अमानवीय...? - २

Submitted by दक्षिणा on 15 June, 2018 - 06:48

अमानविय -१ धाग्याने सुद्धा दोनहजारी गाठली. त्यामूळे पुढची सर्व अमानविय चर्चा इथे करा.

या पुर्वीचा धागा खालिल लिंकवर आहे

https://www.maayboli.com/node/49229

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सापांना कान नसतात, पण त्यांच्या अंगाला घमघमात सुटतो. शिवाय "मला जगायचं नाही आहे कुठे असशील तिथून ये व मला कडकडून चाव," असं सांगितलेलं त्यांना ऐकू येतं.
होकीनाईओबोकलत?

@बाबा कामदेव, कलपेशकुमार धन्यवाद
@भरत, बरोबर आहे आमच्या गावाला लोकं शेतावर जातात त्यांची सावली सापाच्या अंगावर पडली की साप पाठलाग करत घरी येतो, तुम्ही कितीपण नागपंचमीला पूजा केलेली असू दे, चुकीला माफी नाही तुमचा गेम झालाच म्हणून समजा, मित्रांच्या बाबांच्या पाठीवर साप आला होता एकदा, आणि तो साप पण एव्हडा हुशार की डायरेक्ट घराच्या छपरावर जाऊन बसला आणि लोकं येड्यासारखे अंगणात घरात शोधत होते, मित्राचे बाबा छपराखाली आले आणि बोलले अरे इथेच साप पाहिला होता मी अचानक कुठे गेला, सापाला एव्हडा इशारा पुरेसा होता , आवाजाचा अंदाज लावून जी काय उडी मारली फक्त चार पाच इंचासाठी वाचली नायतर मित्राच्या बाबांच्या डोक्यावरच होती बरोबर, मग मारला लोकांनी त्या बिचाऱ्या सापाला.

साप सर्वज्ञानी प्राणी आहे त्यांना सिक्थच काय कितवेतरी सेन्सेस असतात. इथे त्यांच्यावरती चर्चा सुरू आहे हे पण त्यांना कळले आहे. काल रात्री माझ्या स्वप्नात एक आला आणि सरळ माझ्या पोटावर येऊन फणा काढून बसला. अचानक त्याने आपले केस झटकले, बोटभर लांब केस होते ते. आणि मग एकदम घमघमाट पसरला. काही केस माझ्या नाकात गेल्याने मला सटासट शिंका आल्या. मला काय करावे सुचेना. तो एकटक माझ्याकडे बघत होता. सुदैवाने मी टीव्ही वर पिच्चर पहाताना मध्येच बंद करून झोपलो होतो त्यामुळे टीव्हीचा रिमोट हाताशी होता. मी रिमोटचं बटण दाबलं. स्क्रीनवर ओये ओये ओरडत नाचताना अमरीश पूरी आला. त्याचा आवाज ऐकून सापाने वळून टीव्ही कडे पाहीले आणि अमरीश पुरी बघून तो सटपटला. मूड घालवला राव, म्हणत तो खिडकीतून निघून गेला. मी पण मग टीव्ही बंद करून चादर झटकून परत झोपून गेलो.

एक वृत्ती असते, कुठे एखादं टोळक काहीतरी त्यांच्या त्यांच्यात करत असेल (similar interest group म्हणतात बहुतेक) तर उगिचच आपला काहीहे संबंध नसताना, त्यांच्या गोष्टीत काहीही इंटरेस्ट नसताना जाउन बोटं घालायची..

काय फालतुगिरी आहे ही. सापाबद्दल काहीतरी सिरीयस गोष्ट असेल म्हणून वाचायला गेले तर खाली बोकलत. आता यापुढे लेखकाचे नाव पहिले वाचेन मग अनुभव.

सापाबद्दल काही सीरियस वाचायला सायन्स बद्दल किंवा त्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या रिसर्च सेंटर बद्दल असणाऱ्या धाग्याना गुगुलावे अशी नम्र विनंती
~~ एका इच्छाधारी केसधारी आणि वास धारी सापाचे नुकतेच आलेले ट्वीट Wink

>> तुम्ही विनाकारण मला या धाग्याचा दुश्मन समजताय. आज लिहायला सुरवात केली आणि पहा गेल्या दोन आठवड्यात जेव्हढ्या पोस्ट न्हवत्या आल्या तेव्हड्या एका दिवसात आल्या. धागा इथून पुढे नेहमी चर्चेत राहील याची खात्री बाळगा. >>
तुमचा काहीतरी गैरसमज होतोय.
या धाग्यावर रोज काही ना काही पोस्ट पडलीच पाहिजे असं काही कंपल्शन नाहिये कुणाचं....तुम्ही यायच्या आधीचे ट्रेन्डस बघा हवं तर..ईथे रोज काही हॅपनिंग घडत नसायचच..आठवड्यातुन २-३ वेळा कोणी काही किस्से टाकायचा..पण ते सिरीअस असायचे...आणि त्या किस्स्यासंबंधीत लोकांचे कमेंट्स..
तुम्ही आणि तुमचे किस्से सुरु झाल्यापासुन ईथे नुसतीच पोस्ट ची संख्या वाढते आहे पण वाचायला जावं तर हाती काहीच लागत नाही.
तुम्हाला विनोदी लिहायची ईतकी खुम्खुमी आहे तर तुम्ही दुसर्या विनोदी धाग्यावर का नाही लिहित असं तुम्हाला खुप जणांनी समजावुन सांगितलय..ईथे वाचायला येणार्यांची रोजच्या रोज किस्से असावेत अशी अपेक्षा नाहीये. आठवड्यातुन १-२ किस्से पण पुरेत..पण विषयाशी संबंधीत असावेत ईतकीच अपेक्षा...
त्यामुळे तुमच्या मुळे धागा चर्चेत राहिला तरी त्याला काही अर्थ नाही...असो...
आता खरच ईथली संख्या बघुन ईथे येण्यात काही अर्थ नाही.

@दक्षिणा, धागाकर्ती म्हणून या सगळ्या गोंधळावर तुझं काहीतरी मत्/रीअ‍ॅक्शन असेलच ना...गेले अनेक दिवस मी विचार करतेय की तुझी एक पण पोस्ट का नाही ईथे ? जस्ट कुतुहल म्हणुन विचारते आहे...
(मी जितकं तुला ओळखते त्यावरुन तुला हे सगळं पटत नाहीये आणि त्यामुळे तु ईग्नोरास्त्र वापरते आहेस असं वाटतय... Happy ..)

आता खरच ईथली संख्या बघुन ईथे येण्यात काही अर्थ नाही.>>
well, तसं तर माबो वर येण्यात काही अर्थ राहिला नाही (चांगलं लिहिणारे केन्व्हाच गायब झालेत इथुन, काही धागे निघतात चांगले पण प्रमाण खुप कमी झालय) , पण व्यसन सुटत नाहिये सध्या तरी..

पण अमानवीय किस्से विनोदी नसावेत, असं का? उघड्या माळावरून वेताळाच्या हसण्याचा आवाज येण्याच्या गोष्टी मी ऐकल्या आहेत. त्यावरून असे वाटते, की अमानवीय जगातही विनोद ओतप्रोत भरला आहे.

@स्मिता श्रीपाद, अहो हे जग अथांग आहे, आपण किती शूद्र आहोत याची कल्पना सुद्धा करू शकत नाही आपण, आपण स्वतःला एका चौकटीत बांधलेलं असतं, त्या चौकटीपलीकडची कोणतीही गोष्ट आपल्याला थाप वाटते, आपण सहसा त्या चौकटीपलीकडे जात नाही परंतु माझ्यासारखे काही साहसी माणसं याला अपवाद असतात, मी त्या चौकटिपलीकडे जाऊन थरारक आणि सत्य अनुभव तुमच्या सगळ्यांसमोर ठेवतो, आता कदाचित माझे अनुभव आणि गोष्टी तुम्हाला थापा वाटतील पण जसं जसं विज्ञान पुढे जाईल तशा तशा मी लिहिलेल्या गोष्टी उलगडत जातील, ते शास्त्रज्ञ नाही का होते , शोध लावल्यावर लोकं त्यांना वेड्यात काढायचे पण नंतर जगाने त्यांचा उदो उदो केलाच तसंच आहे हे, मला खात्री आहे एक दिवस असा येईल जेव्हा तुम्ही अभिमानाने बोलाल "बोकलत तूच होतास बरोबर कोकलत"

अग्निपन्ख ++
ह्या धाग्यामुळे माबोवर यायची इच्छा व्हायची..
ह्या झाडाला अखेर त्यानी धरले..

अग्निपन्ख ++
ह्या धाग्यामुळे माबोवर यायची इच्छा व्हायची..
ह्या झाडाला अखेर त्यानी धरले..

बोकलत, रॉबीनहुड नाहीयेत, बाबा कामदेव रॉहु आहेत.

मैत्रिणीने वाचलेला किस्सा इथे लिहीतेय. माझ्या मैत्रिणीला ( नेट वर भेट झालेली ) वाचनाची तुफान आवड आणी मग तिची नोकरी पण पत्रकारीतेतली. चित्रलेखा नावाचे मासिक आहे, ते मूळ गुजराती व मराठीत पण आहे. १५ - २० वर्षापूर्वीची ही गोष्ट. काही पत्रकार शुटिंगसाठी अमरनाथला गेले होते ( यात्राच होती त्यावेळी ) तर रात्री त्यांची भेट काही जवान व त्यांचे मुख्य यांच्याशी झाली. त्या कर्नल साहेबांनी त्या पत्रकारांना एक घटना सांगीतली. मागे अशीच गस्त घालत असतांना कर्नल साहेब आणी काही जवान एका छोट्या पुलाजवळ आले. गोठवणारी थंडी आणी त्यात पौर्णिमेची रात्र, त्यामुळे रात्री चंद्राच्या प्रकाशात पुलाखालच्या पाण्यातुन एक ५ फण्यांचा नाग सळसळ पोहत जातांना दिसला, त्याच्या फण्यावर एक लखलखता मणी होता ज्याचा प्रकाश पसरला होता. कर्नल साहेब आणी जवान जागीच खिळले. त्यांचा डोळ्यावर विश्वासच बसेना की असे काही पहायला मिळेल. ही घटना मग कालांतराने चित्रलेखात छापुन आली होती व मैत्रिणीला याच पत्रकार मित्राकडुन कळली.

मध्यंतरी असे वाचनात आले की ( कस्स काय सौजन्य ) साप वा नाग याचे विष जेव्हा वापरले जात नाही तेव्हा ते गोठले जाते आणी त्याचे खड्यात रुपांतर होते. तो खडा ( म्हणजे त्या विषाचा रंग राखाडी चमकदार असतो ) मधून मधून चमकतो त्यामुळे पहाणार्‍याला तो नागमणी वाटु शकतो. आणी तो खडा नाग / सापाच्या मस्तकावर गोठतो. खरे खोटे सायन्स आणी वैद्यक शास्त्र ( जनावरांचे ) जाणे.

ना गमणी वगैरे साठी जिवन्त नागान्ना, सापाना वेठीला धरल जात. >> भूत वगैरेसाठी जिवंत माणसांना, आयडींना वेठीला धरलं जातं. Proud
Please refrain from believing.. Whether true or false doesn't matter. > Lol हे ह्या पूर्ण धाग्याचंच घोषवाक्य असायला हवं नाही का?.

ह्या धाग्यामुळे माबोवर यायची इच्छा व्हायची..
ह्या झाडाला अखेर त्यानी धरले..>>>> Lol Lol Lol आताशी कुठे सुरवात केले तुम्हाला अजून भरपूर सत्य आणि थरारक कथा वाचायच्या आहेत.

युरेका!! युरेका!!!
अखेर सत्य गवसले. इथे घाण करणाऱ्या काही माचो लोकांची दक्षिणा जी यांच्याशी दुश्मनी असल्याने मुद्दाम धाग्याची वाट लावत आहेत. आईच्या खाटेवर जाणारे विकृत व त्यांची री ओढणारे माचो यांचा नंगानाच इथे सुरू आहे. सज्जनांनी आता या धाग्यावर लिहू नये ही विनंती.
bye bye Maayboli.

अखेर सत्य गवसले. इथे घाण करणाऱ्या काही माचो लोकांची दक्षिणा जी यांच्याशी दुश्मनी असल्याने मुद्दाम धाग्याची वाट लावत आहेत.>>> अरेच्चा तुम्ही अजून आहात होय, मला वाटलं या धाग्यावर चौफेर शिवीगाळ केल्यावर गोठवला असेल तुमचा आयडी Lol Lol Lol आता आहातच तर चार दिवस माझ्या रहस्यमय आणि थरारक कथा ऐका आणि नंतर जा.

तुम्हाला कळतंय का की इतरांपेक्षा जास्त वाट तुम्ही लावत आहात धाग्याची, प्रीत००९? Sad

>> तुम्हाला कळतंय का की इतरांपेक्षा जास्त वाट तुम्ही लावत आहात धाग्याची, प्रीत००९
शब्दांचे पक्के आहेत ते. परत येणार नाहीत. एकदा धागा सोडला की तो कायमचच

अरे कुठं चाललाय धागा. अडमीन पण कंटाळलेत बहुतेक आता समज द्यायला येत नाहींयत.
मी आधी बोललो होतो की इथे पुड्या सोडण्याची स्पर्धा भरलेली असते, बोकलत जिंकायला लागले त्या स्पर्धेत म्हणून बाकीचे चिडले बहुतेक.

मानवजी तुमचा पण अनुभव जबरी होता ☺️ बोकलत याना टफ देताय.

।आयझेनबर्ग expected reply.
कुणी ना कुणी तरी दे ईल ह्याची खात्री होती.
only difference is unlike snakes people used to come here on their own. (used to - underline ,italics, bold).

This is not just for u, but overall MO of maayboli these days:
जिकडे तिकडे वितन्डवाद, सो कॉल्ड विनोदी विटम्बने (अरे, मला विडम्बने म्हणायचे होते.. :))
समजु तदार पणाचा लवलेशही नाही. All energy and brain is used for this.

In our office, they took a session - do you have a dual personality? This was to show that people are being nasty while trolling because internet protecta their anonimity/ you are not dealing with person face to face/ no material common interests which you may have otherwise.
No need to be nice, then your true face starts showing up.
So, how are you really? Who are you really?

Happy trolling!

कने खला, खने ग ला, गने घला असं करत करत क्षने ज्ञला सांगितलेली गोष्ट खरी पण टने स्वतःचा म्हणून सांगितलेला अनुभव तेवढा खोटा.
जगात न्याय राहिलाच नाही बघा.

सज्जन, समजुतदारपणा यांच्या व्याख्या बदलल्यात बहुतेक. असो.

Pages