फूटबॉल वर्ल्डकप - २०१८

Submitted by Adm on 4 June, 2018 - 17:23

रशियात होऊ घातलेला यंदाचा फूटबॉल वर्ल्डकप पुढच्या गुरुवारी म्हणजे १४ तारखेला सुरू होत आहे.
स्पर्धा दहा दिवसांवर आली तरी इथे काहीच हालचाल नाही म्हणून वातावरण तापवण्यासाठी, आपल्या आवडत्या टीम्सना चिअर करण्यासाठी आणि नावडत्यांना घा.पा. बोलण्यासाठी हा धागा !

ऑफिशिअल वेबसाईटः http://www.fifa.com/worldcup/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेलं अर्जेंटिना शेवटी रडतखडत का होईना. मी (सकुसप) तहहयात पाठिंबादार असल्याने काल गॅसवरच होते. फार काही बरे खेळले नाहीत पण आधीपेक्षा चांगले खेळले. आणि दोन्ही गोल अप्रतिम होते.
नायजेरियासाठी वाईट वाटलं. खूप छान खेळले. पुढच्या वेळेस ते कडवं आव्हान देऊ शकतील सुपरपॉवर्सना असं आत्ता तरी दिसतंय

नायजेरिया आफ्रिकन चॅम्पियन होते, त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा असतेच पण साऊथ अमेरिका आणि युरोप मधले देश हे इतर खंडातील देशांपेक्षा फारच वरच्या लेव्हलचा खेळ खेळतात, तिथे फुटबॉल लीग भरपूर होतात, त्यामुळे त्यांची तयारी जबरदस्त असते. पण तरीही, नायजेरिया, सेनेगल, जपान, कोरिया हे देश युरोपियन देशांना दमवतात..

<< नायजेरिया आफ्रिकन चॅम्पियन होते.. >> नायजेरिया काल देखील छानच खेळले व, मला आठवतं, गेल्या विश्वचषकातही त्यानी सर्वांवर आपल्या खेळाने छाप पाडली होती. << पुढच्या वेळेस ते कडवं आव्हान देऊ शकतील सुपरपॉवर्सना असं आत्ता तरी दिसतंय >> सहमत. मीं तर इथं सुरवातीलाच [ ९-६-'१८] म्हटलं होतं -<< क्रोएशिया किंवा नायजेरिया कांहीं तरी उलथापालथ करण्याची एक दूरची शक्यता !>>

स्वीडन ३ - मेक्सिको ०
साउथ कोरिया २ - जर्मनी ० (हे अगदी अनपेक्षित होते, ०-० होईल असा अंदाज होता).

<< साउथ कोरिया २ - जर्मनी ० (हे अगदी अनपेक्षित होते, ०-० होईल असा अंदाज होता).>> शेवटच्या मिनीटांत कोरियाने गोल केले व त्यावेळीं स्वीडनने मेक्सिकोला ३-० हरवलेलं होतं. जिंकूनही जर्मनीला स्वीडनच्या गोल अ‍ॅव्हरेजची बरोबरी करतां आली नसती. कदाचित, जर्मनीला याची मैदानावर कल्पना आली असावी व शेवटच्या मिनीटांत त्यांचा खेळातला इंटरेस्टच गेला असावा. [ हा अर्थातच एक अंदाज ]

ब्राझिल ढेपाळत्या सुरुवाती नंतर जोरदार अभ्यास करुन उत्तम रितीने पास होऊन पुढच्या वर्गात
अर्जेंटिना ढेपाळत्या सुरुवाती नंतर जरा बरा अभ्यास करुन ठिकठाक रितीने पास होऊन पुढच्या वर्गात, हेच स्पेनला पण लागू होते
जर्मनी ढेपाळत्या सुरुवाती नंतर जरा कुठे बरे मार्क पडायला मिळत होते तेव्हढ्यात परत ढेपाळून नापास होऊन शाळेतून यंदा बाहेर..

त्यात नायजेरिया आणि कोरियाचा थेट उल्लेख करायला हवा. कोरियाला मेक्सिको विरुद्ध केवळ नशिबाने साथ दिली नाही, अन्यथा चित्र अजूनच वेगळे दिसले असते.

मला काल जर्मनी आणि जर्मनीच्या चहात्यांबद्दल खूप वाईट वाटल. अजून ७-१ च्या धुंदीतून जमिनीवर उतरले नव्हते. :).
तरी काल जर्मनी आधीच्या सामन्यापेक्षा बरे खेळले. आधीच्या सामन्यात सुदैव. काल दुर्दैव. कमीत कमी ४ हेडर तरी गोल मधे जायला पाहिजे होते. कोरीयाच्या गोलीला आयुष्यभर मेक्सिकन रेस्टॉरंटमधे मोफत जेवण मिळेल ही समालोचकाची टिपण्णी खूप आवडली.

ब्राझिलचा पहिला गोल ब्राझिलच्या खेळाचा अप्रतीम नमुना होता. मस्त पास, त्याहुन मस्त फिनिशिंग. Created opportunity from nowhere giving no chance to goal keeper. वेल डन.

आता मी इंग्लंडच्या बाजूने... Proud काहीतरी बदल !!

क्वार्टर्सला गेले तर मज्जा; सेमीजला गेले तर गॅरी लिनेकरच्या आधी मला आनंद होईल. Wink

आता इथून पुढच्या बहुतेक मॅचेस लांबणार... तीन-साडेतीन तास !! तेवढं जागरण वाढणार Sad

जर्मनी हरले Sad

ललिता, इंग्लंड ??? अर्र ! काय झालं तुझ्या "अभिरूची"ला?

मी आता ब्राझिलला सपोर्ट करणार.

आउटसाइड बॅाल म्हणजे काय?>> तुम्हाला ऑफ साईड म्हणायचे आहे का?. कोरीयाचा खेळाडू ऑफ साईड नव्हता कारण बॉल जर्मनीच्या खेळाडूला लागून त्याच्याकडे आला होता.

जर्मनी चे कालच खेळणं फारच विचित्र होतं
पुढे जण्यासाठी विजय आवश्यक असतानाही कुठेही त्यांच्या वागण्यातून असे वाटत होते की ते जीव तोडून खेळत आहेत

मेक्सिको विरुद्ध खेदिरा, ओझील व्यवस्थित खेळले नाहीत म्हणून स्वीडन विरुद्ध ड्रेकल्सर, reus अशी नव्य दमाची मंडळी खेळली होती आणि त्यांनी चांगली कामगिरी केली होती तरी परत कोरिया विरुद्ध म्युलरला बाहेर ठेऊन परत खेदिरा आणि ओझील का खेळवले ते माहिती नाही

पासिंग इतके भिकार होते की ही जर्मन टीम आहे यावर विश्वास बसत नव्हता

डिफेन्स त्या मानाने चांगला होता आधीच्या दोन सामन्यांच्या मनाने पण अटॅक कुठेही जाणवत नव्हता, झाला देवाच्या कृपेने गोल तर होईल असा पवित्रा घेतल्याचे वाटत होते.

<< कुठेही त्यांच्या वागण्यातून असे वाटत होते की ते जीव तोडून खेळत आहेत >> शेवटीं आले होते ना सगळेच, अगदीं गोलीसकट ,कोरियाच्या गोलजवळ गोल करायला ! Wink
मला वाटतं , सुरवातीसच तेजोभंग झालेला जर्मन संघ त्यातून स्वतःला सांवरूच शकला नसावा .

त्यांचे अंतर्गत वाद हे कारणीभूत असावेत
मिरोसलाव क्लोज ला सहायक प्रशिक्षक म्हणून नेमल्यावर बरीच कुरबुर झाली होती.

असेही लो ने विश्वचषक जिंकूनदिल्यावर मी म्हणेन तेच ब्रह्मवाक्य असा त्याचा पवित्रा होता त्याचाही फटका बसला असावा

झाला देवाच्या कृपेने गोल तर होईल असा पवित्रा घेतल्याचे वाटत होते.>> अगदी अगदी. चार हेडर्स वाया घालवले त्यांनी. आणि शेवटी तो पांढर्‍या जर्सीतला कोण रे खेळतोय असा प्रश्न पडून गोली आहे हे लक्षात आल्यावर थक्कच झाले मी... अरे बावळट, गोल जाईल की तिकडे असं म्हणेम्हणे पर्यंत चेंडू तिकडे पोचून गोल झालापण... Proud
जर्मनीच्या नावाखाली तोतये खेळताहेत असं मी पहिली मॅच बघूनच म्हणलं होतं Proud मी कधीही जर्मनीची सपोर्टर नसले तरी हा असला भिकार खेळ करतील असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं या फिफाच्या आधी..

काय झालं तुझ्या "अभिरूची"ला?
>>>
म्हटलं ना, जरा बदल Wink
इंग्लंडचे बहुतेक सगळे खेळाडू नवे आहेत. त्यांच्या कोचबद्दलही बरंच बोललं जातंय, त्यानं इंग्लिश फुटबॉल टीमची विचारांची दिशा बदलली आहे, वगैरे (whatever that means...)

जाऊ दे जर्मनी हरणारच होती. महायुद्धापासून चालत असलेली एव्हडी मोठी ऐतिहासिक परंपरा शुल्लक खेळासाठी कशाला मोडतील ते.

Pages