फूटबॉल वर्ल्डकप - २०१८

Submitted by Adm on 4 June, 2018 - 17:23

रशियात होऊ घातलेला यंदाचा फूटबॉल वर्ल्डकप पुढच्या गुरुवारी म्हणजे १४ तारखेला सुरू होत आहे.
स्पर्धा दहा दिवसांवर आली तरी इथे काहीच हालचाल नाही म्हणून वातावरण तापवण्यासाठी, आपल्या आवडत्या टीम्सना चिअर करण्यासाठी आणि नावडत्यांना घा.पा. बोलण्यासाठी हा धागा !

ऑफिशिअल वेबसाईटः http://www.fifa.com/worldcup/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाकी, १०-१२ दिवस फुटबॉलच्या मॅचेस पाहिल्यावर कालची वन-डे क्रिकेट मॅच फारच स्लो आणि बोअर वाटली. Proud

फुटबॉलमधला जोश झिंग आणणारा असतो !

<< क्रोएशियाचा खेळ रफ वाटत नाही का ?>> त्यांच्या विजयरथावर 'पिवळ्या कार्डां'ची माळ झळकत असली तरीही त्यांची जिद्द, खेळातील वेगवान चाली रचण्याचं कसब व 'फिनीशींग' हे त्यांच्या विजयातले मुख्य घटक आहेतच.

<< आम्ही आता खाडी ओलांडून फ्रान्सच्या किनार्यावर. >> इंग्लीश खाडी पार केलीच आहे , तर बाजूच्याच बेल्जियमच्या किनार्‍यावर उतरून मगच उद्यां जा कीं फ्रान्सला !! Wink

फुटबॉल खरंच कळतो, त्यांचे अंदाज साफ फसले म्हणे ! म्हणजे, निदान यंदा
तरी तुमच्या क्लबमधे सगळ्या पैजा फक्त तुम्हीच जिंकल्या असणार !!
labad.jpg

माझ्या ग्रुपमध्ये मी फ्रान्स यावेळी फेवरीट आहे असं सांगितलेलं . तेव्हा सगळ्यानी जर्मनी, अर्जेंटिना, ब्राझील वगैरेच नाव घेऊन मला तुक दिलेला . आता मी त्यांना तुक देतेय ! याई

<< माझ्या ग्रुपमध्ये मी फ्रान्स यावेळी फेवरीट आहे असं सांगितलेलं .>> अहो, हे कांहींच नाही; क्रोएशिया उलथापालथ करण्याची भन्नाट शक्यता वर्तवणारा मीं तर एकमेव होतो ना ! कावळा बसायला आणि फांदी मोडायला ....[ म्हणून तर वरचं व्यंचि सुचलं ना मला !] Wink

फ्रांस आणि बेलजीयम सेमी फायनल मध्ये हा एकच अंदाज खरा ठरला
बाकी सगळी भाकीत बाराच्या भावात
क्रोएशिया अजिबातच गृहीत धरले नव्हते

बेल्जियम 2 - इंग्लंड 0
मॅच छान झाली, दोन्ही फिल्ड गोल मस्त.
अशा प्रकारे बेल्जियम तिसऱ्या स्थानावर, पण माझ्या दृष्टीने इंग्लंड हरले ते जास्त महत्वाचे. Lol

>>बेल्जियम 2 - इंग्लंड 0<<

एक वर्थलेस मॅच (स्पर्धेच्या दृष्टिकोनातुन) असुनहि चुरशीने खेळली गेली, हे महत्वाचं... Happy

Say what you want about France but their preparation for this tournament was second to none. Spent half the 19th century conquering Africa so they could build this side. Unreal.

फायनल ; सरस टीम जिंकली! पण आपली फायनलपरयंतची मजल 'फलूक' नव्हती, हें क्रोएशियाने निर्विवाद सिद्ध केलं ! सामना विश्वचषकाच्या फ़ायनलला साजेसा झाला!
अभिनंदन फ्रेंचांचं, कौतुक करोएशियनसचं !

*Spent half the 19th century conquering Africa so they could build this side. Unreal.* काल हें जाणवत होतं हें खरंय. पण, आपल्याच देशासाठी खेळायला पैसे घेणं चुकीचं म्हणणारा फ्रेंच आफ्रिकन खेळाडू पाहिला कीं फ्रेंचांचं कौतूकही वाटतं !

पण, आपल्याच देशासाठी खेळायला पैसे घेणं चुकीचं म्हणणारा फ्रेंच आफ्रिकन खेळाडू पाहिला कीं फ्रेंचांचं कौतूकही वाटतं ! >+१

चला... फक्त १५८७ दिवस आणि १५ तास राहिले कतार-२०२२ साठी... फ्रेश होऊन या बरं सगळे.. ह्यावेळी केली तेवढीच जागरणं करावी लागतील Lol

Pages