फूटबॉल वर्ल्डकप - २०१८

Submitted by Adm on 4 June, 2018 - 17:23

रशियात होऊ घातलेला यंदाचा फूटबॉल वर्ल्डकप पुढच्या गुरुवारी म्हणजे १४ तारखेला सुरू होत आहे.
स्पर्धा दहा दिवसांवर आली तरी इथे काहीच हालचाल नाही म्हणून वातावरण तापवण्यासाठी, आपल्या आवडत्या टीम्सना चिअर करण्यासाठी आणि नावडत्यांना घा.पा. बोलण्यासाठी हा धागा !

ऑफिशिअल वेबसाईटः http://www.fifa.com/worldcup/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

पग्या तू जागा आहेस होय? तू गाढ झोपेत गेला आहेस असंच वाटत होतं गेली दोन वर्षे.. तुझ्या लाडक्या टेनिस वर एकही धागा काढला नाहीस. डायरेक्ट फुटबॉल वर धागा. हे तर अजूनच भारी..

माझी लाडकी टीम अर्थातच जर्मनी आहे आणि नंतर अर्जेंटिना.. बघू यंदा के होते ते.. शेवटच्या फ्रेंडली मॅचेस मध्ये जर्मनीची वाट लागली आहे पण.. सो जरा चांगले झाले आहे, प्रत्यक्ष स्पर्धेत पेटून खेळातील आता

आला.. आला... धागा आला...
(चार)सालाबादप्रमाणे जर्मनी आणि एक लिंबूटिंबू टीम यांना मी चीअर करणार.
लिंबूटिंबू टीम अजून ठरायचीय Lol
सध्या रोज पेपरात एकेका ग्रूपचा आढावा येतोय. तो वाचून सध्या स्विस टीम शॉर्टलिस्ट केली आहे.

२०१० च्या वर्ल्डकपला जसे ऑफिशियल साँग फेमस झाले होते तसे गेल्या वेळेस पण फार फेमस झाले नाही आणि यंदाही काही ऐकू येत नाहीये..

नुकतीच व्हॉट्सॅपवर एक अ‍ॅड आली होती - हू टूक द कप? म्हणून ... टीझर टाईप होती; पण मला नाही आवडली.
दरोडा, चोरी असा फील होता त्यात, ते फारसं आवडलं नाही.

<< आमचा आवडता संघ अर्थात ब्राझिल. नेणार करंडक नेमार. >> +१. अर्थात, ब्राझिलच्या खेळातील जादूई नजाकत आतां उतरणीला लागलीय असं असूनही !!

अरे वा! धागा काढल्याबद्दल धन्यवाद. वर्ल्डकप ऐरणीवर आणि हापिसातला आमच्या सेक्शनचा टिव्ही बंद पडलाय Sad फ्रेंच ओपनच्या मॅचेसचे सुद्धा शेवटचा सेट, शेवट्चे २-३ गेम्स असं काहीही बघता आलं नाही यंदा.

करा हो एंजॉय तुम्ही वर्ल्ड्कप ; २०१८त रशियातला फुटबॉल नाही पाहिलात म्हणून
इथें २०१९मधे आपला फुटबॉल व्हायचा थोडाच थांबणार आहे !!!
fcorldcup.jpg

<< वर्ल्डकप ऑफकोर्स आम्ही (जर्मनी) जिंकणार >> ठीक आहे ! आतां, प्रत्यक्ष ऑनकोर्स कोण जिंकतो , तें आपण बघूं !! Wink

<< जर्मन्स अगदी काटेकोरपणे नियम पाळून खेळतात, ... >> कोणत्याही खेळात [ किंबहुना कोणत्याही क्षेत्रात ] शिस्त हा जर्मनांचा स्थायीभावच असावा; उच्च दर्जाचं कितीही कसब अंगीं असलं तरीही संघाच्या ठरलेल्या डावपेंचांत तें बसत नसेल तर जर्मन खेळाडू स्वतःच्या खेळाचं कसब दाखवण्याच्या फंदात कधींही पडणार नाही. अभ्यासपूर्वक आंखलेले डांवपेच मैदानावर जीव पणाला लावून अंमलात आणणं , हें जर्मन संघांचं ब्रीदवाक्यच असावं. म्हणूनच जर्मन संघ सर्वच खेळात कडवा प्रतिस्पर्धी समजला जातो. अर्थात, उत्स्फुर्तता व वैयक्तीक खेळाची चमक यांच्या अभावामुळे जर्मनीचा खेळ कमी आकर्षक व बराचसा प्रेडिक्टेबल' होतो, हेंही खरं असावं..

आमचा (म्हणजे माझा :P) पाठींबा जर्मनीला !!
गेल्यावेळची फायनल मी कैलास मानससरोवर यात्रेदरम्यान तिबेटात तकलाकोटला पाहिली होती. फार फार मजा आली होती जर्मनीला जिंकताना पाहून. Happy
त्याआधीच्या स्पर्धेतही जर्मनीला चांगला चान्स होता पण नेमका बॅलॅक इंज्युअर्ड झाला.
रशिया यजमानपद कसं भुषवतय ते बघायची पण उत्सुकता आहे.

जर्मनीच्य संघाबदल रास्त आदर असून व तो संघ विजेता ठरला तर आश्चर्य वाटणार नसूनही, माझा आवडता संघ मात्र ब्राझिलच !

जर्मनी माझा संघ
मी गेल्या कित्येक वर्षांपासून सपोर्ट करतोय आणि त्यांचा खेळ predictable झालाय याला प्रचंड अनुमोदन.
मधल्या फलीकडून विंगर कडे आणि मग तिथून गोलपोस्ट पाशी आत वळवायचा हे घिसापिटा टेक्निक जर्मनी इतक्यांदा वापरते की त्या मागे काय कारण आहे समजत नाही.
पण त्यांचा काउंटर अटॅक्स चा वेग आणि अक्षरशः चवताळून तुटून पडणे बघायला फार मजा येते.
यावेळी जर्मनीचा खंदा मिडफिल्डर श्वाईनस्टिंगर, फिलिप लॅम आणि डिफेन्सला उंचाड्या मेर्तेसकर नसणार आहेत.
फार मिस करेन या तिघांना. अर्थात तसे त्यांचे मिस करण्यासारखे खूप खेळाडू आहेत बलाक, मिरोसलाव क्लोज, इ.

पण आजून नुयर आहे, बेस्ट गोलकीपर एव्हर
हमल्स, खेदिरा, जेरोमि बोटांग ही जुनी पिढी पण आहे
नवीन खेळाडू फारसे माहिती नाहीत.

जर्मनी नंतर आपला सपोर्ट अर्जेंटिना ला
मेस्सीला कप उंचावताना बघायला आवडेल शेवटची संधी आहे
तशीच रोनाल्डो ची पण, पण पोर्तुगाल टीम कडून काही अपेक्षा नाहीत.

बाकी टिम्स मध्ये इटली, नेदरलँड नसल्याचा धक्का आहे.
जिंकू नयेत असे वाटणाऱ्या टीम मध्ये पहिली स्पेन, लै मजोरडे आहेत क्रिकेटमधले ऑस्ट्रेलियन
ब्राझील पण जिंकू नयेत असे वाटतं, खूप वेळ जिंकून झालाय.

गट A रशिया सौदी अरेबिया इजिप्त उरुग्वे
गट B पोर्तुगाल स्पेन मोरोक्को इराण
गट C फ्रान्स ऑस्ट्रेलिया पेरू डेन्मार्क
गट D आर्जेन्टिना आइसलँड क्रोएशिया नायजेरिया
गट E ब्राझील स्वित्झर्लंड कोस्टा रिका सर्बिया
गट F जर्मनी मेक्सिको स्वीडन दक्षिण कोरिया
गट G बेल्जियम पनामा ट्युनिसिया इंग्लंड
गट H पोलंड सेनेगाल कोलंबिया जपान

गटबाजी

माझा अंदाज

अ गटातून रशिया, उरुग्वे
ब गटातून स्पेन, पोर्तुगाल
क गटातून फ्रान्स डेन्मार्क किंवा ऑस्ट्रेलिया
ड गटातून अर्जेंटिना, क्रोएशिया किंवा नायजेरिया
ई गटातून ब्राझील आणि स्वित्झर्लंड
एफ गटातून जर्मनी आणि स्वीडन (पण हा गट लईच खतरा आहे, मेक्सिको आणि कोरिया अचानक दणका देऊ शकतात)
ग गटातून इंग्लंड आणि बेल्जियम
ह गटातून पोलंड आणि जपान (डार्क हॉर्स कोलंबिया)

बाद फेरी

रशिया वि. पोर्तुगाल - पोर्तुगाल
स्पेन वि. उरुग्वे - स्पेन
फ्रान्स वि. क्रोएशिया किंवा नायजेरिया - फ्रान्स
अर्जेंटिना वि. डेन्मार्क किंवा ऑस्ट्रेलिया - अर्जेंटिना
ब्राझील वि. स्वीडन - ब्राझील
जर्मनी वि. स्वित्झर्लंड - जर्मनी
इंग्लंड वि. जपान - इंग्लंड
पोलंड वि. बेल्जियम- बेल्जियम

पुढे मग

स्पेन वि. पोर्तुगाल (ब्रेन वि. हार्ट)
फ्रान्स वि. अर्जेंटिना (गो मेस्सी गो)
ब्राझील वि. जर्मनी (बाबो इथेच दंगा आेह सगळा)
इंग्लंड वि. बेल्जियम (इपीएलवाले जिंकतील)

स्पेन वि. अर्जेंटिना
जर्मनी वि. इंग्लंड

किंवा

पोर्तुगाल वि. फ्रान्स
ब्राझील वि. बेल्जियम

<< अरे कुठे गायबले सगळे? >> सध्या इतर कांहीं रंगतदार सामने सुरूं आहेत, त्यांत दंग असावेत - ' पुणेरी पगडी वि. फुले पगडी ', किम जोन्ग वि. डोनाल्ड ट्रम्प', इ.इ. पण वेळेवर हजर होतील या धाग्यावर !! Wink

अरे, पण सर्वत्र चर्चा असलेल्या आपल्या देशातील
संघाबद्दल मात्र कांहींच कां नाही तुझ्या त्या धाग्यावर !
raadaa.jpg

भाऊ, भारतीय फुटबॉल संघ आणि संघटना बीसीसीआय च्या ताब्यात द्या. १२ वर्षात अंतिम स्पर्धेत पोचण्याची ग्यारंटी.

आमच्या ब्राझिल संघाची तयारी जोरदार झाली आहे. नेमारने धडाका चालू केला आहे याची इतर सर्वांनी नोंद घ्यावी. विशेषतः जर्मनी आणि त्यांच्या चहात्यांनी.
(मी ब्राझिलमधे असताना १० वर्षांपूर्वी नेमार मोठा खेळाडू होईल असे लिहिले होते. (मायबोलीच्या ब्राझिल फुटबॉल या धाग्यावर) . ते खरे ठरले. Happy

<< १० वर्षांपूर्वी नेमार मोठा खेळाडू होईल असे लिहिले होते. (मायबोलीच्या ब्राझिल फुटबॉल या धाग्यावर) . ते खरे ठरले. >> प्रदीर्घ व दैदिप्यमान कारकिर्द असूनही, देशासाठी विश्वचषक जिंकण्यात स्वतःचा सहभाग असण्यातच सचिनला कारकिर्दीचं खरं सार्थक वाटलं ; नेमकं तसंच नेमारलाही तितक्याच तीव्रतेने वाटतं का, हें पहाणंही ह्या विश्वचषकात औत्सुक्याचं ठरेल .

टाईम्समध्ये आलेलं सेंटरफोल्ड शेड्युल काढून घेऊन दारावर चिकटवलं. आपली वर्ल्ड कपची तयारी झालेली आहे. Lol

लोकसत्तातही आलं आहे, पण त्यात इतका फाफटपसारा भरलाय की विचारता सोय नाही. साधं, सोपं, पटकन नजर टाकायला सोयीचं शेड्यूल छापायचं नसेल तर उपयोग काय त्याचा Uhoh

सलाह खेळला तर माझी लिंबूटिंबू टीम इजिप्त !

त्यांच्या साईट वर चांगल्या फॉर्मेटमध्ये आहे शेड्युल. त्याची प्रिंट आऊट पण लाऊ शकतेस.
आमच्याकडे सकाळी मॅचेस लागणार आहे. मी ऑफिसात आमच्या एरियात ठेवायला मोठा टिव्ही मिळवला आज! आता उद्या त्यावर स्ट्रिमिंगची सोय झाली की तयारी झाली. Happy फुटबॉलची मॅच संपली की मग त्याच टीव्हीवर विंबल्डनही पहाता येईल. झालच तर इंग्लंड टुरच्या मॅचेसपण. ह्या सगळ्यातून वेळ मिळाला तर एखाद्या मिटींगसाठी प्रोजेक्टर म्हणूनही वापरू तो टीव्ही. Proud

फुटबॉलची मॅच संपली की मग त्याच टीव्हीवर विंबल्डनही पहाता येईल. >>> Lol
हो ना, विंबल्डन आणि फुटबॉलच्या नॉक-आऊट मॅचेस साधारण एकाच सुमाराला असतील.

बाकी, फुटबॉलच्या प्राथमिक फेरीच्या महत्त्वाच्या मॅचेस बहुतेक सगळ्या रात्री ११:३० ला सुरू होणार आहेत Sad
स्पेन-पोर्तुगाल मॅचने भौनी करायची ठरवली होती. पण ती सुद्धा ११:३० च्या पुढेच आहे.

Pages