फूटबॉल वर्ल्डकप - २०१८

Submitted by Adm on 4 June, 2018 - 17:23

रशियात होऊ घातलेला यंदाचा फूटबॉल वर्ल्डकप पुढच्या गुरुवारी म्हणजे १४ तारखेला सुरू होत आहे.
स्पर्धा दहा दिवसांवर आली तरी इथे काहीच हालचाल नाही म्हणून वातावरण तापवण्यासाठी, आपल्या आवडत्या टीम्सना चिअर करण्यासाठी आणि नावडत्यांना घा.पा. बोलण्यासाठी हा धागा !

ऑफिशिअल वेबसाईटः http://www.fifa.com/worldcup/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सरळ सांगा ना जर्मनी बाहेर जावी अशी फार इच्छा आहे ! >>> Lol

आधीच इटली, नेदरलँड्स नाहीत; अर्जेंटिनाची अशी अवस्था; आता १-२ छोटे संघ क्वार्टर्सपर्यंत जायला पाहिजेत, मजा येईल. वर्ल्ड कपमध्ये सहभागी देशांची संख्या किती असावी या चर्चेला काही नवीन मुद्दे मिळतील Wink

काल नायजेरियाचे दोन गोलही भारी झाले. आइसलँड हरल्यामुळे अर्जेंटिनाची धुगधुगी कायम आहे.

इंग्लंडचा तरूण, नवाकोरा संघ काय करतो याबद्दलही मला उत्सुकता आहे. इटालिया-९० नंतर इंग्लंडचा खेळ घसरतच गेला आहे.

@भाऊ.
जर्मनी (किंवा अर्जेंटिना म्हणा वा इतर कुणी) जिंकली काय आणि हरली काय, माझ्या आयुष्यात काही फरक पडत नाही.

<<< जर्मनी इतरांची इच्छापूर्ती करण्याबाबत कधींच फार उत्सुक नसते >>>
सगळे संघ हे जिंकण्यासाठीच खेळतात, इतरांच्या इच्छापूर्तीसाठी नाही.

जर्मनी चा आज अवघड पेपर आहे आणि पाहिल्यात नापास झाल्याने टक्केवारी सुधारणे अत्यावश्यक आहे
कसे काय खेळतात बघू
निदान बाद फेरी गाठावी अशी आशा आहे
ब्राझील जर्मनी होईल बहुदा

<< जर्मनी (किंवा अर्जेंटिना म्हणा वा इतर कुणी) जिंकली काय आणि हरली काय, माझ्या आयुष्यात काही फरक पडत नाही.>> उ.बो., माझ्या पोस्ट्च्या शेवटींची स्माईली तुमच्या लक्षात आली नसावी. शिवाय, आपल्या प्रत्येक इच्छेचा आपल्या आयुष्यात फरक पडण्याशी संबध असतोच असं थोडंच आहे; माझ्या आयुष्यात त्याने कांहींही फरक पडणार नसूनही, डोनाल्ड ट्रम्प कधींतरी केळीच्या सालीवर घसरून उताणा पडावा अशी माझीही एक तीव्र इच्छा आहेच ! Wink
बाय द वे, तुमच्या इच्छेच्या पूर्वार्धाची पूर्ती आत्तां होइलसं वाटतंय- ७२व्या मिनीटाला मेक्सिको २- द. कोरिया ० असा स्कोअर आहे !

मेक्सिको 2- द. कोरिया 1

<<< डोनाल्ड ट्रम्प केळीच्या सालीवर घसरून उताणा पडावा अशी माझीही एक तीव्र इच्छा आहेच ! >>>
हाहाहा

जर्मनी जिंकली 2-1
Wow, मस्त झाली मॅच. शेवटच्या मिनिटाला केलेला गोल अफलातून.

जर्मनी 2 -1 ने जिंकली ! शेवटच्या 5 मिनीटांत विजयी गोल !
खेळाचा कल पहाता, स्कोअर 5-1 झाल्याचेही नवल नसते. जर्मनी निश्चितच सरस संघ होता !

हुश्श झालं एकदाचं, जिंकले बुवा, आता पुढचा पेपर पण अवघडच आहे, कोरिया विरुद्ध.

कोरियाने आज एक अगदीच सोपा चान्स घालवला नसता तर मेक्सिकोला पण अवघड परिस्थिती होती. आणि जर्मनीला पण जास्त फाईट मिळाली असती.

कोरिया सोपे जाणार नाही कारण त्यांचा गेम ओव्हर झालाय, त्यामुळे ते एकदम फ्री खेळतील आणि दोन सामन्यातून जर्मनीचा डिफेन्स कच्चा असल्याचे दिसून आलेच आहे त्यामुळे जास्त सावधगिरी बाळगावी लागणारे

सरळ सांगा ना जर्मनी बाहेर जावी अशी फार इच्छा आहे ! >>>
डोनाल्ड ट्रम्प कधींतरी केळीच्या सालीवर घसरून उताणा पडावा अशी माझीही एक तीव्र इच्छा आहेच ! >>>>> Lol

जर्मन कसले भारी खेळले !!! मजा आली एकदम.
शेवटची किक म्हणजे जर्मन प्रिसिजनचा उत्तम नमुना होता.
सेकंड हाफमध्ये तर बॉल जवळजवळ पूर्णवेळ स्विडनच्या हाफमध्येच होता. जोरदार अ‍ॅटॅक केले जर्मनीने.

तसं त्या ग्रुपमध्ये अजूनही सगळं ओपन आहे.

तेच की!! काय चाललंय Lol
५-० हाफटाईम

पनामाचा तो एक जटाधारी जरा भांडकुदळच दिसतोय.

<< दोन सामन्यातून जर्मनीचा डिफेन्स कच्चा असल्याचे दिसून आलेच आहे >> आशुचँपजी, स्विडनविरुद्ध बहुधा सुरवातीपासूनच ' ऑल आउट' आक्रमणच करायचं असं ठरवूनच जर्मनी मैदानात उतरली असावी, अगदीं बचावफळी उघडी पडण्याचा धोका पत्करूनही; म्हणूनच, स्विडनला तिनदां 'सोलो' आक्रमणाची संधी मिळाली व त्यांत त्यांचा एक गोल पण झाला. बाकी साराच खेळ स्विडनच्या 'हाफ'मधेच नाही तर त्यांच्या 'गोल बॉक्स'भोवतीच चालला होता ! जर्मनीने जाणीवपूर्वक बचाव दुय्यम ठरवल्यामुळे , निदान त्या सामन्यावरून तरी जर्मनीचा बचाव कच्चा आहे, असं म्हणतां येणार नाही. अर्थात, हें झालं माझं रांगडं मत.
<< शेवटची किक म्हणजे जर्मन प्रिसिजनचा उत्तम नमुना होता.>> येस, इट वॉज अ ब्यूटी अँड हाऊ टाईमली ! सगळ्या जर्मनीच्या पाठीराख्याना तो गोल एक दैवी देणगी व तो खेळाडू एक देवदूतच वाटला असणार !!

नाही फक्त स्वीडन नाही,मेक्सिको बाबत देखील हेच झालेलं. अटॅक करताना त्यांचा बचाव उघडा पडला. वेगवान काउंटर अटॅक च्या विरोधात त्यांच्याकडे काही उपाय नाहीत
आत तर बोटांग नाही, हमल्स नाही
डिफेन्स ला कोणाला उतरवणार

<< वेगवान काउंटर अटॅक च्या विरोधात त्यांच्याकडे काही उपाय नाहीत>> मला आतां पटतंय आपण म्हणताय तें. माझा समज असा होता कीं जर्मनीला स्वीडनविरुद्ध जिंकणं इतकं अत्यावश्यक होतं कीं त्याकरतां त्यानी जाणीवपूर्वक धोका पत्करून आक्रमणाला पूर्ण अग्रक्रम व बचावाला दुय्यम महत्व दिलं होतं; साधारण परिस्थितीत जर्मनी बचाव एवढा उघडा पडूं देत नसावा.
सेनेगल वि. जपान सामना [१-१] अटीतटीचा चालू आहे. जपानला आतां लय सांपडली आहे व त्यांच्या आक्रमणाला धार आली आहे.

डोळे सकाळीं फ्री किक्स मारत रहाणार हें माहीत असूनही आतां रात्री पोर्तुगाल वि. इराण सामना बघणं आलंच; स्पर्धेच्या पुढच्या टप्प्याच्या उंबरठ्यावरचं माप ओलांडायचा मान पटकवायचा आहे ना दोघांपैकी एकाला !!

पोर्तुगाल जातात आरामात पुढच्या फेरीत, स्पेनलाच थोडे टेन्शन दिले होते मोरोक्को ने पहिला गोल हणून.
स्पेनला draw पण चालणारे त्यामुळे ते निवांत आहेत

<< कसेबसे जरी गेले असले तरी दोन्ही गोल जबरदस्त होते >> एकदम मान्य ! मेस्सी काल प्रथमच खेळात पूर्णपणे 'इनव्हॉल्व' झाल्याचं जाणवलं .
विश्वचषकाचं खूळ पसरायला लागलंय -

अहो, ही कापडी पिशवी न्या ! बाहेर म्युनिसिपाल्टीवाले
रेड कार्ड घेवूनच फिरताहेत !!
platic.jpg

Pages