Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58
तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?
मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.
बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मामी सारखाच अनुभव मला पुण्यात
मामी सारखाच अनुभव मला पुण्यात आला होता. एका घरी जेवायला आमंत्रण होते. मी पोळी भात (पट्टीची) खाणारी होते. आणि आमच्याकडे पोळ्या म्हणजे व्यवस्थित जाड आणि मोठ्या. भात पण ४ जणांसाठी असेल तर कुकरचा मोठा डबा भरून वगैरे. वाढतं वय असल्याने मी २ पोळ्या सहज खात असे.
तिसरी मागायला थोबाड उचकटणार तोवर भातही केलाय बरं का भरपूर... भरपूर(??) चहाच्या भांड्यात अर्धी वाटी भात ४ जणांना.. 
त्या घरात पोळ्या म्हणजे मोठा पापड (एकदम पातळ) दोन खाल्ल्या त्या कुठं गेल्या कळेनात
तिसरी पोळी मी शब्दांबरोबर गिळली आणि तो भरपूर (चमचाभर) भात (३ जणांनी खाऊन) उरलेला खाऊन (अर्धपोटी) उठले. भयानक म्हणजे भयानक शॉक्ड होते मी तेव्हा.
आमच्याकडे म्हणजे अन्न शिजवतातच मोठ्य मोठ्या भांड्यात. एखाद माणूस ऐनवेळी आलं तरी जेवायला सहज खपेल. आणि जेवायला कुणी बोलवलं तर ते आमंत्रण आहे की खायला घालून मारायची सुपारी ते सहज कळणार नाही.
असो, आता मी ही पुण्यात राहते आणि मी ही मोजकेच करते ते ही विचारून, आग्रह नसेल जमत पण अर्ध पोटी कुणी उठणार नाही याची काळजी जरूर घेते.
असतात अशी विचित्र लोकं.
असतात अशी विचित्र लोकं. मामींना अनुभव आला तसाच मला.
इथे आतुन ती जेवून आली, मी येतेच हां सांगून. बाहेर दुपारच्या दोन वाजता ग्लुकोजची दोन-तीन बिस्किटे बशीत. वर तिच्या आईची ,माझी जात-पात चर्चा.
मी गेले होते ट्रेनिंगला आणि हि “विशिष्ट “ मैत्रीणी अग्रहान्र घेवून गेली शेवटच्या दिवशी घरी ट्रेनिंग लवकर संप्स्ले म्हणोन. माझी पुण्याची बस रात्रीची होती तरी मी दुपारीच बाहेर पडले त्या मैत्रीणीच्या घरून, हॉटेल गाठले, खावून दादर फिरत बसले.
परत कधीच जात नाही कोणाच्या घरी भूक वगैरे लस्गली असली तरी आणि जराश्याच ओळखीत झालेल्या मैत्रीत तर कधीच नाही.
पुण्याला जेव्हा आली तीच मैत्रीण , ती माझ्या घरी मस्त राहून वगैरे गेलेली.
माझ्या आईने, एशियाड लवकर सुटते म्हणून तिला प्रवासात खायला बांधून पण दिलेलं.
प्रश्ण मुंबई पुण्याचा नाही, वृत्तीचा आहे; असली माणस्से कुठेही भेटतात पण काही कायम “विशिष्ट” जन्मलो आहोत असे आव आणून असतात ते हि खरेच.
माझ्या आईची खास शिकवण, जेवायला आलेल्याला पोटभरून वाढावे. माणसं आपल्या घरी येणं शुभं असतं.
मी आईसारखा खूप आग्रह नाही करत पण व्विचारते नक्कीच एक दोनदा..
हेअरकट घेणे हा एक मोठा कल्चरल
हेअरकट घेणे हा एक मोठा कल्चरल शॉक असतो बाहेरच्या देशांत.
इंग्लंडमध्ये सलून मध्ये गेल्यावर तिथल्या मुलीने "हेलोऽऽऽ.." वगैरे करून "विच नंबर?" असे विचारले. अपेक्षितच होते. म्हणून फोर म्हणून हाताची चार बोटे सुद्धा तिला स्पष्ट दाखवली. कारण तिकडे जायच्या आधी मित्राने सांगितले होते कि तिथे असे असे विचारतात. तेंव्हा चुकून सुद्धा झिरो किंवा वन म्हणशील बिनशील. आणि ती तुझा चमन गोटा करून टाकेल
तिला अगदी स्पष्ट थ्री किंवा फोर म्हणून सांग.
पुण्यात सलून मध्ये हेअरडाय लावल्यावर घरी जाऊन अर्ध्या पाऊण तासांनी केस धुणे असा प्रकार असतो. तेच सिंगपोर मध्ये डाय लावून झाल्यावर तो आत गेला. आणि घरी जायच्या तयारीने मी खुर्चीतून उठून बाजूला उभारलो. तो परत आला. "किती बिल झाले? मी चाललोय", असे मी सांगितल्यावर माझ्याकडे बघून "असंच डाय लावलेलं डोकं घेऊन जाणार का सगळ्या रस्त्यानं?" अशा अर्थाचे विचारून पोट धरून खो खो हसायला लागला. शॉकच होता त्याला
कारण तोपर्यंत मला "तसेच जाणे" यात विशेष काहीच वाटत नव्हते. आणि मग तिथे बसवून घेऊन पंधरा वीस मिनिटांनी स्वत: माझे डोके धुवूनच त्याने मला घरी पाठवले.
पहिल्यांदा गोव्यात गेल्यावर
पहिल्यांदा गोव्यात गेल्यावर बरेच शॉक बसले होते.
१. शिवराक हवंय म्हणून वेगळे सांगीतले नाही तर नुसती राईसप्लेट म्हणजे फिश करी राईस प्लेट
२. गाडीचा हॉर्न कोणी ओळखीचा माणूस दिसला की वाजवायचा असतो
३. सकाळी ऑफिसच्या वेळेला बाहेर पडल्यावर देखिल चहा मिळत नसे. चहाच्या टपर्या अस्तित्वात असल्याच्या खुणा देखिल नसणे.
शिवराक म्हणजे काय?
शिवराक म्हणजे काय?
शिवराक म्हणजे शाकाहारी
शिवराक म्हणजे शाकाहारी
कोल्हापूर, आळेफाटा, सासवड,
कोल्हापूर, आळेफाटा, सासवड, गोवा फाटा अशा अनेक ठिकाणी मिसळ म्हणजे तर्री, झणझणीत तिखट नुसता जाळ आणि धूर असे समीकरण पक्के होते. पण पुण्यात राहून पुण्यातील प्रसिद्ध मिसळ खाल्ली नाही या अपराध बोधापोटी एकदाची रांग लावून खाल्ली.
मिसळ म्हणून खाल्लेला तो पांचट प्रकार कल्चरल शॅक होता..
पुन्हा तोंडाला चव येण्यासाठी लोहगाला लांब जाऊन खाल्ली.
पुण्यात सलून मध्ये हेअरडाय
पुण्यात सलून मध्ये हेअरडाय लावल्यावर घरी जाऊन अर्ध्या पाऊण तासांनी केस धुणे असा प्रकार असतो. >> नाही हो असे काही नसते. जरा बर्या सलून मध्ये गेला तर व्यवस्थित डायच्या आधी आणि नंतर दोन्ही वेळा केस धुतात.
दक्षे मी ही सेम टू सेम अनुभव घेतला आहे मी तेच टायपायला आलो होतो
मी ज्यांच्याकडे गेलो त्या काकू म्हणत होत्या "हा भात सगळा संपवायचा आहे हां" मनात विचार केला हा एवढासा भात संपवायला चार घास पुरे
आम्ही अजून तो विषय काढून हसतो. एवढं मोजून मापून लोक कस काय जेवतात हा एक शॉकच होता.
अजून एक.. एका मित्राकडे गेलो होतो दुपारी रास्तापेठेत. किंक्रांत होती. हा हिरो आतमध्ये मस्त जेवत होता. त्याची आई बाहेर आली आणि म्हणाली तो जेवतोय बस थोडावेळ, पाणी हव का? (असं मी पण विचारतो
) द्या म्हटल. नंतर हा गडी जेवून आला, मला म्हणाला सॉरी जास्तच वेळ लागला गुळपोळी होती ना
पाणी हव का? हा प्रश्न सुद्धा शॉक वाटूच शकतो
१, २,५ च्या नाण्यांना डॉलर म्हणणे हा सुद्धा शॉक वाटू शकतो. मी तो अनुभव घेतलाय. आपण सर्रास वापरतो पण नवीन माणसाला कुठय डॉलर असे होइल 
Just mahiti mhanun vicharte -
Just mahiti mhanun vicharte - jyanna vishisht ghari gelyavar jevayla milalela nahi tyanna aavadta ka chinch-kokam/gul-sakhar/ khobar-kothimbir sadhal vaparlela aani kanda- lasoon sahsa ajibat n vaaparlela Anna jevayla?
Just ek request kitihi mothe cultural shocks asale tari jatinihay shocks talale tar hya bb chi maja rahil. Jevunach aala asal jokes khup velela aikalet/ vachalet, tyavar hasale aahe, sodun dilet. Baki ashya prakarchya lokanche anubhav fakt itarana yetay ase nahi swajatiya lokana pan yetay. Tyasathi gharabaher kadhihi upashi n padnyachi (konakade jevayla bolavale mhanuun jatana suddha) aani nehmi bagmadhe kahitari khayla thevaychi savay bahutek mandalina asate.
Kahi lihnyat chukla asel tar excuse!
मीच लोकांना दिले असतील
मीच लोकांना दिले असतील जेवणाचे शॉक. पुर्वी जेवण करता येत नसे अजाबात, अंदाज तर त्याहून चुकत. तेंव्हा जे कोणी आले असतील जेवायाला माबोकर त्यांच्या मनाच्या मोठेपणाबद्दल शंकाच नाही! मी घाबरत असे कोणी जेवायला येणार म्हटलं तर!
(ता.क. - आता परिस्थिती बरीच सुधारली आहे, कोणीही न सांगता आले तरी पटकन काही तरी गंमत खाऊ बनवतायेण्या इतपत!)
मला बसलेला कल्चरल सुखद शॉक
मला बसलेला कल्चरल सुखद शॉक युकेतला.
मुम्बईत वाढले तरी आधाशी नजरा, जाता येता लागणारे धक्के, संस्कृतीरक्षक ह्यामुळे कपडे करताना नेहमी आपण कुठे जाणार, कोणाबरोबर, कसा प्रवास करणार ह्याचा विचार करावा लागायचा. इथे मोकळं ढाकळं. काहिही कपडे घाला, कोणालाच फरक पडत नाही. तुम्ही स्त्री आहात ह्यापेक्षा माणुस आहात, अशी जाणीव सुखद होती.
तुम्ही स्त्री आहात ह्यापेक्षा
तुम्ही स्त्री आहात ह्यापेक्षा माणुस आहात, अशी जाणीव सुखद होती. >>> ग्रेट !
खुप दिवसानी मस्त धागा दिसला.
खुप दिवसानी मस्त धागा दिसला. माझे कल्चरल शॉक.पुण्यात शिकायला आल्यावर खुप शॉक बसले होते त्यातले हे आजही आठवतात.
त्याचं लाईफ आहे आणि त्याच्यासाठी हे नॉर्मल आहे हे हळुहळु कळत गेलं

आता काही वाटत नाही..
१. साल २००३--४ : पुण्यात पावभाजी ६०-७० रुपयांना मिळते हे बघुन मोट्ठा शॉक आणि खिशाला खड्डा दोन्ही एकदम बसले. माझ्या गावी तेव्हा पाभा १० रुपयाना मिळायची..सध्या सुद्धा अजुन २५-४० च्या रेंज मद्धे मिळते. त्यामुळे मी अजुनही शॉक मद्धे आहे
२. माझ्या कॉलेज मधला आणि माझ्या वर्गातला मुलगा ज्याची नुकतीच ओळख झालेली , तो पुढच्या आठवड्यात एका जवळच्या टपरी वर सिगरेट ओढताना दिसला होता आणि मला मोट्ठा शॉक बसला. माझ्या वयाचा मुलगा सिगरेट कसा काय ओढु शकतो असं झालेलं माझं.मग आता याच्याशी बोलु की नको ईथवर विचार मनात आले पण ते आले तसेच गेले
३. पुण्यात आलयावर पहिला चित्रपट पाहायला गेले होते.एका मित्राने टिकिट्स काढली.आत शिरलो आणि मी डायरेक्ट चित्रपट्गृहाच्या दाराजवळ जाउन उभी राहिले हेतु हा की दार उघडलं की पळत जाउन चांगली जागा मिळवायची. कारण की चित्रपट्गृहात सीट नंबर नुसार बसतात हे माहितीच नव्हते तोवर
आमच्या गावी जो पहिला त्याला चांगली जागा..सिट नं वगैरे काही नाही ...मित्रमैत्रीणी अजुनही या वर चिडवतात मला
४. कॉलेज मद्धे दिल्ली वाली एक मुलगी आली होती.तिच्याशी मैत्री झाली. कोण कुठे राहातं ? कोणाची रुममेट कोण अशी चर्चा चालु होती तेव्हा ती एकदम सहज म्हणाली की ती "अमक्या अमक्या" मुलासोबत रुम शेअर करते...त्याकाळी तो मोट्ठा शॉक होता
मुम्बईत वाढले तरी आधाशी नजरा,
मुम्बईत वाढले तरी आधाशी नजरा, जाता येता लागणारे धक्के, संस्कृतीरक्षक ह्यामुळे कपडे करताना नेहमी आपण कुठे जाणार, कोणाबरोबर, कसा प्रवास करणार ह्याचा विचार करावा लागायचा. इथे मोकळं ढाकळं. काहिही कपडे घाला, कोणालाच फरक पडत नाही. तुम्ही स्त्री आहात ह्यापेक्षा माणुस आहात, अशी जाणीव सुखद होती.>>>+११११११११११११
तुम्ही स्त्री आहात ह्यापेक्षा
तुम्ही स्त्री आहात ह्यापेक्षा माणुस आहात, अशी जाणीव सुखद होती. >>> +१ जाईजुई
यु.के.मध्ये हेयरकटसाठी अपॉईंटमेंट घेणे माझ्यासाठी कल्चरल शॉक होता.
>> नाही हो असे काही नसते.
>> नाही हो असे काही नसते. जरा बर्या सलून मध्ये गेला तर व्यवस्थित डायच्या आधी आणि नंतर दोन्ही वेळा केस धुतात.
हो. शोध लागला मला नंतर. तसेही हि घटना बरीच जुनी आहे.
हर्पेन ,
हर्पेन ,
>>>>
२. गाडीचा हॉर्न कोणी ओळखीचा माणूस दिसला की वाजवायचा असतो>>>>>
हा प्रकार फक्त गोव्यापुरता नाहीये, रस्तावर GA रजिस्ट्रेशन ची कोणतीही गाडी दिसली तरी दुसरा GA वाला हॉर्न मारून ,हात हलवून जातो.
माझा कालिग चे GA रजिस्ट्रेशन होते त्याच्या बरोबर 2 -३वेळा अनुभव घेतलाय
यु.के. मध्ये हेयरकटसाठी
यु.के. मध्ये हेयरकटसाठी अपॉईंटमेंट घेणे माझ्यासाठी कल्चरल शॉक होता >>> हा शॉक ७ रिश्टर स्केलचा आहे. आपल्याकडे फुटाफुटाला सलून असतात..
इथे कुठल्याही धाग्यात राजकारण
इथे कुठल्याही धाग्यात राजकारण येऊ शकतं हा माझ्यासाठी कल्चरल शॉकच आहे..
फ्रान्स मध्ये पहिल्यांदा गेले
फ्रान्स मध्ये पहिल्यांदा गेले तेव्हा भेटलेल्या टिम मधल्या मुलीने गालाला गाल लावुन 'गाली गाली' केलं. (हे बॉलीवूड पार्ट्या आणी फॅशन पिक्चर बघून माहित आहे पण करताना काही गोष्टी विसरल्या गेल्या
)
मग ते गोंधळलेलं 'गाली गाली' पाहून बाकी लोकांनी साधा शेखँड केला.
'गाली गाली' >>>
'गाली गाली' >>>

यावरुन आठवलं, आमच्या गल्फात अरब पुरुष लोक भेटले (म्हणजे हे रोज भेटत असतील तर नाही.. पण.. अरे कुठे होतास इतके दिवस गणपा ! अश्या प्रकारचा प्रसंग असेल तेव्हाच!) एकमेकांच्या नाकाच्या शेंड्याला नाकाचा शेंडा टेकवून 'गाली गाली' केल्यावर 'तोंडी तोंडी' जो आवाज करतात तसं करतात. पहिल्यांदा पाहताना जयस्री भाभी (खिचडी वाली) सारखं 'हाय लोक' झालं होतं आणि आता तसलं दृश्य दिसलं की 'थ्री इडियट्स' मधला 'नाक बीच में नहीं आती' हा डायलॉग आठवतो
दार उघडलं की पळत जाउन चांगली
दार उघडलं की पळत जाउन चांगली जागा मिळवायची. कारण की चित्रपट्गृहात सीट नंबर नुसार बसतात हे माहितीच नव्हते तोवर >>> माझा याच्या अगदी उलटा अनुभव आहे. वसईला असं जागा पकडणे वगैरे माहीत नव्हत आणि एकदा अमरावतीला आजी कडे गेले असताना मावशीबरोबर सिनेमाला गेलो तर मावशी म्हणाली दार उघडल्यावर पटकन चला आत नाही तर चांगली जागा मिळणार नाही. इतक करुनही आत बसायला बाकडं होत. खुर्च्या नाहीत
लहान होतो तेंव्हाचा एक प्रसंग
लहान होतो तेंव्हाचा एक प्रसंग. एकदा मित्राकडे अभ्यासाला गेलो होतो. अभ्यासाच्या नादात जेवायची वेळ होऊन गेली. काकू म्हणाल्या “खुप झाला अभ्यास, जेऊन घ्या अगोदर” मी खुप टाळायचा प्रयत्न केला पण काकू फार कळवळ्याने म्हणाल्या “अरे जेवायची वेळ होऊन गेली आणि तू असा ऊपाशी चाल्लाहेस, बरं दिसतं का ते. निदान एखादी पोळी खा माझ्यासाठी” पोळीचे नाव ऐकल्यावर मी डळमळलो. दोघेही हातपाय धुऊन जेवायला बसलो. ताटात चपाती, भाजी, लोणचे, चटणी असा नेहमीचा मेन्यू. समोरच ताटात चपात्या मोडून ठेवल्या होत्या. मी अर्धी चपाती संपवली. मित्राने अजुन अर्धी वाढली. असं करीत मी पोटभर जेवलो. हात धुऊन जेंव्हा बाहेर आलो तेंव्हा मित्राला म्हणालो “अरे, पोळीच्या नादात मी अर्धी चपाती जास्त खाल्ली पण काकूंनी पोळी काही वाढलीच नाही. विसरल्या वाटतं” प्रथम मी काय म्हणतोय हे मित्राच्या लक्षातच येईना. पण मग मात्र तो डोळ्यात पाणी येईपर्यन्त हसला, म्हणाला “अरे पोळी म्हणजे चपाती आणि पुरणपोळी म्हणजे तुझी पोळी”
अर्थात काकूंना हे समजल्यावर त्यांनी आवर्जुन “पुरणपोळी”चा बेत केला माझ्यासाठी हा भाग वेगळा.
१९९५-९७ दिल्लीच्या २
१९९५-९७ दिल्लीच्या २ वर्षांच्या वास्तव्यात 'दिल्लीचा दिलदारपणा' अनेक वेळा दिसला.
नजफगढ रोड, उत्तमनगरच्या पुढे राहायला होतो. सोमबाजार, मंगल बाजार असे एकेक दिवस एकेक गल्लीत बाजार भरायचे. बरे ते नुसते भाजी बाजार नाही तर कपडेलत्ते ,बेडशीट्स पासून सैपाकघरात लागणाऱ्या वस्तू, भांडीकुंडीसुद्धा सगळ एकाच ठिकाणी. बाजार मुख्यतः संध्याकाळचाच. ४ वाजेपासून लगबग सुरु व्हायची भाजीवाल्याची.
पंजाबी बायका भाजीला निघाल्या की शेंगा तोंडात टाक, कुठे द्राक्ष, कुठे काकडी, गाजर, कुठे भेंडीचे टोक तोडून खा, जे जे म्हणून खाण्यासारखे आहे ते तोंडात टाकत टाकतच बाजारात फिरत. .. तिथेच अर्धे अधिक पोट भरत असेल. आणि चक्क भाजीवालेही काही बोलत नसत. हा मला शॉक होता. मला आपल्याकडचे दूधीला नख खुपसू न देणारे, भेंडीचे टोक तोडू न देणारे, भाजी न निवडता घ्या असे खेकसणारे भाजीवाले आठवून गहिवरून आलं.
एकदा दारावर फळवाला आला. तेव्हा एकीने तर त्याच्याशी बोलत बोलत किलोभर फ्रुट्स खाऊन गेली. आणि वर काही घेतलेही नाही त्याच्याकडून. आणि तो ही काही बोलला नाही.
जावेला विचारले तर उत्तर आले, 'इकडे असच असतं, विक्रेत्याजवळ उभे राहून कितीही खा. घरात न्यायचं म्हटले तर पैसे द्यावे लागतात.
एक ओळखीच्या सरदारजीन्कडे गेलो होतो. . किती आग्रह , आणि विशेष म्हणजे इतक्या पदार्थांच्या डीश समोर यायच्या की नक्की काय खावं हा प्रश्न पडायचा. फरसाणचे विविध प्रकार, स्वीट्स, बेकरी प्रॉडक्ट्स आणि वर कोल्ड्रिंक्स. हो पण , आपल्यासारखे गरमागरम पोहे, उपमा, भजी वै ताजे प्रकार नाही.
कोल्ड्रिंक्सचे इतके फॅड तिथेच पाहिले.
या उलट, इथे पुण्यात एकदा आतेबहिणीकडे कसब्यात जेवायला बोलवलेल. तिच्या घरात सासु सासरे, लहान दीर वै मन्डळी.
आम्ही नुकतेच गावाकडुन आलेलो. (दक्षिणा म्हणते तश्या )२-२ छोट्या पोळ्या आणि आपण ताटात चटण्या लोणचे घेतो तेवढ्या भाज्या वाढल्या होत्या... दोन दोन घासाच्या. आम्ही एक डोळा कढईकडे पाहुन जेवत होतो. वर आतेबहिणीने एक पोळी मागितली तर तिला सासु म्हणाली, अग तुझ्या ३ चपात्या झाल्या ना? म्हणजे अगदी मोजुन मापुन.
मग ते गोंधळलेलं 'गाली गाली'
मग ते गोंधळलेलं 'गाली गाली' पाहून बाकी लोकांनी साधा शेखँड केला. >>
हे अस गाली गाली Alliance Francaise De Poona ला चालायच. त्यांची नाताळ पार्टी असते तेव्हा तर खूपच. आणि दोनदा केल्यावर म्हणायच not two, not two आणि परत तिसर्यांदा गाली गाली.
पहिल्यांदा तर लाकूडच गाली गाली झाल्यावर
:
गाली गाली आणि नाकी नाकी ची
गाली गाली आणि नाकी नाकी ची गंमत वाटली वाचून!
<<कॉलेज मद्धे दिल्ली वाली एक
<<कॉलेज मद्धे दिल्ली वाली एक मुलगी आली होती.तिच्याशी मैत्री झाली. कोण कुठे राहातं ? कोणाची रुममेट कोण अशी चर्चा चालु होती तेव्हा ती एकदम सहज म्हणाली की ती "अमक्या अमक्या" मुलासोबत रुम शेअर करते...त्याकाळी तो मोट्ठा शॉक होता Happy आता काही वाटत नाही..<<
अगदी, दिल्लीत पहिल्यान्दा गेले तेव्हा नवर्याच्या महाराष्ट्रीयन आर्किटेक्ट मित्रमन्डळीपैकी काहि मुले मुली एकच फ्लॅट शेअर करत होते...मग त्यान्च्यातली एक मुलगी प्रेग्नन्ट राहिली, नन्तर त्यान्नी लग्न केले .. तो शॉकच होता माझ्यासाठी.
यु. के. मध्ये सार्वजनिक
यु. के. मध्ये सार्वजनिक ठिकाणी लोक एकमेकांसाठी विशेषतः स्त्रियांसाठी दार उघडतात, उघडून उभे राहतात. लिफ्ट मध्ये जाताना किंवा बाहेर पडताना एखादी बाई असेल तर तिला आधी जाउ देतात. याची सवय नसल्यामुळे माझ्या काही भारतीय मित्रांना थोड्या लाजीरवाण्या प्रसंगांना सामोरं जावं लागलं होतं. तो पुढे गेला आणि मागून नादात येणार्या मुलीच्या कपाळाला जोरात दार लागलं आणि असे बरेच काही प्रसंग.
बस स्टॉपवर कितीही गर्दी असली किंवा बस कितीही उशीरा आली तरी बस मध्ये चढताना लाईन लावतात. आणि कमी गर्दी असेल तर चक्क पहेले आप - पहेले आप पण चालतं. बस/ ट्रेन मध्ये खूप गर्दी असली तरी कधीही घाणेरडा स्पर्श झाला नाही. त्यादॄष्टीने सतत सावध राहायची गरज नाही हे बरं वाटतं.
स्कॉलंड्मध्ये माझ्या ऑफीस मध्ये (काही) लोक दुसर्याच्या डेस्कवर जाउन बोलताना वाकून उभे राहण्याच्या ऐवजी - गुढग्यावर बसुन बोलायचे.
ऑफीसचं टॉयलेट साफ करणारी बाई आणि माझा प्रोजेक्ट मॅनेजर अधून मधून सिगरेटी फुंकताना, कॉफी घेताना, गप्पा मारताना एकत्र दिसायाचे. सुरुवातीला थोडं आश्चर्य वाटलं होतं.
गाली गाली >> इथे सरळ मिठ्या मारतात.पहिल्यांदा एका पार्टीत एका बुवाने मला हग केले. मी अटेंशन मोड मध्ये. त्याला माझा अनकंफर्ट जाणवला आणि तोच बिचारा "This is normal. It does snot mean anything" असं पुटपुटला. मग भारतीय टीममध्ये बरंच गॉसिप झालं आणि सगळी मुलं हग हा भारतीय नॉर्म असल्यासारखी ब्रिटीश मुलींना हग करत होती.
सगळी मुलं हग हा भारतीय नॉर्म
सगळी मुलं हग हा भारतीय नॉर्म असल्यासारखी ब्रिटीश मुलींना हग करत होती.>>
सगळी मुलं हग हा भारतीय नॉर्म
सगळी मुलं हग हा भारतीय नॉर्म असल्यासारखी ब्रिटीश मुलींना हग करत होती.
>>>
Pages