तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पोट भरलेल्या मांजरी व बोके इकडे तुम्ही काढा नविन धागा, त्याला अमुक नाव द्या करत बसले आणि तिकडे एका बोक्याने स्वतः उपाशी असूनही त्यांना धागा काढुन दिला.
तात्पर्य: रिकाम्या पोटी मेंदू भरकटत नाही.

माझाही स्वयंपाक राहिलाय हो Lol मी शिळे खाऊ आज म्हणून येथे अवांतर करत होते. शिळेपाके खाऊन अवांतर करतोय आणि कौतुक नाही. Proud

कोणी टिकटॉक वर यूरोपिअन्सचे कल्चर शॉक विडिओ पाहत आहे का ? यूरोपिअन्स फिफासाठी अमेरिकेत आले आहेत आणि अमेरिकेत अनेक ठिकाणी भेट देऊन आपल्या रिऍक्शन्स विडिओ पोस्ट करत आहेत. हे व्हायरल विडिओ बघताना खूपच मजा येत आहे. त्यांना एखादे म्युझियम सारखे भव्य वाटणारे वॉलमार्ट, कॉस्टको, तेथील प्रचंड मोठया साईझचे अन्न व ड्रिंक्स, ६ ० अंड्याचे पॅकेज, गॅलन साईझचे दूध, रेस्टाऊरन्टमध्ये ऑर्डर केलेल्या डिशचा पोरशन साईझ , पॅनकेक्सच्या थप्प्या , रँच ड्रेसिंग, फ्री सोडा रिफील. इतकेच नव्हे तर प्रत्येक ठिकाणी असणारे एअर कंडिशनिंग. चीझकेक फॅक्टरी पण एकदम पॉप्युलर, आहे आणि त्यांचा एखादा पुस्तकासारखा भला मोठा मेनू .

त्याचबरोबर अनेकांनी आपले अमेरिकेबद्दल व येथील लोकांबद्दल किती वेगळे मत होते आणि आता प्रत्यक्ष बघून कसे बदलले हेही विडिओ टाकले आहेत. बघून चांगले वाटले.

Happy हो पाहतोय. इटालियन लोकांना पिझावर पायनॅपल टॉपिंग बघून काय वाटले त्याचा नाही आला अजून? Happy

बाकी "...लोकांबद्दल किती वेगळे मत होते आणि आता प्रत्यक्ष बघून कसे बदलले" हे जागतिक सत्य आहे Happy

>>>>बाकी "...लोकांबद्दल किती वेगळे मत होते आणि आता प्रत्यक्ष बघून कसे बदलले" हे जागतिक सत्य आहे Happy
+१

लोकांबद्दल किती वेगळे मत होते आणि आता प्रत्यक्ष बघून कसे बदलले" हे जागतिक सत्य आहे >> ते त्रासदायक ही आहे. इथे फार प्रेमात गळ्यातगळे गप्पा होण्याआधी ते एक नमूद करतो. Wink Lol इथल्या काही माबोकरांना भेटायच्या आधी वादावादी भांडणे करण्यात जास्त मजा यायची. प्रत्यक्ष भेटल्याने कंगोरे पार बोथट झाले राव! आयडी पलीकडला माणूस दिसल्याने आम्हा हलकट लोकांची मजा कमी होते. Wink

Lol माझ्या बाबतीत तसं काही होणार नाही. "Once a हलकट always a हलकट" राहा वाटले तर. उलट सुधारले कुणी तर काळजी वाटेल. इथल्या कुठल्याही वादाने, चर्चने आपसातील बॉन्डवर कसलाही परिणाम होऊ देत नाही मी. दोन वेगळी कंपार्टमेंट आहेत- मतं आणि नातं.

६ वर्षांपूर्वी पुण्यात आलो, तेव्हा छोट्या कपड्यातल्या पोरी पाहून पोटात फुलपाखरे उडालेली आठवतात अजून Wink

Pages