तुम्ही कोणते कल्चरल शॉक अनुभवले आहेत???

Submitted by कटप्पा on 26 June, 2018 - 16:58

तुम्हाला कधी कल्चरल शॉक बसला आहे का?

मी पहिल्यांदा अमेरिकेत आलो तेंव्हा एक गोष्ट मला फार वेगळी वाटली ते म्हणजे रेस्ट्रोरंट्स मध्ये कोल्ड्रिंक्स साठी असणारे फ्री रिफिल्स. एका ग्लास चे पैसे भरा आणि हवे तितके कोल्ड्रिंक प्या.

बाहेरगावी फिरताना तुम्ही कधी कल्चरल शॉक अनुभव केले आहेत तर सांगा इथे...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

लग्नात १७६० पदार्थ ठेवणे हे स्टेटस सिम्बॉल असावं परंपरा वगैरे पेक्षा. नवश्रीमंत वर्गात विशेष चढाओढ असते

मेधावि - पोस्टशी टोटली सहमत. तेव्हाची आणखी एक आठवण म्हणजे घट्ट पाक, लिंबाची परफेक्ट चव आणि केळी, बदाम घातलेला शब्दशः अवीट गोडीचा सुधारस आदल्या दिवशी असे.

मीच नवरी होते तरी न लाजता गरम गरम लाडू चार खाल्ले होते. >>> Lol

ते गाद्या सहसा आदल्या रात्री तेथे राहणार्‍यांकरता कार्यालयातूनच भाड्याने घेतलेल्या असतात. आजकाल जेवल्यावर बहुतांश लोक निघून जातात. पूर्वी आरामात ५ वाजेपर्यंत लोक कार्यालयात असत. काही हॉल मधे खुर्च्यांवर तर काही वर/वधू पक्षातील खोल्यांमधे. तेथे पुन्हा लाडू चिवडा वगैरे असे. पण पब्लिक बहुधा सुस्तावलेले असे. पूर्वी तेथे आज्या, काकू, माम्या वगैरे मंडळींबरोबर अनेकदा बराच वेळ काढलेला आहे. मात्र अशा ठिकाणी(सुद्धा) हमखास शाळेतील लेटेस्ट कामगिरीबद्दल प्रश्न असत Happy मी अशा खोलीत पेपर वाचल्याच्या रॅण्डम आठवणी आहेत. आदल्या दिवशी किंवा सकाळी परगावाहून आलेले नातेवाईक तेथील स्थानिक पेपर्स घेत. त्यामुळे मुंबई, नाशिक, कोल्हापूर वगैरे ठिकाणचे पेपर्स कधीकधी तेथे पडलेले असत. आता मटा, लोकसत्ता, पुढारी, लोकमत वगैरे सगळीकडे झाले. तेव्हा पुण्यात केसरी, सकाळ व तरूण भारत चे प्राबल्य असे, त्यामुळे या पेपर्सचे नावीन्य वाटे.

पुणेरी लग्नांचे वैशिष्ट्य म्हणजे वर पक्ष व वधू पक्षा यातील लोक एकसारखेच एन्जॉय करत लग्ने. एक ग्रूप राबतोय आणि दुसरा सेवा करून घेतोय असे नव्हते. म्हणजे फार पूर्वी होते पण इतरांच्या मानाने खूप लौकर ते सुधारले. हुंडा वगैरे तर नाहीच पण बहुधा एखाद दोन दागिने सोडले तर वधू पक्षाला वेगळा काही खर्च नसतो. आता प्रत्येक लग्ने अशी नसतील पण मी पाहिलेली बरीच होती.

मग नंतर अमराठी लोकांच्या लग्नात गेलो तेव्हा बरेच कल्चरल शॉक्स बसले. एकतर मुलाकडच्या मंडळींचा भलताच रूबाब असतो. फालतू लोक सुद्धा बळंच भाव खाउन घेतात. माझ्या राजस्थानी मित्राच्या लग्नाला गेलो तर आम्हालाच ऑकवर्ड झाले ते लोक - इव्हन त्यांच्याकडचे ज्येष्ठ लोक - आमच्याशी जसे वागत ते पाहून. बनारसला गेलो तर तेथे लग्न ३-४ दिवस होते. मुहूर्त वगैरे होता बहुतेक पण सर्व काम निवांत चालले होते. त्यांच्याकडेही मोकळ्या जागेत बंदुका चालवायची प्रथा होती. हे वाचायला विचित्र वाटेल पण ते लोक ते पक्षी टिपायचा प्रयत्न करत होते.

आणखी एक कल्चरल शॉक म्हणजे नंतर काही लग्नांत आमंत्रित केलेल्या राजकीय नेत्यांना स्टेजवर बोलावून सत्कार केल्यासारखे प्रकार पाहिले. ते लोकही बिनदिक्कतपणे ते करू देतात. आज आपले महत्त्व नाही हे साधे पब्लिकला समजत नाही.

मग इथे लग्नात ५०-६० लोकच बोलावतात व प्रत्येकाच्या नावाचे सीट असते. तेथे लहान मुले दंगा वगैरे करत नाहीत हे पाहून असाच कल्चरल शॉक बसला होता. आपल्याकडे पूजा, आरती वगैरेला सुद्धा इतके येतात. आणि लग्नाच्या हॉल मधला मुलांचा धिंगाणा असतोच.

फेफ Happy त्यावर पुलंच्या एका वाक्याचा इफेक्ट आहे. परदेशात एका पुलाबद्दल त्यांचा टॅक्सीवाला सांगत असतो की पूर्वी तेथे खूप लोक आत्महत्या करत, पण नंतर प्रमाण कमी झाले. तेव्हा त्याच्या चेहर्‍यावर "आता ते पूर्वीसारखे आत्महत्या करणारे राहिले नाहीत" असे भाव होते असे काहीतरी त्यांनी लिहीले आहे. 'जावे त्यांच्या देशा' मधे आहे बहुधा.

मग इथे लग्नात ५०-६० लोकच बोलावतात व प्रत्येकाच्या नावाचे सीट असते. तेथे लहान मुले दंगा वगैरे करत नाहीत हे पाहून असाच कल्चरल शॉक बसला होता. >>>पेक्षाही लग्नाचि रिहर्सल असते हे बघुन मला अचन्बा वाटला होता.... बाकी लग्न न करता मुल मग ते आइ-बाबाच्या लग्नाला असणे, सक्खे सावत्र असे सगळे पालक हसुन खेळुन लग्नात असणे वैगरे शॉक होतेच आता कशाच काहि वाटत नाहि.

जपान मध्ये होता हा किस्सा >>> ओह Happy माझ्या डोक्यात 'मि. सानफ्रान्सिस्को' हे 'जावे त्यांच्या देशा' मधले मिक्स झाले.

“ त्यावर पुलंच्या एका वाक्याचा इफेक्ट आहे. ” - Happy ती अंतरीची खूण पटली होतीच Happy ‘पूर्वरंग’ मधला किस्सा आहे.

फारएण्ड, तो सुतक टोन आणि लग्नाचं वर्णन - दोन्ही मस्त !

पुणेरी लग्नांचे वैशिष्ट्य म्हणजे वरपक्ष व वधूपक्षातील लोक एकसारखेच एन्जॉय करत लग्ने. एक ग्रूप राबतोय आणि दुसरा सेवा करून घेतोय असे नव्हते
>>>
माझ्या मुलाच्या साखरपुड्याला त्याची कॉलेजमधली एक मैत्रीण आली होती. ती यू.पी.ची आहे. आमच्याशीही तिची चांगली ओळख आहे. तिला समारंभातलं वातावरण पाहून टोटल क.शॉ. बसला होता. ती नंतर मला म्हणे- आमच्याकडे साखरपुडा, लग्न इतकं हसतखेळत, मिळूनमिसळून होत नाही. कोणत्याही क्षुल्लक गोष्टीवरून वरपक्षाचा पापड मोडू शकतो. मग मुलीच्या बापाने त्यांच्यासमोर हात जोडायचे, क्षमायाचना करायची. Uhoh

आता वातावरण बदल झाला आहे काही वर्षांपूर्वी म्हणजे 50 ते 60 वर्षापूर्वी पण महाराष्ट्रात पण वर पक्ष म्हणजे श्रेष्ठ असा प्रकार होता..आता हे प्रमाण कमी झाले आहे .पण अजून बदल होण्याची गरज आहे.
अजून पण लग्नाचा खर्च वधु पक्षानेच करायचा अशी रीत आहे
आणि ती पूर्ण चूक आहे.
लग्नाचा खर्च दोघांनी मिळून च करायला हवा.
कोणाची आर्थिक स्थिती चांगली नसेल तर दुसऱ्याने जास्त खर्च करावा.
25 वर्ष पूर्वी माझ्या मित्राने लग्न मंदिरात वैदिक पद्धती नी केले होते.
आर्थिक ,सामाजिक स्थिती अतिशय उत्तम असून पण.
लग्नात बडे जावं मध्ये विनाकारण पैसे खर्च होतात असा विचार त्या मागे.
तोच वाचलेला पैसा वधू वराना त्यांच्या भावी आयुष्यासाठी उपयोगी पडेल.
ज्याच्या कडे एक्सेस पैसा आहे त्यांनी बडे जावं करावा.

पुणेरी लग्नांच्या आ ठवणी असा बाफ काढा. सर्व आठवणीना अनुमोदन. काल फोन वरुन वाचल्या.

एक ब्राम्हण मंगल कार्याल य आहे/ होते. तिथे बोहले जिथे आहे तिथे छोट्या एक पाउल कसेबसे मावेल अश्या पायर्‍या नी बनवलेले एक स्ट्रक्चर होते. मी झगा मगा फ्रॉक घालून त्या पायर्‍यांवरून वर खाली केलेले आहे. ऐन लग्नात. ही बारकी पायर्‍या भिन्त दोन्ही बाजुनी व मधे नवर देव नवरी उभे राहायचे. अगदी साधे छोटे कार्यालय होते.

त्या गाद्यांबद्दल अगदी अगदी. व वरात सुद्ध्हा.

ब्राह्मण मं. मधे कंत्राट न घेता आपले आपण कार्य करायची सोय होती.

नारायण गोष्ट लागली की माझ्या डोळ्यापुढे ब्राह्मण मंगलच येतं कायम.

लग्न प्रसंग, गाद्या, जेवण वाचून नॉस्टॅल्जिआ झाल्या सारखे वाटले.. ते तर्री युक्त मटकी पुरी, मसालेभात खाऊन मी जाम ताणुन द्यायचे Wink

आणि हो सिंगापोरात २-३ दिवसांच्याच काय अगदी तान्या आदल्या दिवशी जन्मलेल्या बाळाला घेऊन माता फूडकोर्टात बसतात खातात, बाजूच्या दुकानांत शॉपींग करून जातात, हे पहिले तेंव्हा मला माझ्या आईचा अचंभित चेहरा आठवतो Lol
तिला क.शॉ. बसला होता खरेच!

कारण म्हणजे इथे बहुतेक जणांच्या आयांना/ सासूंना प्री नेटल केयर साठी घरी आणुन ठेवलेले असते पण कित्तेकांच्या आया सासवांना येणे/करणे झेपत नाही. नॅनी मिळणे सोपे नसते आणि ९०% लोक इथे बाहेर च जेवतात त्यामुळे त्यांना ह्यात काहीच वावगे वाटत नाही.
बाकी चायनिज लोकांतही कनफाईनमेंट पिरेड मधे जोरदार वेळ घेऊन बनवलेले पदार्थ असतात (१ बर्ड नेस्ट म्हणुन माझ्या कलीग ने मला प्रेमाने बाळंत झाल्या वर दिले होते..फार महाग असते आणि बाळंतिणी साठी खूप गुणकारी असे लिक्वीड असते)
माहिती- Edible bird's nest (EBN) is derived from the saliva of certain types of swiftlets. It is consumed in many parts of the world for its nutritional and medicinal values.

इम्युनिटी आणि अँटी एजिंग साठी गुणकारी असते.

इतक्या लांब जाण्याची गरज नाही.
मी असे ऐकले आहे कातकरी समाजात (जे नदीवर च राहतात आणि मासे ,खेकडे पकडुन विकतात ते)
मुल जन्माला आले की त्याला थंड पाण्याने च आंघोळ घालतात
त्याला आणि त्याच्या आई ल पण.
आपल्या सामान्य मध्यम वर्गीय कुटुंबात हजार नियम असतात आणि खूप काळजी घेतली जाते .

आमची पुतणी बाळ झाल्यानंतर तिच्या घरी गेली याचा कल्चरल शॉक आमच्या भारतातील नातेवाईकांना बसला होता. तिच्या मातेने तिला समजावून सांगितले होते की माहेरी येऊन रहा तर म्हणे मला माझ्या घरीच बर वाटेल! कोव्हिड काळ असल्याने तिच्याकडे मदतीला जाणेही शक्य नव्हते! नंतर 1 की 2 आठवड्यात ती एकटीच तिच्या आईकडे बाळाला घेऊन ड्राईव्ह करत आली (जवळपास दीड तास ड्राइव्ह) हे समजल्यावर भारतातील नातेवाईक आम्हाला रागावलेच Lol अर्थात आमचे सख्खे नातेवाईक सोडून.

आता असा प्रतिसाद देण्यास हरकत नाही.
अगोदर च दिला असता तर धागा भरकटला असता.लोकांचा मूड ऑफ झाला असता.
कल्चर काय असते?
कपडे परिधान करण्याची पद्धत.
काय अन्न खातो आणि त्या वर काय प्रक्रिया केली जाते.
भाषा
रीती rivaj .
विविध समजुती .
म्हणजे कल्चर..
जग खूप मोठे आहे काही किलोमीटर वर कल्चर बदलत..
त्या मध्ये शॉक लागण्या सारखे काही नाही.
कारण तुम्ही प्रथम डबक्यात होता नंतर बाहेर आला तेव्हा हे माहीत पडलें

अनंत प्रकारचं कल्चर खूप वर्षा पासून अस्तित्वात आहे
आपण प्रथम अंड्यातून बाहेर आल्या मुळे ते आपल्याला आता माहीत पडले.
खरा प्रश्न हा आहे .
स्वतः मध्ये बदल ,शॉक लागून पण.
शॉर्ट ड्रेस मध्ये स्त्रिया बघितल्या शॉक बसला.
आणि नंतर स्वतचं शॉर्ट ड्रेस वापरायला सुरुवात केली..
हे फक्त उदाहरण म्हणून
खुप लोक वेगळे कल्चर बघून शॉक लागला म्हणतात पण काही वर्षात स्वतचं त्या कल्चर चे पालन करतात
हा खरा शॉक आहे.
आणि दुसरे कल्चर आत्मसात करण्यात स्त्रिया पुरुष पेक्षा खूप पुढे असतात..
३० वर्ष गावातील पुरुष मुंबई सारख्या शहरात राहिला तरी त्याची भाषा गावठीच असते स्त्रिया दोन वर्षात च शहरी भाषा बोलतात..
पुरुष जन्म भर कल्चर सोडून दुसऱ्या ठिकाणी राहिले तरी आहार त्यांचा तोच मूळ असतो स्त्रिया एका वर्षातच आहार पण बदलतात..
हा खरा शॉक आहे.

त्यात शॉक काय आहे? स्त्रियांना मुळातच फ्लेक्झिबल राहायला शिकवलेले असते. त्यांना सो कॉल्ड परक्या घरी जाऊन ऍडजस्ट व्हायचे असते म्हणून.. किंवा नवऱ्याच्या बदलीच्या ठिकाणी कुठेही राहावे लागले तरी ऍडजस्ट व्हावे लागले तर.

याऊलट पुरुषप्रधान संस्कृतीमुळे पुरुषाच्या घरातले कल्चर पुढे जावे म्हणून त्याला तिथे असेल त्या बाबतीत (भाषा / आहार / वागणूक / कपडेपट/ विचार वगैरे) कितीही चांगले किंवा भंगार / टाकाऊ का असेना वृथा अभिमान बाळगून त्याबाबतीत भलतीच रिजिडीटी बाळगायला शिकवले जाते (नकळतपणे).

त्यामुळे स्वतःला बदलण्याची वेळ येते तेव्हा स्त्रिया बाजी मारतात.

अजून एक सिंपल उदाहरण.
पाणी पुरी हा काही महाराष्ट्र चा पदार्थ नाही.
मुंबई मध्ये स्थलांतरित झालेल्या लोकात.
स्त्रिया नी हा पदार्थ लगेच स्वीकारला.
पाणी पुरी ची दुकान बघितली तर मराठी स्त्रिया जास्त असतील.
पण त्याच काळात मुंबई मध्ये आलेल्या पुरुषांनी तो पदार्थ स्वीकारला नाही..
माझे सांगतो.
माझी बायको ल प्रचंड पाणी पुरी आवडते.मी बाजूला उभा राहून बघतो.
आणि शेवटी मन राखण्यासाठी सुखी पुरी खातो.
ती पण मना विरुध्द.
म्हणजे मी अजून बदललो नाही..ज्वारी ची भाकरी च आवडते.

आग्र्यात ज्या हॉटेलमध्ये रहात होतो तिथे एक लग्न समारंभ होणार होता. वरपक्ष व वधूपक्षातील जवळचे नातेवाईक दाखल झाले होते. तिथल्या पद्धतीप्रमाणे लग्नाचा, राहण्याची सोय वगैरेचा पूर्ण खर्च वधूपक्ष उचलत होता. ऐन जानेवारीतली थंडी होती. लिफ्टसाठी लॉबीत उभे असताना वरपित्याने अगदी सहज विहिणीला सांगितले की थंडी जास्त आहे तर आमच्या ड्रायव्हरसाठी गरम पांघरूणाची सोय करा. विहीणबाईंनीही तत्परतेने कुणालातरी फोन करून ड्रायव्हरसाठी ब्लॅंकेटची व्यवस्था करवली.

वास्तविक हॉटेलमधे ड्रायव्हरसाठी डॉर्मिटरीची, आंघोळीची सोेय असते. त्यातून जरी आपल्या ड्रायव्हरला काही गैरसोय होत असेल तर वरपिता हॉटेलमधे बोलून स्वतःच काहीतरी करवून घेऊ शकला असता किंवा ड्रायव्हरला थोडे पैसे देऊन गरम कपडे घे म्हणून सांगू शकला असता (फार उशिर झाला नव्हता, मार्केट चालू होते).

वधूपक्षाकडून लोक किती न काय अपेक्षा ठेवून असतात हे पाहून धक्का बसला.
(इथे ड्रायव्हरची का सोय करू नये, त्याऐवजी नातेवाईक असते तर वगैरे पॉंईट काढू नयेत. आपल्यासोबत आलेल्या सर्वांची सोय आपण पहावी हा मुख्य मुद्दा आहे.)

वधूपक्षाकडून लोक किती न काय अपेक्षा ठेवून असतात हे पाहून धक्का बसला>>> खरंच.
जिथे पाय धुण्याची वगैरे अपेक्षा ठेवतात तिथे हे काय Sad

मठ्ठ्यात पाणी जास्त पडलं तरी ते पाणी वधू पित्यानेच ओतलय असा माज वराकडचे दाखवतात Angry

इव्हेंट मॅनेजमेंट उत्तम असावे लागते.
लग्न समारंभ हा एक इव्हेंट च आहे आणि त्याची जबाबदारी वधु वर
ज्यांचे लग्न आहे त्यांची आहे.
त्यांच्या लग्नाच्या इव्हेंट साठी लोक जमा झाली आहेत अधिकृत आमंत्रण मिळाल्यावर.
कोणी आपल्या मनाने येत नाही आणि कोणाला इतका वेळ पण नसतो.
इव्हेंट आहे तर
विविध प्रकारची माणसं असणार.त्यांची गरज असते कोणी ऐश करायला येत नाही.त्यांना बोलावले जाते
श्रीमंत आणि उच्च मध्यम आर्थिक गटात.
ड्रायव्हर असणार च.
मुल सांभाळणाऱ्या आया असणारच.
ह्या दोन्ही घटक शिवाय येणार पाहुणा लग्नाच्या
इव्हेंट मध्ये सहभागी होवूच शकत नाही.
मुल सांभाळणाऱ्या बायका.
त्यांच्या ताब्यात भावी वारस आहेत
ड्रायव्हर ज्यांच्या हातात मालकच जीव आहे.
त्यांना योग्य राहण्याची सोय,जेवणाची सोय,झोपण्याची सोय ही करावीच लागते .
कोणी ही करा.
मी खूप लग्नाचे इव्हेंट बघितले आहेत.
सर्व घटकांची योग्य सोय कशी करावी ह्याचे नियोजन ये व्यवस्थित करतात

लग्नाला आलेल्या लोकांची सोय किंवा वैयक्तिक कर्मचार्‍यांची सोय करू नका असे म्हणत नाहीच आहे. पण पंचतारांकित हॉटेलमधे महागडी कार
घेऊन येऊ शकणार्‍या माणसाने त्या गाडीच्या ड्रायव्हरसाठी दुसर्‍याकडून अपेक्षा करणे हे मला धक्कादायक वाटले.

आमच्याकडच्या म्हणजे साधारण कोकणात होणार्‍या लग्नात खर्च निम्मा निम्मा करायची पद्धत आहे. आणि वरपक्ष काही एक्स्ट्रा रुबाब दाखवतो असे कधी वाटले नाही. लहानपणापासून कुटुंबात ईतकी लग्ने पाहिली. कधी आम्ही वराकडचे असू तर कधी वधूकडचे. पण कधीच काही फरक जाणवला नाही. दोन्ही वेळा तितकीच धमाल केलीय. एवढ्या गोतावळ्यात एखादे आजोबा तिरसट असू शकतात, पण त्यांना दोन्हीकडचे लोकं मिळून सांभाळून घेतात. वराची बाजू डोमिनेटींग कधी वाटली नाही.

हुंडा मानपान वगैरे अनुभव घरच्या लग्नातून नाही तर चित्रपटातूनच समजत आलेय.

माझा प्रश्न खूप खूप येडपट वाटेल आणि मला विचारायलाच कसं तरी वाटतंय पण जेन्यूअली विचारत आहे,आदल्या दिवशी झालेल्या किंवा 2 3 दिवसाच्या बाळाला घेऊन फूड कोर्ट मध्ये बसणं किंवा शॉपिंग करत चालणं त्या आईला कसं जमतं?नॉर्मल डिलीव्हरी असेल तरी किमान 2 3 टाके तरी असतातच न

बरोबर आदु.

सेम मला जेव्हा बाळ झाल्यानंतर काही तासातच राणीच्या सुना (इंग्लंडमध्ये) बाळ घेऊन बाहेर आलेल्या बघितल्या तेव्हा कशॉ बसला होता.

काही तासातच त्या एकदम फ्रेश, सुंदर मेकप केलेल्या, कॅमेरा फेस करायला एकदम एनथु, रिलॅक्स, कोणाचाही आधार न घेता स्वतःच्या पायावर उभ्या (शब्दशः) वगैरे कश्या काय असू/ दिसू शकतात?

मी नॉर्मल आणि सीझर दोन्ही डिलिव्हरी झालेल्या सगळ्या (वेगवेगळ्या) बायका डिलिव्हरी झाल्यावर किमान 24 तास झोंबीसुद्धा त्यांच्यापुढे सुंदर दिसेल अश्याच अवतारात बघितल्या आहेत.

कारण तिथे बायका प्रेग्नन्सी मध्ये सगळी कामे करत असतात... मुख्य म्हणजे दोन माणसाचे खाणे असला गैरसमज नाहीय तिथे...वर्क आऊट करत असतात... पेल्विक मसल चांगले डेव्हलप असतात - तीन चार पुश मध्ये बेबी डिलिव्हर वगैरे करणारे भरपूर असतात... एपिड्युरल न घेता...

आदू, प्रश्न रास्त आहे. सगळ्यांना टाके असतातच अस नाही! वरवर 2-4 असले तर योग्य ती औषधे किंवा काळजी घेऊन manage करता येते. मुळात भारत सोडून इतर देशात pregnancy and child birth हा काही स्पेशल शारीरिक एपिसोड (मला योग्य शब्द सुचत नाही) न मानता नैसर्गिक बाब मानतात. डॉक्टर, प्रेग्नंट बायका, तिच्या घरचे सगळेच उगाच तू प्रेग्नंट आहेस तर हे करू नको, ते करू नको, हे खाऊ नको, तेच खा असे काही म्हणत नाही. अर्थात काही कॉम्प्लिकेटेड केसेस वगळता. त्यामुळे सगळे कुल असतात. शिवाय बाळाला बाहेर घेऊन जाताना वातावरण असेल त्याप्रमाणे योग्य त्या कपड्यात गुंडाळून, pram मध्ये ठेवून घेऊन जातात. Pram व्यवस्थित झाकून घेता येते. बाळाला कोणी उगाच हातात घेऊन फिरत नाही. कारमध्ये पण मागच्या बाजूला बाळासाठी योग्य आणि सेफ असे कार सीट असते.
माझ्या निरीक्षणानुसार बऱ्याच स्त्रिया शारीरिक दृष्टीने खूप कणखर असतात. त्यामुळे बऱ्याच जणी अक्षरशः दुसऱ्या दिवशी दवाखान्यातून घरी जातात आणि रुटीन सुरू करण्याचा प्रयत्न करतात.

आता वरील माहिती असली तरी मला याबाबतीत बसलेला क शॉक सांगते. माझी एक कलीग प्रेग्नंट असताना सायकल चालवत यायची! चढ उतार करत 10-15 किलोमीटर अंतर एका बाजूने!

काही तासातच त्या एकदम फ्रेश, सुंदर मेकप केलेल्या, कॅमेरा फेस करायला एकदम एनथु,
>>>

कॅमेरा फेस करायला एन्थु असतात की नाही देव जाणे. प्रेझेंटेबल दिसण्याचे हे एक नसते प्रेशर. पण च्रप्स म्हणतात तसे आपल्याकडे जनरली गरोदर बायकांना खूप पॅम्पर केले जाते तसे तिथे नसल्यामुळे त्या शब्दशः लवकर पायावर उभ्या राहत असतील.

माझी बायको 5 का 6 महिन्यांची प्रेग्नेंट असताना लोहगड किल्ला चढून आलेली
तिच्या मैत्रिणी म्हणे तुमच्या पोटी मावळा येणारे जन्माला Happy

आणि खरोखरच आला Happy

पण हे आमच्या नातेवाईकांना कळल्यावर जाम शिव्या खाल्ल्या होत्या
त्यांना बसला असेल कल्चरल शॉक Happy

मी सोशलसाईटवर पोरांचे भरमसाठ फोटो टाकतो ते बघून बरेच जण मला बोलतात की नजर लागेल, नजर लागेल.. अर्थात ते माझे हितचिंतकच असतात. फक्त आमचे विचार जुळणारे नसतात.

पण हल्ली बघतो की बर्‍याच गरोदर बायका आठव्या नवव्या महिन्यात पुढे आलेल्या पोटासह छान प्रोफेशनल फोटो शूट करून तो अल्बमच सोशलसाईटवर टाकतात. नवीन बाळाचा हॉस्पिटलमध्येच बाबाच्या कुशीतला फोटो टाकतात. वा काही जण नुसते बाळाच्या पावलांचा फोटो काढून टाकतात.

अर्थात मला त्याचे काही वाटत नाही. पण नजर लागेल विचारसरणीला किती मोठा कल्चरल शॉक बसत असेल याचा विचार करून गंमत वाटते Happy

Pages