अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

जुन्या जाणत्या मंडळींकडून कोकणातील इटलाई आणि कोकणाई या देवतांविषयी ऐकून आहे .. यांचा जारणमारण विद्या जाणणारे लोक वापर करत/करतात .. कोकणातील कोणाला काही माहिती असल्यास सांगा ..
खान्देशातील आदिवासी स्त्रिया विशेषतः डांग जमातीतील स्त्रिया याना चेटूक विद्या अवगत असल्याचे ऐकून आहे... शिवाय पालघर मधील सुद्धा अश्या जमातीतील काही स्त्रियांना हि विद्या पूर्वी अवगत असल्याचेहि ऐकले आहे .. अर्थात सध्याची परिस्थितीबद्दल माहिती नाही .. यांच्या चमत्कारी कथा या आसाम कामरूप च्या चमत्कारी कथांशी साधर्म्य असणाऱ्या आहेत ..

त्या तुंबाड गावाचा पत्ता कोणाला माहित असेल तर मला द्या. देशातली गरिबीच मिटवून टाकतो. तसेच कोणी जाणकार असेल तर एका हस्तर कडून किती सोन्याची नाणी मिळतात ते पण सांगा म्हणजे मला तशा बाहुल्या न्यायला.

देशातली गरिबीच मिटवून टाकतो >>
नको, राजकारणी लोकांना काही काम ठेवा. तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन, भूत प्रेत धोबी पछाड हि महत्वाची कामे सुरु ठेवा

भीतीची लहर
बोकलतचा कहर

बोकलतांचे घरी
हडळ पाणी भरी

मागच्या आठवड्यात कोल्हापूरला जायचा योग आला. माझी चार चाकी काढली आणि आई नको जाऊस बोलायच्या आत मी भर रात्री कोल्हापूरचा रस्ता पकडला. मी शक्यतो प्रवास रात्रीचाच करतो, ट्राफिक जास्त नसल्याने गाडी हवी तशी सुसाट मारत, हवेवर उडवत मी अंतर झपाट्याने कापतो. नुकतीच सकाळ होत आली होती, कुठे चहा मिळतोय का ते पहायला मी गाडीचा वेग हळू केला पण पदरी निराशाच. अचानक जोरात पावसाला सुरवात झाली. ध्यानी मनी नसताना सुरु झालेल्या पावसाने जरा निराशा केली. थोडं पुढे गेल्यावर एक गाव लागलं आता नीट आठवत नाही पण तुंबाड कि तुंबड असं काहीतरी गावाचं नाव होतं. आत गावात चहा मिळेल या आशेनं मी गाडी एका बाजूला लावून मुद्दाम भिजत भिजत गावात प्रवेश केला. भिजल्यावर चहा प्यायची मजाच काही और असते. थोडं चालून गेल्यावर मला एक भला मोठा वाडा दिसला. या वाड्यात जाऊन मुद्दाम मी अमक्या तमक्याचा मित्र आहे असं सांगून एक कप फुकटात चहा घशात ओतण्याचा माझा प्लॅन होता. कोणीतरी बोलून गेलयच फुकट ते पौष्टिक. तर आतमध्ये गेलो तर स्मशान शांतता. अगदीच पडका वाडा होता, वर्षानुवर्षे कोणीच फिरकलं नसणार त्या वाड्यावर. माझी जरा निराशा झाली, मी बाहेर पडायला निघणार इतक्यात कोणीतरी येण्याची चाहूल लागली एक म्हातारा दबक्या पावलांनी वाड्यात येत होता म्हातारा नक्की कुठे जातोय हे पाहायला मी बाहेर पडणार इतक्यात एक तरणा ताठा माणूस त्याच्या पाठीवर लपत लपत आला, मी झटकन मागे वळलो. आता अजून कोण भलताच तिसरा माणूस पण यायचा म्हणून तिथेच बसून राहिलो. थोड्या वेळाने तो तरणा माणूस अंगणातल्या तळघरात जाताना दिसला, म्हातारा खिडकीतून सगळं पाहत होता. मला पण त्या तळघरात जाऊन नक्की काय आहे ते पाहायचं होतं. पण म्हातारा जो काय टक लावून पाहत होता तो हलायचा अजिबात नाव घेत न्हवता, मी त्या म्हाताऱ्याला दगड मारणार इतक्यात तरणा माणूस त्या बोळातून बाहेर आला तो चक्क सोन्याची नाणी घेऊनच. क्रिकेटर बॉल उडवतात तशी दोन चार वेळा उडवली आणि बाजूलाच एका ठिकाणी लपून बसला. म्हाताऱ्याला वाटलं तो गेला असेल म्हणून म्हातारा पण त्या बोळात जायला निघाला, म्हातारा जसा त्या बोळात गेला तसा त्याच्यापाठीवर तो तरणा माणूस पण आतमध्ये गेला. बराच वेळ झाला मी कंटाळून निघून जाणार होतो इतक्यात तो तरणा माणूस एकटाच बाहेर आला आणि वाड्याच्या बाहेर निघून गेला. तो गेल्यावर मी त्या बोळात उतरलो. एक पंचवीस तीस फूट खोल खाली उतरल्यावर एक सरळ रस्ता लागला खूप जुनं भुयार वाटत होतं. रस्त्याच्या शेवटी भली मोठी संदूक होती. ती संदूक उघडून पाहतोय तर त्याच्याखाली अजून एक संदूक. खाली उतरायला मोठी रशी अडकवलेली. चला आता इथपर्यंत आलोय तर खाली पण जाऊन येऊ म्हणून मी पिक्चर मध्ये दाखवतात त्या स्टाईल मध्ये रशी न पकडता खाली उडी मारली. एका मोठ्या लालभडक तळघरासारखी ती जागा होती. उडी मारली त्या ठिकाणच्या भोवती पिठाचं वर्तुळ काढलेलं होतं. बाजूला लक्ष गेलं तिथे मानवी देह जळत होता, बहुतेक तो म्हातारच असावा. माझ्याच जवळ एक पितळी भांडं होतं मी ते कुतूहल म्हणून उघडलं त्यात एक पिठाची बाहुली होती ती हातात घेतली तर अचानक एक लाल रंगाचा पंचा घातलेला विचित्र प्राणी त्या तळघरात आला. माझ्याजवळ आला आणि ती बाहुली हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होता. बिचारा बऱ्याच दिवसाचा उपाशी दिसत होता. पण काही केल्या त्या पिठाच्या आतमध्ये येऊ शकत न्हवता. मग मीच त्या पिठाच्या वर्तुळाच्या बाहेर आलो आणि त्याला ती बाहुली दिली. तो अधाशासारखा ती बाहुली खाऊ लागला. मला त्याची दया आली म्हणून मी जवळ गेलो आणि मायेने त्याच्या डोक्यावरून हात फिरवला तर तो पण लाडात आला आणि माझ्या हाताला चाटायला लागला, मग मी दोन्ही हाताने त्याला गोंजरायला लागलो तर त्याने आपला पंचा लाडाने हलवायला सुरवात केली आणि काय आश्चर्य त्याच्या पंचामधून सोन्याच्या मोहरा पडायला लागल्या. कितीतरी वेळ त्या सोन्याच्या पडतच होत्या पडतच होत्या पडतच होत्या.

क्रमश ...........................

बरेचसे अनुभव वाचले. काही आवडले तर काही नाही. धागा सुरवातीला खूपच रंजक वाटला पण नंतर बोकलत ने जी काही वाट लावली धाग्याची ते पाहून वाईट वाटले.

माबो चे प्रशासक ढीम्म आहेत.
यामुळे माबो वर येऊ वाटत नाही, काही ठराविक लोक सुपारी घेतल्यासारखी माबो ची वाट लावत आहेत

त्याच असं आहे कि अमानवीय अनुभव काही दिवसागणित नाही येत कोणाला.
स्वानुभव व ऐकलेले अनुभव यावर जरी चर्चा केली तरी ते ही अपुरे पडतात त्यामुळे रोज रोज काही नवीन या धाग्यावर
आलेच पाहिजे असे नाही. त्यामुळे हा धागा सुस्त पडलाय असे वाटेल.
पण सुस्त सिहांच्या अंगावरून उंदरांनी उगीच उड्या मारू नयेत..(हा सिंह कोणत्या जाळ्यात हि अडकणार नाही)

काही ठराविक लोक सुपारी घेतल्यासारखी माबो ची वाट लावत आहेत>>>>पब्लिसिटी स्टंटसाठी म्हणा नाहीतर शोभून दिसण्यासाठी मी काहीही करत नाही, जे आहे ते सत्य आहे आणि तुम्हाला माझ्या थरारक घटना सांगणे हे माझे कर्तव्य आहे जेणेकरून उद्या मायबोलीवरचा एखादा भुतांच्या तावडीत सापडला तर तो माझ्या कथा आठवून स्वतःचा बचाव करू शकतो. धन्यवाद. Happy

इतक्या वेळा जायला सांगूनही परत परत येणार्‍याला काय म्हणावे....
'निर्लज्ज सदा सुखी' ही म्हण आठवली आज>>>>निर्लज्ज नाही ओ निर्लज्जम् आहे ते. तरीपण तुम्ही दिलेल्या या कौतुकास्पद शाबासकीमुळे माझा आत्मविश्वास द्विगुणित झाला असून मी यापुढच्या काळात अधिकाधिक थरारक आणि भयानक अशा साहस कथा लिहून तुमची मान अभिमानाने उंच करेन. मनापासून धन्यवाद.

तुम्ही लिहाच हो... आवडेल आम्हाला वाचायला फक्त ते कथा, लघुकथा इ. म्हणून लिहा इतकेच म्हणणे आहे आमचे. तुमच्या लिखाणाला विरोध नसुन तुम्ही या धाग्यावर इथले अनुभव वाचायला येणाऱ्यांचा उपहास केल्यासारखे जे लिहीता त्याला विरोध आहे.

<<तुमच्या लिखाणाला विरोध नसुन तुम्ही या धाग्यावर इथले अनुभव वाचायला येणाऱ्यांचा उपहास केल्यासारखे जे लिहीता त्याला विरोध आहे>> +1

खरे आहे बोकलत राव . विरोध तुमच्या लिखाणाला नसून अनुभव लिहिनार्यान्ची ज्या पद्धतीने कुचेष्टा करण्याचा स्वर असतो त्याला आहे

कोणी नेक्सटफ्लिक्सवर haunted सिरीस पाहिलीय आहे का? निर्मात्यांचा दावा आहे कि सगळे एपिसोड हे खऱ्या कथेवर आधारित आहेत

तुमच्या लिखाणाला विरोध नसुन तुम्ही या धाग्यावर इथले अनुभव वाचायला येणाऱ्यांचा उपहास केल्यासारखे जे लिहीता त्याला विरोध आहे.
>>>> +२

वॉव, मस्त उत्कंठावर्धक अनुभव बोकलत. वाचताना अंगावर काटा आला, छातीत धडधडायला लागलं, घशाला कोरड पडली, तळहाताला घाम सुटला, काळीज घशात आलं, पायात गोळे आले, कपाळाची शीर ताड्ताड उडु लागली, डावा डोळा फडफडायला लागला, कुरतडुन नखं संपली.... मी मनातल्या मनात १०८ वेळा आमच्या त्या यांचा धावा केला आणि त्यांनी स्वप्नात येउन धीर दिला की पाचाचे पंचवीस करावे लागले तरी बाहात्तर पण मी बोकलत यांना सुखरुप ठेवेन...तेव्हा माझ्या जीवात जीव आला...

प्रथम वाडकर यांनी स्वतः पाहिलेलं प्रकरण

चार पाच वर्षांपूर्वी मी ऑफिसच्या कामानिमित्त उत्तर प्रदेश ला गेलो होतो महिनाभर होतो तेथील ऑफिस मध्ये गेल्या गेल्या जॉईन झालो सर्वांशी ओळ्ख ही झाली आणि काम सुरू ,आम्ही रोज दुपारी जेवण झालं की ऑफिस समोरील टपरीवर चहा प्यायला जात,ज्या वेळी आम्ही चहा प्यायला जात असे त्याच वेळी एक विचित्र माणूस तिथे चहा प्यायला येत असे,हा माणूस दिसायला खूप भयानक होता काळी सफारी घालत असे पण विचित्र गोष्ट ही की तो माणूस असून पूर्ण अंगभर स्त्रियांचे दागिने घालत कपाळावर काळा गोल टिका नाकात नाथ,हातात बांगड्या,बोटात लेडीज अंगठ्या,कानात रिंगा,गळयात मोत्याचा हार असा त्याचा पेहराव असे,(पण हा माणूस तृतीयपंथी नव्हता)असो,नेहमीप्रमाणे आम्ही दुपारी चहा प्यायला आलो, तिथे तीन कॉलेज कुमार चहा,सिगरेट पित बसले होते आणि तितक्यात हा माणूस टपरीवर आला त्याला बघून ही मुलं फिदीफिदी हसायला लागली घाण कंमेंट्स पास करू लागली आणि त्याच्यावर सिगारेट चा धूर ही सोडत होती त्यांचा थिल्लर पणा हा भयंकर माणूस कसा काय सहन करतोय असा प्रश्न मला पडला,आणि तेवढ्यात ह्याचा चहा पिऊन झाला आणि तो जाऊ लागला दोन पावलं गेल्यावर परत मागे आला आणि त्या मुलांकडे भेदक नजर टाकून एवढच बोलला, घटिया औलादो।कलका सुरज देखना तुम्हारे नसीब मै नही।आणि झपझप पावलं टाकत काहीतरी पुटपुटत तीन दगड उचलून आकाशात बघून हातवारे करत ते दगड एका आगीत टाकले आणि निघून गेला हे सगळं बघून आम्हीही थोडे मनातून हादरलो होतो.येणारा एक दिवस काहीतरी भयंकर वार्ता घेऊन येणार याची कल्पना नव्हती, कारण चहा प्यायला गेलो तर समोरची ती टपरी बंद होती चार दिवस असेच टपरी बंद बघून शेवटी काय झालं असावं म्हणून पत्ता काढून त्या टपरी वाल्या च्या घरी गेलो तर तो आजारी होता विचारपूस केल्या वर त्याने जे रडत रडत सांगितले ते हे- साहेब,क्या बताऊ वो तिनो लडके मेरे ही बस्ती मे रहते थे ऊस दिन मैने बहोत समाझाया ऊस आदमी की माफी मांगो पर मेरा माना नही, कुछ नही होता कोन क्या बिगाडता हे हमारा देख लेंगे बोलके चले गये और जब रात को घर आये और 11 बजे उनको खूनकी उलटिया होने लगी शरीर जलने के जैसा काला पड गया कुछ बोल पाते पर तभी उनकी तडप तडप के मौत हो गयी उनका शव देखने जैसा नही था साहेब वो तिनो अच्छे लडके थे पर मजाकीया स्वभाव के थे एक मजाक ने उनको हमेशा हमेशा के लिये सुला दिया.

Pages