अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Maybolivar swapnanche anubhav sangnyasathi konta dhaga ahe ka? Asel kunala mahit tar please sanga mala awdel vachayla.

भीतीची लहर,
बोकलतचा कहर,

मे महिन्याची दुपार आणि सुट्टी असा दुग्धशर्करायोग जुळून आला की आमरस पुरीवर आडवा हात मारायचा आणि नंतर पंखा फुल स्पीडवर ठेऊन आपलं आवडतं पुस्तक वाचायचं हा माझा आवडता जुना छंद. असाच एक दिवस पुस्तक वाचत असताना बाल्कनीत पडफड झाली, जरा नाखुशीनेच उठून मी बाहेर गेलो पाहतोय तर समोर एक कबुतर चोचीत पत्र घेऊन आला होता. मागच्याच आठवड्यात समोरच्या बिल्डिंगमधला पक्या आणि त्याची मैत्रीण बागेत शेवपुरी खायला गेले होते. पक्या मरणाचा कंजूष आणि त्यात हावरा पण, दोघात एकच शेवपुरी मागवली, पक्याने चार खाल्य्या आणि पोरीला दोनच दिल्या. पोरीचा बाप लांबून सगळं बघत होता, प्रेम आहे म्हणून एकच प्लेट मागवली या गैरसमजाचा भोपळा तेव्हा फुटला जेव्हा शेवटी मिळणारी सुकी पुरी पण पक्याने त्याच्याच घशात टाकली. आता बाप भेळपुरीच्या गाडीजवळ जाऊन तावातावाने भांडू लागला. "वेळ आली तर या शेवपुरीवाल्या भैय्यासोबत पोरीचं लग्न लावून देईन तुझ्यासारखा कंजूष जावई पदरात पाडून घेणार नाही" या वाक्यानंतर तो शेवपुरीवाला अनेकदा आमच्या कॉलनीत टोपलीतून दारोदारी शेवपुरी विकताना मला दिसला होता, तर ते पत्रं त्या पोरीनेच पाठवलं असेल म्हणून मी परत आत जायला वळलो तर कबुतर म्हणाला थांब बोकलत, हे तुझंच पत्र आहे. आत्याने पाठवलंय. आत्याकडून पत्र आलंय म्हणजे कोकणात जायचा योग आला होता. माझे नातेवाईक मला त्यांच्याकडे बोलावण्यासाठी पत्रव्यवहार करतात, फोनवर जर मला बोलावलं तर त्या परिसरातल्या दुष्ट शक्तींकडून माझ्या प्रवासात बाधा येते. गाडी बंद पडणे, वाहनचालकाचे नियंत्रण सुटणे अशा गोष्टी सर्रास होतात, त्यामुळे शक्यतो नातेवाईक माझ्याशी पत्रव्यवहार करतात. तर त्या कबुतरालापण मी थोडी आमरस पुरी खायला दिली आणि दुसऱ्या दिवशीच पहाटेच्या गाडीने मी आत्याच्या गावी हजर झालो. पोहचल्यावर माझं जंगी स्वागत गावकऱ्यांकडून झालं. कितीतरी हार एकामागून एक माझ्या गळ्यात पडत होते. समोरच भला मोठा बॅनर लावला होता त्यावर गॉगल घातलेला माझा फोटो आणि चार पाच भुतं भीतीने सैरावैरा पळताना दाखवली होती, आणि बोकलतची फाईट, वातावरण टाईट. बोकलत चले मस्ती में, आग लगी भूतों कि बस्ती में असं बरंच कायकाय लिहिलं होतं.नंतर माझी स्टॅन्डपासून ते आत्याच्या घरापर्यंत वाजत गाजत भव्य मिरवणूक काढण्यात आली. आत्याने मस्त चमचमीत जेवणाचा बेत केला होता. नंतर संध्याकाळी गावातल्या देवळाजवळ माझं भाषण झालं. आजूबाजूच्या गावातले हजारो माणसं माझं भाषण ऐकण्यासाठी आले होते. मी स्टेजवर पाय ठेवताच माझ्या नावाचा असा काही जल्लोष झाला कि विचारू नका. पोलिसांची एकच धावपळ उडाली. मग मीच एक हात वर केला तेव्हा सगळीकडे पिनड्रॉप सायलेन्स. मग मी सगळ्या श्रोत्यांना भुतांचे प्रकार, त्यांची आवडती वस्तिस्थानं, तसेच कुठल्या भुताशी कधी सामना झालाच तर त्यापासून कसं वाचायचं यावर तासभर व्याख्यान दिलं. सगळे मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते. व्याख्यान संपल्यावर टाळ्यांचा जोरदार कडकडाट झाला. रात्री जेवण झाल्यावर सगळे अंगणात गप्पा मारत बसलो होतो, रात्री कधीतरी माझा डोळा लागला, रात्रीचे साधारण दोन अडीच वाजले असतील एका विचित्र घंटानादाने मला जाग आली,......(पुढील भाग लवकरच)

एक लहानशी गोष्ट

अशाच एका उपनगरातल्या गावाबाहेरच्या एका बिल्डिंगच्या दोन बाजुबाजुच्या फ्लॅट मधली
एक फ्लॅट भुताटकीच्या गोष्टींमुळे ओस पडलेला आणि नेहमीच बंद, बाजूचा फ्लॅट पण त्यामुळे कोण घेईना, शेवटी एक बँचलर तिथे रहायला येतो
आजुबाजुच्या लोकांच्या भुवया उंचावतात, अनेक सल्ले दिले जातात
याला चैन पडेना, भिंतिला कान लावुन बघतो, दाराला कान लावतो ,रात्री अपरात्री जागुन कानोसा घेतो तरीही काही कळेना
मग शेवटि ड्रिल मशिन ने हा भिंतिला एक लहानसे आरपार भोक पाडतो.
डोळा लावुन बघतो तर आत फक्त लाललाल दिसते, काही काळ्या रेषा, आणि ओलेपणा
बाकी काही नाही , जेव्हा जेव्हा हा बघायचा दिवसा रात्र एकच चित्र ओलसर लालपणा आणि काळ्या रेषा.
एकदिवस खाली जुन्या जाणत्या एका व्यक्तीला तो गाठतो आणि सांगतो,
व्यक्ती शांतपणे म्हणते, अरे तिचे डोळे असेल लाल लाल झालेले फास लागल्यामुळे, बघते रे तीही तुझ्याकडे

बोकलत तुमचे लेखन ब्लॅक कॉमेडीच्या दर्जाचे आहे...>>> मनापासून धन्यवाद

आय थिन्क द गाय इज sadist/Schadenfreude.>>> किती अवघड इंग्रजी शब्द आहे, आता गुगलून पहिला तेव्हा अर्थ समजला, एव्हडे अवघड इंग्रजी लिहिण्यापेक्षा साधं सोपं मराठी लिहायचं "पुढचा भाग लवकर टाका". असु दे, तुमचे पण मनापासून धन्यवाद.

त्याच वेळी फलाटावर एखादी माणसांनी भरलेली ट्रेन आली आणि एखादी मालगाडी तिथेच उभी असेल तर स्टेशनमास्तरचे प्रातःविधी होईपर्यंत कुणी वालीच नसणार स्टेशनला. एक जीव वाचवण्यासाठी हजारो माणसे मेली असती ...

ही मंत्रशक्ती मग या स्टेमा ने कुणाला शिकवली नाही का ? डॉक्टरला जाणारे हजारो रूपये वाचले असते.

मी मूळचा आफ्रिकन फ्रेंच इंडीयन आहे. खापरपणजी अँग्लो पोर्तुगिज होती. त्यामुळे नाव असे आहे. मराठीत काही अर्थ होत असेल तर माहीत नाही. कारण मला मराठीत येत नाही. मी मा. आदमखान यांना फोनवरून पोस्ट सांगतो. ते अनुवाद करतात.

मी मूळचा आफ्रिकन फ्रेंच इंडीयन आहे. खापरपणजी अँग्लो पोर्तुगिज होती. त्यामुळे नाव असे आहे. मराठीत काही अर्थ होत असेल तर माहीत नाही. कारण मला मराठीत येत नाही. मी मा. आदमखान यांना फोनवरून पोस्ट सांगतो. ते अनुवाद करतात.
वाहवा!एवढा 'वर्णसंकर'कुठ पाहिला नाही. धन्य तुमची!!
मा.आजमखान सुद्धा तुमचेच असतील,तपासून पहा.

Pages