फूटबॉल वर्ल्डकप - २०१८

Submitted by Adm on 4 June, 2018 - 17:23

रशियात होऊ घातलेला यंदाचा फूटबॉल वर्ल्डकप पुढच्या गुरुवारी म्हणजे १४ तारखेला सुरू होत आहे.
स्पर्धा दहा दिवसांवर आली तरी इथे काहीच हालचाल नाही म्हणून वातावरण तापवण्यासाठी, आपल्या आवडत्या टीम्सना चिअर करण्यासाठी आणि नावडत्यांना घा.पा. बोलण्यासाठी हा धागा !

ऑफिशिअल वेबसाईटः http://www.fifa.com/worldcup/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< सगळ्याच टॉप टिम्स पहिल्या राउंड यामध्ये गडबडल्या आहेत >> पोलंडला देखील या साथीच्या रोगाची लागण झालीच !! पोलंड १- सेनेगल !!!

जपानने कोलंबियाला हरवलं !!

सेनेगलचा दुसरा गोल कसला भारी होता. तो प्लेअर बदली खेळाडू म्हणून मैदानात आला आणि थेट गोल करायलाच गेला Lol

भाऊ, कार्टून बेस्ट Biggrin

अपवाद बेल्जियम चा.. >>>> बेल्जियम टॉप टीम आहे का ? Wink
पहिल्या फेरीत टॉप टीमपैकी फक्त स्पेन चांगले खळले. बाकी सगळे ढेपाळले.

रशिया जोरदार खेळले आज. सेनेगल पण भारी. सेनेगलने आपल्या पहिल्या मॅचमध्ये फ्रान्सला हवरलं होतं त्याची आठवण झाली.

बादवे आज आमच्या ऑफिसात जोरदार चर्चा सुरू होती की हे सगळे घडवून आणलेले निकाल आहेत. (कम्युनिस्ट) रशियाला जास्तित जास्त पुढे जाता यावं म्हणून जर्मनी, ब्राझिल, अर्जेंटीना वगैरेंना वाईट खेळायला लावत आहेत. Proud

भाऊ कार्टून भारी Happy

उद्या मजा येणार!

बेल्जियम टॉप टीम आहे का ?
>>> माझ्या माहितीनुसार बेल्जियम सध्या वर्ल्ड नं. ३ टीम आहे. जर्मनी, ब्राझील पहिले आणि दुसरे.

<< पहिल्या फेरीत टॉप टीमपैकी फक्त स्पेन चांगले खळले. बाकी सगळे ढेपाळले.>> ' पहिल्या फेरीत टॉप टीम्सची लढत त्यांच्यापेक्षां सरस असलेल्या संघांशी झाली ', असं कां म्हणूं नये ? यंदाचा विश्वचषक 'टॉप टीम्स'पैकीं कुणीतरी जिंकेलही; पण यापुढे जेतेपद ही दोन-चार देशांचीच मक्तेदारी रहाणार नाही , हा स्पष्ट संदेश देण्याचं ऐतिहासिक कार्य यंदाचा विश्वचषक करणार असावा ! .

ढगाळ हवेमुळे आमच्या इथलं टाटा स्कायचं प्रक्षेपण बंद पडलं Sad
कामधाम सोडून पोर्तुगाल-मोरोक्को मॅच बघायला बसले होते. ५५ मिनिटंच बघता आली.
नेटवर लाईव्ह अपडेट बघायला गेले तर 'रोनाल्डो स्कोअर्स अगेन' दिसतंय. २ गोल केले का त्यानं? की हे पहिल्या गोलबद्दलच आहे?

खरं तर मेसीने परिक्षेचा पेपर लिहीलाच नाही ! गेल्या व या चषकातील मेसीचा खेळ पाहून तो मॅराडोनासारखा चषकासाठी जिद्दीने 100% योगदान देतो का , याबद्दल शंकाच वाटते.
काल क्रोएशिया निर्विवाद सरस संघ होताच ! क्रोएशिया सतत डाव्या बगलेवरून प्रभावी आक्रमण करत असूनही अर्जेंटिना आपल्याच नावलौकिकात मश्गुल राहून त्याबाबत बेसावध होती.

मेसी फक्त बार्सिलोनाची परीक्षा आनंदाने देतो... बाकी आनंदच असतो! तरी त्याला one of the greatest वगैरे म्हटलं जातं Wink

अरे, त्या मैदानाभोवती प्रेक्षकांकडे तोंड करून उभे राहणार्‍या सुरक्षा कर्मचार्‍यांकडे बघता का कधी?

त्यांना नोकरीवर घेताना पहिली अट हीच असेल की फुटबॉलची आवड असता कामा नये Lol गोलमालमधल्या रामप्रसादसारखी Biggrin

तरी, परवा रोनाल्डो गोल केल्यावर सेलिब्रेट करत असताना त्यातला एक कर्मचारी मागे वळून कौतुकानं बघत होता... त्याला नोकरीवरून काढून टाकतील की काय अशी भीती वाटली Lol

मी एक इराकी सिनेमा पाहिला होता. फुटबॉलची मॅच बघण्यासाठी मुली स्टेडियममधे घुसायला काय काय आयडीया लढवतात व किती धोका पत्करतात , यावर छान, विनोदी-उपरोधिक टिपणीच होती, तो सिनेमा ! या विश्वचषकात ईराणी मुली बिनधास्त स्टेडियममधे जल्लोष करताना पहाणं, हेही मजेशीर होतं.

आज ब्राझीलची लढत बघण याला पर्याय नाही. नैमारला त्याचा व्यक्तीगत खेळ खेळायला पूर्ण मुभा असल्याचं ब्राझिलच्या प्रशिक्षकानै म्हटलं आहे. म्हणजे, आतांपर्यंत त्याच्यावर बंधन होतं का ? असो. बघूया आज नैमार तरी अपेक्षित खेळ करतो का !

बहुतेक नेमारला प्रशिक्षकाने सांगितले असणार, भाऊ तुझं काही खरं दिसत नाहीये, ह्या मॅच मधे धुमाकूळ घालून मॅच जिंकून दे, मग पुढच्या मॅच मध्ये विश्रांती घे.. पुढच्या राउंडला खेळ..

ब्राझील जिंकले पण विश्वविजेत्यासारखे रुबाबात नक्कीच नाही; खेळाचा दर्जा , विशेषतः 'फिनीशींग', खूपच सुधारावा लागणार आहे ब्राझीलला !

उद्याचा दिवस महत्वाचा. मेक्सिकोने साउथ कोरियाला हरवलं पाहिजे आणि स्वीडनने जर्मनीला बरोबरीत रोखलं पाहिजे, अशी फार इच्छा आहे.

ब्राझिलने दोन्ही गोल भारी मारले !
काल क्रोएशियाने केलेले फिल्ड गोल्सही अफलातून होते !

ललिला, हिम्या, बेल्जियमच्या रँकिंगबद्दल माहित नव्हतं अजिबात. मी मध्यंतरी बघितली होती रँकिंग पण काहितरी गोंधळ झाला माझा.

<< मेक्सिकोने साउथ कोरियाला हरवलं पाहिजे आणि स्वीडनने जर्मनीला बरोबरीत रोखलं पाहिजे, अशी फार इच्छा आहे.>> असं आडून आडून कां ? सरळ सांगा ना जर्मनी बाहेर जावी अशी फार इच्छा आहे ! पण जर्मनी इतरांची इच्छापूर्ती करण्याबाबत कधींच फार उत्सुक नसते; साधं, इतराना आवडेल असा शैलीदार खेळ करावासाही त्याना कधींच वाटत नाही !! Wink

Pages