फूटबॉल वर्ल्डकप - २०१८

Submitted by Adm on 4 June, 2018 - 17:23

रशियात होऊ घातलेला यंदाचा फूटबॉल वर्ल्डकप पुढच्या गुरुवारी म्हणजे १४ तारखेला सुरू होत आहे.
स्पर्धा दहा दिवसांवर आली तरी इथे काहीच हालचाल नाही म्हणून वातावरण तापवण्यासाठी, आपल्या आवडत्या टीम्सना चिअर करण्यासाठी आणि नावडत्यांना घा.पा. बोलण्यासाठी हा धागा !

ऑफिशिअल वेबसाईटः http://www.fifa.com/worldcup/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्यात काही कळत नाही. कुणा खेळाडूचा हात लागला बॅालला तर ओफसाइड हे आहे, त्या गोलमध्ये काहीतरी संशय होता.

नाही हो.. खेळाडूचा हात लागला तर त्याला हँड म्हणतात..

The Offside Rule and Offside Trap in Football(Soccer) It is not an offence in itself to be in an offside position. A player is in an offside position if: he is nearer to his opponents' goal line than both the ball and the second last opponent.

ऑफसाईडचा नियम हा बेफाम उधळणार्या स्ट्रायकर्सना घातलेला लगाम आहे. कोरिया संघाचा खेळाडू जेव्हा बॉल पास करेल तेव्हा पास घेणारा कोरियाचा खेळाडू हा शेवटच्या जर्मन खेळाडूच्या(गोलकिपर सोडून जो जर्मन खेळाडू जर्मन गोलपोस्ट जवळून पहिला असेल त्याच्या) अलीकडे पाहिजे. जर कोरियाचा खेळाडू पलीकडे असेल तर ऑफसाईड दिली जाईल आणि कोरियाचा फाऊल होऊन जर्मन्स बॉलचा ताबा घेतील.

वाचनात अचानक जर्मनीच्या अपयशाचं कारण गवसल॔_
Germans went to Russia three times totally unprepared - first world war , second world war and the world cup, with the same result !!!

आजचा इंग्लंड - बेल्जियम सामना रंगतदार होईल असे वाटते.

पुढील अंदाजः
फ्रान्स - अर्जेंटिना (फ्रान्स विजयी)
उरुग्वे - पोर्तुगाल (पोर्तुगाल विजयी)
स्पेन - रशिया (स्पेन विजयी)
क्रोएशिया - डेन्मार्क (क्रोएशिया विजयी)
ब्राझिल - मेक्सिको (ब्राझिल विजयी)
स्वीडन - स्विट्झर्लँड (स्वीडन विजयी)
अंतिम सामना ब्राझील विरुद्ध पोर्तुगाल असा अंदाज आहे.

स्वीडन - स्विट्झर्लँड (पोर्तुगाल विजयी) >> Uhoh
आणि बेल्जिअम, ईंग्लंड कुठे ते पण जपान आणि कोलंबोयाला हरवून जाणार पुढे.

रोज जागतां, ऑफिसला उशीरा जातां; तुमचं फुट्बॉल प्रेम
डायरेक्ट बाद फेरीतच नेईल तुम्हाला ऑफिसच्या !!
aarraam.jpg

@हायझेनबर्ग
कॉपी-पेस्ट चूक आता सुधारली आहे. Happy

<<< बेल्जिअम, ईंग्लंड कुठे >>>
ईंग्लंड आज बेल्जिअमकडून आणि मग कोलंबियाकडून हरावेत अशी फार इच्छा आहे मात्र. Lol

भाऊ, मस्त कार्टून.
मी सध्या जिथे नोकरीत आहे तिथे वर्ल्ड कप चालू असल्याच्या कारणाने १ महिना उशिरा रुजू झालो होतो. Happy

माझ्या दॄष्टीने उपांत्य सामन्या साठी ही पसंती
ब्राझिल विरूद्ध फ्रान्स : ब्राझिल मेक्सिको आणि बेल्जियमला तसेच फ्रान्स अर्जेंटिना आणि उरुग्वेला पराभूत करून उपांत्य फेरी गाठतील. रोनाल्डो फॉर्मात असला तरी पोर्तूगाल वन प्लेयर टीम आहे.

स्पेन विरूद्ध इंग्लंड : स्पेन रशिया आणि क्रोएशिया तसेच इग्लंड कोलोंबिया आणि स्वीडनला पराभूत करून उपांत्य फेरी गाठतील.
फायनल इंग्लंड - ब्राझिल.
चँपियन ब्राझिल कप जिंकेल. शेक्ष्टा. (सहावा)
बेल्जियम ला ब्राझिलला हरवायची क्षमता आहे. तसे झाल्यास ते कपही जिंकू शकतील.

इंग्लंड डार्क हॉर्स.
पण माझी पसंती ब्राझिललाच.

<< नवर्‍याला झापताना सासू बाई त्याला वाचवायला नसतील तर बायको ऑफसाइड >>. ..मागे बिचारे सासरेबुवा गोलमधे हात चोळत उभे असले तरीही ! Wink

जबरा मजा आली. अर्जेंटिनाचा शेवटचा गोल झाला असता तर अजून धमाल. फ्रान्सच्या ग्रिझमन, एमबापा यांच्या वेगाशी जुळवून घेताना अर्जेंटिनाची दमछाक झाल्याचे साफ जाणवत होते. मेस्सीचे वाईट वाटले, त्याच्या एकट्याच्या जीवावर अर्जेंटिना जिंकू शकणार नव्हतीच, पण निदान त्याच्या शेवट्चया वर्ल्ड कपमध्ये निदान त्यांनी सेमीफायनल तरी गाठायला हवी होती.

आजच्या दोन्ही मॅचेस कसल्या जबरी !!! तुफान स्पीड, भारी पासेस, भक्कम बचाव आणि अशक्य फिल्ड गोल्स!
त्यातल्या त्यात अर्जेंटीनाचा बचावच कमी पडला आणि फ्रान्सने योग्य संधी साधल्या.
उरूग्वेपण तुफान वेगवान खेळले आणि त्यांच्या डिफेन्सपुढे रोनाल्डोला काही करता आलं नाही.
शनिवार सकाळ वसूल झाली एकदम!

दोन्ही 'गोट' शेवटी वर्ल्डकपच्या शेळ्याच ठरले!

<< दोन्ही 'गोट' शेवटी वर्ल्डकपच्या शेळ्याच ठरले! >> -

आतां तुम्हीही घाईघाईने कुठे पडताय बाहेर,
... तुमच्या त्या मेस्सी आणि रोनाल्डो सारखे !!
footbolar.jpg

हा हा.. भाऊ एक नंबर..

कालच्या दोन्ही मॅचेस भारी झाल्या..
अर्जेंटीना आणि पोर्तुगल दोन्ही टीम्स मधे एक फिनिशर कमी पडला..
मेस्सी आणि रोनाल्डो ह्या दोघांच्या व्यतिरिक्त कोणीतरी गोल मारणारा हवा होता... अर्जेंटीना डिफेन्स मधे तर पारच ढेपाळली होती, फ्रान्सवाले बुंगाट काउंटर अटॅक करत होते आणि तेव्हा अर्जेटीना वाले कुठे दिसतच नव्हते..
उरुग्वे आणि फ्रान्स दोन्ही टीम्स मध्ये एका पेक्षा जास्त फिनिशर होते,
सुआरेझ स्टार प्लेअर असतानाही कावानी ने दोन्ही गोल मारले.. त्यामुळे सुआरेज वरचं प्रेशर कमी होतं.
फ्रान्समधे तर जनताच आहे..

रशिया पेनल्टी शूट आऊट मधून विजयी!!!
स्पेन कित्येक पटीने सरस संघ वाटत असूनही व पहिली आघाडी घेवूनही हरले ! ( माझं कारण - पाहिला गोल झाल्यावर अधिक गोल करण्याऐवजी स्पेन बराच वेळ अर्थ शून्य पासिंग करत होते. रशिया नक्कीच पेनल्टी शूट आऊटवर आशा केंद्रीत करून असावी )

दोन निर्णय रशियाच्या बाजूने गेले आणि स्पेन वर अन्याय झाला असे वाटले
अर्थात मजोरी टीम असल्याने गेले ते बरेच झाले पण फेअर गेम वाटलं नाही

फ्रान्स - अर्जेंटिना खरोखर खूपच रंगतदार सामना झाला. एम्बापे बाप निघाला. अतिशय वेगवान खेळ. दुसर्‍या गोल तर अप्रतीम होता. One touch cool finish. देशासाठी खेळायला पैशाची जरूरी नाही म्हणून तो त्याची विश्वचषक स्पर्धेत मिळालेली सर्व रक्कम (बक्षिसांसहीत) विकलांग मुलांच्या खेळासाठी मदत करणार्‍या संस्थेला भेट देणार आहे असे वाचले. वयाने लहान असूनही अतिशय परिपक्व विचार. आता ब्राझिल पाठोपाठ माझा फ्रेंचांना पाठिंबा. Happy

कालचा दिवसच ' पेनल्टी शूट आऊट 'चा होता - रशियातले दोन्ही सामने व हाॅलंडमधला आपला ऑसीज विरूदधचा हाॅकीचा अंतिम सामना !

हॉकीचा वेगळा ग्रुप नाही म्हणून इथेच लिहितो. काल आपण ऑस्ट्रेलियापेक्षा सरस खेळ करूनही हरलो. पण आपल्या संघाची झालेली प्रगती सुखावणारी आहे. Happy

स्पेन, पोर्तूगाल तसेच अर्जेंटिनाच्या पराभवामुळे एक गोष्ट पुनः सिद्ध होते. चेंडूवरचा ताबा म्हणजे जिंकण्याची खात्री नाही. प्रतिचाली अधिक परिणामकारी ठरत आहेत.

विकिकाकांच्या सगळ्या पोस्ट्सना अनुमोदन Happy
अर्जेंटिना डिफेन्सने नेहेमीप्रमाणे माती खाल्ली. मेस्सीला मूर्खासारखं फॉल्स नाईनला खेळवलं. आणि फ्रान्सच्या बुंगाट वेगापुढे पार दमछाक झाली होती अर्जेंटिनाची. डी मारिया आणि मर्काडोचे गोल्स महान होते ! एम्बापेचे त्यापेक्षाही सुपर!!
मस्त चाललाय पण कप. जर्मनी, पोर्तुगाल, स्पेन, अर्जेंटिना, डेन्मार्क असे पारंपरिकरीत्या बलाढ्य समजले जाणारे संघ बाहेर पडलेत... आज ब्राझिल-मेक्सिको काय होतंय बघायचं, आणि बेल्जियम जपान पण....

काल क्रोएशिया-डेन्मार्क पेनल्टी शूट आऊट एकदम भारी झालं! सहसा, एखादी स्पॉट किक हुकणे/अडवली जाणे किंवा बॉल क्रॉसबारला लागणे इतपत अनिश्चितता असते त्या प्रकारात; पण काल मजा आली.

<< हॉकीचा....पण आपल्या संघाची झालेली प्रगती सुखावणारी आहे. >> १००% सहमत ! [ सहमती दर्शवताना मीं मात्र तुम्हाला 'विकीकाका' म्हणून 'पेनल्टी किक' आमंत्रित नाही करत ! Wink ]
<< चेंडूवरचा ताबा म्हणजे जिंकण्याची खात्री नाही. प्रतिचाली अधिक परिणामकारी ठरत आहेत.>> किंबहुना, खेळाच्या सुरवातीच्या काळापासूनच चेंडूवरचा ताबा ठेवण्यालाच प्राधान्य देणं घातकच ठरतं , हें स्पेनला फार मोठी किंमत देऊन उमगलं असावं.

<< काल क्रोएशिया-डेन्मार्क पेनल्टी शूट आऊट एकदम भारी झालं! >> खरंय. आत्तां त्या मॅचचे हायलाईटस पाहिले. मॅचही वेगवान व रंगतदार झाली असावी.

पूर्वार्धात झाली, म्हणण्यापेक्षा पहिल्या काही मिनिटात. नंतर मग त्या मानाने इतके भारी अॅटॅक नाही झाले. मीही चॅनेल चेंज करून करून मधून मधून बघत असल्यानेही असेल.

Pages