुवून टाकते.

मामाशी लग्न - यातला एक किस्सा अगदी माझ्या शाळेतल्या मैत्रिणीच्या घरात पाहिला होता. मैत्रिणीचे वडिल धरून ३ भाऊ होते आणि एक आत्या. आत्याला एक मुलगी होती. ती लहानपणापासून सर्वात लहान मामाशी लग्न करणार याच स्वप्नात होती. पण मामा मात्र या प्रथेला मोडीत काढण्याच्या विचारात होता. भाचीने मात्र लग्न केलेच नाही. मामा मुली पाहून थकला. शेवटी चाळिशी जवळ येता येता ( मामाची) त्याने भाचीशी लग्न केले.
मामाशी लग्नाचं कंडिशनिंग कसलं स्ट्राँग होतं तिचं. कारण तिला मामाने पहिल्या पहिल्यांदा लग्नाला नकार दिल्यावर, घरच्यांनी तिच्यासाठी पण मुलं पहायला सुरुवात केली होती तेव्हा ती चक्क घरातून पळून जाऊन एकदम संध्याकाळी वगैरे परतायची. Uhoh

भारी किस्से आहेत!

मी इथे आले तेव्हा इथल्या ललनांना सिगरेट फुंकताना बघुन प्रचंड मानसिक आणि सांस्क्रूतिक धक्का बसला होता.

एका ऑस्ट्रेलियन मित्राकडे जेवायला गेलो होतो. मस्त गप्पा झाल्या. जेवणात फक्त २ पदार्थ आणि सॅलड बघुन मला आश्चर्य वाटले होते.
निरोप घेऊन झाल्यावर त्या दांपत्याने लगेच दार लावुन टाकले! प्रचंड धक्का बसला होता तेव्हा..... पण नंतर समजले की इथले लोकं निरोप घेताना आपल्यासरखे रेंगाळत नाहीत Biggrin ते दांपत्य अजुनही आमचे खुप जवळचे मित्र आहेत.... आणि आता ते आमच्यकडे आले किंवा आम्ही त्यांच्या घरी गेलो तर निरोप घेताना हमखास १०-१५ मिनीटे बोलणं होतं Biggrin (आता ते त्यांच्या मायबोलीवर या १०-१५ मिनीटांबद्द्ल लिहीत असतील Biggrin )

हॉस्टेलला असतानाची गोष्ट,
सकाळी मी आणि माझा मित्र चहा प्यायला एका टपरीवर जायचो. बाहेर बाकड्यावर बसलो असताना जवळच एक आजोबा बसले होते. त्यांचे वर्तमानपत्र वाचन चालू होते. दोनेक पेपर बाजूला बाकड्यावर ठेवलेले. मी अगदी सहजपणे म्हणालो, आजोबा पेपर घेतो हा आणि उचलायला हात लावतो न लावतो तोच आजोबा कडाडले.. माझा पेपर आहे !
जवळजवळ हिसकावूनच घेतला. त्यांचा अवतार बघून आम्ही दोघेही घाबरलो. जसे काही त्यांच्या मिनरल वॉटरच्या बाटलीतले पाणीच प्यायलो होतो. मुंबईत असे ट्रेनमध्ये एकमेकांचे पेपर घेऊन वाचणे फार कॉमन आहे. त्याच सवयीने वागायला गेलो आणि पोपट झाला.
पण मग पुढे मुद्दाम आम्ही कोणाकोणाचे पेपर मागायचो. आणि एकही अपवाद न निघता नियम सिद्ध होत गेला.
अर्थात कल्चरल शॉक जो काही होता तो पहिल्या वेळच्या आजोबांनीच दिला होता. त्यानंतर मात्र कोणी आम्हाला पेपर वाचायला दिला असता तर शॉक बसला असता. याबाबतीत गड्या आपले मुंबई स्पिरीटच बेस्ट Happy

>> सोलापूर साईडला ही प्रथा आहे..
महाराष्ट्रात तसेच आंध्र, कर्नाटक मध्ये सुद्द्धा करतात अशी लग्ने (मामा-भाची)

>> पारशी कुटुंबात सख्ख्या भावाबहीणीचं लग्न होतं असं ऐकून आहे
नाही. गैरसमज असावा हा. अशी लग्ने करणे (सख्ख्या भावाबहीणीचं) कायद्यानेच निषिद्ध आहे (जात/धर्म कोणताही असो).

जर त्यांच्या मधे अशी प्रथा असेल तर कायद्याने बंदी चुकीची वाटते. आपल्यासाठी तो कल्चरल शॉक असेल पण त्यांच्यासाठी ती सामान्य गोष्ट असेल. त्याचे तोटे आहेत असे पण ऐकले होते. म्हणजे रक्ताच्या नात्यात लग्न झाल्याने संतती मधे दोष असणे. पारशांमधे म्हणे काही न काही शारीरीक व्यंग दिसते किंवा मग स्पेशल मूल असण्याचे प्रमाण जास्त आहे. तसेच आपसात लग्न झाल्याने या कम्युनिटीची लोकसंख्या घटत चाललेली आहे. मी एक रिपोर्ट खूप पूर्वी वाचला होता त्यात जगभरात पारशांची लोकसंख्या १,२०,००० आहे असे सांगितले होते. त्यातील ७०००० फक्त मुंबईत आहेत. आता ते अजून कमी झाले असावेत.
यामागे आपली संपत्ती दुस-याला जाऊ नये हे एक कारण आहे असे सांगितले होते.

>> http://www.iranicaonline.org/articles/marriage-next-of-kin

फार जुन्या काळात होत होते असा तो संदर्भ आहे:

"xwēdōdah was practiced in Sasanian Iran and before"

म्हणजे ससानियन राजाच्या काळात (इ.स. २२४). तसे पाहिल्यास भारतीय कल्चर मध्ये सुद्धा खूप जुन्या काळात बहिण-भाऊ विवाह होत होते. पण नंतरच्या काळात ते बहुतांशी सगळीकडे निषिद्धच मानले जाऊ लागले.

छान धागा आहे. मजेशीर शॉक आहेत.

1) डिप्लोमाला असताना ज्या क्लासमेटच्या हॉस्टेल रूमवर कित्येक रात्री झोपलो, अभ्यास केला.. त्याचा रूमपार्टनर गे (समलैंगिक) होता हे समजले. माझ्यासाठी तेव्हा हे शॉकिंग होते. आता गे असणे नॉर्मल वाटते.

2) ऑर्कुटवर नवीनच असताना मोठ्या शायनिंगमध्ये रॅन्डम फ्रेंड रिक्वेस्टने काही मैत्रीणी जमवल्या. थोडीफार फ्लर्टींग वगैरे करायची स्वप्ने होती. पण एका मुलीने रात्री दिड वाजता कॉल केला आणि हॉट चॅट चालू केली. शॉक लागल्यागत घाबरून फोन कट केला. दुसरया दिवशी तिला ब्लॉक केले. आपले दुधाचे दात पडून चहाचे दात आले आहेत असे आजवर समजत होतो. पण जगात दारूचे दात असणारे लोकही आहेत हे समजले.

3) लग्नानंतर बायकोच्या गावी गेलो होतो. त्यांच्या प्रथेप्रमाणे एक पूजा आटोपल्यावर 15-20 लोकांना जेवायला घालायचे होते. ईतरवेळी 100 जमली असती. पण मी त्यांच्या जातीचा नसल्याने पकडून पकडून 15-20 माणसे जमवावी लागली.

त्यानंतर आणखी एक गंमत म्हणजे प्रथेचाच भाग म्हणून जेवण झाल्यावर त्यातील 4-5 ज्येष्ठ लोकांची खरकटी ताटे मला उचलायची होती.
याला मी तयार व्हावे म्हणून माझ्या सासरेबुवांनी माझ्यासमोर चक्क हात जोडले. कारण मी सो कॉलड उच्च जातीचा असल्याने याला नकार देईन आणि त्यांची मान खाली जाईल अशी त्यांना भिती.
अर्थात, आमच्याईथे महाप्रसादाला ईतक्या लोकांच्या पत्रावळी उचलल्या आहेत की हे माझ्यासाठी नॉर्मल होते.
पण मुंबईत आयुष्य गेल्यानंतर असे बायकोच्या गावी जाऊन जातपात अनुभवली तो एक सांस्कृतिक धक्काच होता.

4) 31 डिसेंबरच्या रात्रीच्या पार्टी आधी आम्ही संध्याकाळी आमच्यातल्याच एका मित्राच्या घरी गेलो होतो. त्याची पुर्ण फॅमिली, बहिण आई वगैरे बीअर पित होत्या. मी पित नाही सांगितल्यावर सारे हसले मला. अगदीच बचकांडे झाल्यासमोर वाटले त्या पोरींसमोर. नशीबाने मी नॉनवेज खात असल्याने माझी माणसात गिणती केली त्यांनी आणि त्यांच्यात सहभागी होऊ दिले. नाहीतर हाकललाच असता.

क्रमश: ....

थोडे उद्या लिहितो..

Submitted by भन्नाट भास्कर on 27 June, 2018 - 14:06

>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>

हे ऋन्मेषावतारी भास्करा,
लग्न गर्लफ्रेंडशीच केलेस का आणखीन कोणाशी?

मी विचारणारच होतो अफ्रीका, चीन, कोरिया वगैरे मधले शॉक नाहीत का या धाग्यावर, तोच हे वाचले. बापरे>>

चीन मधे मला एका सुबक ठेंगणीने गप्पा मारताना विचारल, "तुम्ही कुत्रा पेट म्हणून पाळलाय का? (त्याचा दुसरा अर्थ - खायला पाळलाय का, कोंबड्यांसारखा). साप वगैरे रोड साइडच्या दुकानात लटकलेले अनेक ठिकाणी पाह्यला मिळतात, अगदी विमानतळावर सुद्धा.

यामागे आपली संपत्ती दुस-याला जाऊ नये हे एक कारण आहे असे सांगितले होते.>>>
हे कारण नाही. त्या धर्मात धर्मांतर मान्य नाही. पारशी मुलाने अन्यधर्मीयाशी लग्न केले तर मुले जन्माने पारशी ठरतात पण मुलीने असे केले तर ती मुले पारशी होऊ शकत नाहीत. त्यामुळे धर्माबाहेर लग्न करायला खूप विरोध होतो. संख्या कमी असल्यामुळे धर्मातच हवा तसा जोडीदार मिळणे कठीण होते, त्यामुळे बरेच अविवाहित राहतात. धर्मांतर होतंच नसल्याने नवीन भरतीही होत नाही. परिणामी संख्या घटतेय.

<<<तुम्ही कुत्रा पेट म्हणून पाळलाय का? (त्याचा दुसरा अर्थ - खायला पाळलाय का, कोंबड्यांसारखा)<<<
आई ग! Uhoh हाईट आहे हे..

कल्चरल शॉक नव्हे पण गंमत

माझी एक नागपुरी मैत्रिण आहे. तिचा नवरा जो माझ्याहून एकाद वर्ष मोठा आहे तो पण माझा मित्र आहे , अगदी भावासारखा!

तो माझ्या नवर्‍याला 'राव' म्हणतो. कसलही आमंत्रण करायला नवर्‍याच्या सवडीने येतो आणि यायचं हो असं बहुवचनी आमंत्रण करतो, नेहमी बोलताना अरे म्हणतो हेच नशिब.

आणि आम्ही कोकणी अरे - जारे शिवाय बातच नाही.

मला मज्जा वाटते. Happy

कुठल्याही वाचनालयाचे सभासदत्व फुकट. एकावेळी अनेक पुस्तके +vdeo/cds घरी घेऊन जाता येणे. पुस्तक परत करायचे असल्यास एका शूटमध्ये ढकलून देणे. माझ्या IELTS परीक्षेची तयारी मी अशा library मध्ये बसून केली आहे! (भारतात तेव्हाही हजारो रुपये फी होती या परीक्षेच्या तयारीची)

वरच्या पदावरचा अधिकारीपण स्वताचा चहा स्वतः घ्यायला किचनमध्ये येतो, त्यालाही किचनमध्ये भांडी डी वॉ मध्ये टाकणे, ओटा टापटीप करणे इत्यादी कामांचे रोस्टर असते
आणि तो ते काम इमाने इतबारे करतोही!

उच्च पदाधिकारी सायकल ऑफिसला येणे.

ऑफिसमध्ये / युनिमध्ये जिम असणे, शॉवर असणे.

इथल्या बायका पर्स वगैरे सहजपणे पब्लिक टॉयलेटमध्ये घेऊन जातात आणि दाराला अडकवतात हे बघून प्रचंड धक्का बसला होता...

>> तुम्ही कुत्रा पेट म्हणून पाळलाय का?

हा हा हा. हा खरा कल्चरल शॉक... अजून एका कलीग कडून ऐकले होते चायनाचे कल्चर. चायना विषयी म्हटले जाते: Chinese Eat Anything That Moves

इंडोनेशियातले अनुभव मजेदार.

आम्ही तेथे असताना आपल रामायण डब करून टीवीवर दाखवत होते.
राम वगैरे मंडळी बहासा इंडोनेशियामधे ऐकताना मजा वाटायची.
एकदोन मंडळींनी प्रश्न ही विचारला होता. " तुमच्याकडे रामायणाची कथा सेमच आहे का?. " Happy. तिकडच्या देवळात मूर्ती नसते. गीता जुलिया, विष्णु महमद नावाची माणस माझ्या ओळखीची होती. Happy

हो रामायण वगैरे जोरात आहे तिकडे. राक्षसांचे अस्तित्व अजूनही मानतात ते लोक. गुढी पाडव्याला न्याती नावाचा सन असतो. त्या रात्री सगळ्या बालीभर गुडूप अंधार केला जातो (त्या रात्री थोडा जरी उजेड दिसला तर बाली वर हल्ला करायला राक्षस येतो म्हणे). पर्यटकांना सुद्धा परवानगी नाही बाहेर फिरायची किंवा लाईट लावायची. स्टार रिसोर्ट मध्ये लाईट गेलेल्या अवस्थेत एक रात्र काढली आम्ही. पण तो सुद्धा एक सही अनुभव होता. अक्षरशः पोलिसांचा पहारा असतो बाहेर कुणी लाईट लावू नये म्हणून. दे आर सो सिरीयस अबाउट इट Lol

बाली इंडोनेशियामधला अजून एक कल्चरल शॉक म्हणजे अत्यंत चविष्ट म्हणून त्यांनी आम्हाला एक भाजी खायला दिली होती. पण तिचा प्रचंड उग्र वास येत होता. मला वासावरून ती वनस्पती ओळखीची वाटली. नाव माहित नाही पण लहान असताना गावाकडे अनेकदा पाहिली आहे. पण तिची कधी भाजी खायचा योग असेल असे वाटले नव्हते तेंव्हा Biggrin मी बायकोला म्हटले आपल्याकडे शेपू पण खरंतर अशीच उग्र असते. पण आपल्याला केवळ सवय झालीय म्हणून आपण ती खातो. हि भाजी यांच्यासाठी तशीच आहे.

कुठल्याही वाचनालयाचे सभासदत्व फुकट. एकावेळी अनेक पुस्तके +vdeo/cds घरी घेऊन जाता येणे. पुस्तक परत करायचे असल्यास एका शूटमध्ये ढकलून देणे. -> अगदि अगदि. ९९ लिमिट आहे. फक़त वीडियो गेम च्या सीडी चार नेता येतात एका वेळेला. फ्री इंटरनेट , कलर प्रिन्टस.

प्रथमच अमेरीकेत गेलो होतो, पहिलीच मिटींग. एक बाई दुसाऱ्या बाईला म्हणाली: कार गॅरेज मध्ये दिली आहे, ट्रक घेऊन आले आज. मी माझ्या तिथल्या सिनीअरला म्हणालो, "च्यायला ही बाई ट्रक चालवते?"

उत्तराखंडात रुद्रप्रयाग किंवा कर्णप्रयाग पैकी एका गावात बस मधून उतरल्यावर संगमावर जाताना पाठीवरचे ओझे बाळगत जायला नको म्हणून एखाद्या दुकानात ठेवून जावे असा विचार केला होता तर त्या दुकानदाराने दुकानाबाहेर रस्त्यावरच ठेवा बिनधास्त म्हणून सांगीतले आणि आम्ही देखिल जवळपास तासभरानंतर आलो असता ते तसेच्या तसेच होते. असा अनुभव नंतर उत्तराखंडात बाकी ठिकाणी देखिल आला. खरोखरच देवभुमी

मी माझ्या तिथल्या सिनीअरला म्हणालो, "च्यायला ही बाई ट्रक चालवते?"
नवीन Submitted by टवणे सर on 29 June, 2018 - 16:43

banner6.jpg

वरच्या चित्रातली गाडी आकाराने जीपइतकी असली तरी टेक्निकली तिला ट्रकच म्हणतात. प्रायवेट नंबरने पासिंग करुन मिळते त्यामुळे इथे देखील बायका चालवितात ही ट्रक. फक्त किंमत थोडी जास्त (ऑन रोड १८ लाख) असल्याने उच्चभ्रू घरातले लोक मागे हौद्यात सायकली / फुटबॉल वगैरे टाकून पिकनिकला जाताना चालवतात. ज्यांचं बजेट थोडं कमी असतं ते टाटा झेनॉन चालवतात.

{{{ दुकानदाराने दुकानाबाहेर रस्त्यावरच ठेवा बिनधास्त म्हणून सांगीतले आणि आम्ही देखिल जवळपास तासभरानंतर आलो असता ते तसेच्या तसेच होते. खरोखरच देवभुमी
Submitted by हर्पेन on 29 June, 2018 - 16:50 }}}

ही बिझनेस ट्रीक आहे. तुम्ही आता तुमचा अनुभव इथे लिहिला म्हणजे अजून १० पर्यटक तिथे जायचे चान्सेस वाढले. सेम लाईक शनी शिंगणापूर.

Chinese Eat Anything That Moves >> Uhoh
मी ऐकलं आहे की ज्या प्राण्यांचा पाठिचा कणा सुर्याकडे असतो असे सर्व मुव्हिंग ऑब्जेक्ट्स खातात चायनिज लोक. Uhoh

भारताच्या इशान्येकडच्या राज्यात अमावस्येला काळा कुत्रा मारून खातात. माशा, कीटक हवेतून पकडून खातात. गडचिरोली वगैरे भागात लाल मुंग्या गोळा करून त्याची भाजी करून खातात. लडाखला गुरखा रेजिमेंटने एकदा त्या भागातले केसाळ कुत्रे चालवले होते. चौकशी केली तर स्थानिकांनी सांगितले की हे लोक आल्यापासून कुत्री कमी झाली या भागातली.

Pages