अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

@ अनामिका, बाबुराव बागुल यान्च सुद्धा अघोरी नावाच एक पुस्तक आहे मला ते वाटल Happy शाळेत असताना वाचल होत.
[इथे प्रतिसाद लिहिताना अनुस्वार कसा लिहितात? येतच नाही Sad ]

बोकलत आणि प्रीत ह्यानी ठरवून धाग्या ची वाट लावली आहे.
सिम्बा, ओके. पण इथे वाचायला आलेल्या लोकानी अनेकदा सान्गूनही असे बोअर का करतात काही आयडी?

बरोबर आहे रमेश.
स्वप्निल छानच आहे की मग, तुमच्यामुळे अजून एका लेखकाचं नाव कळलं. "बाबुराव बागूल " आता हे पुस्तक कुठे मिळेल ते पहाते. Happy

@ स्वप्निल, अनुस्वार ह्या (:) चिन्हाच्या डाव्या बाजूला आहे. मला स्वतःला मराठी टाईप करायला पण खूप वेळ लागतो. Happy आता हळूहळू जमतय.

बोकलत आणि प्रीत ह्यानी ठरवून धाग्या ची वाट लावली आहे.>>> मी काय केलं आता? माझी शेवटची पोस्ट २८ तारखेची आहे त्यानंतर मी या धाग्यावर हास्यास्पद वाटेल असं काही पोस्ट केलं नाही. पण तरीसुध्दा दर ३-४ कमेंट्स नंतर माझ्या नावाचा जप सुरूच आहे इथे. आता काय करू मी, तुमची नक्की काय अपेक्षा आहे. लिहिलं तरी माझ्या नावाचा गोंगाट नाही लिहलं तरी गोंगाट. मला मिस करताय का सगळे खूप, तसं असेल तर सांगा मी लिहायला सुरु करतो परत.

भुत्याभाऊ तुम्ही नेहमी कुठुन तरी कॉपी पेस्ट केलेले किस्से टाकता

Submitted by सस्मित on 30 August, 2018 - 12:40>>> +1
सस्मित या धाग्याचा सर्वात पहिली लिंक , पृष्ठ क्रं 60 -67 अभिजित ब्रो नामक एका आयडी विरोधात ईथल्या काही आयडीज नी याच विषया वरून रान उठवले होते, ज्याची परीणीति अखेर त्या आयडी च्या बंदी मधे झाली...खरोखरच या दुनियेत न्याय, दृष्टीकोन हे व्यक्तीसापेक्ष असतात...

प्रशासनालाच हा धागा नकोय. त्यांनी काही आयडींना मोकाट सोडलेले आहे. कोण शिव्या खाणार इथे येऊन ?

मी या धाग्याचं गत वैभव परत मिळवून देऊ शकतो >>> Rofl हे वाक्य वाचून मला आपलं लहानपण आठवलं. आपण नाही का आपल्या आईवडिलांनी एखादी गोष्ट मिळणार नाही म्हटलं तरी त्यांच्यामागे ती गोष्ट मिळवण्याकरीता आपण आपलं टूमणं लावत कसं फिरायचो ते आठवलं. छान!!!

वेताळाची पालखी निघते असे म्हणतात त्या पालखीला सोन्याचा गोंडा असतो.
माझ्या शेजारील काकूंनी मला लहानपणी सांगितलं होत कि त्यांच्या भावाला रात्री शेतावर असताना एखादा ती पालखी दिसली
पहिलाचे लोक आत्त्ताच्या मानाने धाडसी होते. त्याने तो सोन्याचा गोंडा हिसकावून आणला जो पर्यंत तो गोंडा आपल्याकडे आहे
तोपर्यंत भुते आपणाला काही करू शकत नाहीत मग ती आपणाला लालच दाखवतात , तुला अमुक देतो तमुक देतो वगैरे
पण जर त्याला भुलून आपण तो गोंडा परत दिला तर मग तुम्हच मरणच समजा.. म्हणून त्याने तो गोंडा त्यांच्या माहेरच्या देव्हाऱ्यात ठेवला आहे म्हणे

वेतळाच्या पालखीबद्दल माझा एक खराखुरा अनुभव आहे, पण तो इथे लिहिला तर परत गदारोळ माजेल आणि माझी शपथ पण तुटेल त्यामुळे नकोच ते लिहिणं.

लिहा ओ बोकलतराव
शप्पथच एवढे काय टेन्शन
शप्पथ तुटली तर भूत थोडीच मानगुटीवर बसणारेय Wink

भुत खरच घेऊन गेले बोकलतरावांना तर त्यांचे भुत येईल या धाग्यावर आपल्या डोक्यावर बसायला.

बोकलतना बोलवा
धागा नव्या दमाने धावेल
आता धावून दमलाय बिचारा

शिव्या देऊन, पोरं मरतील अशी भाषा करूनही काही कारवाई होत नाही हे पाहिल्यावर या धाग्यातला इंटरेस्ट कमी झालाय. खरे म्हणजे धाग्याची काहीच चूक नाही. ज्यांची आहे ते ढिम्म आहेत.

अरे वाह बोकलत Happy आलात
वेलकम बॅक
आता होवुन जाऊ दे एक मस्त अनुभव लगे हाथ कुश्ती के दो चार हाथ

कॉलेजच्या दिवसातला अनुभव

अ‍ॅन्युअल डे ची तयारी चालू होती. आम्ही गाणी बसवत होतो. लेक्चर्स बंक करायचे नाहीत म्हणून मग कॉलेज सुटल्यावर प्रॅक्टीस करायची होती. संध्याकाळी सहाला आम्ही जमायचो. मग ऑडिटोरियमची चावी आणेपर्यंत अर्धा तास जायचा. इन्स्ट्रुमेण्ट्स लावणे वगैरेंमधे अजून अर्धा तास. सात वाजता मग सिरीयसली सगळे प्रॅक्टीस सुरू करायचे. माझ्या डोळ्यासमोर ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाईट सिनेमातला राजेंद्रकुमार गाणे म्हणताना यायचा. त्याच्या आवाजावर मुग्ध होऊन कॉलेजची स्वप्नसुंदरी त्याच्या गळ्यात पडायची.. किंवा मै पल दो पल का शायर हूं म्हणणा-या अमिताभच्या प्रेमात निळ्या डोळ्यांची राखी पडायची असे चित्र असे.

पण तब्येत खूप बारीक. वजन ४८ किलो. त्यामुळे मुली "चांगला मित्र " म्हणून माझ्याकडे बघत. याची चांगली जाणीव असली तरीही गाण्यावर खूप मेहनत घेऊन गाण्यात आर्त वगैरे भाव आणण्याचा मी प्रयत्न करायचो. पण त्या गाण्याच्या कौतुकात ती बात नसायची जशी शक्ती वगैरेंना दाद मिळायची. पोरी लगेच "हाय हाय" "मै मर जावां" अशा चित्कारायच्या , ते ऐकून काळजाचा ठोका चुकत असे.

नऊ वाजता पोरींच्या पोटात कावळे ओरडायला लागले की ब्रेक होई. पोरं स्वखर्चाने त्यांना पुणे स्टेशनपर्यंत नेऊन खाऊ घालत. यात पाऊण तास मोडायचा. सुरूवातीला मी पण गेलेलो. पण मी अदृश्य असल्याप्रमाणे सर्वांचा व्यवहार पाहून मग मी कॅफे डिलाईट मधे जाऊन झटकन कटलेट खाऊन पुन्हा यायचो. मी एकटाच असायचो.

कुणी नाही हे पाहून मी अवघड गाण्यांचा सराव सुरू केला. आशा वेडी असते. अचानक "लागा चुनरी मे दाग" गाऊन धक्का द्यायचा असा बेत होता. एक दिवस असाच डोळे मिटून गाणे म्हणत असताना टाळ्या वाजल्या. बघतोय तर समोर प्रेक्षागृहात एक मुलगी गाणे ऐकत होती. मी निरखून पाहीले. स्वप्नसुंदरी हा शब्द सुद्धा कमी पडेल इतकी सुंदर. मनात म्हटलं बरं झालं कुणी पटली नाही. उसके घर मे देर है अंधेर नही है..

मग ती रोजच यायला लागली. एक बरं झालं. तिच्या वेळेला ही सगळी गँग स्टेशन किंवा कँपात भटकायला गेलेली असायची. अलिकडे त्यांना वेळही लागत होता. त्यामुळे रात्री बारा, एक , दोन वाजत. प्यून चावी मागायला आला की मगच प्रॅक्टीस बंद व्हायची. एक महीन्यात तिच्याशी चांगलीच गट्टी जमली होती.

एकदा धाडस करून तिला नाव आणि क्लास कुठला ते विचारलं. तर ती फक्त हसली. अलिकडे मी कॉलेज सुटल्यावर जीव खाऊन सायकल मारत घरू जायचो आणि सहा वाजेपर्यंत वडलांची जुनी लांबरेटा स्कूटर घेऊन यायचो. तिला मागे बसवायचं असं मनाने घेतले होते.

अरे ये क्या मेरी रोमँटीक कहानी यहा पर शुरू हो गई ?
बोटं दुखायला लागली म्हणून थांबतो.

क्रमशः

एक दिवस हिय्या करून तिला विचारलं... भूक लागली का ?
तिने फक्त माझ्याकडे पाहीलं. बहुतेक होकार असावा. मी म्हणालो "डिलाईट मधे जाऊयात का ?"
तिने नजरेनेच होकार दिला..
डिलाईट तर पायी चार पावलांवर. मग स्कूटर आणण्याचा काय फायदा ?
मी म्हणालो... " अरे पण आज डिलाईट बंद आहे ना ?"
तिने माझ्याकडे पाहीलं.
मी म्हणालो "अभिषेक मधे जाऊयात का , अलंकारच्या शेजारी ? स्कूटरवर जाऊयात"
तिने खूप छान मान डोलावली.
मी एक करोडची लॉटरी लागल्यासारखा खूष झालेलो.
स्कूटर काढली. ती एका किकमधे चालू झाली नाही. ब-याच किका मारताना बॅक किक येऊन घोट्यावर आदळली. मेंदूपर्यंत झिणझिण्या आल्या.
पण हिच्यासमोर शूर बनणे गरजेचे होते. शरीर आतून आक्रंदत असताना मी वरून चेहरा हसरा ठेवण्याचा प्रयत्न केला.
गाडी एकदाची चालू झाली. आम्ही अभिषेक मधे (आताचे अक्षय) पोहोचलो. नंबर आल्यावर ऑर्डर देण्यासाठी काय घेणार विचारले..
ती काहीच बोलली नाही. मी जवळपास सर्व मेन्युकार्ड वाचले. पण ती मानेने नकारार्थी खूण करायची.
मग मलाही काही खाणे प्रशस्त वाटेना. खरं म्हणजे भूक केव्हांच पळून गेली होती.
शेवटी कोल्ड्रींक्सला ती तयार झाली.
दोन मिराण्डा आले. तिच्या समोर हॉटेलमधे बसून मिराण्डा पिताना मला अक्षरशः दुनिया मेरी मुट्ठीमे असं वाटू लागलेलं होतं. आता जाताना हिला विचारूनच टाकावं की जरा थांबावं असा विचार चाललेला होता.
आम्ही बाहेर आलो. गाडी सुरू झाली. ती मागे बसली. पोरगी मागे बसल्यावर काय भारी वाटतं त्याचा अनुभव घेत होतो.
एखाद्या पिक्चरचा हिरो असल्यासारखं वाटत होतं. (लो बजेट मराठी सिनेमाचा समजून चालवून घ्या ).
मी चटपटीत, विनोदी काही तरी बोलत होतो. तिच्या हसण्याचा आवाज वीणेच्या तारा झंकारल्यासारखा येत होता. अंगावर रोमांच उठत होते. मी कुठल्या तरी दुनियेत वावरत होतो. माझा मी राहिलोच नव्हतो.
स्कूटर रेल्वे ब्रीजच्या वर आली. मी बोलत राहिलो.
खूप वेळ गेला होता.

मागून ती काहीच बोलेना. मी मागे पाहीलं. काहीच जाणवेना. स्कूटर थांबवली.
मागे पाहीलं...

मागची सीट रिकामी होती. पूर्ण रिकामी.
आणि त्या सुनसान रस्त्यावर माझ्याशिवाय कुणीही नव्हतं...
चालत्या गाडीवरून उतरून गेली तरी दिसली असती अशा उंचावर मी उभा होतो.
मला काहीच सुचेना.

घड्याळात पाहीलं रात्रीचे बारा वाजले होते.
मन काही तरी गडबड असल्याचा इशारा देत होतं . मला दरदरून घाम फुटत होता.
कुठूनतरी डोक्याला चालना मिळाली आणि गाडीला किक मारून मी ऑडीटोरीयम गाठले.
प्यून होता फक्त. पोरं गेली होती.
माझा अवतार पाहून त्याने काय झालं विचारलं..
मी सगळा किस्सा सांगितला.
त्यावर त्याने सांगितलं. त्या पुलावर अपघातात एक मुलगी मेलेली आहे.
रात्री लिफ्ट मागते आणि त्या पुलावर आलं की गायब होते .
त्यालाही अनुभव आलेला होता हा...

त्यानंतर कित्येक वर्षे रात्री उशिरा कधीच त्या पुलावरून जायचे धाडस केले नाही.

[समाप्त]

Pages