अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बोकलत आणि कंपनी हा धागा तुम्हीच प्रेजेंट म्हणून ठेवून घ्या आणि दक्षिणा अमानवीय अनुभवासाठी तू नवीन धागा ओपन कर

@उमानु, मग आम्ही त्या झाडावर पण येणार, त्या झाडावर पण रहस्यमयी, जीवाचा थरकाप उडवणाऱ्या कथा टाकणार आणि या झाडावर पण. Happy दोन्ही झाडं कथांनी आणि प्रतिसादांनी बहरून टाकणार. Happy

सी भरत, तिथेही आम्ही येणार - ह्यालाच सज्जन्पणा म्हणायचा ना?
सग ळ्या तमाम सो कॉल्ड बुद्धीवादी मन्डळीन्चा विश्वासच आहे की जे काही आम्ही बोलतोय ते खोटे आहे. हे कशाच्या जोरावर?
म्हणूनच आपले अनुभव कुणाला सा न्ग त नाहीत अनेक्जण.
गो बेल्स नी ती

अहो बोकलत तुमचा काहि तरि चुकिचा समज झालेला आहे, तुम्हाला वाटत कि या धाग्या मुळे अंधश्रद्धा पसरतेय म्हणुन तुम्हि अस वागत आहात तर एक लक्शात घ्या. इथे येउन वाचनारे सगळे लोक सुशिकशित आहेत. त्याना टाइप करता येत वाचता येत इतके तरि आहेत. आम्हि काय अमानविय धागा वाचुन घरि जाउन लगेच मन्त्र तन्त्र करायला बसत नाहि किवा भुताना बोलवत नाहि. एक विरन्गुळा म्हणुन आम्हि इथे वाचायला येतो. जस लहान पणि देवाचा कथा आपले घरचे मोटे लोक सान्गायचे ते कसे आपण आवडिने अय्कायचो तसच हे पण आहे.

आणि अंधश्रद्धा बद्दल म्हाणाल तर जरा शहरा बाहेर १०० किमि जावा तिथे तुमचि खरि गरज आहे. तिथे अजुन पण मुलिना ५ दिवस घरा बाहेर जाउ देत नाहित शाळेत जाउ देत नाहित अभ्यास जाउदे ५ दिवस अस बोलतात. ति खरि अंधश्रद्धा.
आणि आमचा सरखे देव हि सन्कलपना न मानणारे लोक भुत खेत मानतिल अस नाहि. आणि अंधश्रद्धा पेक्शा श्रद्धा लोकानचे जास्त नुकसान करते अस माझ तरि मत आहे. कोणाला जर सान्गितल कि एखादि गोश्ट कर नाहितर तुला भुत बाधेल तर लोक एक वेळ हसुन सोड्तिल पण जर तेच त्याना सान्गितल कि एखादि गोश्ट कर मग तुला पुण्य लागेल तर लगेच करतिल.......
विचार करा.....

शहाण्याला शब्दाचा मार म्हणतात.. एक तर हि म्हण चुकीची ठरली किंवा इथे कोणी शहाणे नाही आहे..
भुते नसतात असे कोण म्हणते फक्त त्यामागील सत्य आपणास माहित नाही एवढंच.. "आपको आँख नही है इसका मतलब ये नही कि दुनिया असस्तित्व हीन हैं!"
जगविख्यात भविष्यवेत्ता किरो यालासुद्धा कर्णपिच्चाशनी विद्या अवगत होती असे म्हणतात..माझ्या बरोबर ज्योतिष शिकायला एक मुलगी होती तिच्या घरी एकदा आम्ही गेलो होतो तेंव्हा सहज हा विषय निघाला. तेंव्हा तिचे वडील म्हणाले अशी विद्या असते व त्यांच्या गावातील एका व्यक्तीला हि कर्णपिच्चाशनी अवगत होती.
एक दिवस त्यांनी त्याला विचारले कि तू पत्रिका पाहूनच सांगतोस कि मी ऐकलंय तस तुला कर्णपिच्चाशनी वश आहे.
तो म्हणाला मी पत्रिका पाहूनच सांगतो असं म्हणालो तरी तू विश्वास नाही ठेवणार आणि मला कर्णपिच्चाशनी वश असती तर तसे स्पष्ट सांगायची परवानगी मला नसणार आहे.
मग मी निघतो तर असे म्हणून ते जाऊ लागले तर तो त्यांचा मित्र म्हणाला थांब थोडा वेळ केळ खाऊन जा,,
कुठे आहेत केळ ??
येत आहेत, अमुक एक व्यक्ती त्याच्या शेती संबंधात प्रश्न विचारायला येत आहे व त्याने केळी आणली आहेत असे तो बोलला
५ ते १० मिनिटात शेतीविषयक काही प्रश्न घेऊन एक माणूस केळी घेऊन आला....

{एक विरन्गुळा म्हणुन आम्हि इथे वाचायला येतो}

बोकलत यांच्या पोस्ट्स विरंगुळा म्हणूनच वाचायच्या की.
झाडाला झपाटणाऱ्या भुताला हाकलावं, तसं त्यांना हाकलायचे उद्योग झाले नसते, तर पुढलं भूतायन घडलं नसतं.

भरत
जर तुम्हि एखादा हॉरर मुवि बघायला गेलात आणि काहिहि कारणा मुळे तुम्हाला तिकिट नाहि मिळाले आणि तुम्हाला कॉमेडि मुवि बघावि लागलि तर तुम्हि तो बघाल पण.... तसच आमच पण होतय.

पुर्वी रामसे बंधुंच्या हॉरर चित्रपटांमुळे लोकांना भिती वाटायच्या ऐवजी हसु यायचं म्हणे. पण म्हणुन रामसे बंधुंना हॉरर चित्रपट बनवुच नका असं कोणी म्हणालं नाही. किंवा तुम्हाला हवं तर त्या भोजपुरी भाषेत बनवा आम्ही येउ बघायला पण आमच्या हिंदी भाषेत नका बनवु असंही कोणी म्हणालं नाही Proud

इथल्या काही लोकांना अजूनही माझ्या कथा थापा का वाटतात हे न उलगडलेलं कोडं आहे. :डोळे मोठ्ठाले करून बुब्बुळ गोल गोल फिरवणारी बाहुली: श्रद्धा आणि अंधश्रद्धा या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, मी जसं काल बोललो कि आपण ज्या चौकटीत राहतो वावरतो त्या चौकटीपलीकडची आपल्या आकलनाबाहेरची गोष्ट जेव्हा अचानक आपल्या समोर येते तेव्हा माणूस आपल्या परीने त्याचे अर्थ लावतो ज्या उलगडतात त्या श्रद्धा आणि ज्या उलगडत नाहीत त्या अंधश्रद्धा. तर सांगायचा मुद्दा हाच कि माझ्या कथांवर विश्वास ठेवा, त्या शत प्रतिशत खऱ्या आहेत त्याची ग्वाही मी तुम्हाला देतो. आता तुम्हीच सांगा या विधात्याने, नियतीने माझ्या पदरात जगातल्या अमानवीय शक्तींविरोधात लढण्याची शक्ती टाकली आणि मी बोकलत बनलो (कसा बनलो त्याचा किस्सा टाकला आहे वाचला नसेल तर एकदा वाचा) या सगळ्यात माझी काय चूक. या दुष्ट शक्तींविरोधात लढताना अनेकदा माझ्यावर प्राणघातक हल्ले झाले, वेगवेगळ्या प्रकारच्या बाधा आल्या पण या सगळ्यातून सावरत, स्वतःच्या चुकीतून शिकत मी लहानाचा मोठा झालो. दुष्ट शक्तींच्या जगात आज माझा दरारा आहे, सर्वपित्रीला एक महिना बाकी असला कि मला या दुष्ट शक्तींकडून त्यांच्या सणावाराचे आमंत्रण येतात, गावी कधी गेलो कि पंचक्रोशीतल्या सगळ्या वाईट शक्ती गप्प असतात, ना कोणच्या अंगात येतं ना कोणाला झपातट, तर या सगळ्यातून तावून सुलाखून बाहेर पडल्यावर मी माझे अनुभव इथे मांडतो, आणि तुम्ही जेव्हा बोलता अनुभव खोटा आहे तेव्हा खूप यातना होतात.

बोकलत म्हणजे जोरात पळणे. आमच्या गावी जी जुनी माणसं होती ती हा शब्द वापरायची. म्हणजे एखाद्या लहान मुलाला दुकानातून वैगरे काय आणायला पाठवायचं असेल तर बोलायचे 'बोकलत जा आणि घेऊन ये'. लहान मुलं पळत असतील तर बोलायचे 'कसं बोकलतायेत बघ'. मायबोली आयडी उघडता विचार करत होतो कोणता घेऊ तेव्हा हा शब्द आठवला. बोललो आपण पण थरारक घटना लिहून बोकलऊ या धाग्याला.

ह्या बोकलतच्या किश्श्यांचं हसायला ही येतय, आणि बाकीच्यांना त्रास होतोय त्याने वाईट पण वाटतयं Uhoh

बस्स करा हो बोकलत आता.आता कंटाळा येऊ लागलाय.>> सहमत आहे, पण तुम्हीच सारखे बोकलत लिहू नको लिहू नको करताय त्यामुळे मी का लिहिलं पाहिजे हे परत परत लिहायला लागतंय मला, तुम्ही थोडा विचार करायला वेळ दिला असता तर आतापर्यंत माझ्या दोन चार 'भीतीची लहर बोकलतचा कहर' कथा आल्या असत्या.

मिवि, इथे हॉरर मुव्ही चालू होती म्हणता?
मला अगदी रामसेंचे भयपट आठवले आणि व्यत्यय यांनी नेमकं तेच लिहिलं.
बाकी काही लोकांचा कर्णपिशाच्चावर, चमघमाटी नागावर विश्वास आहे, पण बोकलत यांच्या शक्तीवर नाही , याची गंमत वाटतेय.
की असे अनुभव भलत्याच कुणाचेतरी असावेत, सांगणाऱ्याचे स्वतःचे नसावेत, असा नियम आहे?

बोकलतचा अर्थ काही का असो पण
'हा बोकलतपणा आहे माने' असा डायलॉग इथून पुढे रूढ झाला तर आश्चर्य वाटणार नाही Wink Light 1

>>काही लोकांचा कर्णपिशाच्चावर, चमघमाटी नागावर विश्वास आहे, पण बोकलत यांच्या शक्तीवर नाही , याची गंमत वाटतेय.

पिशाच्च नाही हो पिच्चाश. तुमालातरबैकैकळतचनै.
लिहा बघू दहा वेळा वहीत

।आयझेनबर्ग expected reply. कुणी ना कुणी तरी दे ईल ह्याची खात्री होती. >> बघा म्हणून म्हणतो माणसांवर, आयडींवर भरोसा ठेवावा... भुतांवर नाही Proud भुतं विश्वासाला ऊतरत नाही म्हणून माणसांना जास्त महत्व द्या.
only difference is unlike snakes people used to come here on their own. (used to - underline ,italics, bold). >> आणि साप समन्स बजावल्यावर येतात होय? Lol

This is not just for u, but overall MO of maayboli these days:
जिकडे तिकडे वितन्डवाद, सो कॉल्ड विनोदी विटम्बने (अरे, मला विडम्बने म्हणायचे होते.. :))>> अपना, अपना नजरिया होता है. आपण केले की संवाद दुसर्‍याने केला की वितंडवाद... आपण केले की रसग्रहण दुसर्‍याने केले की विडंबनविटंबन (शब्दाची सोय ..मग अर्थ काहीही असो)... असे म्हणायची फॅशन पूर्वीपासूनच आहे हो मायबोलीवर. these days वगैरे झूठ आहे.

समजु तदार पणाचा लवलेशही नाही. All energy and brain is used for this. >> आता कोणाकोणाचा ब्रेन आणि एनर्जी जगातला सगळा समजुतदारपणा दाखवल्यानंतरही शिल्लक ऊरतो. काय करणार? Proud

In our office, they took a session - do you have a dual personality? This was to show that people are being nasty while trolling because internet protecta their anonimity/ you are not dealing with person face to face/ no material common interests which you may have otherwise.
No need to be nice, then your true face starts showing up.
So, how are you really? Who are you really? >> चुकीची यूज केस चुकीच्या ठिकाणी लावली की अर्ग्यूमेंट आधी तकलादू आणि मग गैरलागू होऊन जाते. आपल्याला न पटणार्‍या सगळ्या गोष्टीं 'ट्रोलिंग' नसतात आणि ट्रोलिंग कशाला म्हणायचे हे 'ट्रोलिंग १०१' आधी तुमच्या ऑफिसमध्ये सेशन घेणार्‍यांनी शिकवायला हवे होते. Proud फेस टू फेस भेटून सांगायचे असते तरी हेच सांगितले असते.
आणि आपण भेटलोच आहोत की फेस टू फेस.रिमेंबर? मग हे ट्रोलिंग कसे काय झाले?

Happy trolling! >> Sit back and Enjoy! Wink

कमेंटस वाचून संपवेपर्यंत टि. व्हि. वर चालु असलेल्या गाण्याच्या ओळी कानावर पडल्या...
...आरं बत्ताश्या, कशाला पिळतोस मिशा,
हे वागणं बरं नव्हं.... Lol Lol

हा धागा आता बंद झाला असे समजावे का ?
नवीन Submitted by भुत्याभाउ on 12 September, 2018 - 23:20
>>>>>
नाही सांगता येणार आत्ताच halloween_born ने "पिंजरा" उघडलाय.

अमानवीय किस्से लिहिण्यास खास "भुत्यभाऊ" वगैरे आयडी घेऊन आलेल्यांनी "आता हा धागा बंद झाला असे समजावे का?" असे विचारणे म्हणजे
"मेरा नाम है कॅलेंडर" वगैरे पेंटलगिरी मध्येच सुरू झाली बघून मोगॅम्बोने "म्हणजे हा चित्रपट बंद झालाय ना! मी घरी जाऊ?"
असे विचारल्या सारखे वाटते.
अरे टफ फाईट द्या! तगडे किस्से येऊ द्या!

अरे टफ फाईट द्या! तगडे किस्से येऊ द्या! >> मानव ++

मुळात हा क्रिकेट, सिनेमा, विनोद सारखा ओपन फोरम आणि तोही 'विरंगुळा' विभागात. असे असतांना ईथे फक्त 'सो कॉल्ड' भितीदायक किस्सेच लिहा असा आग्रहच हास्यास्पद आहे. मला भूत हा प्रकारच मोठा विनोदी वाटतो म्हणून त्या अनुशंगाने येणारे बोकलत ह्यांचे विनोदी किस्सेही आवडतातच.

ज्यावेळी बोकलत ईथे लिहित नव्हते तेव्हा ईथे लिहिणारे 'सो कॉल्ड' भितीदायक (रीड-पांचट) किस्से वाचून कोणी लिहिले नाही की 'हे पांचट किस्से थांबवा आणि खरेखुरे भितीदायक लिहा'. ( एकदा का गानू आजींचा किस्सा/कथा वाचली की बाकी सगळे पांचट/बाळबोध वाटत रहाते Lol )

अजूनही असे पांचट 'सो कॉल्ड' भितीदायक किस्से लिहिणार्‍यांना बोकलतनी किंवा ईतर कोणी लिहू नका म्हंटलेले नाहीय.. मग अनेकांना आवडणार्‍या बोकलत ह्यांच्या भुताच्या किस्श्यांना कोणाचा आक्षेप का असावा? बोकलत ह्यांच्या किस्श्यांपेक्षाही 'सो कॉल्ड' भितीदायक किस्श्यांच्या चाहत्यांचा आक्षेप, आवेश आणि आवेग जास्त विनोदी आणि मनोरंजक वाटत आहे. Lol

तुम्हीही लिहा... बोकलतनाही लिहू द्या..सगळ्यांनीच लिहा. ज्याला जे आवडेल ते तो घेईल. भुताच्या धाग्यावर ऊद्या बोकलतनी ऊगीचच ट्रंप, मोदी, रामदेवबाबा अशी जिवंत माणसे आणली तर मात्र आम्हीही आक्षेप घेऊ. Proud जोपर्यंत बोकलत ह्यांचे किस्से भूत, पिशाच्च, हडळ थोडक्यात अमानवीय विषयांशी सबंधित आहेत तोवर ते धाग्याला आणि विषयाला धरूनच आहेत की. भितीदायक की विनोदी की पांचट वाटणे हे ज्याच्या त्याच्या धारणेशी निगडीत आहे.

Pages