फूटबॉल वर्ल्डकप - २०१८

Submitted by Adm on 4 June, 2018 - 17:23

रशियात होऊ घातलेला यंदाचा फूटबॉल वर्ल्डकप पुढच्या गुरुवारी म्हणजे १४ तारखेला सुरू होत आहे.
स्पर्धा दहा दिवसांवर आली तरी इथे काहीच हालचाल नाही म्हणून वातावरण तापवण्यासाठी, आपल्या आवडत्या टीम्सना चिअर करण्यासाठी आणि नावडत्यांना घा.पा. बोलण्यासाठी हा धागा !

ऑफिशिअल वेबसाईटः http://www.fifa.com/worldcup/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< कालचा दिवसच ' पेनल्टी शूट आऊट 'चा होता ->> << काल क्रोएशिया-डेन्मार्क पेनल्टी शूट आऊट एकदम भारी झालं! >> -

,,,,पण आतां तो ट्रम्प कोकलेल ना, " इतरत्र जल्लोष आणि अमेरिकेत मात्र
शूट आऊट झाला रे झाला कीं शस्त्र बाळगण्यावर बंदीच्या बोंबा कां ? "
purviche.jpg

अरे यार ! मायबोली नवीन रुपडे घेऊन आलीये ते चांगलं आहे पण नेमके कामाचे बाफच दिसत नाहीत . Sad
हा बाफ देखील भाऊ काकांच्या पोस्ट मुळे कळला .

किती मिस झालीये चर्चा

तर काल रशियाने पेनलटी शूट आऊट मध्ये बाजी मारली .मजा आली मॅच बघताना

नेमार गोल आणि असिस्ट, दोन्ही भारी होतं... मजा आली... अस्सल मैदानी गोल !!

पराग, तुझं ब्राझिल जिंकलं, रे !

भाऊ, कार्टून बेस्ट Lol

ब्राझील चँपियनसारखे खेळले. ब्राझीलला त्यांची पारंपारिक शैलीदार लय सांपडतेय, असं जाणवतंय ! मेक्सिकोने मात्र यंदा मिळवलेले चहातेही गमावले; हरले म्हणून नाही, तर जाणूनबुजून आडदांडपणा, विशेषतः नेमारशीं, केल्यामुळे !

आणि नेहमी प्रमाणे मेक्सिको स्पर्धेबाहेर.. दरवेळेसची कथा आहे त्यांची.. ग्रुपमधे पुढे जातात आणि पुढच्या राऊंडला हारतात...

नेमारशी अडदांडपणा केला असला तरी त्याने काही कमी रडकेपणा नाही केला. वेळ वाया घालवण्याचे उद्योग बरोबर केले.. अर्थात त्याने फार फरक पडला असता असे नाही पण खेळाची लय बिघडवण्याचे काम नक्कीच करत होता..

[ << भाऊ टोटल जोशात आहेत यंदा..>> माझं पहिलं प्रसिद्ध झालेलं व्यंचि [म्हणजे , नंतर अगणित प्रसिद्ध झालीं असं मुळींच नाही ] हें एका नॅशनल पेपरच्या फुट्बॉल वर्ल्डकप पुरवणीमधे छापून आलं होतं. त्यामुळें, नंतरचा दर फुटबॉल वर्ल्डकप आला कीं माझं हें जुनं खूळ चाळवतं ! Wink ]

ब्राझिल सुरुवातीला गडबडले होते. मेक्सिकोचा एखादा गोल झाला असता तर अवघड झाल असत. मेक्सिकोचे विंगर्स अतिवेगवान होते. जर्मनीची पुनरावृत्ती करतील की काय अशी बिती वाटून गेली. पण एकदा जम बसल्यावर ब्राझिलने खूप शैलीदार खेळ केला. पहिला गोल त्यांच्या समन्वयाच उत्तम उदाहरण होते. दुसरा गोल सुद्धा अप्रतीम पास नेमारचा.
बेल्जियम - जपान मॅच भारी झाली अस दिसतय. मला वाटल होत बेल्जियम सहज जिंकेल. ब्राझिल विरूद्धच्या मॅच साठी दम राखून ठेवलाय जणु.

बेल्जियमची मॅच अमेझिंग झाली ! जपानने आधी धपाधपा दोन गोल करून हवा टाईट केली पण बेल्जियमने शेवटच्या क्षणी केलेला गोल भारी होता. अक्षरशः दोन सेकंदात शिट्टी वाजली आणि जपानला काही कळायच्या आत ते हरले होते.

पण बेल्जियमची हवा टाईट झाली होती, डबल सबस्टिटयुशन मुळे त्यांना फायदा झाला आणि तीन पैकी दोन गोल सब्सनीच केले. दोन गोल झाल्यावर एकदमच विस्कळीत झाले होते बेल्जियम वाले, पण नंतर मस्त रिग्रुप केले त्यांनी, गेल्या २२ मॅचेस मधे हारले नव्हते.. पण पहिल्यांदाच २ गोलने पिछाडीवर पडले त्यामुळे प्रेशराईज झाले.
वर्ल्डकप मध्ये केवळ सहाव्यांदाच दोन गोलने पिछाडीवर असलेल्या टीमने विजय मिळवला आहे.

भाऊ जोमात, ट्रंप कोमात Lol
स्वीडन १ - स्वित्झर्लंड ०
शेवटच्या मिनिटात स्वीडनला जवळजवळ पेनल्टी किक मिळाली असती, कदाचित २-० पण अर्थात त्याने निकालात फार काही फरक पडला नसता.

उबो,
'कवार्टर'साठी ही यातायात
'सेमी'साठी तरी टाका कात
जेता व्हावं तर कसं रुबाबात
'कपा'साठी नको 'देवाचा हात' !!

माझा आतापर्यंत एकच अंदाज चुकलाय. रशिया पुढे जाईल अस वाटल नव्हत. हरकत नाही उपांत्य फेरीचा अंदाज
ब्राझिल - फ्रान्स
इंग्लंड - रशिया

चला, आतां जगभरातल्या कडव्या संघनिष्ठांसाठीं उद्यापासून जीवघेणी उत्कंठा सुरू ! -

देवा, पुन्हा हे टीव्ही फोडतील हें दु:ख नाही पण आणखी चार वर्षं मला सिरीयल
चुकतील ना; म्हणून , यावेळीं तरी जिंकूंदे रे बाबा त्यांची टीम !!
prayer.jpg

खरंय, फ्रान्सचा पहिला गोल अप्रतिमच. दुसरा गोल उरुग्वेच्या गोलीच्या " बॉल बाहेर 'पंच' करावा कीं पकडावा " या द्विधा मनःस्थितीमुळे झाला असावा. उरुग्वेच्या खेळात जोष कमी पडतोय असं सतत वाटत होतं, हेंही खरं. France has peaked at the right time !
डोळे पेंगत असले तरीही ब्राझील वि. बेल्जियम हा तुल्यबळ संघांतला सामना चुकवणं अशक्य. अर्थात, मनातून ब्राझील जिंकावे असं वाटतंय, हेंही कबूल. धसमुसळेपणाने खेळाचा विचका मात्र होवूं नये, ही प्रार्थना !

जबरी मॅच !!!!
सेकंड हाफ मध्ये ब्राझिलने तुफान अ‍ॅटॅक्स केले पण बेल्जियन डिफेन्स लय भारी होता ! त्यांच्या गोल किपरला २००% मार्क्स ! त्याने शेवटची न्येमारची किक काय अफलातून अडवली. ब्राझिल हरले पण मॅच जबरी झाली !

कमनशिबी ठरले ब्राझील, इतके चान्स गेले की ५-२ वगैरे जिंकू शकले असते
बेलजीयम गोली ने कमाल केली शंकाच नाही पण कित्येक सोपे चान्स ब्राझील घेऊ शकले नाहीत

एक अविस्मरणीय सामना !
ब्राझील हरलयाचं वाईट वाटलं पण बेल्जियम जिंकली याचं नवल नाही वाटलं. ब्राझीलने अनेक जोरदार हल्ले केले, बेल्जियमने मोजक्याच पण वेगवान, अचूक व निर्णायक चाली रचल्या ! बेलजियमचा गोली ब्राझीलसाठी मोठाच अडथळा ठरला, हेही आहेच !

Pages