अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोकलत यांच्यासाठी (त्यांनी या धाग्यावर मुळीच लिहू नये , म्हणून) काढलेला वेगळा धागा दिसला, म्हणूनच मी हा अमानवीय धागा वाचायच्या फंदात पडलो.

<बोकलतचा अर्थ काही का असो पण
'हा बोकलतपणा आहे माने' असा डायलॉग इथून पुढे रूढ झाला तर आश्चर्य वाटणार नाही >
अजुन एक
आयत्या धाग्यावर बोकलतबा

घरोघरी बोकलतच्या गोष्टी

मायबोलीच्या बोकलतना आरसा कशाला

आधी भूतोबा मग बोकलतबा

बोकलत तो धागा पीळी

आमचा तो सोनूला बोकलतचा ते कार्ट

क्रमशः

बोकलत म्हणजे जोरात पळणे. आमच्या गावी जी जुनी माणसं होती ती हा शब्द वापरायची.>>> हो बरोबर.
आमह्याकडेही वापरतात. पण तुम्ही लिहिलंय तेवढ्या चांगल्यापणी नाही वापरत.
काय म्हशीसारखी बोकळतेय. रेड्यासारखा बोकळत सुटलाय वै. अशा कंटेस्ट मधे वापरतात Lol

एकंदर लिखाणावरून असे वाटत आहे कि बोकलत व प्रीत ००९ या एकमेकांशी भांडणा-या आयड्यांना थोडे थोडे टक्कल असावे. पैकी प्रीत ००९ या आयडीचे टक्कल विस्तीर्ण असावे. दोघांचेही कुरळे केस मागे हटलेले असणार. बोकलत हा आयडी केशरी गंध लावणारा व वर्णाने अत्यंत उजळ, कडवा आणि हुषा-या करताना डोकं चालवल न गेल्याने वारंवार पकडला जाणार असा असावा. प्रीत ००९ या आयडीचंही हेच होत असावं.

या दोघांमधे मासे हा ही एक घटक सारखाच असावा. प्रीत ००९ या आयडीला मासे आवडत असतील. कदाचित खातही असावा आणि पाळतही असावा. तर बोकलत या आयडीला गावाजवळ समुद्र असूनही मासे खाल्लेले चालत नसावेत.

हा बोकलतपणा आहे माने' >>> हा शुध्द बोकलतपणा आहे माने! असं म्हणा हो Happy

काल मुलाला अमानविय वरचे प्रसंग सांगितले. बोकलत हे नाव ऐकूनच तो लाल होईपर्यत हसला Lol

हमम.... शेवटी हा धागा hijack झालाच तर..
आमचे अनुभव तुम्हाला थापा वाटतात किंव्हा मानसिक रोग वाटतो..तर एक अनुभव सांगतो तो एका..
मीही तुमच्या सारखा एक वैचारिक मनुष्य आहे. डोळे झाकून कोणत्याही गोष्टीवर विश्वास नाही ठेवत मात्र
समोरची गोष्ट माझ्यासाठी पूर्ण असत्य कधीच नसते जो पर्यंत त्याचा पडताळा नाही पाहत.
ज्योतिष सुद्धा मी याच उद्देशाने शिकायला सुरवात केली पण नंतर त्याचे result कळू लागले तसे यावर विश्वास बसला.
तसेच मला जिथे कळेल कि अमुक एका व्यक्तीला अमुक एक विद्या अवगत आहे तिथे मी शक्य असेल तर भेट देऊन खात्री करायचा प्रयन्त करतो
पण जो पर्यंत खात्री किंवा अनुभव नाही येत तो पर्यंत ती गोष्ट मी पूर्णपणे असत्य कसे म्हणू..
उदाहरणार्थ माझ्या दोन नंबरच्या मोठ्या भावाच्या सासरच्या लोकांना एक बाई माहित आहे तिच्या अंगात देवी येते व ती त्यात लोक्कांना मार्गदर्शन करते
त्यांनी तिला विचारलं होत कि मुलीला मुलं केंव्हा होईल काही अडचण नाही ना वगैरे.. तेंव्हा ती बाई म्हणाली काळजी करायचं काम नसतंय पाचव्या वर्षी होईल बघ मूल आणि मुलगा होईल बघ..
जेंव्हा माझा भावाने मला फोने करून मी काका होणार असल्याची खुशखबर दिली तेंव्हा हा हि विषय निघाला. तो म्हणाला त्यांनी (त्याच्या सासरच्यांनी )
त्या बाईला विचारलेलं त्याला माहित होत मात्र त्याचा अशा गोष्टीवर विश्वास नाही आहे त्यामुळे तो कधी नाही बोलला पण वाहिनीची खुशखबर व पाचवे वर्ष जुळून येत आहे तसेच माझा भाऊ सध्या सिडनी मध्ये आहे तिथे डिलेव्हरीच्या वेळी डॉक्टरांकडून सर्व तपासणी होते,सोनोग्राफी होते तेंव्हा ते मुलगा कि मुलगी ते सांगतात. भारतासारखी मानसिकता तिथे नाही कि मुलगी झाली कि पाडा गर्भ,असो तर त्यावेळी मुलगा आहे असेही सांगितले..
जेंव्हा आमच्या घरी वाहिनीचा भाऊ आला तेंव्हा मी तो विषय सहज काढला. तो म्हणाला कि मी पहिले आहे ती अंगात आले कि वेगवेगळ्या भाषांमध्ये बोलते
अडाणी बाई आहे पण इंग्लिश अस्सलखीत बोलेल इतर भाषा पण बोलेल पण अंगातून गेलं कि गावठी बोलते. मी म्हणालो अंगात आलं कि इंग्लिश व इतर भाषा बोलते वगैरे हा काय पुरावा नाही. मी वाचलंय त्या प्रमाणे अंगात येणे हा मानसिक आजाराचा प्रकार आहे. पण तो म्हणाला त्याला व त्याच्या काही मित्रांना पण अनुभव आहे.
झालं हे आमच बोलणं माझ्या मोठ्या वाहिनीने मनावर घेतलं व म्हणाल्या आपण जाऊन येऊया का एकदा. माझ्या मोठ्या वाहिनी शाळेत शिक्षिका आहेत व त्यांच प्रमोशनच काम तीन वर्ष होत नव्हतं. मागे त्यांनी मला विचारलं होत तेंव्हा ज्योतिष शात्रानुसार मी तुमचा काम निदान एकदोन वर्ष नाही होणार असे सांगितले होते. परत कधी होईल हे आपण नंतर प्रश्नकुंडली मांडून पाहू असे सांगितले कारण ज्योतिषशात्रानुसार प्रश्नकुंडली हि एक ते दीड वर्षासाठीच वापरायची त्यापुढे दशा अभ्यास नाही करायचा..असो तो वेगळा विषय आहे..
मात्र म्हणतात ना जिथे पिकतं तिथे विकत नाही तास काहीसा प्रकार म्हणा हवे तर वाहिनी म्हणाल्या तुम्ही मागे म्हणाला होता कि दोन वर्ष काम नाही होत
आता दोन वर्ष होऊन गेली आहेत तुम्ही पण बघा आणि आपण जाऊन पण येऊया.. जायचं काही नाही मला तर अश्या लोक्काना भेटायला आवडते पण ते ठिकाण खूप लांब होते. माझी सुट्टीही संपत आली होती व मला परत पुण्याला जॉबला हजर व्हायचे होते आणि असे अंगात वगैरे म्हंटल्यावर आपल्या पदरी निदान ८०% निराशाच पडणार असे मला वाटू लागले. तरीही आम्ही जायचं फायनल केलं. पण जाताना एके ठिकाणी ट्रॅफिक मध्ये अडकल्यामुळे आम्हाला खुपच उशीर झाला. तरी आम्ही एकल कि अंगात फक्त एक-दोन तास असत व नंतर त्या अक्का ( त्यांना सर्व अक्का म्हणतात) कवड्या टाकून प्रश्नाचं उत्तर देतात. आता तर मला ९०% निराशा पदरी पडणार असे वाटू लागले. ज्योतिषशास्त्राला काही ठराविक नियम सूत्र आहेत या कवड्या टाकून काय डोंबलाचे भविष्य सांगणार असे माझे मन मला सांगत होते. शेवटी तिथे पोहचलो गर्दी होती काही लोक आपले अनुभव सांगून तुमच्या मूळे काम झाले असेही फीडबॅक देत होते. माझे शंकेखोर मन हि यांचीच माणसं दिसतायत असे सांगत होते. मी फक्त बाजूला बसून तमाशा पाहायचे ठरवले. त्या अक्का कवड्या टाकून पुढील ४-५ सेकंदात सांगत. आमच्या ज्योतिषशात्रात तर एक कुंडली नीट मांडून सर्व अभ्यास करून उत्तर द्यायचे म्हंटले तरी किमान एक तास तरी धरा पण या इथे एक दोन वेळा कवड्या टाकत व लगेच उत्तर देत. इतक्यात एका व्यक्तीने प्रश्न विचारला आक्कांनी चार पाच वेळा कवड्या टाकल्या त्यांना काही उत्तर सापडेना कदाचित त्यांनी आपला उजवा हात कानाला लावला व फोन वर बोलतात तसे कुणाशी तरी बोलल्या कि मला कवड्या अश्या संकेत देत आहेत काय समजायचं. एकदोन वेळा बर बर म्हणून त्यांनी त्या व्यक्तीच्या प्रश्नच उत्तर दिल. मी बाजूच्या माणसाला विचारलं "कुणाशी बोलल्या ?" तो म्हणाला त्यांचे गुरु आहेत फक्त कानाला हात लावून बोलतात. मी आपलं त्या खोलीतल्या अंधुक प्रकाशात त्यांच्या कानाजवळ काही वायरलेस डीवाईस आहे का हेही पाहिलं
व मनात म्हंटल चला १००% बनवाबनवी प्रकार दिसत आहे. माझ्या वहिनींचा नंबर आला आक्कांनी एकदाच कवडी टाकली व म्हणाल्या तुझं काम होईल. वाहिनी म्हणाल्या सगळे होईलच म्हणतात पण नेमकं केंव्हा अक्का म्हणाल्या पुढील महिन्यात.पुढील महिना म्हणजे सप्टेंबर .. त्यांनी मग रेणुका देवीचा अंगारा दिला पैशाची अट नाही तरी माझ्या भावाने शंभर रुपये दिले. त्यालाही ते पटलं नाही पण न पैसे देता कस यायचं ना.. घरी आल्यावर वाहिनी म्हणाल्या भावोजी तुम्ही परत बघतो म्हणाला होता बघा एकदा. मी पुण्याला आल्यावर परत प्रश्नकुंडली मांडली दशा-विदशांचा विचार करता डिसेम्बर आणि एकदा महिना जास्तीचा म्हणून पुढील जानेवारी पर्यंत तुमचं काम होईल हे माझे गणित तेही किमान अर्धा तासाचे गणित बर का.. पण वहिनींचा काम ऑक्टोम्बरच्या पहिल्या पंधरा दिवसात झालं..
बाकी याला योगायोग म्हणा किंवा काहीही पण जे आहे ते सर्व असे आहे

छान अनुभव
ते ठिकाण नक्की कुठे आहे आणि त्या अक्का अजून आहेत का हेही लिहून टाकावे अश्या अभ्यासु टिप्पणीत

मंगळवारी व शुक्रवारी सांगतात फक्त त्या
गजरगाव आंबेडकर पुतळ्याजवळ, आंबेडकर गल्लीत पहिलाच घर आहे.
कोल्हापूर ते गडहिंग्लज
गडहिंग्लज ते आजरा रोड पकडून ३किमी वर बेळगुंडी गाव लागते तिथून डाव्या हाताला जायचं गजरगाव आहे .

बोकलत जिंदाबाद ... बोकलात यांनी लिहिलेच पाहिजे. अन्यथा ' चांदोबा ' त शोभणार्या गोष्टी बंद होणार नाहीत. बोकलत यांचे खरे किस्से आम्हाला वाचायचे आहेत

सगळ्या मान्यवरांचे शतशः आभार, खरं सांगायचं तर माझ्याकडे शब्द नाहीत तुमच्या सगळ्यांचे आभार मानायला. शब्द सुद्धा अपुरे पडतील अशी खंबीर साथ तुमच्या सगळ्यांची मिळाली. एक वेळ अशी आली होती की इथे लिखाण करायचं थांबवावं लागणार की काय ही भीती मनात उत्पन्न झाली होती, पण तुम्ही सगळे मदतीला धावून आलात आणि असा काही प्रतिसाद माझ्या कथांना दिलात की कथांच्या सुरवातीला आता सिग्नेचर टाकायची सुद्धा गरज उरली नाही, पण तरीसुद्धा मी आपली माणुसकी जपून सिग्नेचर टाकत जाईन, तुम्ही माझ्यात नवचैतन्य निर्माण केलंत आणि इथे कथा लिहायला प्रेरणा दिलीत या उपकारांबद्दल मी सदैव तुमचा ऋणी राहीन तसेच लवकरात लवकर माझ्या थरारक आणि रहस्यमय भयकथा तुमच्यासमोर घेऊन येईल याची खात्री तुम्हाला देतो, सगळ्यांना परत एकदा मनापासून धन्यवाद्. जय हिंद जय महाराष्ट्र.

धाग्याचा विषय व आतील लिखाण यात विसंगती असेल तर लोकांना राग येतो...निदान दुसर्या धाग्यावर तरी..इथे मात्र सर्रास समर्थन...
हा कसला दुट्टपीपणा..

धाग्याचा विषय व आतील लिखाण यात विसंगती असेल तर लोकांना राग येतो...निदान दुसर्या धाग्यावर तरी..इथे मात्र सर्रास समर्थन...
हा कसला दुट्टपीपणा..

>>>> +१

जाऊ द्या, लिहिणारे लिहितील वाचणारे वाचतील. त्यांना उत्तरे नको देत बसायला.

नमस्कार , मी अमानवीय चे पहिले दोन धागे मागील वर्षी वाचले होते . त्यावेळी माझे अनुभव टाकू म्हणलं पण राहून गेलं . ..असो .... ह्या धाग्यातले पहिले १५ वीस पेजेस वाचून आता थेट रजिस्टर करून पोस्ट टाकतोय. आता बरेच लोकांनी असे अनुभव टाकलेत कि ते खरे खोटे समजायला मार्ग नाही . काही लोकांनी तर एवढे अनुभव घेतलेत कि त्यांच जीवन फारच अद्भुत दिसतंय असा म्हणावं लागेल. एकाने एका गोष्टीत एका कुटुंबाचा उल्लेख केलाय जे समुद्र किनारी फिरायला गेले होते आणि संध्याकाळी परतताना पहिले गाव थेट ८० किमी नंतर होते आणि त्यांना ३०किमी वर गेल्यावर काही अनुभव आला . आता आपल्या देशात असा कुठला भाग आहे जिथे ८०किमी पर्यंत वस्ती नाही ..खीखीखी .... दुसऱ्या एका अनुभवात माहूर ट्रिप ला लागलेला चकवा आणि बॅगेत काय तर गुरु चरित्र होत म्हणून वाचले आणि तो किस्सा न.ख. क्षीरसागर यांच्या परलोक विद्या या पुस्तकातून घेतला असा सांगितलंय ... आता माझ्याकडे क्षीरसागरांची दोन्ही पुस्तके आहेत त्यात कुठेही याचा उल्लेख नाही ..... थोडक्यात काय तर खरे अनुभव आणि कल्पनारंजन ओळखणं थोडं अवघड आहे इथं ...

आता थेट माझ्या अनुभवांकडे येतो . खरं खोटं तुमची मर्जी . मी आत्तापर्यंत दोन वेळा प्रत्यक्ष भुतबित काय ते पाहिलं आहे . १९९९ साली मी चौथी मध्ये असतानाची हि गोष्ट आहे. एका रात्री आह्मी सहकुटुंब किचन मध्ये जेवत होतो . आमच्या किचन आणि हॉल च्या भिंतीमध्ये मध्ये एक छोटी मोकळी जागा आहे जिथे आता एक स्लायडिंग विंडो आहे पण पूर्वी ती मोकळीच होती . तर जेवताना मला त्या खिडकीत माझे पणजोबा दिसले जे १९९५ साली वारले होते. मला ते अंदाजे १५ सेकंद दिसत होते आणि मी घाबरून ओरोडलो पण बाकी कोणाला दिसले नाहीत. त्यांच्या चेहऱ्यावर काहीच भाव नव्हते आणि ते मला सुद्धा न बघता शून्यात कुठेतरी बघत होते . नंतर मी तासभर बोंबलून दूरदर्शन ची मालिका पाहता पाहता झोपलो आणि सकाळी निवांत उठून शाळेत गेलो. परत नाही कधी दिसले त्यानंतर .

दुसरा अनुभव मोठा असल्याने नंतर टाकेल पण शेजारील काकूंचा एक अनुभव सांगतो. या कॉलेज ला असतानाची गोष्ट आहे . पारनेर तालुक्यात सुप्याजवळ यांचे माहेर होते . दोन वर्षांपूर्वी मोठ्या आजारपणात त्या गेल्या . तर नॉर्मली मोठ्या खेडेगावात मेन गाव आणि आजूबाजूला मळे असतात . एकदा ह्या दळण आणायला मळ्यातून गावात गेल्या होत्या. परत येताना दिवस मावळून गेला होता म्हणून या भराभरा येत होत्या. तर येताना रस्त्यात एक भुरकट रंगाचं मांजर त्यांना आडवं गेलं म्हणून त्या काही पावले माग चालत गेल्या समजुतीप्रमाणे तर तेवढ्यात त्या निम्म्या रस्त्यात आलेल्या मांजराचे एका कोंबड्याच्या रूपांतरण झाले आणि तो कोंबडा पटकन कडेच्या गवतात निघून गेला . नंतर त्या काकू घाबरून घरी गेल्यावर काही दिवस आजारी पडल्या होत्या. हि घटना त्यांनी स्वतः सांगितली होती . बाकी मला मात्र दोन्ही वेळा तापबिप आला नाय ...... खीखीखी .....

बाकी इतर बऱ्याच अमानवीय गोष्टी ज्या आमच्या घरात, ओळखीतील आणि नात्यातील लोकांबरोबर घडलेल्या आहेत. त्यात करणी ,तंत्रमंत्र ,गुप्त धन , आणि नेहमीचे भूतप्रेत अशा भानगडी आहेत ..पाहिजे असतील तर टाकतो

जिद्दु तुमचे अनुभव खरे खुरे आणि वास्तव आहेत. बोकलत पेक्षाही अधिक थरारक. येउ द्या आणखी ५-१० किमान.

हि सत्यघटना माझ्या वडिलांकडून कळली आहे. नगर मध्ये श्री देवेंद्रनाथ म्हणून एक नाथपंथी सिध्दपुरुष होऊन गेले. ते पेशाने आर्चिटेक्ट होते आणि गृहस्थाश्रमात होते. ठाण्याला श्रीरंग सोसायटी मध्ये राहायचे. दर अमावास्येला मढी येथे शाबरी विद्येच्या साहाय्याने ते लोकांची सेवा करत असत. अलीकडच्या काळातील उघडपणे शाबरीविद्या वापरणारे ते कदाचित एकमेव सत्पुरुष असतील . गूगल करून पाहिल्यास त्यांची भरपूर माहिती कळेल वाचकांना. माझे वडील कॉलेज ला असताना आडेप नावाच्या परिचितांकडे हे कायम यायचे त्यामुळे वडलांना त्यांची माहिती कळली . आज जे कानिफनाथ गडाला भव्यस्वरूप मिळालं आहे याचे सर्व श्रेय या महाराजांचे आहे .

तर असो ... महिन्यातले काही दिवस ते नगर ला राहायचे . एकदा पोलीस कॉलनीतिल पवार नावाच्या गृहस्थांच्या बंगल्यात ते दुसऱ्या मजल्यावर राहत होते. त्यांनी गावाकडून घरकामाला एका मुलीला आणले होते आणि तिला सोबत म्हणून कोणीतरी राशीनकर म्हणून एक वयोवृद्ध पण होते. एके दिवशी हि मुलगी अचानक चक्कर येउन पडली. जेव्हा बाबांना हि गोष्ट कळली तेव्हा राशीनकर म्हणाले तुम्ही असता त्यावेळी प्रसन्न वाटते पण तुम्ही नसल्यावर अस्वस्थ होते आणि चित्रविचित्र भास होतात . कोणीतरी बरोबर असल्यासारखे वाटत राहते. त्याच रात्री खाली घरमालकांना पण हार्ट अटॅक येउन गेला. महाराज त्यांना भेटायला गेल्यावर कळाले कि त्या घरात सतत आजारपणे चालू असतात. महाराज नंतर वर आलयावर त्यांनी याचा छडा लावायचा ठरवलं . रात्री १२ ला त्यांनी ध्यान लावून आजूबाजूला शोध घेण्यास सुरुवात केली . तर पूर्व दिशेला त्याना एका झाडाखाली भला मोठा आग्यावेताळ पहुडलेला दिसला. त्याच्या नाका तोंडातून आगीचे लोळ बाहेर पडत होते आणि डोळे सुद्धा प्रचंड लाल होते. मग त्यांनी सूक्ष्मदेहाने तिथं जाऊन त्याचे बंधन करायला सुरुवात केली तसा तो ताडकन उठला आणि म्हणाला कोण तुम्ही ? मला का बांधता ? मी काय नुकसान केलं तुमचं? मग महाराजांनी त्याला ओळख देऊन विचारल कि मी जिथं राहतो तिथल्या लोकांना तू का त्रास देतोस ? त्यावर तो म्हटला कि ते घर माझ्या जाण्यायेण्याच्या मार्गात असल्याने माझा नाईलाज आहे ...
त्यावर बाबा म्हणाले कि मी जिथं राहतो तिथं माझ्या कोणाला त्रास देऊ नकोस आणि तुला नाथांची शपथ आहे . तो काही वेळ गप्प बसला आणि त्याने बाबांना प्रणाम केला . मग बाबा मूळ परिस्थितीला आले आणि सगळ्यांना दिलासा दिला . त्यांनी घरमालकाला पण कल्पना देऊन मढीला पुढील अमावास्येला रक्षकवच घेण्यासाठी बोलावले . नंतर बाबा ठाण्याला निघून गेले आणि काही दिवसांनी अमावास्येला थेट मढीला गेले. तिथं त्यांनी पवारांची चौकशी केली तर ते आले नव्हते. नंतर काही दिवसातच घरमालकाला हार्टअटॅक येऊन ते वारले . महाराजांना हि गोष्ट कळल्यावर त्यांनी हळहळ व्यक्त केली . ते म्हणाले कि मी त्या आग्यावेताळाला समज दिली होती आणि त्याने मला सलामी पण दिली पण त्याने त्याचा मार्ग बदलला नाहीच . कदाचित त्याला अपमानित होऊन राग आला असावा. हे गृहस्थ मढीला आले असते तर त्यांना आणि कुटुंबाला मी पंचमुखी हनुमान कवच (हि बाबांची उपास्य देवता होती) देणार होतो पण प्रारब्धाने घात केलाच शेवटी.
मी हि घटना जशी घडली अगदी तशी सांगितली आहे अगदी स्थळ नामनिर्देशासहित ...

भारीच किस्से आहेत सगळ्यांचे. अनामिका ती बाई किती वेळ उभी तशी. नन्तर पुढे पण दिसली काय? तुझा बहुतेक मनुष्य गण असावा.

Submitted by बोकलत on 5 August, 2018 - 16:51
---------------------------------------------------------------------
माझा देव गण आहे. तरिही मला असले प्रकार जाणवतात. >>> राक्षस गणला भुतं दिसत नाहीत आणि त्याला त्रास पण देत नाहीत, देवगणाला दिसतात पण त्रास नाही देत आणि मनुष्यगणाला दिसतात आणि त्रास पण देतात. तो चादरीचा प्रकार तुमच्यासोबत घडला म्हणून मला वाटलं मनुष्यगण असावा. पत्रिकेत पण राहू केतू विशिष्ट स्थानी असले की असे त्रास होतात.

Submitted by बोकलत on 5 August, 2018 - 21:10
---------------------------------------------------------------------

नानबा, मी अमानविय शक्तींच अस्तित्व नाकारत नाही. माझ्या आईला आलेले अनुभव ऐकले आहेत , जवळच्या मित्राला आय टी कंपनीत आलेला अनुभव, गावाकडे दोन जणांना आलेले अनुभव या धाग्यावर शेअर पण केले आहेत.

या धाग्यावर जरा गदारोळ झाल्यानंतर ३ दिवस १९ तासांपूर्वी जन्मलेल्या आयडी ला येणार्‍या अनुभवांवरील पोस्टवर जरा संशय आहे Wink

Submitted by आसा. on 8 August, 2018 - 11:52
---------------------------------------------------------------------

इथल्या लोकांना नक्की काय प्रॉब्लेम आहे समजत नाही. प्रत्येक अनुभवाकडे संशयाने पाहून तो खोटा ठरवायचा आणि खरे अनुभव का नाही टाकत अशी बोंब मारत सुटायचं. तुम्हाला एव्हडीच चाड आहे खरे अनुभव अनुभवायची तर काढा एक दोन रात्री स्मशानात नाहीतर झपाटलेल्या जागी. @अनामिका तुम्ही लिहीत राहा, लोकांच्या बोलण्याकडे लक्ष नका देऊ.

Submitted by बोकलत on 8 August, 2018 - 12:23
--------------------------------------------------------------------->>
ERROR - SOMETHING WENT WRONG!!!! Lol

थोडसं अवांतर...सध्या बोकलतांच्या खांद्यावरून बंदुक चालवून मजा लुटनार्या आयडीज साठी...बोकलत हे ईथलेच एक झाडं आहे...कधी एका व्यंगात्मक भुतकथे वरून काही प्रस्थापित आयडीज च्या तिरकस उपहासात्मक ताशेर्यांनि डिवचले जाऊन त्यांनी बंडाचे निशाण हाती घेतले ....त्याउप्पर प्रस्थापितांच्या कथा निमूटपणे ऐकणार्या आणि नवागतांच्या कथांकडे साशंकतेने पहाण्याच्या मानसिकतेविषयी त्यांना असलेली चिडही त्रयस्थ द्रृष्टि ने समजण्यायोग्य आहे.

तरीही बोकलत नामक वेताळाला खांद्यावर घेऊन, त्याच्या कथांमधुन आनंद घेउन स्वत‌: चा कार्यभाग साधनार्या विक्रमादित्यांनो, एक दिवस तुमच्या खांद्यावरचा हा बोकलतरूपी वेताळ , आपले मुळ रूप धारण करेल व तुमच्या खांद्यावरून उडून, पुन्हा या धाग्याच्या वटव्रृक्षावर झूलू लागेल, याबद्दल मला खात्री आहे...Hoping for the best.. Happy

हिजवडी फेज 1 मधील haunted building विषयी कोणि ऐकलय का? haunted place in Pune Hinjewadi Phase-1 असे गुगल करा माहिती मिळेल. हि वास्तु आमच्या Persistent company समोरच आहे व एवढया.मोक्याच्या ठिकाणि असून बंद आहे मागील दोन वर्षापुर्वी पहिला मजला चालू झाला बाकी संपुर्ण बिल्डिंग बंद आहे. या विषयी माझ्या सहकार्याने सांगितलेला किस्सा असा की , एके रात्री त्याचा मित्र दुचाकी वरून चालला होता तेंव्हा त्याला त्याचा एक कलीग जो Persistent मध्येच कामाला आहे पण नवीन असल्यामुळे त्या ला या गोष्टीची काहि कल्पना नाही तो तिथे कोणाशीतरी बोलत होता.. मात्र समोर कोणी. नव्हतं हा काय समजायचं.ते समजला व त्याला हाक मारून पुढे बोलवल व विचारले कुणाशी बोलत होतास तर तो म्हणाला ती मुलगी लिफ्ट मागत.आहे.पण मी पुण्यात नवीन असल्याने तीला नेमक कुठे जायचेय ते मला कळेना..तिच्या नादाला नको लागू चल म्हणून तो त्याला. घेऊन गेला व नंतर.त्याला सांगितले की तु हवेत.बोलत होतास....
आता यातील सत्यता संशयास्पद असली तरी फेज 1ची एक मोक्याच्या ठिकाणची वास्तु बंद कशी हा प्रश्नच आहे...

अरेच्चा, वाडीया कॉलेजमधून हिंजवडीत शिफ्ट झाली का ती मुलगी ? बहुतेक शिक्षण पूर्ण होऊन कामाला लागली असेल रात्रीच्या शिफ्टमधे.

मी अमानवीय धाग्याची गेली तीन वर्षे वाचक आहे. खूपदा मला इथे माझा अनुभव लिहावं असं वाटलं पण लिहु शकले नाही. मला लेखनाचा फारसा अनुभव नाही पण एक प्रयत्न करेन.
पण सध्या इथले वातावरण थोडे विचित्र वाटते आहे. लिहु की नको कळत नाहीये.

Pages