फूटबॉल वर्ल्डकप - २०१८

Submitted by Adm on 4 June, 2018 - 17:23

रशियात होऊ घातलेला यंदाचा फूटबॉल वर्ल्डकप पुढच्या गुरुवारी म्हणजे १४ तारखेला सुरू होत आहे.
स्पर्धा दहा दिवसांवर आली तरी इथे काहीच हालचाल नाही म्हणून वातावरण तापवण्यासाठी, आपल्या आवडत्या टीम्सना चिअर करण्यासाठी आणि नावडत्यांना घा.पा. बोलण्यासाठी हा धागा !

ऑफिशिअल वेबसाईटः http://www.fifa.com/worldcup/

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<< ह्या सगळ्यातून वेळ मिळाला तर एखाद्या मिटींगसाठी प्रोजेक्टर म्हणूनही वापरू तो टीव्ही. >> Wink पण, त्यातूनही जरासा वेळ काढून अधून मधून इथंही डोकवत जा, प्लीज !

जितक्या बघता येतील तितक्या मॅचेस बघणार, पण घरच्यांच्या तावडीतून टीव्ही सुटला की मग, तो पर्यंत गपगुमान झी आणि कलर्स मराठी बघायला लागणार..

<< पण घरच्यांच्या तावडीतून टीव्ही सुटला की मग,>> घरोघरीं मातीच्याच चूली ! माझा जांवई मात्र ठार फुटबॉलवेडा असल्याने त्याचं मॅच पहाणं असेल तेंव्हा माझी मुलगी टिव्हीकडे जायलाही धजत नाही ! थोडक्यात, आतां मुलीकडे मुक्काम ठोकणं आलंच !!

कोणीतरी ईथे मायबोली लीग बनवा, मग बाकीच्यांनी त्या लीगला सबस्क्राईब करून आपापले प्रेडिक्शन्स येऊ द्या.

https://bracketchallenge.fifa.com/bracket/prediction

मी ऑलरेडी दुसर्‍या लीग मध्ये असल्याने मला बनवता येणार नाही... पण खूप सोप्पं आहे सगळं

नेवर माईंड....
मी Maayboli नावानं लीग बनवले आहे.

लॉगिन बनवून खालच्या लिंक वर क्लिक केले की आपोआप माय्बोली लीग जॉईन करण्यासाठी विचारणा होईल.

https://bracketchallenge.fifa.com/bracket/leaguejoin/53b8205c

मग bracket मध्ये जाऊन ग्रूप स्टेज ते फायनल्स पर्यंत आपापले प्रेडिक्शन्स सिलेक्ट करून सबमिट करा. प्रत्येक बरोबर प्रेडिक्शन्स ला पॉईंट मिळतील. एकच दिवस राहिला आहे.

पण घरच्यांच्या तावडीतून टीव्ही सुटला की मग
>>>
याच प्रकाराला कंटाळून मी दोन वर्षांपूर्वी घरात दुसरा टीव्ही घेतला Wink

हायझेनबर्ग - केलं मी पूर्ण आणि फँटसी टीम पण तयार केली >> तू थोर_माणूस आहेस का?
हिम्सकूल ने केले आहे असे दिसते आहे.

अजून कोणाला ब्रॅकेट चॅलेंज घ्यायचे असल्यास ४० मिनिटे बाकी आहेत.

२०२६ फिफा वर्ल्ड कप अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको संयुक्तपणे आयोजित करणार म्हणे! आणि अंतिम सामना इथे आमच्या न्यूजर्सीत इस्ट रदरफोर्ड ला असे ऐकले आज बातम्यांत !! अमेरिका कॅनडा ला आधी क्वालिफाय व्हायचे बघा म्हणावे Happy

अमेरिका कॅनडा ला आधी क्वालिफाय व्हायचे बघा म्हणावे >> सध्याच्या रूल्स नुसार होस्ट नेशन्स क्वालिफाईंग फेज मधून न जाता आपोआप क्वालिफाय होतात Happy त्यासाठीच लॉबी करून होस्ट करण्याचे कंत्राट मिळवले आहे Proud
हा रूल सध्या अंडर डिबेट आहे पण २०२६ साठी ला अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको क्वालिफाय झाले हे नक्की.
भारतानेही २०३० साठी प्रयत्न करायला हवा.. पैसे माल्या आणि मोदी कडून घ्या म्हणावं Wink

रशियाच्या जर्सीवरची नावं नीट वाचताच येत नाहीयेत...
तो फॉन्ट नाही आवडला अजिबात Proud

(मुहूर्ताची मॅच बघावीच म्हटलं :P)

स्पेन वि. पोर्तुगाल ३-३ ! मिडफील्डमधे स्पेनचा 'शॉर्ट-पासींग' खेळ लाजवाब ! पहिल्या पांच मिनीटांतच पोर्तुगालला पेनल्टी वरचा गोल बहाल करूनही स्पेनने आपल्या गुणवत्तेची झलक दाखवलीच. रोनाल्डोने पोर्तुगालला वांचवलं. सामने रंगतदार होणार अशी चिन्हं दिसत आहेत !

स्पेन पोर्तुगाल नी इराण साठी मार्ग थोडा सोपा करून ठेवला पण, इराण व्यवस्थित खेळून जात दोन्ही मॅच ड्रॉ करू शकले तर तेच पुढच्या राउंडला जातील. फक्त गोल फरक मध्ये नको तडमडायला.

इराणला सेल्फ गोल मुळे मिळालेला विजय बोनस आहे..

मेसीने पेनल्टी किक चुकवली व चक्क आईसलॅडला पाॅईंटस बहाल केले.
पेरूने डेन्मार्कची भंबेरी उडवली ; पेरूने पेनल्टी चुकवली नसती, तर लढत 0_1 ऐवजी नक्की 1_1 तरी झालीच असती...

जर्मनीच्या शिट्ट्या वाजल्या राव,मेक्सिकोनी फास्ट ब्रेक अटॅक जबरी केले, त्यामुळे जर्मनी वर पहिल्या हाफ मध्ये प्रेशर आलं फार, आणि गोल देऊन बसले, दुसऱ्या हाफ मध्ये प्रयत्न जोरात केले पण ऑफ टार्गेट खूप मारले, फक्त 33 टक्के ऑन टार्गेट होते एकूण शॉट्स पैकी..

<< मेक्सिकोनी फास्ट ब्रेक अटॅक जबरी केले,>> +१. जर्मनी त्यामानाने अटॅक करताना गोल बॉक्सजवळ खूपच 'पासिंग'मधेच अडकून पडत होते असं जाणवलं. मेक्सिको नक्कीच अधिक संधीसाधू होते !

मेक्सिकोने जबरदस्त खेळ केला. जर्मन टीम नेहमीसारखी वाटली नाही. मेक्सिको काउंटर अ‍ॅटॅक मधे कधिही गोल करतील असेच वाटत होते. खूपच वेगवान आहेत मेक्सिकन. मैदानी गोल तर अप्रतीम. स्वतःवर विश्वास ठेवला तर यावेळेस खूप पुढे जाउ शकतात.
ब्राझिलला फिनिशिंग जमत नव्हते. त्यांचा गोल छान झाला असला तरी एकंदर खेळ सुमार झाला.
जर्मनी व ब्राझिल जिंकायला जास्त फेवरीट आहेत असे आता म्हणता येणार नाही.

<< ब्राझिलला फिनिशिंग जमत नव्हते. त्यांचा गोल छान झाला असला तरी एकंदर खेळ सुमार झाला.>> मला तर उलट ब्रझिलच्या खेळात [ गेल्या विश्वचषकाच्या तुलनेत ] खूपच सुसूत्रता असल्याचं जाणवलं. स्विस अतिशय छान खेळले तरी नेमारला 'मार्क' करताना मात्र ते आडदांडपणा करत होते हें निश्चित. पहिल्याच सामन्यातला त्याच्या दुखापतीचा धोका टाळण्याकरतां ब्राझिलने कदाचित पहिला गोल नोंदवल्यावर आक्रमण जरा आवरतं घेतलं असण्याची शक्यता आहे.

पहिल्याच सामन्यातला त्याच्या दुखापतीचा धोका टाळण्याकरतां ब्राझिलने कदाचित पहिला गोल नोंदवल्यावर आक्रमण जरा आवरतं घेतलं असण्याची शक्यता आहे.>> असेल, असेल. तस असल तर बरच आहे.
काल इग्लंड बरे खेळलेले दिसतायत. बेल्जियम फॉर्मात.

<< सगळ्याच टॉप टिम्स पहिल्या राउंड यामध्ये गडबडल्या आहेत >> व त्यामुळे ग्रुपमधल्या उरलेल्या दोन सामन्यांत त्यांच्यावर 'क्वालिफाईंग'साठी खूप दडपण येणार आहे . परिणामीं, अधिक गडबड होण्याचीही दाट शक्यता आहे. तात्पर्य - सध्यां तरी अंतिम सोडाच पण पुढच्या फेरीबद्दलही आडाखे बांधणं जरा धार्ष्ट्याचंच !!

" मला मेलीला सगळेच सघ सारखे " म्हणतेस ना नेहमी ? मग,
अगदीं शंभर टक्के, विश्वचषक तुझा संघच पटकावणार !!
anand.jpg

Pages